Friday 18 November 2016

बिठूरचे नाना साहेब पेशवे(२) गेले कुठे?





बिठूरचे 
नाना साहेब पेशवे(२) गेले कुठे?


 मनोहर मळगावकर ह्यांचे पुस्तक वाचनात आले. सदर पुस्तक हे मराठीत वादळवारा ह्या नावाने भा .द. खेर ह्यांनी अनुवादित केल आहे.प्रकाशन वर्ष १९८४.  त्यातील हा सारांश इथे देतो आहे. थोडी पार्श्वभूमी सांगून मी थेट त्यांच्या कानपूर हून गायब होण्या कडे येतो.कारण अन्य माहिती आंतरजालावर बरीच उपलब्ध आहे. पण सदर कादंबरीच खर भाष्य त्या नंतरच्या घटनेवर आहे. 
 मळगावकर ह्यांच्या पुस्तकावर माझा विश्वास का?आणि मी हे इथे का देतोय? कारण  मनोहर मळगावकर ह्यांचे आजोबा पी बाबुराव हे त्याकाळी ग्वाल्हेर संस्थानात मंत्री होते.व हे नानासाहेब जे भारतातून सटकले ते ग्वाल्हेर च्या जयाजी शिंदे ह्यांच्यामुळेच.त्या वेळीस बाबुराव व नानासाहेब ह्यांच्यातील बोलणी हाच ह्या कादंबरीचा पाया आहे.हे पुस्तक नाना स्वतः आपल्याला सांगत  अस लिहिण्यात आल आहे. म्हणजे मी गेलो ,मी पत्र पाठवले अस. काय म्हणतात त्याला प्रथम पुरुषी एकवचनी तस.पण आता वेळे अभावी मी थोडक्यात सांगतोय.               

इस्ट  इंडिया कंपनी  सरकारने  दुसरे बाजीराव पेशवे ह्यांना पदच्युत करून त्यांची रवानगी बिठूर ह्या कानपूर नजीकच्या खेड्यात केली.  ब्रिटीश सरकारने त्यांना सालीना ५  लाख रुपये पेन्शन दिली.   बिठूर व आसपासच्या प्रदेशाचा संस्थानिक असा दर्जा दिला.पण  महाराजा हा किताब मात्र नाकारला. त्यांना एवढे दूर नेले कारण ब्रीटीशाना हि भीती होती कि जर ते मराठी प्रदेशात राहिले तर पुन्हा आपल्या विरुद्ध उभे राहतील.बाजीराव निपुत्रिक होते.नारायण भट व त्यांची पत्नी गंगाबाई ह्यांच्या धोंडोपंत ह्या पुत्रास  त्यांनी दत्तक घेतले. तेच पुढे नानासाहेब म्हणून ओळखले  जावू लागले 

तात्या टोपे ह्यांच्या कडून नाना ह्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलं.मनुकर्णीका म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई हि त्यांची बाल मैत्रीण.आपल लग्न मनीशी व्हाव हि त्यांची इच्छा.पण  बाजीराव ह्यांना निपुत्रिक असण्याचा शाप होता  व तो पुढे  नानासाहेब ह्यांना हि लागला अस ह्यात म्हंटल आहे. तसेच लग्नाच्या बाईशी संबंध आला कि  बाई  मेलीच. असेही नानांच्या पत्रिकेत होते. पुरोहितांच्या सल्ल्याने  बाजीरावांनी प्रथम नानासाहेबाच लग्न एका वेलीशी लावलं.ती वेल काही  दिवसात जळाली .म्हणजे शाप  गेला.मग ह्या दुसर्यांदा  स्त्री शी लावले.      नानासाहेब ह्यांची हि पत्नी  पहिल्या रात्री नंतरच गेली. मग बाजीरावांनी त्यांच्यासाठी  एक रखेल  ठेवली. तीच नाव चंपा.तिच्यापासून त्यांना गंगामाला नावाची मुलगी झाली. व नंतर युद्ध पश्चात एमिली नावाच्या anglo इंडियन स्त्रीपासून अजून एक मुलगी झाली
पुन्हा लग्न कराव तर कुणी मिळेना.पेशवे घराण्याचा हा शाप जगजाहीर झाला होता.  शेवटी बाजीरावांनी वधू  पित्यास भरघोस बक्षीस देऊ जाहीर केल.तेव्हा कुठे एक मुलगी मिळाली.ती म्हणजे  काशीबाई.त्या  मुलीशी नानांनी  विवाह  केला पण नावालाच. ते कधीच एकत्र आले नाहीत.आपल्यामुळे तिचा जीव जाईल ह्या भीतीने नानांनी तिस कायम दूर ठेवले.ती फक्त सण,सभारंभ,पूजा ह्यात पत्नी म्हणून सहभागी होइ.पत्नी म्हणून एवढाच तिचा अधिकार होता. बाकी नानांच्या आयुष्यातली खरी पत्नीची जागा हि चंपाचीच होती.              
. तसेच त्यांची एक बहिण ग्वाल्हेरला दिली होती.तिचे सासरे हे ग्वाल्हेर दरबारात होते.सखे  बंधू बाळाराव (जन्म दात्या आई वडिलांचे ) व त्यांचे पुत्र रावसाहेब हेही युद्धात कामी आले.इथे हि शाखा संपली असा मळगावकरांचा दावा आहे.  तरीही काही लोक आम्ही नानाचे  वंशज असा दावा करत असतात.त्यात उत्तर प्रदेशचे सुरज प्रताप आहेत व गुजरातचे काही आहेत.(आपण जे पुण्यात पेशवे वंशज पाहतो ते बहुतेक अमृतराव  ह्यांचे असावेत.)                  

