Tuesday 23 April 2019

दहशतवाद ,साध्वी आणि गुंतागुंत ....!

दहशतवाद ,साध्वी आणि गुंतागुंत ....!

नमस्कार
आज परत आतून वाटतंय लिहावं आणि चर्या पुस्तिका ठीक काम करतीय म्हणून लिहितोय. गेले काही दिवस देशातील डावे समाजवादी , उजवे हिंदुवादी अन्य विचार प्रवाह यांची बरीच मते ऐकून घेतलीय. कायम काहीतरी मिसिंग असतं. कुठेही काहीही अन्यायकारक घडलं कि आपण घाई घाई मध्ये चिडून भावनेत वाहून जात असतो आणि त्या घटनेवर तिखट प्रतिक्रिया देत असतो. आता आतंकवाद किंवा मराठीत दहशतवाद च बघा ना. किती वर्षांपासून सर्व जगाला विधवस्त करतोय पण त्याचा नायनाट करावा ते सोडून कायम त्यात जात धर्म शोधला जातो.
आणि दुर्दैव हे कि या हल्ल्यांचा निषेध करण्याऐवजी भारतात यावर पण डावे उजवे भिडतात एकमेकांवर.

आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या काळ्या दहशतवादाची व्यख्या केली गेली नव्हती. पण पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रसंघावर दबाव टाकला आणि कदाचित हे काम मार्गी लागले असं दिसतंय. आपल्या देशात कायम भावनेच्या भरात जनता व्यक्त होत असते.यामुळे च सत्य बाजूला पडतं आणि विषयाची गल्लत होते गुंतत जातो आपण आणि सत्य मागेच राहते.आज दहशतवाद म्हणजे काय ते नेमकं बघूया.




दहशतवाद म्हणजे काही इस्लामी कट्टरवाद्यांनी धर्माच्या नावावर सर्व जगभरात विस्फोटक साहित्याच्या माध्यमातून सुरु केलेला विध्वंस. यात वाक्यात काही हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे.
इस्लाम धर्मातील जिहाद किंवा दार-उल-इस्लाम या संकल्पनांचा वाट्टेल तो अर्थ लावून जगभरात जिथे जिथे शक्य आहे तिथे बॉम्बस्फोट करणे ,लोक मारणे, लहानपणापासून मुलांना वहाबी कट्टर मजहबी शिकवण देणे , दहशतवादी मानसिकता जन्माला घालणे , सर्व जग वेठीला धरणे, यातून आपला मजहबी व भौमिक वसाहतवाद साध्य करणे हेच यांचे कार्यक्रम आहेत.



दहशतवादाला धर्म नाही हे सत्यच आहे कारण 100% मुस्लिम समाज काय असं करत नाहीय पण जगाला छळणारा दहशतवाद हा मात्र इस्लाम ला misinterpret करून किंवा धर्माला स्वतःनुसार  पुनर्लिखित करून धर्माच्या आधारे भावना भडकवून च जन्माला आलेला हा दुर्दैवी सत्य मानलं नाही तरी जागतिक सत्य हेच आहे.

पण आपल्याकडे अति शहाणे लोक उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता ,पुरोगामीत्व यांना बळी पडून कायम सत्य नाकारत असतात. पहिला दुष्प्रचार हा करतात की "नथुराम गोडसे हा पहिला हिंदू आतंकवादी होता"". मग प्रश्न विचारला कि त्याने किती दहशतवादी हल्ले केले ? किती लोक मारले कि फक्त हिंदू द्वेष करणाऱ्या आणि लाखो हिंदूंना दिल्ली मध्ये मरत असताना हसत बघणाऱ्या गांधींच्या त्या नपुंसक अहिंसेमुळे आलेली चीड त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरली तर मग गप्प होतात हे लोक. आणि हो त्यांनंतर जर हिंदू आतंकवाद नावाची कांग्रेस कल्पना खरंच अस्तित्वात आहे तर मग 30 जानेवारी 1948 नन्तर हिंदू आतंकवाद्यांनी किती हल्ले ,विस्फोट केले जगभर भारतभर? किती कत्तली केल्या? आणि ज्या संघटनांची नावे घेता त्या संघटनेला जगात किती देशात बंदी घातली गेली?तुम्ही तर 60 वर्ष दिल्ली च्या गादीवर बसून बंदी का नाही घातली? बरं  या 30 जानेवारी ननंतर देशभरातून काँग्रेस चे लोक महाराष्ट्रात आले व 5000 मराठी  लोक मारले गेले कारण नथुराम मराठी होता. हि बाब कायम लपवली जाते. असं का??





