Friday 30 December 2016

एकतीस डिसेंबर ..

बरे नसल्यामुळे गेल्या आठ्वड्यात  tv पाहणे सोडले होते. म्हणून खूप काही मिस झाले .पण वर्तमान पत्र वाचत होतो म्हणून काही माहिती मिळत होती चालू घडामोडींची .......  आता ३१ डिसेंबर म्हणजे न्यू इयर ..चे सेलिब्रेशन जवळ येतय ..मग tv आणि whatsapp वर विविध पोस्ट्स फिरतच असतात...... त्यात काही डाव्या तर उजव्या .....

  एक कॉमन विचार मांडला जातो तो म्हणजे थर्टी फर्स्ट साजरा करावा कि नको...... तसं  पाहिलं तर हा वादः विषयच नाहीय.. ज्याला जे वाटत ते त्यांनी कराव ..... पण या व्यक्ती स्वातंत्र्याच्या  नावावर टिश्यू पेपर वापरणाऱ्या भरलेल्या इंग्रजांची गुलामी मात्र करू नये.... आणि आपल्या देशातल्या निम्म्या लोकांची या ब्रिटानिया मानसिकतेची बळी कॉंग्रेस नि आधीच दिलेली आहे.

इथे नागपुरात गेल्या महिनाभरापासून एवढी प्रचंड थंडी आहे.कि दिवसासुद्धा पलंग सोडवा वाटत नाही आणि हे रात्रीचे उद्योग...... न प्रकृतीमध्ये काही बदल होत न वातावरणात आणि नोकर्या शिक्षण यातसुद्धा काहीच बदल होत नाही....तरी याचं नवीन वर्ष मात्र सुरूच असते... काय कथा आहे म्हणे या ब्रिटानिया नववर्षाची .... प्रभू यशुच्या जन्माच्या पाच सहा दिवसांनी नवे वर्ष साजरे करायचे...... आपल्याकडे पाचवी पूजतात ..तसे आता हे इंग्रजी नवे वर्ष आपल्याच पाचवीला पूजले आहे असे वाटते.....

जसे काही या २०१६ वर्षांआधी जग आणि समाज नव्हताच......  बुद्धाचा जन्म तर २५५६ वर्षांपूर्वी झाला पण त्यांच्या नावाने नाही होत एकही कालगणना ....
बरोबर आहे न राव आता बुद्धाच्या नावाने हिंदूंना आणि ब्राह्मणांना शिव्या दिल्या जातात तेवढेच बुद्ध उरले आता.... नवी कालगणना आणि नवे बुद्ध वर्ष अश्या नव्या व्यवस्था जन्माला घालण्यासाठी अक्कल लागते आणि  काहींनी टी अक्कलच हिंदू द्वेषात खर्चीली आहे मग कसे होणार स्वतःचे खरे स्वतंत्र तयार.. असो..




काही पुरोगाम्म्यांना खालील प्रश्न विचारायचे आहेत ...त्यांचे उत्तर द्या...




   इंग्रजी नवीन वर्षाच्या निमिताने हिंदू सणाच्या नावाने बारमाही बोंब मारणाऱ्या हिंदुस्थानातील तथाकथित ढोंगी पुरोगाम्यांना काही प्रश्न..........


१] ३१ DEC ला लाखो जनावरांची कत्तल होते तेव्हा बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

२] लाखो लिटर दारू ( बेकायदेशीर ) पिवून बेवडे रस्त्यावर पडलेले असतात तेव्हा बिनडोक ढोंगी पुरोगामी कोणते प्रबोधन करतात का हेच बिनडोक ढोंगी पुरोगामी पिवून टाईट असतात व गटारीची सोबत करत असतात का ?


३] मोठ्या हॉटेल मध्ये हजारो किलो अन्नाची नासाडी होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

४] मोठ मोठ्या हॉटेल मधून डॉल्बी (DJ) लावून प्रचंड ध्वनी प्रदुर्षण होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

५] ख्रिस्ती सणाच्या नावाखाली लाखो लिटर पाणी वाया जाते त्यावेळी हे बिनडोक पुरोगामी गप्प का ?

