Friday, 22 September 2017

तू ये ना कधी ....!

तू ये ना कधी ....!




माझ्या रम्य आठवणींची साउली बनुनी ये ना  कधी.....!

उमललेला पारिजात मी समजूनि मनमानसी  ओंजळी मज  घे ना कधी...!

आलिंगण्या या  सागरा  तू   होऊनी  सरिता सखी ये ना कधी...!

स्वप्नातल्या त्या मधु मिलनाची स्वरवेली जणू तू होऊन ये ना कधी......!

अंतर्मनीची स्वररागिणी  तू ,सावनी बनुनी झरझर बरस ना कधी...!

लवते न लवते पापणी हि जशी,आठवते मला तू तत्परी..जणू स्पर्शणारी झुळूक बनुनी नयन सुख दे नां कधी....!


मनाचिया व्याकुळतेची क्षुधा शमवणारी वर्षा सरी होऊन बरस ना कधी...!

जणू बासरी तू वृन्दावनीची,  संतोषण्या  मन माझिया तृप्ती बनुनी ये ना कधी...!

कांती तुझी मृण्मयी ,दरवळण्या प्रीतगंध तो..कस्तुरी होऊनी ये ना कधी...!

चंद्र्प्रभेसम तेजस्विनी तू.,सारण्या अंधार या मनमंदिरी चांदणी होऊनी तू ये ना कधी...!

लावण्याची जणू रसिकमोहिनी तू...,रमविण्या कृष्णास या राधा बनुनी ये ना कधी....!


अहिर भैरव


Monday, 18 September 2017

About malayalis in my life….. माझ्या आयुष्यातील केरळी लोकांबद्दल.... !

About malayalis in my life…..
माझ्या आयुष्यातील केरळी लोकांबद्दल....



नमस्कार राजे.......!

आज काहीतरी वेगळ घेऊन आलोय..तुमच्यासाठी.. नेहमी आवेशात राजकारण आणि समाजकारण यावरच जास्त लिहिल्या जाते माझ्याकडून... पण या व्यतिरिक्त हि एक सुंदर शांत प्रेमळ प्रेरणादायी अस जग आपल्या भोवताली नित्य असते....

 अश्या या जगाचा भाग असून त्याकडे न बघण्याची चूक माझ्याकडून होणे नाही.. आपल्या आयुष्यात येणारी वेगवेगळ्या प्रकारची माणसे आपल्याला खूप काही शिकवून जातात...

 आजूबाजूची लोक बदलली कि आपले आयुष्यही बदलत जाते..त्यातही नवे रंग भरले जातात... कित्येकदा या गोष्टी आणि बदल नकळत होत असतात ..आपल्याला जाणीव सुद्धा होऊ नये इतक्या हळुवारपणे... हे सगळ होत असते....


लहानपणापासून कॉस्मोपॉलिटिन म्हणजे आपल्या “तारक मेहता का उलटा चष्मा” आहे न अश्या प्रकारच्या लोकवस्तीत राहतोय....आमच्या पश्चिम नागपूरला सर्वात जास्त केंद्र सरकारची मोठमोठी कार्यालये आहेत... 

त्यामुळे या भागात सरकारी कर्मचार्यांच्या वसाहती बर्याच प्रमाणात आहेत.. यामुळे बंगाली मल्याळी तमिळ उडिया इतर सर्व भारताच्या भाषिक समुदायाचे लोक इथे असतात आणि त्यांच्याशी संपर्क येतो.. आज माझ्या आयुष्यातल्या मल्याळी किंवा केरळी लोकांबद्दल मी लिहिणार आहे...

आयुष्यातले पहिले केरळी कुटुंब म्हणजे माझ्या घराच्या मागे राहणारे शाजू अंकल आणि त्यांचे कुटुंब  काकू...
आणि त्यांच्या दोन मुली काव्या  आणि दिव्या... 


Image result for kerala map

काका केंद्रीय संस्थेत नोकरी करतात तर काकु  घरी असतात दोन्ही मुली शिकणाऱ्या एक १० वीत तर दुसरी १२ वी ला... फार छान कुटुंब आहे... हे लोक धर्माने क्रिश्चन आहेत पण सगळेच मल्याळी लोक स्वतःला मल्लीक्रीश्चन म्हणजे मल्याळी क्रिश्चन म्हणवून घेतात .. हे लोक इथे येऊन मराठी शिकले.. सोबत घरीच आपल्या मुलींना मल्याळी लिहायला पण शिकवण्यात आले... केरळी लोकांना मराठीचा दुस्वास नाही..ते जिथेही जातात तिथल्या भाषा संस्कृतीशी एकरूप होतात आणि तेही स्वतःची भाषा संस्कृती सणवार, खाद्य संस्कृती जोपासून... या काकू नेहमी क्रिसमस ला आमच्याकडे एक मोठ्ठ भांड भरून केक आणि इतर गोड पदार्थ पाठवतात.... स्वभावाने खूप चांगले आणि मनमिळाऊ लोक आहेत.. कित्येकदा केरळी पदार्थ जसे अप्पम सांबर इडली डोसा सुद्धा पाठवतात... अर्थात आपण हे घरी सुधा करून खात असतो पण त्यांच्या हातच केलेल हे चवीने वेगळा असत.... तसेच colony मधल्या गणेश उत्सवात वर्गणी पासून विविध कार्यक्रम मध्ये भाग घेण्यापर्यंत यांचा सहभाग असतो... क्रिश्चन असुनहि.. त्यांन्च्यात हिंदू विरोध नाही..आणि आम्ही हिंदू सुद्धा क्रिसमस च्या शुभेच्छा आणि इतर वेळेस त्यांच्यात सह्भागी  होत असतो...

यानंतर दुसरे मल्याळी कुटुंब म्हणजे जिनी काकू आणि त्यांची शिकवणी... ६ वीत असताना मी इंग्रजी चांगल व्हावं म्हणून जिनी रॉय या बाईंची शिकवणी लावली होती ..

बाई स्वभावाने कडक पण वर्ग संपल्यावर प्रेमळ... या जिनी काकुनकडे मी ५ वर्ष शिकलो... मला काहीही इंग्रजी यायचं नाही...माझे हसे व्हायचे... पण या काकुंमुळे मी आज फाडून ठेवतो लोकांची... माझ्या मित्रांमध्ये बोलायला जायचं असला तर मलाच पुढे करतात... 

अर्थात इंग्रजी जर कोणामुळे आल तर जिनी काकुमुळे... याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत यांच्या मुलासोबत म्हणजे कुक्कु सोबत मी मल्याळी लिहायला पण शिकलो... मला कैरली भाषेची लिपी अवगत झाली ती यांच्यामुळेच... 


Image result for onam men

शिवाय या काकूंनी मला बायबल आणि प्रभू  येशूच्या खूप गोष्टी सांगितल्या शिकवल्या... आणि माझ्याकडून महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक आंदोलने या गोष्टी जाणून घेतल्या... अचानक या काकुंशी संपर्क तुटला.. कारण या बदली होऊन सुरत ला कि इंदूर ला गेल्या......

या नंतर ७ वर्षे गेली... february २०१७ पासून मी घराजवळच्या केटी नगरच्या मैदानावर खेळायला जाऊ लागलो... तिथे माझी मैत्री पूर्णिमा ,अजिन रोशन आणि शेनो... या चौघा मल्याळी मित्रांशी झाली... यासोबतच काही मराठी आणि काही बंगाली मित्र  मैत्रिणी सुद्धा आहेत... 