बाजीरावांच्या मृत्यनंतर नानासाहेबांना पेन्शन नाकरली.संस्थानिक दर्जा हि काढून घेण्यात आला. त्यांची मालकी केवळ त्यांचा वाडा,त्यांची मंदिरे,घाट,व शिकार खाना एवढीच ठेवण्यात आली. नानांचा वकील अजीमउल्ला खान नानांची मागणी घेऊन लंडन ला जाऊन आले पण काही उपयोग झाला नाही. ५७ च्या कटात ते  फैजाबाद चा मुल्ला,अयोधेची बेगम हजरत महल ह्यांच्या सोबत  सहभागी झाले.

Ajimullah Khanवकील अजीमउल्ला खान 


 पण केवळ पेन्शन नाकारली हे कारण न्हवते. त्या बिठूरच्या वाड्यात इंग्रजांची चांगली उठबस होत असे.बाजीराव व नंतर नाना हे आपले दोस्त आहेत,पाहुणचार चांगला करतात अशी ढीगभर पत्रे इंग्रजांची मिळतील. तो वाडा ब्रिटीश मंडळींचा सहलीचा मुख्य अड्डा झाला होता व नाना आणि अजीम खास दोस्त.हे उलटतील अस कुणालाच वाटत न्हवत.उलट वेळ पडली तर ह्या वाड्यात आपली बायका मुल आपण सुरक्षित ठेऊ शकतो असे इंग्रजांना वाटत होते. सदर पुस्तकात तसे पत्रव्यवहार आहेत.निदान पेशव्यांच्या बाबत तरी पेन्शन नाकारली  म्हणून लढले अस म्हणू नये. त्यांची पेन्शन नाकारली  तरी ते उपलब्ध संपत्ती च्या जोरावर पुढील कैक पिढ्या आरमात जगू शकले असते.किंवा काही उद्योग करू शकले असते. ती वर्णन पुढे देतोच आहे.               

कानपूर पडल आणि अंधारात लपत छपत नाना बिठूरला वाड्यात आले. तिथे सर्व तयारीतच होते.७ पेशवे, त्यांच्या बायका  ह्यांचे दागिने,हिरे जडित कट्यारी,तलवारी,सोन्या चांदीची भांडी असे सर्व परंपरागत वैभव  गोळा केले जावू लागले.एका  ते पेटीत ते भरण्यात आले. ते सर्व वाड्याच्या विहिरीत टाकण्यात आले.बाजीरावांच्या मते त्या वाड्यात केवळ सुवर्ण मुद्राच चलनी किंमत रुपये ३५ हजार   होत्या.म्हणजे चलन म्हणून तेवढी पण वितळवून सोने केल कि अधिक किंमत असे   सोन्याच्या मूल्याने हि किंमत खूप जास्त भरते. (ह्यापैकी केवळ ३५ हजार इतकी सोन्याची किंमत असलेल्या मुद्राच पुढे लुटा लुटीत मिळून आल्या. )    चंपा व गंगामाला वकील अजीमउल्लाह खान व स्वतः नाना ह्यांनी जरुरी पुरते   तेवढे सोने स्वतःजवळ घेतलं. शेवटी काही  वस्तू राहिल्या.थोरल्या बाजीरावांची जयंती तलवार व मस्तानी ची कर्णफुले व नवलखा हार.                 