दुसरे दोन दुष्प्रचार ते म्हणजे शीख व तमिळ आतंकवाद. भिंद्रांवाला व लिट्टे या दोन्ही संघटनांना सरळ विचार न करता दहशतवादी ठरवायचं. पंजाब मध्ये शीख कट्टरता वाद्यनां पंजाब फक्त शिखांचं खलिस्तान असावं असं वाटायला लागलं आणि त्यात हा भिंद्रांवाला त्यांचा नेता झाला. पंजाब मध्ये सत्ता प्राप्तीच्या हव्यासापायी इंदिरा गांधींनी यास पाठबळ दिले यातून पंजाब मध्ये हिंदूंच्या कत्तली झाल्या.निवडणुकांत शीख मतांचे ध्रुवीकरण होऊन काँग्रेस सत्तेत आली पण इंदिरांनी मुख्यमंत्री मात्र भिंद्रा ला केले नाही याचा राग धरून काही शस्त्रे घेऊन तोच स्वर्ण मंदिरात लपला त्यावर इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार करत सर्व शीख मारून टाकले. यावर शिखांमध्ये असंतोष जन्मला व इंदिरा गांधींना त्यांच्याच दोन शीख रक्षकांनी मारलं.इथवर कायम बोललं जातं पण त्यांनतर दिल्ली व पंजाब मधे हजारो शीख मारून टाकले गेले, काँग्रेस कडून  कायम शीख ध्रुवीकरणाला मदत दिली गेली पण या बाबी वगळून कायम शीख समाज हा आतंकवादी आहे खलिस्तानी आहे असाच प्रचार केला जातो.

दुसरा मुद्दा लिट्टे व तमिळ भाषिकांच्या हत्येचा.इंग्रजांनी लाखो तमिळ लोक श्रीलंकेत नेले व ते लोक तिथेच वसवले गेले.ब्रिटिश गेल्यावर लंकेतल्या सिंहली लोकांनी खूप त्रास दिला तमिळ लोकांना , कत्तली अत्याचार झाला. शूद्रांपेक्षाही भयानक जीवन जगायला लावले.यातून तमिळनाडू ला हि दुःख व्हायचे. या त्रासातून तिथे तमिळ इलम म्हणजे जाफना या भागातील तमिळ राज्याची संकल्पना प्रभाकरण ने शस्त्र सामग्री तुन जन्माला घातली त्याला राजीव गांधींनी समर्थन दिले व नन्तर काढून टाकले आणि श्रीलंका सरकार सोबत मिळून भारतीय सैन्य पाठवून आपल्याच तमिळ भाषिकांना लाखो च्या संख्येत मारून टाकले. यात श्रीलंका शांत झाली पण लाखो तमिळ आत्मे शाप देऊन गेले. या उत्तर भारतीय असंवेदन शिलतेचा बदला म्हणून राजीव गांधी मारले गेले पण यात सुद्धा ते शहीद झाले असा दुष्प्रचार केला गेला.




मला सांगा स्वतः च्या अस्तित्वासाठी स्वभूमीवर कायदा हातात घेणे, शस्त्र सामग्री चा मार्ग शांतपणे मागण्या रास्त हक्क काढून घेतल्यावरच कोणीही घेत असतो. याला खरंच आतंकवाद म्हणायचं का?
नथुराम चे समर्थक हिंदू, भिंद्रांवाला चे समर्थक शीख व प्रभाकरण चे समर्थक तमिळ हे सर्व लोक जर आतंकवादी असतील तर त्यांनी जगभर कुठे बॉम्बस्फोट केले आणि किती लाख लोक इस्लामी दहशत वाद्यांसारखे मारले याचे उत्तर अपेक्षित आहे? स्व अस्तित्वासाठी लढणे यास दहशत म्हणणे हा डावा विचार आहे. अर्थात मी भिंद्रांवला किंवा प्रभाकरण नथुराम या तिघांनाही नाकारतो पण माझी संवेदना तमिळ शीख व हिंदू यांच्या 1 कोटी पेक्षा जास्त झालेल्या उगाचच च्या केलेल्या हत्येबाबत आहे.





