Wednesday 30 January 2019

30 जानेवारी : नेत्र उन्मीलन दिवस


मित्रांनो आज देशाचे अर्धमान्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृती दिन. गांधी नावाचं वादळ सहस्र वर्षे गाजतच राहणार आहे. पण सत्य काय नि असत्य काय याचा पूर्वाग्रह सोडून घेतलेला राजहंस पद्धतीने घेतलेला आढावा.


हा देश न्यूनाधिक 1000 वर्षच्या गुलामी चा बळी ठरला होता. तेव्हा इंग्रज आले. हळूहळू पसरले गोड बोलून अधिकारी झाले.
आणि यात महाराष्ट्र सोडून अन्यांचा अधिक सहयोग होता. मोगलाई ओसरून फिरंगीयत यायला मराठा व शीख सत्तेच्या व्यतिरिक्त अन्य भारतीयांचं संपलेलं क्षात्रतेज सर्वात जास्त कारणीभूत आहे. थोरल्या छत्रपतींनी गादीवर आल्यापासून फिरंग्यांची चाल ओळखली व मराठ्यांनी 250 वर्ष हजारदा जस जमेल तसं हे इंग्रज थोपवून धरले. ब्रिटिश सत्तेत यायच्या आधी
मोठी मराठा -इंग्रज 1,2,3 अशी युद्धे झाली . शिखांशी युद्ध झाले मराठे 2 युद्धे जिंकले व तिसऱ्यांदा हरले.

 8  टक्के मराठी व 2 टक्के शीख लोकसंख्या शेवटी किती पुरणार होती संपूर्ण भारताला कारण या व्यतिरिक्त अन्य कोणतीही भारतीय सत्ता अस्तित्वात नव्हती जी भारतासाठी लढेल. जसं मराठा इंग्रज युद्ध इतिहासात आहे तसे बिहारी इंग्रज युद्ध का नाहीय?इंग्रज तामिळी हिंदी युद्ध का नाहीय? कारण हे कि भारताचं क्षात्रतेज पूर्णतः संपलेलं होतं. भारत  अंधश्रद्धा परंपरा जातीयता स्वत्वाच्या अस्तित्वाचा अभाव व महाराष्ट्र पंजाब सोडून अन्य भारतीय हे बनियवादी गोडबोल्या भिक्षुक शाही च्या मानसिक दास्यत्वाचा भाग बनलेले होते. जे दास्यत्व धर्माच्या नावे लादले गेले होते. यात 100 टक्के (मराठी शीख) सोडून अन्य भारतीय लोकांचा विशेषतः अन्य भाषीय क्षत्रिय समाजाचा दोष होता.अशा परिस्थिती मध्ये इंग्रजांनी विवेक स्वत्व हरलेल्या भारतीयांनाच हाताशी धरून देश हडपला.



आणि मग सुरु झालं इंग्रजांच्या विरोधी युद्ध 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नावाची संघटना स्थापन करण्यात आलं.खरं तर ही संघटना पण ब्रिटिशांनी च अदृश्य स्वरूपात बनवली होती.त्यांचा मागून हात होता. सुरेंद्रनाथ बनर्जी ते लोकमान्य टिळक 1920 पर्यंत हि संघटना बरोबर भारतीयांच्या काही प्रमाणात जगलेल्या क्षत्रतेजाच्या मार्गाने चालत होती पण 1920 ला टिळकांची संदिग्ध स्थितीत हत्या झाली व मोहनदास गांधी नावाचे एक गोडबोले व्यक्तिमत्व काँग्रेस चे अध्यक्ष झाले. इथूनच  भारत किमान 1000 वर्ष स्वतःच्या व्यवस्थांचा गुलाम ठेवण्याच्या ब्रिटिश हेतूला साध्य होण्याचे काम सुरु झाले व फळले.



युरोप ने जगावर सत्ता का गाजवली व आजही आर्थिक राजकीय दृष्ट्या युरोप अमेरिकेची सत्ता जगावर का आहे माहितीय? युरोप विशेषतः इंग्लड कधीच अविचारी युद्ध करणारी जमात नवहती त्यांनी कायम ज्यांच्यावर अधिकार गाजवायचा आहे त्यांचा विशेषतः त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला व नन्तर गुलामी लादली. भारतात सत्ता मिळूनही लोक विरोध करतच होते म्हणून एक असं व्यक्तिमत्त्व स्वतःचा विरोध करणाऱ्या संघटनेला त्यांनी आणून दिले जे व्यक्तिमत्त्व फार गोडबोलून लोकांवर अक्षरमोहिनी टाकणारे होते.आपले बापूजी.



