Monday, 18 September 2017

About malayalis in my life….. माझ्या आयुष्यातील केरळी लोकांबद्दल.... !

About malayalis in my life…..
माझ्या आयुष्यातील केरळी लोकांबद्दल....



नमस्कार राजे.......!

आज काहीतरी वेगळ घेऊन आलोय..तुमच्यासाठी.. नेहमी आवेशात राजकारण आणि समाजकारण यावरच जास्त लिहिल्या जाते माझ्याकडून... पण या व्यतिरिक्त हि एक सुंदर शांत प्रेमळ प्रेरणादायी अस जग आपल्या भोवताली नित्य असते....

 अश्या या जगाचा भाग असून त्याकडे न बघण्याची चूक माझ्याकडून होणे नाही.. आपल्या आयुष्यात येणारी वेगवेगळ्या प्रकारची माणसे आपल्याला खूप काही शिकवून जातात...

 आजूबाजूची लोक बदलली कि आपले आयुष्यही बदलत जाते..त्यातही नवे रंग भरले जातात... कित्येकदा या गोष्टी आणि बदल नकळत होत असतात ..आपल्याला जाणीव सुद्धा होऊ नये इतक्या हळुवारपणे... हे सगळ होत असते....


लहानपणापासून कॉस्मोपॉलिटिन म्हणजे आपल्या “तारक मेहता का उलटा चष्मा” आहे न अश्या प्रकारच्या लोकवस्तीत राहतोय....आमच्या पश्चिम नागपूरला सर्वात जास्त केंद्र सरकारची मोठमोठी कार्यालये आहेत... 

त्यामुळे या भागात सरकारी कर्मचार्यांच्या वसाहती बर्याच प्रमाणात आहेत.. यामुळे बंगाली मल्याळी तमिळ उडिया इतर सर्व भारताच्या भाषिक समुदायाचे लोक इथे असतात आणि त्यांच्याशी संपर्क येतो.. आज माझ्या आयुष्यातल्या मल्याळी किंवा केरळी लोकांबद्दल मी लिहिणार आहे...

आयुष्यातले पहिले केरळी कुटुंब म्हणजे माझ्या घराच्या मागे राहणारे शाजू अंकल आणि त्यांचे कुटुंब  काकू...
आणि त्यांच्या दोन मुली काव्या  आणि दिव्या... 


Image result for kerala map

काका केंद्रीय संस्थेत नोकरी करतात तर काकु  घरी असतात दोन्ही मुली शिकणाऱ्या एक १० वीत तर दुसरी १२ वी ला... फार छान कुटुंब आहे... हे लोक धर्माने क्रिश्चन आहेत पण सगळेच मल्याळी लोक स्वतःला मल्लीक्रीश्चन म्हणजे मल्याळी क्रिश्चन म्हणवून घेतात .. हे लोक इथे येऊन मराठी शिकले.. सोबत घरीच आपल्या मुलींना मल्याळी लिहायला पण शिकवण्यात आले... केरळी लोकांना मराठीचा दुस्वास नाही..ते जिथेही जातात तिथल्या भाषा संस्कृतीशी एकरूप होतात आणि तेही स्वतःची भाषा संस्कृती सणवार, खाद्य संस्कृती जोपासून... या काकू नेहमी क्रिसमस ला आमच्याकडे एक मोठ्ठ भांड भरून केक आणि इतर गोड पदार्थ पाठवतात.... स्वभावाने खूप चांगले आणि मनमिळाऊ लोक आहेत.. कित्येकदा केरळी पदार्थ जसे अप्पम सांबर इडली डोसा सुद्धा पाठवतात... अर्थात आपण हे घरी सुधा करून खात असतो पण त्यांच्या हातच केलेल हे चवीने वेगळा असत.... तसेच colony मधल्या गणेश उत्सवात वर्गणी पासून विविध कार्यक्रम मध्ये भाग घेण्यापर्यंत यांचा सहभाग असतो... क्रिश्चन असुनहि.. त्यांन्च्यात हिंदू विरोध नाही..आणि आम्ही हिंदू सुद्धा क्रिसमस च्या शुभेच्छा आणि इतर वेळेस त्यांच्यात सह्भागी  होत असतो...