थोरल्या बाजीरावा नंतरचे नानासाहेब,माधवराव काही कमी पराक्रमी न्हवते पण कुणाची ती थोरल्या बाजीरावांची तलवार वापरण्याची हिंम्मत झाली नाही. नाना नको म्हणाले पण चंपा म्हणाली कि ते लोक ह्या पवित्र तलवारीने गायी मारतील.मग शेवटी नानांनी आपल्या म्यानातली आधीची तलवार काढून  जयंती तलवार म्यानात घातली.अगदी व्यवस्थित म्यानात बसली.जणू काही ते म्यान जयंती साठीच होते.जणू काही शेवटच्या पेशव्या च्या हातात ती जावी अशी नियतीची इच्छा असावी  मस्तानीच्या कर्णफुलांचा पण असाच किस्सा. निजामाने दिलेल्या  रत्नाच्या कंठा मोडून हि कर्णफुले घडविण्यात आली.पण त्यावरून गहजब माजला.कारण निजामाने तो कंठा लढाईत हरलो म्हणून खंडणी रूपाने दिला होता. आणि तो यवनी मस्तानीस दिलाच कसा? बाजीराव भडकले. त्यांनी ती कर्ण फुले परत घेऊन जामदार खान्यात टाकली व गर्जना केली," जी स्त्री मस्तानी  एवढी सुंदर असेल तिलाच हि कर्ण फुले मिळतील." गोपिकाबाई,आनंदीबाई  कमी सुंदर न्हवत्या.पण त्यांची पण  ती कर्ण फुले घालण्याची हिंम्मत झाली नाही. आणि .... नवलखा हार. हा हार पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट ह्यांनी त्याकाळी म्हणजे साधारण १७१५ साली ९ लाख रुपये मोजून घेतला होता. त्यात केवळ एकच पाचू चे रत्न होते.ते जगातले सर्वात मोठ्या आकराचे पाचूचे रत्न आहे अस म्हणतात.त्रिकोणी आकाराचे ते आहे. ९ लाखास घेतला म्हणून  तो नवलखा हार.नंतर गादीवर आलेल्या प्रत्येक पेशव्याने त्यात रत्न व सोने ह्यांची भर घातली  होतीच. मग १८५८ साली त्याची किंम्मत काय असेल? कंपनी सरकार ने लुटून फस्त केलेल्या हिंदुस्तानात कोण मिळणार होता त्याचा खरीददार? हे सर्व घेऊन नाना निघाले. चंपा व मुलगी गंगामाला व इतर स्त्रिया ह्यांनी  बिठूर च्या वाड्यातच थांबावे असे ठरले.चंपा रखेल असली तरी पत्नी पेक्षा तिचा दर्जा कमी न्हवता. शिवाय राजकारणाची तिला उत्तम जाण होती. तिथे जर तिला कैद केलेच तर तिला नंतर सोडवता येईल किंवा ती नानांच्या वतीने कंपनीशी बोलणी करू शकेल असा हेतू होता.                                       

nana darbari poshakh
श्रीमंत नानासाहेब तथा धोंडोपंत  पेशवे.दरबारी पोशाखात  

आता मला खरच माफ करा.गावांची नाव मी विसरलो.आणि दोन पात्रांची सुधा.  पण नेट वरून काही सापडली. इथून म्हणजे बिठूरच्या  वाड्याहून नाना व त्यांची पत्नी काशीबाई ,अजीम,व काही मोजके सेवक कम अंगरक्षक निघाले.  पहाटेची वेळ ,गाव हळू हळू जाग होऊ लागल होत.नाना हरले तर स्वतःस गंगार्पण करणार,जलसमाधी घेणार अशी आवई आधीच उठवण्यात आली होती. लोक हळू हळू घाटाकडे जमू लागले.नाना आपल्या काबिल्यासाहित नावेत बसले. नाव दूर गेली आणि नानांनी नदीत उडी मारली.घाटावरील लोकांनी ते पहिले.लोक हळहळली. गीतेचा अध्याय म्हणू लागली.इकडे दूर पाण्याखाली हळू हळू अंदाज घेत नाना पोहत होते. दिसेनासे झालो ह्या बेताने वर आले. मग एके ठिकाणी थांबले.आपले कपडे टाकून संन्यासी  वेश घेतला.कफनीच्या  आता तलवार लपवली.हातातील काठीत सुवर्ण मुद्रा लपवल्या.झोळीत कट्यार,नवलखा हार,मस्तानीची कर्ण फुले लपवली.तिथून जावे तर कुठे? बेगम हजरत महल व  नानांचे कुटुंब बहारीच ला एकत्र येऊन पुढे नेपाळ ला जाणार होते.मागून अंदाज घेऊन नाना हि तिकडे येणार होते.व रस्त्यात एके ठिकाणी  अजीम त्यांना येऊन मिळणार होता.तोवर आजू बाजूच्या गावातून दडून बसावे किंवा माहिती काढावी असा बेत होता.   कुटुंब तिकडे गेले.मग आपण काय कराव? मग त्यांना आपल्या एका मुस्लीम  सेनाधिकारीची  आठवण झाली. त्याने लढाईच्या गदारोळाचा फायदा घेऊन खूप लुटमार केली हे त्यांना आठवत होत. तसेच त्याने एक बंगला पण विकत घेतला अस त्यांना समजल होत. ते ठिकाण कानपूरच्या पुढे होते.ते तिथे गेले. तर एक म्हातारी  स्त्री एका तरुणीवर बसून तिला खिळे ठोकण्याचा प्रयत्न करत होती. नानांनी तिच्यावर एकच वार  केला ती मेली.तो आवाज ऐकून अजून एक लहान मुलगा व बाई पळत आली. ते दृश्य पाहून ते आले त्या बाजूला निघून गेली. ती तरुणी होती एमिलीव्हीलर साहेबांची मुलगी. हे व्हीलर साहेब तेच जे कधी त्यांचे मित्र होते,जे नानांच्या वाड्यात नेहमी येत,ज्यांनी एका भारतीय स्त्रीशी विवाह केला होता,पुढे  जे कानपूरच्या किल्ल्यात दडून नानांशी  लढले. त्यांचीच हि anglo इंडियन मुलगी एमिली. तिच्याकडून समजलेला प्रकार भयंकर   होता. त्या सेनाधिकारीस एमिली सती चौरा च्या घटने नंतर पळून जाताना सापडली.त्याने एमिलीचा तिच्या इच्छे विरुद्ध  धर्म बदलला,निकाह लावला व रोज बलत्कार करत असे.त्या दिवशी संधी मिळताच तिने त्याला मारले. मग हि म्हातारी म्हणजे त्या अधिकार्याची पहिली पत्नी ती बदला  म्हणून क्रूर पद्धतीने मारायचे म्हणून खिळे ठोकून मारत होती. नानांनी तिचे  पायातील खिळे काढले,जखमा बांधल्या. आजू  बाजूचा अंदाज घेत व एमिलीच्या माहितीनुसार ती जागा सुरक्षित होती   दोन दिवस तिथेच राहिले.