गेल्या ६-७ महिन्यात आम्ही खूप मस्ती केलीय badminton फुटबाल ... एकमेकांचे वाढदिवस इतर सोहळे... रविवारची पार्टी ... breakfast किंवाअन्य काही कार्यक्रम अगदी मिळून मिसळून करतोय...  यांच्या संपर्कात येऊन मी काही मल्याळी शब्द शिकलो जसे सुगम आणू ?? म्हणजे कसे आहात... इल्ले इल्ले म्हणजे नाही नाही... स्नेहम प्रेमम... कुन्जमणी ... कुंडी चंदी लग्नं जाथकम ... असे  खूप...... 








 काही दिवसांपूर्वी ओणम हा केरळी लोकांचा प्रमुख  सण साजरा झाला तेव्हा नागपुरातील केरला समाजं या संस्थेने मिरवणूक काढली... त्यात केरळी हिंदू आणि क्रिश्चन असे दोन्ही बांधव लुंगी ज्याला मुंड म्हणतात ते घालून सह्भागी झाले होते..शिवाय मुली पांढरी पिवळ्या जरीची साडी घालून होत्या अगदी छान प्रकारे फुलांच्या रांगोळ्यांनी सजावट केलेली होती...  

या सहा महिन्यात मी निरीक्षिले  कि... हे लोक आपल्या भाषा आणि संस्कृती शी फार जुळलेले असतात.. नागपुरात केवळ एका multiplex मध्ये महिन्याला एकदाच मल्याळी चित्रपट येतो तिथे हे लोक आवर्जून बघायला जातात..अगदी फुल असतो हॉल,,, जन्म इथे झाला असला तरी मल्याळी कुटुंबाने त्यांवर खूप चांगले संस्कार केले आहेत.. हे यातून दिसते .. या सर्व मित्रांच्या मोबाईल मध्ये सर्वात जास्त मल्याळी गाणी असतात..त्यातले मीपण एखादे ऐकून पहिले मला आवडले... कान्नोलाम...नावाचे... ...


 मल्याळी चित्रपट असो... भाषा असो..यावर अगदी मनापासून यांचे प्रेम असते... एक मल्याळी दुसर्या मल्याळी मित्राशी मल्याळी भाषेतूनच बोलतो.. हे विशेष .पण कोणतेच मराठी दुसर्याशी मराठी बोलत असतील हे क्वचीत सुद्धा आढळत नाही... आपल्या भाषा संस्कृतीची पाळेमुळे येणाऱ्या पिढीच्या मनात कशी रुजवावित हे यांच्याकडून शिकावे.. 

अल्प जरी असले तरी हे लोक एकमेकांना धरून राहतात,,हिंदू असोत वा  क्रिश्चन भाषा हा यांच्यातील सर्वात मोठा दुवा असतो... केरळ मध्ये ओणम हा बळीराजा शी संबंधित उत्सव असो किंवा त्रिशूर महोत्सव ..वल्ला पोल्लाकाराम असे आणखी फार सण असतात जे ... केरळमध्ये...  सगळ्या धर्माचे  लोक साजरे करतात.....

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच हिंदू किंवा भारतीयत्व हे धर्म नसून एक संपन्न जीवन शैली असल्याचे प्रतिपादन केले होते... त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे केरळी लोक.... 


Image result for onam

असा गुणी समाज निर्माण केला गेलाय कि या राज्याची भाषा संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही हि मंडळी असलीत न तरीही लयास जाणार नाही...  माझ्या यातल्या दोन मित्रांचे आईबाबा निवृत्त होऊन केरळला कायमस्वरूपी शिफ्ट होत आहेत.. तब्बल ३५-४० वर्षे इथे राहूनसुद्धा इथे एकही घर यांनी घेतलेले नाही.. पण केरळ मध्ये २-२ घर आहेत..हे सगळे मित्र सुद्धा ... शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथेच जाणार आहेत..... 

जन्म इथे झाला नागपूरच्या मराठी आणि बाट्वून हिंदी केलेल्या श्रीमंत वातावरणात राहूनही परतीची ओढ यांना जाणवते आणि मानवते हे अत्यंत कौतुकास्पद आहे...   आपल्या संस्कृतीच दाक्षिण्य कसं जोपासाव मनामनात रुजवाव आणि नेहमी साठी टिकवून ठेवावं हे कोणीही यांचे कडून यांचेकडून शिकावं...

 नाहीतर आहेच संघ मुख्यालायातले गोडबोले भटजी आणि धरम पेठेतले चतुर शेटजी (राजकारणी )... एक हिंदू राष्ट्र बनविण्याच्या बाता करतय आणि दुसरे परप्रांतीयांच्या अल्प  मतांसाठी.. बहुसंख्य समाजाची मराठी भाषा बोलायलाही लाज वाटवून घेतात.. आजकाल नागपुरातले सगळे संघाचे कार्यक्रम हिंदीत होतात... ९० टक्के मराठी लोकसंख्या असूनही असा दलीद्दरवाडा ..... 

या  जखमेवर मीठ म्हणून... नागपूरची महानगरपालिका आताशा हिंदीत काम करू लागलीय ...जागोजागी पोस्टर आहेत...कचरा कुडे दान मे डालिये अश्या स्वरूपाचे.... मेट्रोला माझी मेट्रो असे  नाव होते ते बदलून महामेट्रो केले गेले तेही  या भाषिक सामाराज्यावादी लोकांच्या मतांसाठी ..

. कुडे दान मे या भैय्या लोकांची हिते जपणाऱ्या भाजपलाच टाकयला पाहिजे...     

मराठी भाषा संस्कृती ची वाट लावून कोणते हिंदू राष्ट्र येणार
 माहित नाही...
मोगलांच्या भाषेला देशावर थोपवून आणि हजारो वर्ष जुन्या देशी द्रविड भाषा संपवून काय साध्य करतय भाजप ते देवच जाणे..... असो...... 

कधी कधी आपल्या राज्याचा हा र्हास बघून दुखः होते... पण कुठेतरी आनंद आहे... कि केरळी तमिळ कानडी तेलुगु हि मंडळी आपल्या भाषा, राज्ये आणि संस्कृती किती छान पणे जोपासत आहेत.... मी केरळी लोकांकडून खूप काही जाणून घेतले .
.यामुळे माझ्या ज्ञानात भरच पडली.. याचा माल आनंद आहे..

या लेखाद्वारे ..आदी शंकराचार्यांच्या केरळ या द्रविड देशाला माझे आणि सर्व मराठी बांधवांचे शतशः नमन.....




हा लेख कोणत्याही जाती धर्म भाषिक समुदायाबद्दल द्वेष भावनेच्या हेतून लिहिलेला नाहीये....


तूर्तास इति शम,...........!



Friday, 15 September 2017

Engineer's Day.....!

*देशोदेशी वेगवेगळ्या दिवशी इंजिनिअर्स डे साजरा केला जातो.*






*भारतात तो १५ सप्टेंबरला साजरा होतो. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा वाढदिवस. त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल आदरांजली म्हणून भारत सरकारने त्यांचा वाढदिवस इंजिनिअर्स डे म्हणून जाहिर केला आहे. १८६१- १९६२ असं ९९ वर्षांचं आयुष्य लाभलेले विश्वेश्वरय्या हे शिक्षणानं सिव्हिल इंजिनिअर होते.*
*त्यांनी त्यांच्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उपयोगाची कामे करण्यासाठी केला.