यानंतर दुसरे मल्याळी कुटुंब म्हणजे जिनी काकू आणि त्यांची शिकवणी... ६ वीत असताना मी इंग्रजी चांगल व्हावं म्हणून जिनी रॉय या बाईंची शिकवणी लावली होती ..

बाई स्वभावाने कडक पण वर्ग संपल्यावर प्रेमळ... या जिनी काकुनकडे मी ५ वर्ष शिकलो... मला काहीही इंग्रजी यायचं नाही...माझे हसे व्हायचे... पण या काकुंमुळे मी आज फाडून ठेवतो लोकांची... माझ्या मित्रांमध्ये बोलायला जायचं असला तर मलाच पुढे करतात... 

अर्थात इंग्रजी जर कोणामुळे आल तर जिनी काकुमुळे... याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत यांच्या मुलासोबत म्हणजे कुक्कु सोबत मी मल्याळी लिहायला पण शिकलो... मला कैरली भाषेची लिपी अवगत झाली ती यांच्यामुळेच... 


Image result for onam men

शिवाय या काकूंनी मला बायबल आणि प्रभू  येशूच्या खूप गोष्टी सांगितल्या शिकवल्या... आणि माझ्याकडून महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक आंदोलने या गोष्टी जाणून घेतल्या... अचानक या काकुंशी संपर्क तुटला.. कारण या बदली होऊन सुरत ला कि इंदूर ला गेल्या......

या नंतर ७ वर्षे गेली... february २०१७ पासून मी घराजवळच्या केटी नगरच्या मैदानावर खेळायला जाऊ लागलो... तिथे माझी मैत्री पूर्णिमा ,अजिन रोशन आणि शेनो... या चौघा मल्याळी मित्रांशी झाली... यासोबतच काही मराठी आणि काही बंगाली मित्र  मैत्रिणी सुद्धा आहेत... 

गेल्या ६-७ महिन्यात आम्ही खूप मस्ती केलीय badminton फुटबाल ... एकमेकांचे वाढदिवस इतर सोहळे... रविवारची पार्टी ... breakfast किंवाअन्य काही कार्यक्रम अगदी मिळून मिसळून करतोय...  यांच्या संपर्कात येऊन मी काही मल्याळी शब्द शिकलो जसे सुगम आणू ?? म्हणजे कसे आहात... इल्ले इल्ले म्हणजे नाही नाही... स्नेहम प्रेमम... कुन्जमणी ... कुंडी चंदी लग्नं जाथकम ... असे  खूप...... 








 काही दिवसांपूर्वी ओणम हा केरळी लोकांचा प्रमुख  सण साजरा झाला तेव्हा नागपुरातील केरला समाजं या संस्थेने मिरवणूक काढली... त्यात केरळी हिंदू आणि क्रिश्चन असे दोन्ही बांधव लुंगी ज्याला मुंड म्हणतात ते घालून सह्भागी झाले होते..शिवाय मुली पांढरी पिवळ्या जरीची साडी घालून होत्या अगदी छान प्रकारे फुलांच्या रांगोळ्यांनी सजावट केलेली होती...  

या सहा महिन्यात मी निरीक्षिले  कि... हे लोक आपल्या भाषा आणि संस्कृती शी फार जुळलेले असतात.. नागपुरात केवळ एका multiplex मध्ये महिन्याला एकदाच मल्याळी चित्रपट येतो तिथे हे लोक आवर्जून बघायला जातात..अगदी फुल असतो हॉल,,, जन्म इथे झाला असला तरी मल्याळी कुटुंबाने त्यांवर खूप चांगले संस्कार केले आहेत.. हे यातून दिसते .. या सर्व मित्रांच्या मोबाईल मध्ये सर्वात जास्त मल्याळी गाणी असतात..त्यातले मीपण एखादे ऐकून पहिले मला आवडले... कान्नोलाम...नावाचे... ...


 मल्याळी चित्रपट असो... भाषा असो..यावर अगदी मनापासून यांचे प्रेम असते... एक मल्याळी दुसर्या मल्याळी मित्राशी मल्याळी भाषेतूनच बोलतो.. हे विशेष .पण कोणतेच मराठी दुसर्याशी मराठी बोलत असतील हे क्वचीत सुद्धा आढळत नाही... आपल्या भाषा संस्कृतीची पाळेमुळे येणाऱ्या पिढीच्या मनात कशी रुजवावित हे यांच्याकडून शिकावे.. 

