Tuesday 19 February 2019

शिवसेना : ह्य: , अद्य , श्व: ।



नमस्कार राजे..!

आज शेवटी नाही नाही म्हणता म्हणता सेना भाजपची युती झालीच. साहजिकच आहे प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. हा समाज डावे उजवे सैनिक स्वयंसेवक खांग्रेसी घड्याळी काटे अशा वर्गात विभागलेला आहे त्यामुळे समर्थन विरोध तर काहींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. पण असं नाही वाटत का मराठी जनहो कि काहीतरी सुटतंय ? काहीतरी चुकचुकतंय ? येणारा काळ महाराष्ट्रासाठी कसा असेल? किती लाभदायक असेल ? इथल्या मूलभाषीय समाजाचे अस्तित्व त्यावर होणारा भाषिक आर्थिक कोंडमारा आणि त्यातून राजकीय पोळ्या भाजून घेणारी वेश्या वृत्ती जोपासलेला हा राजकीय समाज.



      आज सर्वांचे लक्ष ज्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले होते ती शिवसेना काहीतरी महत्त्व ठेवून आहे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणूनच ना? शिवसेना हा फक्त एक पक्ष नाही तो एकमेव जनांदोलनातून जन्मलेला अग्नी प्रवाह आहे. देशाच्या अन्य कुठल्याही राज्यात असं एकही राजकीय कुटुंब नाही ज्याला सत्तापदावर बसायची घाणेरडी इच्छा नाही? फक्त महाराष्ट्रात ^बाळ ठाकरे^ या जननेत्याचे ते कुटुंब आहे ज्याने कधीही सरळ लाभाच्या पदाचा ,लाल दिव्याचा , सरकारी बंगल्याचा मोह नाही केला उलट तोच लालदिवा स्वतःच्या साध्या घरचा दास करून दाखवला. मुंबई सारख्या एका राज्याच्या राजधानीत राहून पाकिस्तानच्या लोकसभेला निंदा प्रस्ताव पारित करावा लागावा असा काही पाकिस्तानचा विरोध केला. जे एतद्देशीय अन्य कुठल्याही पक्षाला जमलं नाही ते करून दाखवलं. बाळासाहेब गेल्यावरही उद्धव ठाकरेंनी खूप काही शाश्वत(वृद्धी नक्कीच झाली नाही) ठेवले. अर्थात सर्व जसेच्या तसे कधीही नसतेच.



आज आपण शिवसेना काल आज आणि उद्या यावर एक थोडक्यात दृष्टी टाकू. 1960 च्या महाराष्ट्र निर्माणाच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरेंचा सहभाग होता त्यांचीच सावली म्हणजे बाळ ठाकरे व त्यातून जन्मली शिवसेना. आधी मुंबई पूरती सीमित असलेली शिवसेना मुंबई मध्ये मराठी लोकांसाठी त्यांच्या समस्या व अस्तित्वासाठी काम करू लागली . हळूहळू मराठी अस्तित्व टिकण्यासाठी सत्ता आवश्यक आहे हे उमजले व त्यातून मुंबई महानगर पालिका व नंतर मुंबई म्हणजेच शिवसेना हे समीकरण झाले. हा पक्ष विस्तार नंतर कोकण, नाशिक जळगाव, ठाणे पालघर, पुणे कोल्हापूर औरंगबाद, अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ अशा मोजक्या ठिकाणी झाला. पण महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्यामुळे व मुंबई कडचा भाग जास्त आपला वाटल्यामुळे वा मानवल्यामुळे बाळासाहेब व शिवसेना मुंबई कोकण नाशिक संभाजीनगर अशा पट्ट्यात व मोजक्या शहरां पुरता असलेला पक्ष झाला. तसं महाराष्ट्राच्या भौगोलिक व्यापकतेमुळे कोकण- उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा,  विदर्भ असे भाग आहेतच आणि तसंच राजकीय प्राबल्य देखील आहेच. राजकारणात महाराष्ट्राचा सामाजिक,जातीय,ऐतिहासिक,वैचारिक प्रवाहाचा पण प्रभाव दिसून येतो. 40 व्या वर्षी उभारलेला पिल्लूसा पक्ष बाळ ठाकरेंनी वयाच्या 78 व्या वर्षीपर्यंत खूप समर्थपणे सांभाळला. जेवढं ते करू शकत होते तेवढं त्यांनी केलं.शेवटी तो माणूस राजकीय चौकटीच्या बाहेरचा होता.खरा *वाघ *खरा मराठा* मराठी* होता. 