 नवीन शोधही लावले. एकेकाळी घेतलेल्या सर्व्हेनुसार ते कर्नाटकातले सर्वात जास्त प्रसिद्ध व्यक्ती होते.*
*त्यांच्या कामाचं आणि हुशारीचं महत्व इतकं होतं की ब्रिटिश साम्राज्यालाही त्यांची दखल घ्यावी लागली होती. तर आजच्या या  खास दिवशी पाहूयात ’फादर ऑफ मॉडर्न म्हैसूर- सर विश्वेश्वरय्या’ यांच्या कार्याबद्दल काही माहिती-*

*इंग्रज सरकारकडून ’सर’ हा किताब*
*१५ सप्टेंबर १८६१ला कर्नाटकच्या एका खेड्यात  जन्मलेले एम. विश्वेश्वरय्या १९१२ ते १९१८ या काळत म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. त्यांची हुशारी  आणि समाजोपयोगी कामे पाहून  राजा जॉर्ज (पाचवा) याने त्यांना १९१५ मध्ये  ’सर’ ( Knight Commander)  हा किताब दिला.*

*भारत सरकारकडून भारतरत्न*
*भारत सरकारने सन १९५५मध्ये विश्वेश्वरय्यांचा ’भारतरत्न’ या देशातल्या सर्वोच्च बहुमानाने सत्कार केला.*
*या शिवाय लंडलच्या सिव्हिल इंजिनिअर्स इन्स्टिट्यूटने त्यांना मानद सभासदत्व दिलं होतं. त्यांना भारतातल्या आठ युनिव्हर्सिटीजची मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली होती, तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने विश्वेश्वरय्यांचा फेलोशिप देऊन सत्कार केला होता.*

*आपोआप उघडणारे धरणाचे दरवाजे*
*पाण्याची पातळी वाढल्यावर आपोआप उघडणार्‍या धरणाच्या दरवाज्यांची कल्पना सर विश्वेश्वरय्यांचीच. नुसत्या कागदावर ती कल्पना न मांडता १९०३ साल खडकवासला धरणात असे दरवाजे बांधून त्यांनी ती अंमलात देखील आणली. खडकवासल्यामध्ये ही यंत्रणा व्यवस्थित चालते आहे हे पाहून पुढे ग्वाल्हेरच्या टिग्रा आणि कर्नाटकातल्या कृष्णराजसागर या दोन धरणांमध्येही असे दरवाजे बसवण्यात आले.*

*कृष्णराजसागर धरण*
*म्हैसूरला गेल्यावर वृंदावन गार्डन्सला भेट दिली नाही असं होत नाही.*
*आता त्या गार्डनमधल्या नाचर्‍या कारंज्यांचं कौतुक राहिलं नसलं तरी एकेकाळी ते म्हैसूरचं मोठं आकर्षण होतं. हे गार्डन आहे कृष्णराजसागर धरणाच्या इथेच.*
*सर विश्वेश्वरय्यांनी या धरणाच्या बांधकामाची देखेरेख केली होती. या धरणामुळे त्या काळचं आशिया खंडातलं सर्वात मोठं जलाशय तयार झालं होतं.*
*विशाखापट्टणम बंदर*
*विशाखापट्टणम बंदराची समुद्राच्या पाण्यामुळं झीज होत होती.*
*ते रोखण्याचं श्रेय सर विश्वेश्वरय्यांना जातं. इतकंच नाही, तर हैद्राबादची पूर संरक्षण यंत्रणेची संकल्पना त्यांचीच होती.*

*फादर ऑफ मॉडर्न म्हैसूर*
*इंग्रज सरकारच्या काळात कर्नाटक राज्य हे म्हैसूर स्टेट होतं. तेव्हाच्या सरकारच्या साहाय्यानं सर विश्वेश्वरय्यांनी म्हैसूरमध्ये बर्‍याचशा फॅक्टरीज आणि  शाळा-कॉलेजेस चालू केल्या. म्हैसूर सोप, पॅरासिटॉएड लॅब, भद्रावतीमधली म्हैसूर आयर्न ऍंड स्टील वर्क्स, श्री जयचामाराजेंद्र पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट, बेंगलोर शेतकी विद्यापीठ,बेंगलोरमधलं  युनिव्हर्सिटी विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही त्यातली काही उदाहरणं. स्टेट बँक ऑफ म्हैसूर चालू करण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. या सर्व कार्यामुळं त्यांना मॉडर्न म्हैसूरचा पिता मानण्यात येतं*
*त्यांचं  वेळेचं मॅनेजमेंट आणि कामाबद्दलची तळमळ खरोखरीच अतुलनीय आहे. *

रोहिंगे ।

एक जलन मेरे सीने में भी हैं


 एक जलन तेरे सीने में तू
 जल रहा हैं


उस वतन के लिए जिसमे जयचन्दों की फ़ौज




 भी क्या करेंगा इन मृत शरीरो को जगाकर जिसमे न प्राण
हैं न देने को आन


अपने ही देश मे बने शरणार्थीयो की
चिंता न उनका सम्मान और लगे पड़े हैं जयचंद भडवे




रोहिंग्या के विधवा विलाप करो कुछ इस वतन के लिए
न होंगे जयचन्द न होंगे उनके बाप ।




।। सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल मे हैं देखना हैं जोर
 कितना बाजुए कातिल में हैं ।।



वंदे मातरम

Thursday, 7 September 2017

पाखंड खंडीनी


🌾🌾एकदा मन लाउन वाचाच🌾🌾
 भारतात इंग्रज आले ,
फक्त
१७९


 नंतर
१००० झाले ,
 नंतर
१०,०००
आणि
 नंतर
१,००,००० झाले


 आणि
या एक लाख इंग्रजांनी आपल्या
३० करोड
 जनतेवर राज्य केले.
कसे बर शक्य झाले ???
 कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते
 त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास
 केला होता
 आणि
त्यांनी एक निष्कर्ष
 काढला जो आजही 2016 सालीही लागू होतो ,


 तो म्हणजे भारतीय लोकांना
 जाती-भेद,
 धर्मभेद,
 गरीब-श्रीमंत,
 प्रांत भेद
 या गोष्टीनमध्ये
 पेटवायचे मग हे
 ३० काय ३०० करोड
जरी झाले तर
 कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत ...
कारण....
 ते एकमेकांनाच कापत बसतील
पण कधीही एक होऊ
 शकणार नाहीत .

 एवढा द्वेष मनामध्ये भरेल


खंडन:भारतात १७९ इंग्रज आले याचा रेफरन्स काय आहे साहेब?? मोगल बादशहा जाह्न्गीर्च्या काळात जवळपास ७०० ब्रिटीश पहिल्यांदा आल्याचा उल्लेख आहे . मग १७९ आकडा कुठून आणला आपण??

जातीच्या आधारावर आजवर भारतात  कोणीही कोणाला कापलेले नाही .उगाच काहीतरी खोटे बोलू नका .. आणि जे बोलताय न त्याचा पुरावा द्या..दलित अस्पृश्य मानले गेले पण कोणाचीही हत्या केले गेली नाही..