अल्प जरी असले तरी हे लोक एकमेकांना धरून राहतात,,हिंदू असोत वा  क्रिश्चन भाषा हा यांच्यातील सर्वात मोठा दुवा असतो... केरळ मध्ये ओणम हा बळीराजा शी संबंधित उत्सव असो किंवा त्रिशूर महोत्सव ..वल्ला पोल्लाकाराम असे आणखी फार सण असतात जे ... केरळमध्ये...  सगळ्या धर्माचे  लोक साजरे करतात.....

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच हिंदू किंवा भारतीयत्व हे धर्म नसून एक संपन्न जीवन शैली असल्याचे प्रतिपादन केले होते... त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे केरळी लोक.... 


Image result for onam

असा गुणी समाज निर्माण केला गेलाय कि या राज्याची भाषा संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही हि मंडळी असलीत न तरीही लयास जाणार नाही...  माझ्या यातल्या दोन मित्रांचे आईबाबा निवृत्त होऊन केरळला कायमस्वरूपी शिफ्ट होत आहेत.. तब्बल ३५-४० वर्षे इथे राहूनसुद्धा इथे एकही घर यांनी घेतलेले नाही.. पण केरळ मध्ये २-२ घर आहेत..हे सगळे मित्र सुद्धा ... शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथेच जाणार आहेत..... 

जन्म इथे झाला नागपूरच्या मराठी आणि बाट्वून हिंदी केलेल्या श्रीमंत वातावरणात राहूनही परतीची ओढ यांना जाणवते आणि मानवते हे अत्यंत कौतुकास्पद आहे...   आपल्या संस्कृतीच दाक्षिण्य कसं जोपासाव मनामनात रुजवाव आणि नेहमी साठी टिकवून ठेवावं हे कोणीही यांचे कडून यांचेकडून शिकावं...

 नाहीतर आहेच संघ मुख्यालायातले गोडबोले भटजी आणि धरम पेठेतले चतुर शेटजी (राजकारणी )... एक हिंदू राष्ट्र बनविण्याच्या बाता करतय आणि दुसरे परप्रांतीयांच्या अल्प  मतांसाठी.. बहुसंख्य समाजाची मराठी भाषा बोलायलाही लाज वाटवून घेतात.. आजकाल नागपुरातले सगळे संघाचे कार्यक्रम हिंदीत होतात... ९० टक्के मराठी लोकसंख्या असूनही असा दलीद्दरवाडा ..... 

या  जखमेवर मीठ म्हणून... नागपूरची महानगरपालिका आताशा हिंदीत काम करू लागलीय ...जागोजागी पोस्टर आहेत...कचरा कुडे दान मे डालिये अश्या स्वरूपाचे.... मेट्रोला माझी मेट्रो असे  नाव होते ते बदलून महामेट्रो केले गेले तेही  या भाषिक सामाराज्यावादी लोकांच्या मतांसाठी ..

. कुडे दान मे या भैय्या लोकांची हिते जपणाऱ्या भाजपलाच टाकयला पाहिजे...     

मराठी भाषा संस्कृती ची वाट लावून कोणते हिंदू राष्ट्र येणार
 माहित नाही...
मोगलांच्या भाषेला देशावर थोपवून आणि हजारो वर्ष जुन्या देशी द्रविड भाषा संपवून काय साध्य करतय भाजप ते देवच जाणे..... असो...... 

कधी कधी आपल्या राज्याचा हा र्हास बघून दुखः होते... पण कुठेतरी आनंद आहे... कि केरळी तमिळ कानडी तेलुगु हि मंडळी आपल्या भाषा, राज्ये आणि संस्कृती किती छान पणे जोपासत आहेत.... मी केरळी लोकांकडून खूप काही जाणून घेतले .
.यामुळे माझ्या ज्ञानात भरच पडली.. याचा माल आनंद आहे..

या लेखाद्वारे ..आदी शंकराचार्यांच्या केरळ या द्रविड देशाला माझे आणि सर्व मराठी बांधवांचे शतशः नमन.....




हा लेख कोणत्याही जाती धर्म भाषिक समुदायाबद्दल द्वेष भावनेच्या हेतून लिहिलेला नाहीये....


तूर्तास इति शम,...........!



No comments:

Post a Comment