2004 साली बाळासाहेबांनी शिवसेना आपल्या पुत्राच्या हाती सोपविली. इथून सेनेचे अद्य म्हणजे आज सुरु होते.
2004 ते 2019 हा काळ सेनेचा आजचा काळ आहे असं मानुया. 2004 ला सेनेची धुरा उद्धव ठाकरेंच्या हातात दिल्यावर सेनेची साडेसाती सुरु झाली. एकामागून एक नेते सोडून गेले.आधी नारायण राणे, छगन भुजबळ,गणेश नाईक आणि एवढंच नाही तर बाळासाहेबांची प्रतिमा छाप असणारे त्याचे पुतणे व भाचे असलेलं आक्रमक व्यक्तिमत्त्व राज ठाकरेंनी सुद्धा अवघ्या दोन वर्षात 2006 ला शिवसेनेला घटस्फोट दिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापिली. भुजबळ राणे नाईक यांच्या मुळे कोकण नाशिक नवी मुंबई येथे शिवसेनेला फार नुकसान झाले. आणि राज ठाकरेंनी मनसे स्थापिल्यापासून तर सेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई मध्ये लाखो मते घेतली आणि आश्चर्य हे कि बाळासाहेब हयात असताना , नेतृत्व करताना मनसेचे  तब्बल 13 आमदार जिंकून आले, एवढचे नाही तर लोकसभेला सुद्धा दीड लाखावर मनसेने मते घेतली. 2009 ची विधानसभा सेना भाजप युतीला मनसे,व राणे भुजबळ नाईक यांच्या मुळे जिंकता आली नाही. त्यांनतर अवघ्या 3 वर्षात 2012 ला महाराष्ट्राच्या राजकारणातून एकमेव असा मर्द गेला.
सेनेचे उरले सुरले क्षात्रतेज , चाणक्य नीती संपले.



    साहेब गेले नोव्हेंबर 2012 ला आणि 2013 च्या पहिल्या अर्ध्यात गुजरातचे मुख्यमंत्री देशाच्या राजकीय पटलावर ठाकरी आवाजात खांग्रेसची मायबहिण एक करू लागले. देशाचं सर्व भान एका मोदी नावाच्या माणसावर नेलं गेलं सर्व निवडणूक केंद्रकृत केली गेली.यातच 2001 ते 2011 या दहा वर्षात मुंबई महाराष्ट्रात तब्बल 2 कोटी परप्रांतीय लोकसंख्या स्थलांतरित झाली. हिंदी व उर्दू भाषिकांची लोकसंख्या मुंबई मध्ये अचानक वाढली. याच काळात 2009 पासून भाजपचे केंद्रीय नेतृत्व बदलले .दिल्लीच्या चार चौकडीत बंदिस्त असलेला भाजप संघाने स्वतःच्या माणसाच्या म्हणजे नितीन गडकरींच्या हाती दिला.गडकरींनी भाजप जुन्या नेत्यांना परत आणून वाढवला. मुंडेंशी वाद मिटवून महाराष्ट्र भाजपला पुन्हा स्फूर्ती दिली. 2013 च्या उत्तरार्धात भाजपने मोदींना नेतृत्व देऊन टाकले व देशाचे राजकारण झपाट्याने बदलून गेले. खांग्रेसची हिंदू विरोधी कामामुळे हिंदू मते एकीकडे झुकली.भाजपने संघाने पैसा, कार्यकर्ते , जीव ,घाम रक्त दिवस रात्र सर्व एक करुन आपल्या सत्तेची अघोरी भूक भागविली. यातच 2012 ला फडणवीस महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष बनविले गेले .फडणवीसांनी महाराष्ट्र भाजपला प्रत्येक जिल्हा गावात घुसलेल्या परप्रांतीय विशेषतः उत्तर भारतीय लोकांचा पक्ष बनविले. गेल्या 10 वर्षात आलेल्या 1 कोटी शुद्ध हिंदी मतांना भाजपमध्ये उत्तर भारतीय मोर्चाच्या माध्यमातून आपल्याकडे वळवून मराठी राज्य घाणेरड्या जातीय वळणाकडे नेणे सुरु होते.