 मी मराठा
 मी सोनार
 मी धनगर
 मी चांभार
 मी कुंभार
 मी मांग
 मी महार
 मी ब्राम्हण
 मी माळी
 मी आमुक आणि मी तमुक .....
 .... झालं यातच
 आम्ही
आमचे श्रेष्ठत्व मानतो.

उत्तर : हो वरील नमूद केलेल्या जाती उदा.सोनार ह्या कर्म आणि गुणावरून पडल्या आहेत आणि आमच्या गुण व कर्माचा आम्हाला अभिमान आहेच... सोनारा शिवाय  खर्या सोन्याची पारख कुणाला? कुंभार नसता तर भांडी कुठून आणायची? या जाती नव्हे सर्वांना विविध उद्योग देऊन रोजगार देणारी व्यवस्था होती..ज्याला आपण जातीवाद म्हणून बघतो ... आणि हो यातल्या कुठल्याही जातीमध्ये भांडण किंवा दंगे कधीही झाले नाहीत...  असल्यास दाखवणे ..पुराव्यानिशी....


 ( मीञांनो ६७४२ जाती आहेत)


 आज आम्ही एवढे मोठे झालो आहे
की....
..... थोर युग
 पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही..

मुहम्मद पैगम्बर , मुसलमानांचे झाले,: मोहोम्मद पैगंबर कोणत्या युगाचे युगपुरुष होते>?? आठवतंय तरी का??  हा माणूस ६ व्या शतकात झाला आपण इंग्रजांच्या काळाबद्दल बोलतोय आणि तेही भारता बद्दल .. हे तिकडे फार दूरवर अरबस्तानात जन्मले आणि मुस्लीम धर्म स्थापून  वाढवून मेलेत सुद्धा ... त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही... आणि अरबस्तान सोडून इतर कुठेही यांचा संबंध नाही.... मुसलीमांचे झाले म्हणजे काय मुस्लीम धर्मच स्थापिला न यांनी मग मुस्लिमांचे नाही तर कोणाचे??? तुम्हा बाटव लेल्यांचे  का?? यांनी कधी भारतात येऊन दलित महिला अस्पृश्यता आदी निर्मूलनाचे काम केलेय का? इतर कुठल्याही देशात त्यांनी तसे केले नाही..मग युग्पुरुश कसे..??

 सावरकर
ब्राह्मणांचे झाले,
हे तुम्ही म्हणताय आम्ही नाही ..आमच्यासाठी सावरकर आजही संपूर्ण देशाचे आहेत..पण तुम्हाला त्यांची जात दिसते हे दुर्दैव..
बाबासाहेब आंबेडकर
दलितांचे ,

बाबासाहेब सुद्धा सर्व देशाचे होते ... फक्त तुम्हीच त्यांना दलीत समाजापुरता  ठेवताय...
 छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे,
 मल्हारराव होळकर धनगारांचे.



महात्मा ज्योतीराव फुले माळ्याचे.


आणाभाऊ साठे मातंगाचे ..

शिवाजी मराठी माणसाच्या मनामनात आहे. मल्हारराव हे हिंदू सत्तेचे पाईक होते फक्त धनगरांचे नाही... जोतीबा महात्मा आहेत त्यांची माळी जात फक्त तुम्हाला दिली..आणि तीही खोटी...फुले कुटुंब हे मराठा होते..नंतर फुले विकण्यामुळे फुले आडनाव पडले..आप्प्ल्याला हे सुद्धा माहित नाही....   अण्णा  भाऊंच्या  नावाआधी लोक शाहीर हि उपाधी आहे ती लावायला विसरू नका..ते लोकशाहीरच  आहेत त्यांची जात काढायचे नादान काम करणारे तुम्ही मूर्ख...
 जाता
जात नाही
ती जात
 इंग्रजांनी केली वाताहत।
 आपण बनवले गेलो हातोहात,
 आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात।
 पटत असेल तर आचरणात आणा नाहितर आजही कोणाचेतरी गुलाम बनुन जगा ॥   

तुम्च्यारखे लोक जातीवाद पसरवतात ..तुम्हीच मानुस्कीचा हात धारा आणि आपला समाज पुढे न्या...
🍃🍃🍃🍃🍃🍃


 🚨एक ब्राह्मण होता ज्याने निहत्या गांधीचा खुन केला त्याचे नांव होते नथुराम गोडसे:जात माणू नये असे आपणच म्हणता न मग बामन हा शब्द का वापरताय ?? गांधी महात्मा आहेत का? या नावाचे बाबासाहेबांचे पुस्तक आपण वाचले नाहीत वाटत... कोपर्दीचा बलात्कारी दलित आहे मग त्याचेही नाव असे घ्यायचे का एक दलित होता त्यांनी बलात्कार केला>>??? सांगा ...

🚨एक बामण ज्याने स्वतःच्या आईचा खुन केला त्याचे नाव परशुराम.: परशुराम क्षत्रिय होते.. त्यांची आई राजकन्या होती..आणि त्यांच्यात तेच गुण सर्वाधिक होते ,,..हातात शास्त्र असणारा क्षत्रीयचं  असतो....  या पुरांकाथांवर  आजही तुमचा विश्वास आहे... म्हणजे तुम्ही फुले आंबेडकरांना मनात नाही वाटत... आजही पुराणात गुंतून पडला आहात  का??

🚨एक बामण जो लग्नातून पळून गेला व शिकवतो संसार करावा नेटका त्याचेनाव रामदास:रामदास स्वामी बद्दल  खोटा इतिहास लिहिणारे लोक एकही पुरावा कोर्टात देऊ शकले नाही... तिथे का रे माफी मागता भिकार्यांनो...

🚨एक ब्राह्मण होता ज्याने शिवरायावर तलवार चालविली त्याचे नांव होते भास्कर कुलकर्णी: शिवरायांवर मराठा अ नि इतर जातीच्या लोकांनीही तलवार चालविली .. आणि त्यांचे रक्षण करणारे सुद्धा ब्र्हमान मराठेच होते ,.... कोणाकडून लढायचं हे ज्याचा त्याच प्रश्न आहे... रामचंद्रपंत अमात्य हे शिवरायांकडून होतेच न...

🚨एक ब्राह्मण होता ज्याने शिवरायानी कमावलेले स्वराज्य आपल्या घश्यात घातले व शिवरायाच्या वंशजाना नामधारी केले त्याचे नांव होते बाळाजी विश्वनाथ: बालाजी विश्वनाथ फक्त २ वर्ष जगले पेशवा पदावर आल्याप्सून... कान्होजीनंना साहू महाराजांकडे आणून स्वराज्य बळकट केले त्यांनी घशात तुम्ही घालतंय फुकाच आरक्षण.... त्यांना पेशवे हे पद छत्रपतींनी दिले तुम्हाला शाहू महाराजंच्या वर विश्वास नाही का? त्यांना तुम्ही मूर्ख समजता का? 