आता वळू या साध्वी कडे.
भाजपने साध्वीनां तिकीट दिल्यापासून भयंकर गदारोळ सुरुय.
सरसकट हिंदू दहशतवादाचे आरोप लावले जातायत.
याची सत्यता काय? देशातली पहिली वहिली हि घटना आहे ज्यात मालेगाव च्या स्फोटात 7 आरोपी पकडले गेले व त्याचा धर्म हा काँग्रेस चा पारंपरिक मतदाता वर्ग असल्याने तब्बल दीड वर्ष तुरुंगात ठेवून अचानक एक दिवशी कोणतीही न्यायालयीन कारवाई न करता त्यांना सोडलें गेले. त्यांनतर साध्वी प्रज्ञा ,असीमानंद, कर्नल पुरोहित या तीन लोकांना जे संघाशी सम्बंधित आहेत यांना अचानक अटक करण्यात आली आणि तब्बल 9 वर्ष छळ केला गेला हिंदू आतंकवादाचा आरोप ठेवून त्यांना तो कबूल करायला अमर्याद यातना दिल्या गेल्या. एका साध्वी ला अश्लील चित्रफिती दाखवून तिचा बलात्कार केला गेला, बेदम मारून पाय निकामी केले गेले,त्यातच त्यांना कर्क रोग झाला. कर्नल पदावरील माणूस अरबी भाषेचे धडे घेत असताना अचानक धरले जाणे व तब्बल 9 वर्ष फक्त छळ करणे ही कुठली लोकशाही व कुठलं संविधान?


मित्रानो हा देशातील एकमेव असा खटला आहे की त्यात 9 वर्ष आरोप पत्र सुद्धा दाखल करता आलं नाही तपास यंत्रणांना. NIA सारखी यंत्रणा जी अन्य आतंकवादाच्या खटल्यात पटकन तपास पूर्ण करते त्यांना फक्त आरोप काय लावायचे हे ठरवायला 9 वर्षे लागवित हे धक्कादायक नाहीय का? 108 महिने कोणालाही तुरुंगात डांबून ठेवणे हि कुठली लोकशाही आहे? कोणती व्यवस्था व संविधान असं सांगतं करायला? 9 वर्षांनंतर यांना जामीन मिळाला कारण तपास यंत्रणांकडे बोलायला काहीही नाहीय.



मुद्दा असा आहे की हिंदूंना बदनाम करण्याचे मिशनरी बाईंचे काम हे 2004 पासूनच सुरु झाले होते. 2004 च्या दिवाळी ला अचानक कांची कामकोटी पिठाच्या शंकराचार्यांना महापूजा करत असताना अचानक अटक केली गेली होती.कारण हे होते की तमिळनाडू मध्ये दलित आदिवासी अस्पृश्य समाज जो हिंदूंपासून दुरावला होता त्याला जवळ आणण्याचे लोकोपयोगी कामे जोरात सुरु होती आणि यामुळे मिशनरी धर्मांतर फारसे चालत नसे. त्यावरही खटला चालला आचार्य सर्वोच्च न्यायलायतून निर्दोष मुक्त झाले पण तरीही डावी माध्यमे व पुरोगामी सत्तेने बदनामी सुरूच ठेवली.मुळात सत्य हे आहे की,
कोणताही हिंदू आतंकवाद करूच शकत नाही. आमचं भारतीय रक्त dna आम्हाला जगभर बॉम्बस्फोट करा, लोकांना धर्मांतरित करा,जगभर वसाहतवाद पसरवा अशी शिकवण देत नाही मग तो दलित असो किंवा ब्राह्मण भारतीय रक्तात विस्तारवाद नाही हे या देशाचं फिलॉसॉफिकल सत्य आहे.