    पण यात कुठे होती शिवसेना? कुठे हरवला होता तो वाघ ज्याचा दरारा होता राज्यात आणि देशाला हि एवढेच नव्हे तर पाकिस्तानला पण. 2004 ला उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केल्यावर पक्ष वाढायला पाहिजे होता.पण शिवसेना जेवढी आहे तेवढीच राहिली.सुख एवढेच कि सेना आटली नाही. ती जेवढी आहे तितकीच आजही आहे. मे महिन्यात लोकसभेला तब्बल 282 जागा घेलेल्या भाजपला महाराष्ट्राच्या बदललेल्या भाषिक समीकरणाची व सेनेच्या गाफील,मर्यादित अस्तित्वाची पुरेपूर जाणीव होती. अवघ्या सहा महिन्यात विधानसभा झाली.171 117 हे समीकरण भाजपने अमान्य केले.सेनेनी नमते घेऊन 144-144 मानायला हवे होते पण ते मानले गेले नाही.इथूनच शिवसेना चुकली आणि वासे फिरले. एवढ्यावरच सेना थांबली नाही निवडणुका झाल्या व भाजपला चक्क दुप्पट जागा मिळाल्या पण पूर्ण बहुमत नसताना भाजपची गोची झाली.अशा वेळी योग्य काळाची वाट बघून पत्ते टाकण्यापेक्षा मूर्ख शीर्ष नेत्यांचं ऐकून सेना अगदी कमी महत्त्वाच्या 5 खात्यांवर सत्तेत सहभागी झाली तेही भाजपने न बोलवता.त्यांनतर राजीनामा देऊ अश्या धमक्या दिल्या गेल्या पण पण सत्ता तीही इवलीशी सुटली नाही.




2004 ते 2019 शिवसेना संघटनात्मक रित्या वाढविली गेली पाहिजे होती पण ते काम झालं नाही.मराठीत्व हा निवडणुकीचा आधार झाला पण मराठी कल्याणासाठी महाराष्ट्र हातात असावा लागतो हे काही मुंबई करांना समजलं नाही.हि 15 वर्ष फक्त उंटावरून शेळ्या हाकलल्या गेल्या आणि जो पक्ष आयता हातात मिळाला तो पुढच्या पिढीला वाढवता आला नाही.अशातच मुंबई व राज्यात परप्रांतीय लोकसंख्या वाढतच गेल्यामुळे भाजपला जडत यश मिळू लागले.सेनेची फार दैना झाली पण सेना खच्चीकरण कोणीही करू शकले नाही.तिचा बाणा भाषा क्षात्रतेज कोणीही सम्पवू शकलं नाही.सेनेच राजकीय महत्त्व जे साहेबांमुळे होतं ती पुण्याई आजही सध्याचे चालक उपभोगत आहेत.




2019 ला कोणतीही लहर नसेल हि जाणीव भाजपला आहे म्हणून भाजप युतीसाठी इच्छुक होता.ऐन विधानसभेला युती तोडल्याचा वचपा लोकसभेला भाजपशी युती न करता सेनेला काढता आला असता पण अर्ध्या अर्ध्या जागांवर युती झालीच.लाखो कार्यकर्ते संभ्रमात व निराश आहेत.यावेळी जर सेनेनी युती केली नसती तर शिवसैनिक व पक्षामध्ये बळ आलं असतं. भाजपला 10 जागांपुरत मर्यादित करून दिल्लीमध्ये मोदींचा रथ पून्हा थांबवता आला असता.गडकरींना किंवा सुषमा स्वराजांना बिनशर्त पाठिंबा देऊन भाजपला कायम चा धडा देऊ शकली असती शिवसेना.क्षेत्रीय पक्ष म्हत्त्वाचेच नाहीत तर ते पंत प्रधान सुद्धा ठरवू शकतात बदलू शकतात हे याआधी झालंय ते सेना एकट्या बळावर करू शकली असती.अमित शहा व मोदी फडणवीस यांनी वारंवार घाणेरडी टीका केली त्याला शाश्वत उत्तर देण्याची हि वेळ होती पण ती सेनेनी गमावली युती करून.दिल्लीला दिलेल्या समर्थनाच्या बदल्यात पूर्ण महाराष्ट्र देवगौडाच्या पक्षासारखा स्वहाती ठेवता आला असता पण विचार संपले कि फक्त सत्ता उरते तसं आज झालंय. आज सेना कायमची पिछाडीवर गेलीय.ना पक्ष संघटन वाढवलं ना धड राजकारण करता आलं.2019 ला सुद्धा अर्ध्या अर्ध्या जागा लढवून देखील भाजपचे जास्त आमदार येतील आणि परत उत्तर भारतीय घुसखोर आणि मनुवादी सत्तेत बसतील.पण मराठीत्व मात्र गप्पगुमान महाराष्ट्राचा युपी बिहार पाकिस्तान होत असताना बघत राहील.सेना उद्या आजपेक्षा जास्त दास्यत्वात गेलेला प्रवाह बनेल.