 नंतर ते व एमिली आधी ठरल्यानुसार अजीम भेटणार  होता तिथे निघाले. एमिली हि anglo इंडियन त्यामुळे ती दिसयला भारतीयच दिसत असे. दोघे संन्याशी  वेशात निघाले   ठरल्याप्रमाणे अजीम भेटला.सोबत अजून ४ सेवक होते. आता प्रवास हळू हळू बहारीच च्या दिशेने सुरु झाला.आता मला खरच माफ करा. ह्या जागेच नाव  खूप महत्वाच आहे हे मी विसरलो.एके ठिकाणी एका गावात एका वाड्यात  नाना साहेबांना  आश्रय दिला.नाना तिथे एके दिवशी सज्जत विचारमग्न अवस्थेत उभे होते. तेवढ्यात एक भारतीय सैनिकांची तुकडी चालत आली.ते अयोध्येकडे निघाले होते. त्यातील एकाने नाना साहेबाना ओळखले.व नाना जणू परेड ला सलामी देत आहेत अस त्यांना वाटल.मग नानांच्या नावाचा जयघोष झाला. नाना भानावर आले. तुकडी प्रमुखाने येऊन नानांचे नेतृत्व मान्य असल्याचे व पुढील आदेश द्या असे सांगितले. पराभूत राजाचे पराभूत सैनिक एकमेकाला भेटत होते. नानांनी नेतृत्व स्वीकारले असे जाहीर केल. २ तासापूर्वी कुणाच्या तरी मेहरबानी वर आश्रय दिलेल्या घरात  केवळ ८ सहकारी सोबत घेऊन पुढे नेपाळात कसे सटकावे असा विचार करत असलेले नाना पुन्हा एकवार  २ हजार सैन्याचे स्वामी नानासाहेब पेशवे झाले. 

ह्या घडामोडी साधारण जानेवारी १८५८ च्या मग पुन्हा लष्करी डावपेच आखले जावू लागले. अयोध्या पडली न्हवती.  अयोध्येकडे जावे आणि जर वाट अडवली गेली तर वर नेपाळ ला सटकावे अस ठरलं. ह्या वाटेवर ३ लढाई झाल्या. शेवटी एकूण  दीड हजार लोक ह्यांच्यासोबत नाना बहारीचला नेपाळ च्या वाटेवर  दाखल झाले. दरम्यान रावसाहेब हा त्यांचा पुतण्या कामी आला. आता खरी परीक्षा सुरु झाली. बातमी अशी आली कि नाना व सगळेच गोंधळले.  नेपाळचे राजे जंग बहाद्दूर राणा  हे ब्रिटीश सैन्याच्या मदतीला भारतात उतरत असल्याच्या बातम्या होत्या. मुळात जंग बहादूर हे राजे राजेंद्र ह्यांना दूर सारून व आपल्या मर्जीतील व्यक्तीला राजेपदावर बसवून स्वतः राजाचे राजे म्हणजे पंतप्रधान झाले होते.नेपाळी लोक त्यांना राजांचा  राजा म्हणत.पण पुन्हा संदेश देवाण घेवाण झाली व तराई च्या जंगलातील बाजूने आपण नेपाळात शिरावे असा संदेश आला.

नाना व त्यांच्या बरोबरचे सैनिक  सेवक असे दीड हजार लोक तसेच बेगम हजरत महल व अन्य स्त्रिया हे नेपाळ कडे गेले.तिथे गेल्यावर   
त्यांना एक वाड्यात नेण्यात आले.वाड्यात नानांनी व प्रमुख व्यक्तींनी मुक्काम केला.इतरांनी आजू बाजूला तंबू टाकले. वाड्याच्या सर्वात उंच मजल्यावर असलेल्या   दालनात  जंग बहादूर बसला होता.थोड्या वेळात त्याने आपला सेवक नाना साहेबांकडे पाठविला.        
आता हे  जे तुम्ही वाचाल ते तुमच्या भारतीय  महाराष्ट्रीय  मनाला पचवणे जड जावू शकेल.पण हे स्वतः नाना नीच पी बाबुराव व होळकर नरेश  जयाजी शिंदे   ह्यांना सांगितले आहे असा मळगावकर साहेबांचा दावा आहे.