गांधींनी काँग्रेस हातात घेऊन जहाल गट च सम्पवला तत्कालीन अशिक्षित मागास भट भिक्षुक शाही बनियवादाला बळी सहज पडू शकणारा हिंदू समाज विशेषतः गंगे काठचा भारत शब्दांनीच गुलाम केला परदेशी आक्रमकांना 2000 वर्ष हाकलून लावणारा क्षात्रतेजाचा भारत स्वतःच्याच माणसाच्या मोजक्या शब्दांनी गुलाम झाला. इंग्रजांना तरी बंदुका लागल्या पण इथल्या गोडबोल्या बनिया लोकांनी राम कृष्ण या क्षत्रिय आस्थांचं अमर्याद बनियाकरण करून इथल्या इथेच करोडो लोक दास केले.आणि मनमुराद खेळ मांडला शोषणाचा. 




Gandhi
Diluted the spirit of freedom amongst Hindus .
He did psychological Subversion of Crores of Hindus who are so numb and still dumb to realize the Truth of their own Dharma Shastra National identity... Their own philosophy he made them to forget forever.



मी पहिला परिच्छेद गांधींच्या जन्माच्या आधीची हजार वर्षे भारताची पार्श्वभूमी का मांडली? लक्षात आलं का?
गांधी हा एक माणूस नाही एक (अ)विचार आहे जो इथे का रुजला याच कारण आहे की 1000 वर्षात मराठी पंजाबी सोडून 90 टक्के भारतीयांचं क्षात्रतेज कधीच संपलेलं होतं. धनुष्याने रावण वधणारा राम, सुदर्शन चक्राने दैत्य विनाश करणारा कृष्ण व असेच अन्य सर्व हिंदू आस्थेचे प्रतीक क्षणात विसरून अगदी त्यांच्याच नावाने एक झापड एक गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा अशी शिकवण हिंदूंनी स्वीकारली. का?



जी समाज खूप अशिक्षित व मागास झालेला असतो तो असाच गुलाम बनतो.गांधी आजही मेला नाही तो आजही हिंदूंच्या संपलेल्या क्षत्रतेजाचे प्रतीक आहे. हिंदू सत्तेत येऊनही अति सहिष्णू आहेत, जगात 4थी मोठी सेना असूनही चारिकडून आक्रमण सहन च करतोय आपण या राजकीय क्षात्रतेजाच्या अभावाचे कारण बनून गांधींचं उभा आहे. हिंदूंमधली अति सहिष्णुता पुरोगामित्व हे हि याच गांधीवादाची देणगी आहे.
ब्रिटिश गेले पण भारताला लुटणारे सत्ता तंत्र कायम ठेवून, गेल्या 70 वर्षात करोडो हिंदू संपले ज्याचा स्वतः हिंदूंनाच हिशोब माहित नाही माहित झाल्यास मान्य नसतो.धर्माच्या नावावर तथाकथित संत पुजार्यांनी खूप नुकसान केले देशाचे जे आजही सुरु आहे. पण महाराष्ट्र लढला हिंदूंना जागवून आजही उभा आहे स्वतःचे सरणारे अस्तित्व विसरून हिंदुत्वाच्या भगव्यासाठी कायम निश्चल मंदार मेरू सम .


गांधी चांगला कि वाईट हा आज प्रश्नच नसावा. सत्य काय आणि असत्य काय ते च कळलं तर पुरे.
आज 70 वर्षात हिंदू जागे झाले आता 2 ऑक्टोबर ला शास्त्रीजी जास्त असतात सोशल मीडियावर.थांबा थोडं आणखी लोक जगातील.


जे लोक म्हणतात गांधिंमुळे करोडो लोक मारले गेले मला त्यांना विचारायचं कि हे करोडो क्षत्रतेज ज्या भागात नाहीत त्याच भागात का मारले गेले? त्यांच्या क्षात्रतेजाच्या अभवाच काय? त्यांचा दोष नाहीय का? 5 टक्के मुस्लिम कट्टरतेने 25 टक्के होऊ शकतात तलवारी गाजवणाऱ्या दुर्गा भवानीचा धर्म मानणारे हिंदू का ओसरत जातायत??



त्या 1947 च्या हत्या ज्या बघून नथुराम चे मन व्याकुळ झाले त्यांचा दोष गांधींच्या आधी आणि जास्त अफगाण ते ढाका या पट्ट्यातल्या हिंदूंच्या संपलेल्या क्षात्रतेजाचा आहे.
मराठी माणूस ज्या साठी लढतोय ते कालही अन्यांमध्ये नवहते आणि आजही नाही.

शेवटी गांधी भारतीयांच्यातल्या सम्पलेल्या क्षत्रतेजाचं प्रतीक आहे


आज त्यांना दक्षिणेवर त्यांचं व त्यांच्या मुसलमानी भाषेचं आधिपत्य हवंय कुठलंच हिंदुत्व नकोय .
असो।


घाई घाईत खूप क्रम बदलले असतील पण बघा डोळे उघडून
एखादा समाज खूप काही हरवून बसला असेल तरच एका माणसाचा इतका गुलाम होऊ शकतो कि स्वतःला शत्रूपुढे सम्पवून घेईल पण विरोध करणार नाही.



जय भवानी जय शिवाजी🏹🚩