    या देशात हिंदुत्वाचे सर्व प्रवाह एका जातीच्या काही लोकांच्या जातीयतावादी मनुवादी हातात आहेत , त्यांना सर्व जातीय व सर्व भाषीय सांप्रदायिक सर्व समावेशकतेचा क्षात्रतेजाचा आधार नाही, फक्त बाळ ठाकरे हा माणूस अवघ्या देशात जातपात न मानणारे, भारतीय भाषिक विविधता जिथे जाऊ तिथे जपणारे व तितकेच आक्रमक उग्र पाकड्याना हाकलून लावणारे हिंदुत्व देऊ शकले पण हा प्रवाह आटत गेलाय.आता काय होईल एकजातभाषा वादी धरमपेठ सत्तेत येईल नाहीतर परत 10 जनपथ चे लुटेरे चाकर सुलतान होतील.पण राजकीय चौकटी बाहेरच सत्य कोण बघेल?त्यासाठी कोण न्याय करेल? तब्बल 5 कोटी अमराठी लोक येऊन चुकलेत इथला माणूस दिवसागणिक सम्पतोय त्याला स्वराज्यात नोकऱ्या मिळत नाहीत.दरदिवशी नगर जातायत.परप्रांतीयांच्या महानगर पालिका होतायत विधानसभा होतायत आणि याचा आधार आहे भाजप म्हणून हा गद्दार पक्ष सत्तेतून कायमचा हाकलून लावायचा होता पण झालं उलटंच. मराठी जनहो , आपण डावे असू अथवा उजवे पण देश धर्म राज्य याचं एक सत्य असतं हे तर्काने , सरकारी आकडेवारीने अभ्यासले पाहिजे व त्यानुसार सत्ता प्रणाली राबविली पाहिजे. आशा करतो की, पक्ष प्रेमाचे चष्मे उतरवून समाज पाहिल्या जाईल.



टीप:मी कुठल्याही राजकीय पक्षाची गुलामी व भक्ती करत नाही पण काहींना असं वाटतं त्यासाठी हा प्रपंच.मराठी माणूस 33टक्के संपल्यावर उरावा म्हणून ठाकरे कुटुंबाला कायम समर्थन राहील ते जसे जितके थोडके का असेना महाराष्ट्रवादी आहेत.
जय मराठी जय महाराष्ट्र...!

Saturday 16 February 2019

मलरे .....🌹


मलरे.....: सुंदर फुल




संस्कृत पंडितांनो माझ्या
या द्रविड भाषेला संस्कृतोद्भव सिद्ध करून दाखवा.
नाहीतर गाण्याचा आनंद घ्या. गायला अवघड जात होत म्हणून एका मल्याळी मित्राला विचारून विचारून मराठी केलं.आवडतं गाणं माझं.लिंक म्हणजे दुवा देतोय नसेल तर डाउनलोड करून घ्या.https://www.masstamilan.org/1341/malare-ninne-mp3-song



थेली मानम मळ विल्लीन. निरमनियुम नेरम
 निरमारनोरु  कण विन्निल  थेलीयुन्न पोले
पुळयोरुम तळवुन्नी थनू निरन काट्टूम्
 पुळ कंगल इळनेतोरु  कूळ लुथीय पोले