सेवका करवी  जंग बहादूर ने सरळ सांगितलं कि मला तुमची मदत व रक्षा  एक हिंदू, एक ब्राम्हण म्हणून करावी लागेल.तसा शब्द मी आधीच देऊन बसलो आहे.  मला तुमच्या राहण्याच्या भाडे पोटी तुमची रत्ने हवीत.तुमच्या नवलखा हारातील रत्ने. मी वेळोवेळी ती रत्ने आपणाकडून घेऊन  जाईल. पण ह्या करारासाठी  आपली बायको हि आपल्यासोबत राहणार नाही.पण तुमच्या वयानुसार योग्य त्या वयाच्या २-४  बायका तुम्हाला  तुमच्या जवळ ठेवता येईल. नाना चमकले. म्हणजे?माझ्या बायकोवर ह्याची नजर गेली तर? निरोप सांगणाऱ्या सेवकाच्या कानाखाली त्यांनी एक मारली. तो म्हणाला "साब,ती तुमची नावालाच  बायको आहे हे सगळा हिंदुस्तान जाणतो.तुमचा शाप सर्वाना माहिती आहे. तसेही तुमच्या जवळ पर्याय नाही.इथून निघून जा.आम्ही जबरदस्ती करणार नाही. तिकडे ब्रिटीश.आणि बाकी आपल नशीब! "   नाना विचारात पडले. जिला आपण पत्नीचा दर्जा दिला नाही आज तीच आपल्या जीवनाच मोल बनत आहे?तिला पत्नीचा दर्जा दिला नाही ह्याचा काळ माझ्यावर असा सूड उगवत आहे? सेवक पुढे म्हणाला कि आज रात्री तुमच्या राणी सरकारना आमच्या महाराणी साहेबांनी भोजनच आमंत्रण दिल आहे. निदान तेवढ तरी कबूल  करा,बाकी पुढच पुढे पाहू. नानांनी संमती दिली. 

रात्री १ चे टोल  पडले तरी काशीबाई दालनात आल्या न्हवत्या.नाना तिथे वाट पाहत थांबले. त्या उशिरा आल्या.त्यांचे चालणे बदलले होते.डोळ्यात एक  चमक होती.

नानांनी विचारलं: काय म्हणल्या महाराणी? 
काशीबाई:  त्या कुठे होत्या ? फक्त राजे एकटेच होते.
नाना:ओह,मग? तुलाही तो आवडला तर? 
काशीबाई: तुम्ही मला कधी पत्नीचा दर्जा दिला नाहीत. मला हव ते  दिल नाहीत.आज मला संधी आहे.तुमच्या जिवांच मोल देऊन मला माझ्या हक्कच सुख  मिळणार  आहे.ह्यात तुमच्याशी प्रतारणा कुठे आहे ? तुम्ही मला ते सुख तुमच्या शापामुळे देवू शकत
  नाहीत कारण मग 
माझा  जीव जाईल. हे   मान्य करून तुम्ही तुमचे  व  दीड हजार लोकाचे प्राण वाचवू शकाल.ह्यात तुमच्याशी प्रतारणा  असली  तरी तुमचीच सेवा आहे.
           
नाना सुन्न झाले.सकाळ झाली.जंग बहादूर चा तो सेवक पुन्हा आला.  नाना नि विचारलं समजा तुझी अट ,काशीला तुमच्या
सोबत द्यायची मान्य केली,म्हणजे समझ हा अस तर? 
तसेच माझ ब्रिटीश सैन्यापासून रक्षणाच काय?आणि  हाराची किंम्मत किती ? तो फक्त २ लाख बोलला. नानांनी  वेळ मागितला.सेवक म्हणाला तो 
रत्न हार अनमोल आहे. हे हे आमचे महाराज जाणतात.पण नेपाळ  मध्ये रत्ने ह्या प्रकारच्या बाबत बर्याच गोष्टी प्रचलित आहेत.रत्ने म्हणलात तर त्या सोबतचे शाप आणि वर दोन्ही आले.इथे एखाद्याची बायको पळवण सोप. पण रत्ने? अजिबात नाही. चोरही रत्ने चोरत नाहीत आणि धनवान हि विकत घेताना हजारदा विचार करतात.अगदीच गरजू असेल तर विकत घेतात. जेणेकरून शाप लागणार नाही. आज त्या  हाराची किंमत कोटीत होती. नानांनी वेळ मागितला.दुसर्या दिवशी तो सेवक परत आला.नानांनी हो नाही करत त्या हाराची किंमत साडेचार लाख रुपये ठरवली ज्याची किंमत दीडशे वर्षापूर्वी केवळ एक रत्न असताना नऊ  लाख रुपये होती.त्यातील लागेल तशी रत्ने वेळोवेळी  ठराविक दिवसांनी येऊन खरेदी केली  जातील अस ठरलं
मग सेवक गेला.जंग बहादूरला सौदा 
कबूल  आहे असा निरोप घेऊन तो संध्यकाळी आला. तसेच माझ इथे असण्याच काय ? ब्रिटीश आणि जंग बहादूर ह्यांच्यात वितुष्ट नाही येणार काय ? ब्रिटीश इकडे शोधायला  नाहीत काय ? असे प्रश्न नानांनी विचारले.  तो सेवक म्हणाला कि  जंग बहादूर ने एखादा  माणूस मेला अस नेपाळात  जाहीर केल  तर यम देवता  पण त्यावर विश्वास  ठेवते. तुमच्या सारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीच  प्रेत घेऊन बनारस ला जाऊन जंग बहादर चे लोक अंतिम संस्कार करतील.मग तुम्ही हवे  तेवढे राहा.