या 2008 च्या मालेगाव चा फायदा घेत 2013 ला जयपूर मध्ये काँग्रेस चे गृह मंत्री म्हणाले होते की संघाच्या शाखांमध्ये हिंदू आतंकवादाचं प्रशिक्षण दिलं जातं. लगेच जगभरातील देशांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईद ने केंद्रीय गृह मंत्र्यांचे अभिनंदन केले होते. तर लगेच दुसऱ्या दिवशी गृह मंत्र्यानं आपलं विधान परत घ्यावे लागले होते.
मला एक सामान्य भारतीय म्हणून सांगा जर संघ एवढी वर्षे हिंदू  आतंकवादाचे प्रशिक्षण वर्ग चालवत असता तर भारत च काय जगभरात स्फोट संघानेच केले असते. मग जैश ए मोहम्मद इंडियन मुजाहिद्दीन लष्कर ए तैययबा यांची ओळख काय नोबेल शांती पुरस्कार मिळालेले अशी आहे का? काँग्रेस ने संघ का बंद नाही केला मग? काल पेक्षा आज जास्त पसरलाय संघ व भाजप मग भारत काय रोज स्फोटांनी हादरतोय का? आणि हो तब्बल 9 वर्ष मालेगाव चा तपास व सुनावणी पूर्ण एक झाली नाही?
साध्वीना तिकीट देणं हा प्रकार वेगळा पण हिंदूंना त्याआडुन दहशतवादी ठरविणे हे निखालस खोटं व चुकीचं आहे.

हा लेख लिहिण्याचे कारण तीन महाराष्ट्रवादी मित्र म्हणाले की यावर तू भाजप सोबत का दिसतो? मित्रानो मी कुठल्याही पक्षासोबत नाहीय. देशात दोन  प्रश्न आहेत एक हिंदू हिताचा तर दुसरा दक्षिण भारतीय मराठी अस्तित्वाचा. मला मराठी अस्तित्व महत्त्वाचे वाटते आणि भाजप हिंदी लोकांचा पक्ष झालाय म्हणून मला आजकाल पटत नाही भाजप.बस एवढंच.
मनसे सेना किंवा गैर काँग्रेसी गैर डाव्या मित्रांनी समजून घ्यावे कि आपण हिंदू आहोत जस मराठी अस्तित्व गेली 70 वर्ष संकटात आहे तसा हिंदू समाज 2000 वर्ष नाश केला जातोय मराठीची भावना हि भाजपविरोध असल्यामुळे काँग्रेस च्या पथ्यावर पडू देऊ नका.
मी गांधी विरोधी आहे पण मला ते सिद्ध करायला नथुराम चा आधार घ्यावा लागत नाही . कारण सुभाष बाबू आहेत त्यासाठी. तसेच भाजप विरोध करताना राज साहेबांसारखं स्वतःच काय ते बोला. दिग्विजय सिंग सारखं हिंदूंना आतंकवादी म्हणून किंवा भडव्या कन्हैया कुमार चा आधार घ्यायची निदान आपल्या प्रगल्भ द्रविड अस्तित्व वादी लोकांना गरज पडू नये. पुन्हा हे सांगतो कि जस मराठीत्व महत्त्वाचं आहे तसेच हिंदुत्व पण. 7 टक्के मराठी लोकसंख्या हि उत्तरेतल्या उर्दू भाषिक म्हणजे मुस्लिम लोकांमुळे ओसारलीय हे विसरू नका.

सागर घाटगे जी आपण जे म्हणता कि साध्वी ने मप्र मधले मुस्लिम का नाही मारले? इथले का मारले?
यावर आपल्याला हे म्हणायचे आहे का कि मप्र मधले मुस्लिम मारणे हे योग्य झाले असते?
किंवा मराठी मुस्लिमांबद्दल प्रेम असले तर सांगतो की मराठी मुस्लिम हि जमात फक्त 3 टक्के आहे.बाकी त्यातले सुद्धा पाटील चं शेख सय्यद आडनाव लावतात शिवाय मालेगाव इथे अमराठी मुस्लिम लोक राहतात. आणि हो साध्वीनां संविधान दोषी मानत नाही. त्या आंबेडकरी संविधानाने निवडणूक लढत आहेत जस राहुल गांधी व सोनिया.

हा लेख मी संघीय आहे या चष्म्यातून वाचणे व मला संघी ठरविणे वाचणाऱ्याचा मूर्खपणा होईल. छ्त्रपतींपासून आम्ही हिंदू आहोत. आणि हिंदूवरील खोटे दहशत वादाचे आरोप खपवून घेणार नाही.

इति शम्।