Friday, 22 September 2017

तू ये ना कधी ....!

तू ये ना कधी ....!




माझ्या रम्य आठवणींची साउली बनुनी ये ना  कधी.....!

उमललेला पारिजात मी समजूनि मनमानसी  ओंजळी मज  घे ना कधी...!

आलिंगण्या या  सागरा  तू   होऊनी  सरिता सखी ये ना कधी...!

स्वप्नातल्या त्या मधु मिलनाची स्वरवेली जणू तू होऊन ये ना कधी......!

अंतर्मनीची स्वररागिणी  तू ,सावनी बनुनी झरझर बरस ना कधी...!

लवते न लवते पापणी हि जशी,आठवते मला तू तत्परी..जणू स्पर्शणारी झुळूक बनुनी नयन सुख दे नां कधी....!


मनाचिया व्याकुळतेची क्षुधा शमवणारी वर्षा सरी होऊन बरस ना कधी...!

जणू बासरी तू वृन्दावनीची,  संतोषण्या  मन माझिया तृप्ती बनुनी ये ना कधी...!

कांती तुझी मृण्मयी ,दरवळण्या प्रीतगंध तो..कस्तुरी होऊनी ये ना कधी...!

चंद्र्प्रभेसम तेजस्विनी तू.,सारण्या अंधार या मनमंदिरी चांदणी होऊनी तू ये ना कधी...!

लावण्याची जणू रसिकमोहिनी तू...,रमविण्या कृष्णास या राधा बनुनी ये ना कधी....!


अहिर भैरव


No comments:

Post a Comment