शेवटी नाना व अजीम व जवळ जवळ दीडशे सेवक त्या वाड्यात उरले.एमिली मात्र तिथेच राहिली. तेव्हा ती गरोदर होती.तिच्याशी निकाह लावणाऱ्या व बलात्कार करणाऱ्या त्या सेनाधीकार्या पासून.अन्य सैनिकांना जंग बहादूर ने माफी मिळवून दिली.ते आप आपल्या रेजिमेंट ला पुन्हा रुजू झाले. 

एव्हाना बिठूरच्या बातम्या आल्याच होत्या.(वर लिह्याच राहून गेल)नाना साहेबांचा वाडा जनरल नील च्या सैन्याने लुटला व आग लावली.आगीत चंपा व पुत्री गंगामाला व अन्य  स्त्रिया होरपळून गेल्या. त्यांच्या शिकारखान्या तील वाघ, सिंह,हरीण,ससे   ह्यांची शिकार झाली.घोडे हत्ती वाटण्यात आले.विहिरीतून काही  पेट्या मिळाल्या. त्या वाटण्यात लुटीत सामील सैन्याच्या-सैनिक व अधिकारी ह्यांच्या हुद्यानुसार वाटण्यात   आल्या.नानांचा  काय तो रुबाब होता.ते दौर्यावर जात तर २० हत्ते, ४० घोडे,१००-१५० सशस्त्र  पायदळ त्यांच्या सोबत असे.चांदीच्या अंबारीत किंवा पालखीत  नाना बसत.पेन्शन बंद झाली तरी त्यांचा  पेशवाई थाट आर्थिक तोशीस न पडता सुरु होता.म्हणून म्हणतो कि पेन्शन नाकरली,महाराजा किताब दिला नाही म्हणून हे लढाईत उतरले असे नाही.समजा हे ब्रिटीश सैन्याच्या बाजूने उभे राहिले असते तर? आणि पुढे राणीनी कारभार हातात घेतला व कंपनीस दूर सारले. दत्तक मंजूर केले जाऊ लागले.  म्हणजे आजही पेशवे आपल्याला दिसू शकले असते. पण ह्या नानांनी आपल्या बापावरचा पळपुटा बाजीराव हा कलंक धुवून काढणारच ह्या एका ध्येयाने स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली.
Nanacha Lavajama
                
नानांचा दौरा 


१८५८ चा जुलै .भयंकर पाउस.पाउस तर पाउस.त्यात ताप.हा ताप तिथे पावसाळ्यात येईच.ताप आला कि माणूस ३-४ दिवस जगे. ताप,हात पाय जबर दुखत आणि थेट मृत्यू.जवळ जवळ २० लोक दगावली.पाउस संपला.दिवाळी आली. काशीबाई परत आली. तिने  म्हणल्या नुसार तीने  एमिलीच्या बाळाला दत्तक घेतले. त्याच नाव  समशेर ठेवलं.वर्षामागून वर्ष गेली.पावसळ्यात तराईच्या जंगलातून नाना मुक्काम हलवत.पाउस संपला कि पुन्हा तिथे येत.  वर्षे सरत होती.त्यांना एमिली पासून  कन्या रत्न झाले   नाना, एमिली व त्यांची मुलगी.सोबत अजीमउल्ला हा वकील/दिवाण,बंधू बाळाराव.वेळोवेळी जंग बहादूरचा सेवक येई. रत्ने घेऊन जाई.नानांची पत्नी काशीबाई हि जरी जंग बहादूर सोबत असली व त्याने जरी तिला जनान खान्याची मुख्य राणी असा किताब दिला असला तरी ती मनाने पती मात्र नाना साहेबांनाच मानी.दर दिवाळीस पाडव्याला  ती नाना साहेबाना ओवाळण्यास येई. जंग बहादुर  हि तिच्याकडून नानांना असे निरोप पाठवी जे सेवक अथवा पत्रातून देता येत नसत.नाना मात्र तिच्याशी फारस बोलत नसत. ती  कसे आहात?विचारी
नाना फक्त हो म्हणत.ओवाळणी टाकीत आणि निघून जात.   ह्या काशी  ने तिकडे राजधानी काठमांडूत जंग बहादूर ची प्रतिष्ठा धुळीस मिळवली.त्याच्या दरबारातील  चित्रकार त्याच्याशी तीच नाव  गेल होत. अनेक दरबारी  मानकरी  तिने आपल्या जाळ्यात  ओढल होत. तिने दत्तक घेतलेला एमिलीचा मुलगा बहादूर हा अवघ्या १६ व्या वर्षी नेपाळ रॉयल आर्मीत  बनला होता. नानांना हे ऐकून बरे वाटे.कि ती आपली नाही,होऊ शकली   हि नसती पण तिने जंग बहादूर च्या दरबाराची प्रतिष्ठा धुळीस मिळवली.एवढ होऊनही जंग बहादूर ने काही तिला दूर केल नाही. तिला नेपाळी जनतेने कामदेवी ठरवून टाकल.सौंदर्याचा अविष्कार वैगेरे वैगेरे   तिच्यावर गाणी रचण्यात आली.विशेष करून सैनिकात आजही गोरखा बटालीयन  व काठमांडू परिसरात लोक गीतात तिची सौंदर्याची स्तुती पर  गाणी ऐकू येतात.                
                                       