६] जनावरांची प्रचंड कत्तल केल्यानंतर उपयोगात न येणाऱ्या मांसाची विल्हेवाट गटर, तलाव, नदी मध्ये केली जाते किवा उघड्यावरच फेकले जाते ह्याने प्रचंड प्रदूषण होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

७] सरकारी खर्चाने ह्या उच्चभ्रू लोकांना संरक्षण दिले जाते (पुण्या मुंबई सारख्या टिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून ) त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

८] इतर वेळी रात्री १० वाजले तरी हिंदूंचे सात्विक कार्यक्रम बंद पडायला पोलीस यंत्रणा लगेच सज्ज असते पण ३१ DEC ला रात्रभर अनैतिक कृत्य करायला सरकारच परवानगी देतंय हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का?
९] दुर्ग गड संवर्धन ह्या विषयाकडे दुर्लक्ष करून बेवड्याना गडावर दारू पिण्याकरिता जाण्यासाटी रोखण्याचे काम मावळ्यांनी करायचे मग हे बिनडोक पुरोगामी गप्प का ?


१०] ३१ DEC ला बऱ्याच टिकाणी चुकीच्या पाश्च्यात संस्कृतीमुळे बलात्कार ,विनयभंग, छेदचाड सारखे प्रसंग घडतात प्रसंगी खून, मारामाऱ्या ही होतात हे बिनडोक पुरोगामी गप्प का? सोयीस्कररीत्या अश्या घटनेकडे कानाडोळा करणारे हे नालायक ढोंगी पुरोगामी काय कामाचे ......


११] आतिषबाजीच्या नावाखाली प्रचंड हवेचे प्रदूषण होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?



१२] हजारो पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर असतात त्यावेळी ह्या पोलीस बांधवांचे मानसिक आरोग्य धोक्यात येवून मानवी अधिकाराच्या हक्काचे अवमूल्यन होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?


१३] कुटल्या ढोंगी पुरोगाम्याने आज पर्यंत दुर्ग संपत्तीचे म्हणजे गडांचे तिथे अपप्रकार घडू नये म्हणून प्रयत्न केले आहेत काय ? कसे करणार ह्यांना हिंदुत्ववाद्यांविरुध बोंब मारण्याशिवाय दुसरे काम नाही !


१४] ढोंगी पुरोगाम्यानो ह्या विरुद्ध आवाज काढा नाहीतर तुमचे ढोंगीपणा म्हणजे तुम्ही औरंग्या आफ्झ्ल्याचीच औलाद आहात हेच सिद्ध होईल !...........


अश्या बऱ्याच गोष्टी ह्या ३१ DEC च्या निमिताने घडत असतात त्याविषयी कोणी बोलत नाहीत ... आपण १ जानेवारीला शुभेच्या नाही दिल्या, दारू नाही पिली तर आपला बाप काय स्वर्गात जाणारच नाही अशी धारणा केलेल्या हलकट पुरोगामी, उच्चभ्रू, अति आधुनिक ( म्हणजे माणसात नसलेल्या ) लोकांचा हा नालायाकापणा आहे... नाहीतर वर्षभर काहीना काही निमित्य काढून दारू पार्टी झोडत असता तेव्हा जरा गांभीर्याने विचार करा .......






उत्तरार्धात एवढेच सांगीन माझ्या वाचकांनो दृष्टी सगळीकडे असू द्या ...प्रत्येक गोष्टीला व्यापकतेच्या चष्म्याने बघा.....

भारत हा उत्सवप्रिय देश आहे कितीही भिकारी असलो आपण तरीही उत्सवांचा उरक काही संपल्या संपत नाही आपल्या रक्तातून..कित्येक लोक या उत्सवप्रिय भारतीयातेतून अगदी छानपणे उत्सव साजरे करत असतात.....
 खूप ठिकाणी सगळे नातेवाईक जमतात आणि रात्रभर छान गप्पा होतात सग्ल्यांच्या हातचे  जेवण मिळते .......

 आत्याच्या हातची पनीरची डिश तर मामीच्या हातची मस्त मसालेदार गरम गरम बासुंदी मिळते.......

 मामाने मध्ये मध्ये घुसून पळी फिरवलेला काजू गाजर वाटणे आणि केसर  टाकलेला नवरत्न पुलाव सुद्धा मिळतो कुठेकुठे......

 तर कोणाला चुलीवरच्या स्वयंपाकाची मेजवानी असते अंगणात किंवा गच्चीवर चूल पेटवून साधेसे एक दोन पदार्थ खाण्यातही मजाच असते न ... ....