🚨एक बामणाची टिम होती ज्यांनी तुकोबांना त्रास दिला व गाथा बुडवली
त्याचे प्रमुख मंबाजी भट व रामेश्वर भट:तुकारामांचे मयेकारी  सुद्धा  ब्राह्मण होतेच न? जेव्हा मंबाजी व रामेश्वर भट हे सगळ करत होते तेव्हा महान बहुजनी  पिल्ले कुठे होते..तुम्ही का नाही रक्षा केली तुकारामांची.. खेडकर च्या  सोबत दारू पीत तर नव्हते बसले ना?? नाहीतर मुल्ल्यांची गटारे तर साफ नव्हते करत तुम्ही???

🚨एक बामण जो देवगीरीच्या राज्यात फितुरी करून खिलजीची मदत केली त्याचे नाव हेमाद्रि पंडीत: खिलजी युद्ध स्वतःच्या सामर्थ्याने  जिंकला ..फितुरीने नाही... खोटा इतिहास  लिहिता येतो पण सिद्ध करायला तुम्हा लोकांकडे काहीच नसते..



🚨 एक बामण होता ज्याने संभाजी राजे पकडून दिले त्याचे नाव रंगनाथ स्वामी....राजेंना शिर्क्यांनी पकडून दिले....रंगनाथ स्वामी यांचा काळ २०० वर्ष आधीच आहे....
ब्राम्हणांची महान परंपरा

-----------------
आईची हत्या करनारा
परशुराम ब्राम्हण.

तुम्ही पुराणातल्या  भाकाद्काथांवर विश्वास  ठेवता का?
-----------------
आदर्श राजा बळीस कपटाने पाताळात पाठवनारा वामन  ब्राह्माण.बळी राजचे वडील सुद्धा ब्राह्मणच होते वामन आणि बळी दोघेही भाऊ होते.... बळी राजा ९ व्या मन्वंतराचा इंद्र म्हणून वामन अवताराने  इंद्रपद दिले होते...
------------------
एकलव्याचे अंगठा कापनारा
द्रोणाचार्य ब्राम्हण.


------------------
बृहद्रथाचा कपटाने वध करनारा
पुष्यमित्र शुंग ब्राम्हण.

शुंग हा क्षत्रिय  होता आजही या वंशाचे लोक बिहारमध्ये क्षत्रिय  जातीत येतात जाऊन बघा आधी... मूर्ख काहीही लिहायच
--------------------

-------------------
ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्येस कारणीभूत ब्राम्हण.यांचे आईवडील पण ब्राम्हणच  होते ..
-----------------
ज्ञानेश्वराला जातीतून बहीष्कृत
करनारे ब्राम्हण.:जातीतून नाही समाजातून काढले होते..
----------------------
नामदेवाला बुडून मारनारे
ब्राम्हण.: साफ झुठ आहे हे..याचा  पुरावा द्या... 
--------------------
शिवरायांना राजा होण्यास रोखनारे ब्राम्हण.शिवाजी राजा होतेच..त्यांना रोखायची हिम्मत मोगलाम्ध्येही नाही..
--------------------

--------------------
राजर्षी शाहूना विरोध करनारे
टिळक ब्राम्हण.: शाहू राजांचे टिळक यांबद्दलचे  पत्र वाचा...आधी..
----------------_
डॉ.आंबेडकरांना त्रास देणारे
ब्राम्हण.: आंबेडकरांना  वर कोणी आणले? आंबेडकर हे आडनाव सुद्ध ब्राह्मण आहे ....
-----------------
पानीपतावर हजारो मावळयांच्या नाशास कारणीभूत.
ब्राम्हण: त्यासाठी अहमद हाहा अब्दाली कारणीभूत आहे...
-------------------
महिला शिक्षणालाविरोध करणारे ब्राम्हण
अन् सर्व प्रथम शिक्षणाचा लाभ घेणारे
ब्राम्हण.आपल्या मुलींना सावित्री बाईंच्या शाळेत पाठव्नारेही  ब्राह्मणच..
-----------------
गांधीनी मारनारे ब्राम्हणच: शिवाजी राजांना भ्रष्ट म्हणणारे गांधी  तुम्हाला प्रिय आहेत का??
--------------------

----------------------

---------------------
🔶✨
👇
🔴 या भारत देशात🔴
कुत्रा = देव
माकड़ = देव
गाय = देव
बैल = देव
साप = देव
मुंगी = देव
मासा = देव
डुक्कर = देव
वाघ = देव
सिंह = देव
गरुड़ = देव
बकरी = देव
वडाचे झाड़ = देव
तुळशीचे झाड़ = देव
दुर्वाचे झाड़ = देव
नदी = देव
समुद्र = देव
सूर्य = देव
चंद्र = देव
अग्नि = देव
वायु = देव
जल = देव
मांजर = देव
उंदीर = देव
ससा = देव
कबूतर = देव
चिमणी = देव
आकाश = देव
पाताळ = देव
डोंगर = देव
पृथ्वी = देव
घोडा = देव
कावळा = देव
मोर = देव
✨एवढेच काय तर "दगड" सुद्धा देव
पण
🔴माणूस = ?


 ✔रोहीदास-----चांभार
✔गोरा--------कुंभार
✔सावता------माळी
✔वाल्मीक------कोळी
✔नरहरी--------सोनार
✔चोखा---------महार
✔नामदेव--------शिंपी
🔴तर मग
🔶रामदास-----स्वामी  ?
🔶ज्ञानेश्वर ----- माऊली ?
हे कसे ????😳
🔵 हे कोणाचे षढयंञ आहे ..??
✨बहुजन समाजातील संत म्हटलं की त्याच्या पुढे जात लावायची आणी रामदास, ज्ञानेश्वर ह्यांच्या पुढे त्यांची जात लावत नाही .
✨त्याचे कारण असे आहेकी बहुजन समाजातील संत असला  की त्याला त्याच्या जातीपुरतेच मर्यादित ठेवायचे आणि
✨ब्राह्मणांचा संत असला की, त्याला स्वामी, माऊली म्हणायचे कारण स्वामी म्हटलं की सर्वांचे माऊली म्हटलं की सर्वांचे,
✨वर सात महान संताची नावे आहेत पण एकाही नावाचा पुढे स्वामी किंवा माउली शब्द नाही.
✨ही विचित्र परंपरा येथील ब्राम्हणी व्यवस्थेने  जाणिवपुर्वक रूजविली आहे...!

वरचे सगळे संत त्यांच्या अभंगांनी आणि कमानी ओळखले जातात जातीनि नव्हे..... विवेकानंदांना स्वामी  हे बिरूद आहेच न? ते तर बहुजन स माजाचे आहेत... मग काय साहेब?  बहुजनांच्या देवाला विठ्ठलाला पण माउली  म्हणतात...क्षत्रिय  कन्या रेणुका देवीला सुद्धा  मुली म्हणता..असे अनेक आहेत  आहेत..जो पोराप्रमाणे प्रेम करते तो माउली  ..पण हे तुम्हाला कळणार नाही.. 



✨आपल्याला ही परंपरा मोडीत काढायची आहे....
संता बरोबर आपल्या महापूरूषांपा पण जातीत अडकवण्याचे काम इथली व्यवस्था करत आहे,
🔴आंबेडकर दलितांचे
♦शिवाजी महाराज मराठ्यांचे
♦महात्मा फुले माळ्याचें
♦अण्णाभाऊ साठे मातंगाचे
आणि
अण्णा भाऊ साठेंना  लोकशाहीर म्हणतात त्यांह एकेरी नाव लावून अपमान तुम्ही करताय ...