कुलिरेकुम कणाविन्नील कदिराडीय कालम्
मनथारील मधुमासम् थलीराडीय नेरम

 अक मरुकुम मयी लिनकल तूयी लुनरुम कालम्
येन अकथारील अनुरागम पकरून्न यामम


…अळगे.....
अळगिल थीथोरू शीलअळगे
..मलरे.....
एन्नुयीरील विडरूम पनी मलरे

मलरे निन्ने काणा थिरुन्नाल
मिळी वेगिय निरमेल्लाम् मायून्नापोले
अलिवोडेन अरीकत्तीन अनया थिरुन्नान
अळ केकीय  कणवेल्लाम् अक लुन्ना पोले
ज्ञानेन्टे आथमा विन आळथीनूल्लील
अथिलो लमारो रु मरियाथे सूक्क्षीच
थालंगल रागंगल ईनंगलाई


ओरोरो वारंगलाई
इडरुन्न इंन्टे इडनेनजीनूल्लील
प्रणायथीन मळययी नी पोळीयुन्नी नाळील



थळरुन्नो रेंडे थनुथोरुम निंडे
अलथल्लम प्रणायथा लुनरुम्
मलरे.....अळगे....

कुलिरेकुम कणाविन्नील कदिराडीय कालम्
मनथारील मधुमासम् थलीराडीय नेरम


अक मरुकुम मयी लिनकल तूयी लुनरुम कालम्
येन अकथारील अनुरागम पकरून्न यामम


…अळगे.....
अळगिल थीथोरू शीलअळगे
.मलरे.....
एन्नुयीरील विडरूम पनी मलरे

Friday 15 February 2019

ग्रीन कॉरिडॉर

द् ग्रीन कॉरिडॉर

मित्रांनो , आजचा भारत आपण जरी 1947 नन्तरच्या काळातला बघत असू  तरीही आजच्या भारताची मुळे हि एक सहस्र वर्ष जुनी आहेत. म्हणतात ना ^प्रेसझेन्ट इझ द रिफ्लेक्शन ऑफ हिस्टरी^ अगदी तसेच. इतिहासात काय झाले वायव्य ते ईशान्य भारत कायम क्षत्रतेजाच्या अभावात परकीय आक्रमणाला बळी पडला आणि भारतभूमीचे अतोनात नुकसान झाले.



आर्य चाणक्य नन्तर फक्त मराठा साम्राज्याने हा एकसंध भारत हृदयी धरला त्यासाठी तंजावर ते मुलतान लढला महाराष्ट्र. पण नंतर काय सर्व व्यर्थ झाले.मुळात हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे हे अमराठी लोकांना कधी समजलेच नाही.
म्हणूनच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात हिंदुत्व हरवलं आणि तथाकथित भारतीय समाज नावाची संकल्पना उदयास आली आणि त्याद्वारे ब्रिटिश सत्तेचा विरोध झाला. 1947 ला धर्मधारे पाक बनला तसाच भारत बनू शकला असता पण गंगेच्या किनार्यातील राजकारण्यांच्या हाती सत्ता असल्यामुळे ते झाले नाही.आणि काश्मीर ते बंगाल आसाम हा तब्बल 60 कोटी च्या आसपास असलेला अर्धी लोकसंख्या वसलेला भारत आपल्या गळी पडला ज्यात बहुतांश  लोकसंख्या हि मजहबी। जमातीची आहे. दार उल चे स्वप्न उरी बाळगून अंशतः काही चांगली मंडळी सोडली तर अन्यांनी कायम दार उल चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी च काम केलंय. 1947 ते 2019 एका जमातीचा जन्मदर , वाहाबीपणा , भारतीय संविधानिक व्यवस्था व कायद्यांच्या प्रति असलेला विरोध, धर्मांध राजकारण, शरियत अन्य गोष्टी कायम वाढतच गेल्या. आणि गंगा किनाऱ्याच्या तथाकथित सेक्युलर राजकारणाने हे चोचले पोसले एवढंच नव्हे तर त्यांचा मजहबी साम्राज्यवाद वाढायला राजकीय दृष्ट्या मोकळे रान उपलब्ध करून दिले.
अशातच मराठी माणसांमुळे हिंदुत्व जे भारताचं स्वत्व आहे तयाचा एक राजकीय प्रवाह जन्माला येऊ लागला तो म्हणजे संघ भाजप शिवसेना . दोन दशकात देशाचं राजकारण पालटून एक हिंदू किंवा भारतमातेला हार घालणारे भारतीयता मानणारे लोक विसाव्या शतकाच्या अंती सत्तेत आले. फारसे बदल करणारी ती सत्ता ठरू शकली नाही कारण स्वबळ नवहते.पण आताच्या सरकार कडे स्वबळ असूनही भारताच्या होणाऱ्या शाश्वत हानी स थांबविणे यांचे उद्देश नाही हेच दुःख.