मला आठवत काही वर्षांपूवी आम्ही मामाकडे ३१ डिसेंबर ला पिठलं भाताचा बेत केला होता घरच्या बायकांना हे करायला फारसा त्रासही झाला नाही कारण सोपेच काम असते.........
 ...गरम गरम पिठलं भात आणि त्यावर तळलेली दह्याची मिरची याची मेजवानी ह्या थंडीत काही खासच असते राव... नंतर सगळे मूलं  मिळून नाच मारामार्या मस्ती पत्ते अश्या खूप गोष्टी..घडल्या होत्या....

असा उत्सव कोणी करत असेल माझ्याकडून शुभेच्छा..........!
ह्यात एक दिवस निमित्त करून कुटुंब एकत्र येत असत ...जवळीक वाढते ... कुटुंबाचे महत्त्व कळते ..शेवटी हिंदुस्तान आणि भारतीय समाज २००० वर्षे टिकला त्याच एकच कारण आहे ते म्हणजे कुटुंबव्यवस्था.............

 ती  टिकावी म्हणून या ब्रिटानिया सणांचे उत्सवाने भारतीयकरण करा ..आज विदेशी गोष्टींना सकारात्मक करण्याखेरीज काही उपाय नाहीय आपल्याकडे...सरळ विरोध करून काहीच पदरी पडणार नाही ..कारण आता युद्ध इंग्रजांशी लढतोय आपण...आता शिवाजी राजांची बुद्धिमत्ता यावर भर द्यावा लागेल... इति शम .....





Wednesday 28 December 2016

Radha Virah Geetham

अक्लेश केशव मञ्जरी तिलकं - 8




निभृत निकुञ्ज गृहं गतया निशि रभसि निलीय वसन्तं
चकित विलोकित सकल दिशा रति रभसभरेण हसन्तं
सखी हे केशी मथनं उदारं....



रमय मयासह मदन मनोरथ भावितया सविकारं... (ध्रुपद)

प्रथम समागम लज्जितया पटुचाटु शतै अनुकूलं
मृदुमधुर स्मित भाषितया शिथिलीकृत जघन दुकूलं - 1
सखी हे..... (धृ)



किसलय शयन निवेशितया चिरं उरसि ममैव शयानं
कृत परिरम्भण चुम्बनया परिरभ्य कृत् अधर पानं - 2
सखी हे .... (धृ)



अलस निमीलित लोचनया पुलकावलि ललित कपोलं
श्रमजल सकल कलेवरया वर मदन मदादति लोलं - 3
सखी हे ... (धृ)


कोकिल कलरव कुजिताय जित मनसिज तन्त्रविचारं
श्लथ कुसुमाकुल कुन्तलया नख लिखित घन स्तनभारं - 4
सखी हे ......(धृ)



चरन रणित मणि नुपुरया परि पूरित सुरतवितानं
मुखर विश्रुन्खल मेखलया सकच ग्रह चुम्बन दानं - 5
सखी हे .... (धृ)



रतिसुख समय रसालसया दर मुकुलित नयन सरोजं
निःसह निपतित तनुलतया मधुसूदन मुदित मनोजं - 6
सखी हे .... (धृ)



श्रीजयदेव भणितमिदं अतिशय मधुरिपु निधुवन शीलं
सुखं उत्कण्ठितम् गोपवधु कथितं वितनोतु सलिलं..
इति....



जयदेवांच्या गीतगोविंद काव्यातील हा राधेचे विरह दर्शवणारे गीत.

Sanskrit... erotic .... conversational poetry.....


शुक रंभा संवाद..



शुक..
शुक मुनी म्हणजे वैराग्य..ईश्वर भक्ति..

तर रंभा म्हणजे कामदेवता..सौंदर्य देवता..श्रृंगार व प्रणयाची देवता..

या दोघांचे वाद संवाद वाचण्या जोगे आहेत




..
सुरवातिलाच रंभा आरंभ करते...

रम्भा :

मार्गे मार्गे नूतनं चूतखण्डं खण्डे खण्डे कोकिलानां विराब: ।
रावे रावे मानिनीमानभड्गॊ भड्गे भड्गे मन्मथ: पञ्चबाण:

मार्गा-मार्गा वर नवीन आंब्याची झाडे शोभून दिसत आहेत. प्रत्येक झाडावर कोकिळा सुमधुर कूजन करित आहेत.
हे कूजन ऎकून मानी स्त्रियांचे गर्वहरण होत आहे आणि गर्व नष्ट होताच पाच बाणांना धारण करणारा कामदेव मनाला बेचैन करित आहे..