🔵टिळक माञ लोकमान्य ?😳
🔵सावरकर मात्र स्वातंत्र्यवीर.?😳

नाना पाटलांना क्रांती  सिंह  म्हणतात .ज्योतीबांना महात्मा म्हणतात...हे बिरूद आपणविसरलात  कि काय??

🔘प्रमोद महाजन... देशाचे नेते
🔘लाल अडवानी... देशाचे नेते
🔘नितीन गडकरी. ... देशाचे नेते
🔘सगळेच ब्राह्मण ... देशाचे नेते
😳
🔴गोपीनाथ मूंढे ..वंजारी नेते
🔴महादेव जानकर.. धनगर नेते
🔴रामदास आठवले.. दलीत नेते
🔴शरद पवार... मराठा नेते
✨मिञानों बहूजन समाजातील प्रतेक महापूरूषाने जातीविरहीत कार्य केले आहे, आपण त्यानां एका जातीपूरतं मर्यादित ठेवणे यात या व्यवस्थेचा विजय आहे,
✨बहूजन समाजाने आपले  नेते-महापुरूष-संत समजून घेणे गरजेचे आहे...🙏​🙏​आपनास आवडले तर तुमच्या मिञाना पाटवा....बहुजन बहुजन तुम्हीच तर म्हणत आहात.... देशाबाद्द्ल बोला न तुम्ही.... एका जातीबद्दल लेख लिहिता ..आणि तुम्ही काय  देशाचे नेते व्हायला चाललेत...


आजची वस्तुस्थिती----
महाराष्ट्र विधानसभा 2015
मराठा आमदार . . . . . . . . 145
ओ . बी . सी .  . . . . . . . . . 44
अ . जाती . . . . . . . . . . . . .30
अ . जमाती . . . . . . . . . . . 26
मुस्लिम . . . . . . . . . . . . .   10
परप्रान्तिय . . . . . . . . . . . . 19
ब्राह्मण . . . . . . . . . . . . . . .14
मुख्यमंत्री - - -- - - - - -  ब्राह्मण

अर्थमंत्री - - - - - - - - - -ब्राह्मण:सुधीर मुन्गान्तीवर कोमटी या मग जातीचे आहेत...

उद्योग मंत्री - - - - - - - - ब्राह्मणसुभाष देसाई चंद्र्सेनीय  आहेत..

अन्नमंत्री - - - - - - - - - -ब्राह्मण

जलमंत्री - - - - - - - - - - ब्राह्मणगिरीश महाजन ओबीसी आहेत..


सभापती - - - - - - - - - ब्राह्मणहरिभाऊ बागडे मराठा आहेत..


हि पेशवाई नाहीतर काय ? ? ? ? ? ? ? ?
हे आहेत अच्छे दिन
सर्वांची साथ आणि केवळ ब्राह्मणांचा विकास.
निवेदन


मा.पंतप्रधान. नरेंद्र मोदी साहेब
कृपया सगळ्या योजना बंद
 करून टाका.
फक्त संसद भवन मध्ये जसे कॅन्टीन आहेत तसे  देशात प्रत्येक दहा किलो मिटर अंतरावर कॅन्टीग काढा.
सगळे लफडे संपतील!
 29 रूपये मध्ये पोट भरून जेवण.
80% लोकांना घर चालवण्याचे लफडी बंद होतील.
 ना सिलेंडर आणायला लागेल ना राशन घरवाली पण खुश!
सगळीकडे आनंद च आनंद नांदेल. नंतर आम्ही सगळे म्हणु
 !सबका साथ सबका विकास!
 सगळ्यात मोठा फायदा 1 रूपये मध्ये गहु नाही द्यायला लागणर
आणि मोदीजीनां हे सगळं काही सांगावे लागणार मध्येम वर्गातील
लोक अप आपल्या हिसाबात घर
चालवा.
  हया सगळ्या गोष्टीकडे लक्ष दया
कृपया इमानदारीने मेहनत करून माहिती गोळा केली आहे.
देशातील एक एक नागरिकांना
 पोहोचवली पाहिजे.
  देशात एकच जागा अशी आहे तिथे खायला स्वस्त मिळते.
 चहा =  1.00
 सुप =   5.50
 दाल =  1.50
 जेवण = 2.00
 चपाती =1.00
 चिकन = 24.50
 डोसा  = 4.00
बिर्याणी =8.00
मच्छी  = 13.00
  हया सगळ्या फक्त तिथल्या गरीबांच्या करता आणि
  हेच सगळं उपलब्ध आहे. भारतीय संसद मधील कॅन्टीनमध्ये
   आणि हया सगळ्या गरीबाना पगार आहे 80,000 महिन्याचा ती पण बिगर इनकम टॅक्स.
  आपल्या मोबाईलवर जितके नंबर आहे, त्यानां हि माहिती पोहोचली पाहिजे. कळु तर दया
 कि जे लोक रोज 30 या 32 रूपये रोज क



मावतो तो गरीब नाही.
   जोक्स तर रोज पाठवतो मग
    जोक ऐवजी हे पाठवुन बघा.
🙏​​🙏​​🙏​​👍​👍​🙏​​🙏​​🙏​​


एवढी वर्ष तुमच्या कॉंग्रेस ने का नाही हे बंद केले...???   हि राजकीय व्यवस्था तर कॉंग्रेसनेच दिली न देशाला.मग???/ अशा जातीयवादी पोस्ट लिहिण्यापेक्षा काहीतरी चांगले लिहा....







Saturday, 26 August 2017

धारा ३७० : आणि काश्मीर महाराष्ट्र संबंध.......




नमस्कार राजे .. 



नुकताच माझ्या महाविद्यालयात एक कार्यक्रम झाला ... युवा संसदेसारखा .
.
. विविध वयोगटाचे आणि शाळेपासून तर 

शिकलेल्या मोठ्या माणसांपर्यंत चे सगळे लोक 

त्यात सहभागी होत असतात..आयोजक प्रत्येकाला

 पद देत असते .. जशी आपली लोकसभा असते न तसेच सगळे पक्ष असतात कॉंग्रेस भाजप 


तृणमूल द्रमुक वगरे वगरे भाग घेणार्यांना एका 
एका पक्षातल्या नेत्यांची भूमिका दिली जाते ..जशी मागल्या वेळेस मी  पंतप्रधान झालो होतो.. यंदा दुसरे लोक सोनिया गांधी राहुल बाबा मोदी  सुषमा जेटली वगरे झाले.. आणि मुद्दा होता धारा किंवा कलम ३७०.. सत्ताधार्यांना चर्चा घडवून आणून हि कलम रद्द करवून घ्यावयाचे लक्ष्य होते ..तर विरोधकांना ते संख्याबालाभावी हाणून पडण्याचे काम होते..लोकसभेत भाजप ची संख्या जास्त म्हणून काय तर ..विअजय आमचाच झाला ..म्हणजे भाजपचा ......   २ दिवस सकाळी ११ पासून ते संध्याकाळी ७ पर्यंत अगदी जशी लोकसभा चालते न तशीच चालते हि युवा संसद.....  दोन दिवस खुप्प उहापोह झाला काश्मीर मुद्द्याचा..त्यात पाकिस्तान नेहरू राजा हरीसिंघ श्यामाप्रसाद मुखेर्जींचे कर्तुत्व , मुरली मनोहर जोशींची लाल चौकात तिरंगा फडकवण्याची...  यात्रा ... आपले गोळवलकर गुरुजी...काश्मिरी पंडितांच्या समस्या इत्यादी सगळ्या गोष्टींचा खूप खालवर विचार झाला ..... 