दरम्यान नानाचं प्रेत बनारस ला जाऊन अंतिम संस्कार पार पडले होते. नंतर काही वर्षांनी  नानांच्या बहिणीचे सासरे येऊन गेले.नानांची हि बहिण त्यांच्या सोबतच बिठूरहून निघाली होती.तीच लग्न झाल होत पण पाठवणी बाकी होती. तिथून बहारीच व नेपाळ.नंतर जंग बहादर ने तिला परत ग्वाल्हेर ला सोडण्याची व्यवस्था केली.तिचे सासरे आले ते साल होत १८६५.ते  म्हणाले कि माझे मालक (जयाजी शिंदे,ग्वाल्हेर नरेश ) हे शब्द टाकतील.निदान जीवितास तर धोका नाही. 
पण नानांनी प्रस्ताव अमान्य केला. ते व एमिली व त्यांची कन्या निवांत आयुष्य जगत होते.त्यांना आता पुन्हा ते सर्व नको होत.पुरेसा ऐशोरम,कुटुंब आणि फावल्या वेळात   देवाची आराधना मला अजून काय हव अस ते म्हणाले. मग ते(सासरे) म्हणाले कि मागे एकदा आमचे महाराज तुमच्या वाड्यात आले होते. वेळ प्रसंगी गरज पडली तर  तुम्ही एक हत्ती सोन्याने लादून आमच्या महाराजांच्या सोबत ग्वाल्हेरला पाठवला होता. त्यातील काही गरज आहे का? नाना त्यालाही नाही म्हणाले. 
                    
१८७० साली नानांचे बंधू बाळाराव गेले.नानांना हा फार मोठा आघात होता. १८७१ ला अजीम मक्केला जातो म्हणून गेला. उरलेलं आयुष्य तिकडेच काढीन.गरज लागली तर हजर कळवा हजर  होइन अस सांगून गेला.  १८७२ च्या दिवाळीत काशी बाई पाडव्याचे ओवाळायला म्हणून आल्या.त्यांनी सांगितलं कि आता राजे पेचात अडकले आहेत.तुम्ही इथे आहत अशी खबर त्यांचा भाऊ बद्री व त्यांच्या आधीचे राजे राजेंद्र ह्यांनी लढाई ची  तयारी  सुरु केलीय. म्हणून हल्ली महाराजांनी आपल्य्कडून रत्ने खरेदी केली नाहीये. कारण  अधिक काळ तुम्हास आश्रय देऊ शकत नाही.एकदा जर तुम्ही इथे आहात हे समजल व हि माहिती ब्रिटीश सरकारला समजली तर जंग बहादूर संपलाच. कारण त्यानेच शपथेवर तुम्ही मेला असे सांगितलं होत.ब्रिटीश सरकारला काहीतरी कारण हवेच  आहे एवढा मुलुख गिळण्यासाठी.            

नियतीच चक्र पुन्हा उलट फिरलं. पुन्हा ती पळापळ. एकेदिवशी एमिली व मुलगी निघाले. नंतर नाना सध्या वेशात काठीत  सोने भरून निघाले. १३ फेब्रुवारी १८७३ ला ते कानपुरात आले.गंगा किनारी त्यांनी वडील बाजीराव ह्यांचे श्राद्ध केले. गंगापुत्राने (गंगा नदीकाठील ब्राम्हणास गंगापुत्र म्हणतात) त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव विचारले.ह्यांनी बाजीराव सांगितलं. मग त्यांच्या वडिलांचे नाव विचारले ह्यांनी राघोबा सांगितले,मग राघोबांच्या वडिलांचे नाव विचारले तर पुन्हा बाजीराव.हे ऐकून तो उडालाच व म्हणाला, "मालक माझ भाग्य थोर जे आपण मला भेटलात.कुठे होतात आपण ? मी पांडे.मंगल पांडे माझा चुलत चुलत भाऊ.(वास्तविक मंगल पांडे ह्यांच्या हौतात्म्या  नंतर सर्वच पांडे आम्ही त्याचे भाऊ अस म्हणू लागले. तुम्ही कधी युपीत गंगाकिनारी काही कार्य केल असेल तर समजेल हे कसे चतुर असतात ते)  आम्ही सगळे कानपूर, बिठूर व आस पासची लोक आजही आपली आठवण काढतो. हे ब्रिटीश लोक आपल्याला गुन्हेगार म्हणतात.शाळेत पण मुलांना तोच इतिहास शिकवतात.पण आम्ही मात्र मुलांना सांगतो कि ते आपले राजे होते.आणि हे ब्रिटीश परके.ह्यांच्या विरुद्ध ते लढले.त्यांनी आपल्या सैनिकांच्या विरुद्ध दोन स्मारके उभारली आहेत.एक बिबिघरात व एक इथेच सती चौरा घाटात.दोन्हीकडे जे ब्रिटीश लोकांचे म्हणजे घाटावर स्त्री पुरुष व बिबिघरात महिला ह्यांचे जे  हत्याकांड झाले ते आपल्या सैनिकांनी केल अस त्यावर लिहून ठेवलाय अस म्हणतात."नानांनी त्यास उत्तर दिल कि बाबा मी आता काही राजा नाही.माझे विधी आटप.  मग शांत पणे तुझ्या घरी जावू मग बोलू.त्यानुसार नाना त्याच्या घरी गेले,जेवले.दुपार नंतर ते त्या दोन ठिकाणी गेले.ते शिलालेख वाचले.नंतर एका बागेत  लपत गेले.ती बाग  केवळ ब्रिटीश लोकांसाठीच होती.त्यात नानांनी स्वताचा क्रूरकर्मा वैगेरे उल्लेख वाचला. 