काय आहे ग्रीन कॉरिडॉर?

मित्रानो गझवा ए हिंद अथवा मुघलिस्तान वा ग्रीन कॉरिडॉर हे एकाच दुकानातले वेगवेगळ्या प्रकारचे बूट आहेत. उद्देश एकच आहे मजहबी साम्राज्यवाद. सम्पूर्ण भारत विशेषतः नर्मदा अथवा त्याखालील भाग हा हिंदू बहुल असल्यामुळे सहजतेने व्यापता येणार नाही म्हणून जिथे भारतीयत्वाची मुळेच सम्पलेली आहेत तो भाग, जिथे हिंदू समाज अल्प आहे तिथे आपली कारस्थान करायची. पाकिस्तान ते बांगलादेश काश्मीर ते बंगाल मार्गे जोडायचा हा मूळ उद्देश आहे.आणि एक मुस्लिम मजहबी साम्राज्य परत उभारायचे जे यांचा पूर्वज औरंगजेब उभारून गेला होता.

आणि का असू नये हीच राज्ये ? मित्रांनो देशातील 70 टक्के सूनन्त म्हणजे मजहबी लोकसंख्या हि याच भागात आहे. एकट्या उत्तर प्रदेशात तब्बल 5 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. बिहार बंगाल घाटी तर सुभान अल्लाह स्थिती.इतल्या राजकारण्यांनी च उर्दूचा द्वितीय भाषेचा दर्जा दिलाय. इथल्या मजहबी जमातीचे वाहबीपण गेली 70 वर्ष वाढलंय आणि या सर्व घडामोडींच केंद्र आहे रोहिलखण्ड म्हणजे हरित प्रदेश अथवा पश्चिम उत्तर प्रदेश जिथे अलिगढ आहे तो भाग जवळपासचा  प्रदेश समजुया. मराठे अवध व रोहिलखण्ड तसेच सोडून पंजाबात गेले नसते तर कदाचित आजचा दिवस वेगळा असता. हरित प्रदेशातल्या 10 जिल्ह्यामधून जवळपास सर्व गावे हि अखिलेसुद्दीन चं सरकार मध्ये हिंदू मुक्त केली गेली.अक्षरश: हिंदू हाकलून लावले .आणि तेही लढायचं विसरून अन्य राज्यात घुसले. आज 8 वर्षांनी परत योगी सरकार वेगळी लोकगणना करतेय.इथली प्रचंड मजहबी लोकसंख्या हा ग्रीन कॉरिडॉर बनवून च सोडेल.


हिंदू सत्तेने काय करणे ?

मग भारत कसा रक्षिणे यावर विचार केला असता भारताची प्रचंड वाढत असलेली लोकसंख्या नियंत्रित करणे, सर्व धर्मांना एक संविधान एक व्यवस्था लागू करणे , लोकसंख्या वाढीतून होणारा वसाहतवाद थांबविणे, स्वतंत्र न्याय व तपास व्यवस्था निर्मिणे हे खूप गरजेचे आहे पण व्यर्थ.
जर खरच भारत वाचविणे हिंदू सत्तेच्या मनात असते तर असे काही झाले असते पण केवळ राजकारण केले गेले.,


देशात मजहबी व भाषीय वसहतवादाची पराकाष्ठा होतेय पण रामाचे जादे सत्ता माजोरीत मग्न आहेत.


असो!
जय भारत।