 आणि मला हे कलम काश्मीर पेक्षा आपल्या महाराष्ट्रासाठी किती आवश्यक आहे याची जाणीव झाली....  मुळात काश्मीरची मुळ ओळख टिकून राहावी म्हणूनच नेहरूंना हे कलम ठेवण्यास बाध्य केले गेले होते ... काश्मिरियत ....म्हणजे तिथली मुळ भाषा भूषा लोकसंख्या अर्थात तिथले मुळचे लोक याबाबतची शाश्वती बहाल करण्यासाठी हे कलम होते... या कलमांतर्गत काही बाबी येतात जसे तिथे ६ वर्षांनी निवडणुका होता आणखी इतरही आहेत,,, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे .. जम्मू काश्मीर सोडून अन्य कुठल्याही भारतीय राज्यातील माणसाला काश्मीर मध्ये फिरायला जाता येते पण तिथे कायमची वस्ती करता येत नाही..अर्थात तिथे घर घेऊन किंवा भाड्याने राहण्याचा अधिकार अन्य भारतीयांना नाही..


म्हणजे आपल्याला तिथले मतदाता होता येत नाही , शिधापत्रिका किंवा domicile अर्थात तिथली नागरिकत आपल्याला मिळू शकत नाही .. एकूणच काय तर संचार स्वातंत्र्याचा पुर्नाधिकार हा काश्मिर मध्ये लागू होत नाहीई...  भारताचे साम्विधान्सुद्धा पूर्णतः तिथे लागू होत नाही..त्यांचे स्वतःचे संविधान आहे.. असो...

जेव्हा हा मुद्दा पेटलेला होता तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी गोळवलकर गुरुजींना पत्र लिहून काश्मीरच्या राजांशी म्हणजे महाराजा हरीसिंघ यांचेशी बोलून त्यांना काश्मीरचे भारतात विलीनीकरण करावयासाठी मन वळवायला जावे असे सुचवले होते.. हा शेवटचा प्रयत्न श्री गुरुजींनी केला व तो यशस्वी झाला आणि काश्मीर आपल्याला मिळाले ..तेही ३७० च्या कटकटी सोबत..पण हे मराठी माणसाचे कर्तुत्व दिल्लीधीशांनी आजवर दाबून ठेवले याला कुठेही स्थान दिले गेले नाही..... असो.....





धारा ३७० हि कलम आणि यातला कायमचे रहिवासी न होण्याचा अधिकार जर खरोखरीच एखाद्या राज्याला त्याचे मुळचे अस्तित्व टिकावे यासाठी बहाल करण्यात आलाय तर आज त्याची सर्वात जास्त आवश्यकता आपल्या महाराष्ट्ाला आहे...कारण गेल्या ७० वर्षात इथे उत्तर आणि दक्षिण भारतातून लाखो लोक राहायला आलेयत नोकरीच्या नावाने... एवढेच नाहीं तर उत्तर भारतातल्या समाजवादी पक्षासारख्या राजकीय पक्षाने राजकीय साम्राज्य्वाद्सुद्धा करण्याचे चंग बांधलेत....  हिंदी भाषिकांनी भाषिक साम्राज्यवाद सुरु केलाय... इथे यायच रिकाम्या जागांवर झोपडपट्ट्या उभारायच्या गुंडागर्दी करायची..इथल्या लोकांचे रोजगार हिसकावायचे..हळूहळू आपपल्या नातेवाईक ओळखी पाळखी च्या लोकांना बोलवायचं आणि इथेच गचागच करायचं पिल्लावळी जन्माला घालायच्या आणि राहायचं... यातून काही गुंड लोकांनी बाहुबली लोकांनी अबू आझमी राज पुरोहित सारख्यांनी भाषिक आधारवर मतदारसंघ बनवले आहेत.... मुंबईच्या या निवडणुकीत भाजपला ८२ जागा भैय्या बिहारी न गुज्जू लोकांमुळे मिळाल्या आहेत... सेनेच काम चांगल नाही म्हणून नाही.... 



 २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या ६ लोकसभेच्या जागांपैकी शिवसेना सोडून भाजप कॉंग्रेस राष्ट्रवादी या सर्वांनी परप्रांतीय माणसाला उमेदवारी दिली... असो....




सर्वात महत्त्वाचे हे कि २०११ च्या जन गणनेनुसार महाराष्ट्रात ज्यांची मातृभाषा मराठी आहे असे फक्त ६९% लोक आहेत म्हणजे उरलेले सगळे परप्रांतीय.... ११ टक्के हिंदी भाषिक.. ४ टक्के  गुज्जू ७ टक्के मुस्लिम ...आणि अन्य ...

 हा आकडा भयंकर आहे .देशातल्या अन्य कुठल्याही राज्यात मुळचे भाषिक हे ९५ टक्क्यांपेक्षा कमी नाहीत.... फक्त आणि फक्त महाराष्ट्र  हेच राज्य असे आहे जिथे हा भिकारवाडा होतोय लोकसंख्येचा....... 


येत्या जन गणनेत आपण ५०  टक्क्यांपेक्षा जास्त उरलो तरी आनंद होईल... 

कारण सध्या पर परप्रांतीयांशी इश्क़ लढवणारे महाराष्ट्र द्रोही समाज बुडवे मूर्ख मुख्यमत्री आहेत म्हणून.... ज्या माणसाला आपल्याच राज्यात आपली मातृभाषा   बोलायला लाज वाटते 

..परप्रांतीय लोकांच्या मतांसाठी हे मराठीत बोलत सुद्धा नाहीत... 
नागपूर आणि इतर महानगरपालिकांच्या योजना आणि शहरात लागलेले फलक सुद्धा हिंदी मध्ये आहेत... एवढी लाज का असावी मराठीची... ???

  म्हणून मला असा वाटत कि ३७० कलम अंतर्गत असलेला रहिवास चा अनुच्छेद महाराष्ट्राला विशेष दर्जा म्हणून देण्यात यावा... नाहीतर २० वर्षात महारष्ट्रात मराठी माणूस संपलेला असेल... आजच mpsc ची  भाषा हिंदी आणि उर्दू द्या अशी मागणी करतायत ..आणि ती मान्य केल्या जातीय उद्या काय करतील देव जाने..


देशाला महाराष्ट्रानी आजवर खूप काही दिलेय राज्याच्य बेयोंड जाऊन आम्ही संघ दिला अन्णा हजारे दिले... शिवाय एकटा मराठी माणूस देशाला २५ टक्के कर देतो... महाराष्ट्र देशाची एक चतुर्थांश तिजोरी भरतय...आणि ४० टक्के लोकांख्येचे हिंदी भाषिक  काय देतात फक्त ८ टक्के ... 

केंद्र राज्याला फक्त १० टक्के परत करत राज्य चालवायला आणि बाकी १५ टक्के युपी बिहारला जात...