दुसर्या दिवशी ते बिठूर ला गेले.दुरून आपला भस्मसात वाडा पाहिला.त्याचं मन भूतकाळात रमल.तिथून ते ग्वाल्हेर ला आपल्या बहिणीकडे गेले व तिथून राजवाड्यात.शिंदे सरकार उभेच होते.त्यांनी एकास   आत बोलावलं व सांगितलं जा नीट दाढी  करून कपडे  करून ये. त्यांनी काही घटना सांगितल्या.नानासाहेब गायब झाल्यापासून हिंदुस्तानभर  लोक नाना म्हणून पकडले गेले.पण तुम्हाला प्रत्यक्ष पाहणाऱ्या कुणाही इंग्रजाने त्यांना ओळखले नाही.साक्ष इंग्रज व्यक्तीची शक्यतो ग्राह्य धरतात. त्यातले दोन नाना माझेच होते.म्हणजे मीच पाठवले होते. अजून दोन ठेवले. एक मध्ये वारला.हा एक उरलाय. हा कपडे करून आला कि  तुमच्यासारखाच  दिसतो.तुम्ही एक काम करा.माझा जीव वाचवा,मी पळून पळून थकलो असून मला स्थैर्य हवे आहे,मला काही राज्य वैगेरे नको,ब्रिटीश सरकार कडे माझ्यासाठी शब्द टाका अस पत्र माझ्या नावाने लिहा. शिंद्यांनी योजना पेशव्यांना सांगितली. शिंदे म्हणाले इथला  ब्रिटीश  रेसिडेंट माझा चांगला  मित्र आहे.उठावास  पण आता १५ वर्ष होऊन गेली.कारभार पण आता कंपनीकडून राणी कडे आला आहे.बघू काय प्रतिसाद येतो ते. नानांनी पत्र लिहील.ते पत्र तो तोतया नाना व शिंदे संध्यकाळी रेसिडेन्सीत गेले. त्या तोतयास  डॉक्टर टोड  समोर उभ करण्यात आल .हा डॉक्टर टोड  बिठूरला नानांचा डॉक्टर होता. अर्थातच त्याने हे नाना नाहीत अस सांगितलं. तो तोतया निघाला व त्याची रवानगी कोठडीत झाली. म्हणजे नानांना माफी नाही हे स्पष्ट झाल. इथे पहा पेशवा ह्या शब्दातील जादू. होत काय त्यांच्यकडे कुटुंबाच्या नावाशिवाय? एक हुजर्याहि सोबत नाही.पण ब्रिटीश सरकारला केवढा धाक  

मग तिथून नाना निघाले कोंकणात - मालवणला.तिकडे बंदरात  एक बोट त्यांची वाटच पाहत होती.ते बोटीत गेले. बोटीच्या अरब खलाशाने त्यांना  अरबी रिवाजाचे  कपडे दिले व एका खोलीत  सोडले.आत दोन  बुरखा धारी महिला बसल्या होत्या.त्यातील एक जवळ येऊन बिलगून बाबा म्हणाली. ती होती त्यांची मुलगी व  एमिली. तिथून ते मक्केस गेले.मक्केला अजीम होताच.  ते तिकडून constantinople  (कॉन्स्तान्तिनोपाल) (म्हणजे हल्लीच इस्तंबूल ) येथे गेले. शिंदे सरकारांचे आर्थिक व्यवहार जगभर होतेच. तिथल्या पेढीवर त्यांना हवी ती रक्कम  शिंद्यांच्या हुंडीवर मिळत असे. (त्यांच्यकडे सोन्याने लादून  हत्ती जो पाठवला  होता.) 

शेवटी नाना म्हणतात,"आज मी इथे खुश  आहे.इथे बहुतेक वर्षभर स्वछ सूर्यप्रकाश असतो.माझा वाडा,त्यापलीकडील नारळीची बाग ते तळे . माझी नव लख्खा हरतील सर्व रत्ने आता माझ्या शिरपेचात आहेत. मस्तानी बाईची कर्ण फुलेही लंडन मधील तितक्याच  सुंदर स्त्रीला मिळाली.सोबत एमिली आणि मुलगी व अजीम सारखा विश्वासू वकील आणि शांतता".

मूळ लेखक:मनोहर मळगावकर

अनुवादक: भा.द.खेर 

आणि ह्याचा केवळ  सारांश-कौस्तुभ गुरव             


उत्तर प्रदेश सरकारने बिठूर येथे उभारलेले स्मारक आपण खालील लिंक वर पाहू शकता. 

http://galleries.fin-mas.com/p673552669/h3E9B0213#h3e9b0213

त्यातील एक फोटो 
      
nana smarak of bithur

No comments:

Post a Comment