आज युपितली ३६००० कोटींची ऋण माफी आमच्या मराठी खिशातून गेलीय आणि आमचाच पैसा आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिला जात नाही कारण त्यासाठी पैसे नसतात दिल्ली कडे ...असो महाराष्ट्राची खरी आवश्यकता अनुच्छेद ३७० आहे नाहीतर आपली पुढची पिढी भाषिक गुलामीत जगणार...... अल्पसंख्याक होऊन अस्तित्वच संपायची भीती आहे...


Wtevr I have written here is not for discretion of any society n person.. these are economical facts which are in public domain..n everyone can check it…  I have nothing hatred for any linguistic or religious community …. My sole intension is to protect the thousand year existence of ma holy land of पोषण संस्कृती...  … and nothing much……



तूर्तास जय महाराष्ट्र........ माय मराठी...  

Tuesday, 22 August 2017

हेड्गेवारी विचारांची कत्तल आणि भिक मांगो वैद्य



नमस्कार राजे.......!

.गेल्या पंधरवाड्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या.... त्यातल्या दोन्ही महाराष्ट्राशीच संबंधित होत्या .... पण महारार्ष्ट्रीय जनांनी या भारत्भूमीस जे राष्ट्रीय संघटना व राजकारणाचे रक्तमय सामिधारूपी योगदान दिले त्याच्या छायेतून ह्या दोन गोष्टी काही सुटलेल्या नाहीत....


अर्थातच....   दिल्ली आज जेवढी सकारात्मक दिसतीय ती महाराष्ट्र्कारणे...... पण कोण जाणे नेहमीच या सह्याद्रीच्या नशिबी पांडवान्सारखे  वनवास किंवा लाक्षागृह यांसारख्या दुखद किंवा क्लेशकारकच फळे या भारत भूमीच्या साठीच्या आरंभिलेल्या यज्ञातून मिळतात....  लेखाची पूर्वपीठीका मांडण्याचा हा सावरकरी प्रयत्न इथेच थांबवून ..पुढे बघुयात.....




एक घटना घडली ती अशी कि केंद्रीय सरकारने दर वर्षी प्रमाणे  यंदाही पद्म पुरस्कारांची  घोषणा केली...आणि त्यात आपल्या अति विश्वजेत्ता पंतप्रधान नरेंद्र भाई मोदिजींचे अत्यंत अत्यंत महान गुरुवर बारामतिअधिष्ठित सुप्रीयापीता तथैव अजितदादा रक्षक लखोबा लोखंडे समर्थक...श्री श्री पदच्युत शरदचंद्र पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला गेला.....




नरेंद्र मोदी या कर्तुत्व संपन्न आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाला कुठेतरी मलीनत्व येते ते याच सत्तेच्या
अधाशीपणामुळे......... नरेंद्रा तू संघकार्य तर केलेस पण संघाला जे हवेय ते काही राजकारणात आपण तेवत ठेवू शकत नाही आहात याची आता तरी  जाणीव असू द्या........ 
कधी बारामतीत सभा घ्यायची आणि म्हणायचे कि मी आठवड्यातून ४ दिवस शरद रावांना फोने करतो....शरदराव माझे राजकीय गुरु  आहेत........ हे अचानक फुकटचे प्रेम का उफाळू लागलेय तुम्हाला काय माहित?


कदाचित शिवसेनेला डिवचून गप्प बस्व्ण्यासाठीच हे सर्वे उद्योग महाराष्ट्रातील भट वादी कंपू म्हणजेच कमळाबाई करतीय....   ह्या साखरेच्या धोंडानी काय दिले मोदिजी तुम्हाला? तुमचे मुख्यमंत्रीपद जाणार होते तेव्हा बाळासाहेब उभे ठाकले होते तुमच्या पाठीशी म्हणून आज राजकीय रूपातही अस्तित्व आहे तुमच..... पण आपण हे विसरलेला आहात.....  सत्तेची नशा आणि हव्यास माणसाला ... समाजकारणापासून अति दूरवर नेऊन ...राजकारणीय यशस्वीतेच्या मदिरेची चव आणि चोचले इतपतच खितपत ठेवत असते आणि म्हणून....आज ...एक कर्तुत्वान माणूस एका महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी एवढा मोठ आयडो logical तडजोड करायला लागतो


 ....मोदिजी शेवटी तुम्हीसुद्धा धूर्त राजकारणी निघाले....बाळासाहेबांना भारतरत्न देण्याऐवजी या म्हातार्याला पद्मविभूषण देऊन कशासाठी.....इतकी वर्षे  भूखंडांचे श्रीखंड खाल्ले म्हणून????  यांनी पाणी फिरवून फिरवून पुरता पश्चिम महाराष्ट्राची जमीन अति सुपीक केली म्हणून कि वर्षानुवर्षे काळा पैसा विदेशी बँकांमध्ये जमवलाय म्हणून....?
वाः काय रीत म्हणावी भाजपची....

खरच खूपच मर्दानगीच काम केलेल दिसतंय तुम्ही शेटजी भटजींनी......

आता दुसरी बातमी ती म्हणजे रिक्काम टेकडा म्हातारा म्हणजे हे संघाचे भिश्म्म पितामह ...भिक मांगो वैद्य ..... द्रौपदीचे वस्त्र्हर्ण होत असतानाही .... तिला सोडवायला जाऊ न शकणारी विद्वत्ता आणि शौर्य ,,....मोठेपणा महिमा आणि वय ..यांचेही आज ९५ वर्षे आणि त्यांचेही महाभारतातल्या भिष्मचार्यांचेही तेवढेच असावे बहुधा ........    येऊन जाऊन काय तर म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करा ........ साला ज्यांनी कधीच राज्यासाठी काहीही केले नाही... नेहमी हिंदुत्व हिंदुत्व हाच राग आलापला...ज्यांना कधीच मराठी मनाच्या मुंबईत होणार्या हत्या दिल्या नाहीत .... मराठी जनता व तिचे दुखः दिसले नाही त्यांना काय अधिकार राज्याचे तीन तुकडे करा म्हणायचा????



आणि महाराष्ट्राचे ४ तुकडे कशाला करायचे?? अविकसित आहे म्हणून ?? हा तोच महाराष्ट्र आहे जो एवढ्या  वर्षांपासून लाखो परप्रांतीयांना पोसत आहे...  तोडायचं असेल न तर २१ कोटीचा उत्तर प्रदेश तोडा .. त्याचे क्षेत्रफळ महाराष्तरा एवढेच जवळपास ... पण लोकसंख्या २१.५० कोटी..... ४-४ कोटीचे ५ नाहीतर ५-५ कोटींचे ४ राज्य बनवा.... बुंदेलखंड , अवध  ,पूर्वांचल , हरित प्रदेश .... गेल्या ४ पिढ्यांपासून इथे घुसत आहेत आणि आपलेवार्ड तयार करत आहेत......  बिहार चे तुकडे करा.. राज्याचे क्षेत्रफळ छत्तिसगढ , तेलंगण ,विदर्भ एवढे यानुसार लोकसंख्या २-२.५० कोटी हवी होती.... ती आहे ११ कोटी.... देशात तब्बल १३ पोट्टे पैदा करणारा एकमेव  मुख्यमंत्री लालू यादव..जसा राजा तशी प्रजा  ,.................... हे तेच मागो वैद्य आहेत जे म्हणतात आम्ही पवारांचं समर्थन घेऊ.... भिकारी ....  कुठले..... 



असो........ माझा महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र ........