तर त्याला शुकमुनी उत्तर देतात..

.
मार्गे मार्गे जायते साधुसड्ग सड्गे सड्गे श्रूयते कृष्णकीर्ति: ।
कीर्तो कीर्तो नस् तदाकारवृत्ति: वृत्तो वृत्तो सच्चिदानंदभास:


हे रंभा, मार्गा-मार्गा वर मला साधुंचा सहवास लाभत आहे. प्रत्येक सहवासात भगवान कृष्णाचे गुणगान ऎकावयास मिळत आहे.

ते ऎकत असताना आमची चित्तवृत्ति भगवंतात लीन होत आहे आणि ह्या ध्यानात सच्चिदानंदाचा सहवास लाभत आहे.

जिवनाची इति कर्तव्यता सांगताना रंभा वदते..व वाद रंगत जातो..





रम्भा :

पीनस्तनी चन्दनचर्चिताड्गी विलोलनेत्री तरूणी सुशीला ।
नालिड्गिता प्रेमभरेण येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्

भरदार स्तन असलेल्या, शरीरावर चंदनाचा लेप असलेल्या, चंचल नेत्र असलेल्या अशा सुंदर स्त्रिला ज्याने प्रेमयुक्त अलिंगन दिले नाही त्याचे जीवन व्यर्थ गेले




तर शुक मुनी उत्तर देतात..


अचिन्त्यरूपो भगवान्निरञजनो विश्वम्भरो ज्ञानमयश्चिदात्मा ।
विशोतिधो येन हदि क्षणं नो वृथा गतस्य नरस्य जीवितम्


ज्याच्या रूपाचे चिंतन होऊ शकत नाही, जो निरंजन, विश्वाचे रक्षण करणारा आहे; अशा ज्ञानाने परिपूर्ण चित्स्वरूप परब्रम्हाचे ज्याने हदयापासून स्मरण केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले




पुढे..रंभा म्हणते..

ताम्बूलरागैः कुसुमप्रकर्षै सुगन्धितैलेन च वासितायाः ।
न मर्दितो येन कुचौ निशायां वृथा गतस्य नरस्य जीवितम्


सुगंधित पान, उत्तम फूल, सुगंधित तेल आणि अन्य पदार्थांनी सुवासित शरीर असलेल्या कामिनीच्या स्तनाचे ज्याने रात्री मर्दन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले.


मुनी त्यावर म्हणतात

ब्रम्हादिदेवोऽखिलविश्वदेवो मोक्षप्रदोऽतीतिगुणःप्रशान्तः ।
धृतो न योगे न हदि स्वकीये वृथा गतस्य नरस्य जीवितम्

ब्रह्म इत्यादिंचा देखील देव, संपूर्ण जगाचा स्वामी, मोक्ष देणार्या, निर्गुण, अत्यंत शांत भगवंताचे ज्याने योगाद्वारे ध्यान केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले.
व वाद रंगत जातो..व शेवटी..


सुगन्धैः सुपुष्पैः सुशय्या सुकान्ता वसन्तो क्रतु: पूर्णिमा पूर्णचन्द्रः ।
यदा नास्तिपुस्त्वं नरस्य प्रभूतं ततः किं ततः किं ततः किं ततः किं


सुंदर सुगन्धित पुष्पांनी सुशोभित शय्या असेल, मनोनुकूल स्त्री असेल, वसंत ऋतु असेल, पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे असेल परंतु ज्या पुरुषामध्ये परिपूर्ण पौरुष नाही त्याच्या जीवनाचा त्रिवार धिक्कार असो.


शुक :
सुरूपं शरीरं नवीनं कलत्रं धनं मेरूतुल्यं वचश्र्चारू चित्रम् ।
हरेरंडिघ्रयुग्मे मनश्र्चेदलग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं


सुंदर शरिरसंपदा, सुंदर भार्या, मेरु पर्वताएवढे धन, मनाला भुरळ घालणारी मधुर वाणी असेल पण जर भगवान शंकराच्या चरणी मन एकाग्र होत नसेल त्या जीवाचा त्रिवार धिक्कार असो.




असे हे वाद संवाद आहेत...


सनातन धर्मात काम व मोक्ष दोन्हीत हि महत्त्व आहे..
विरक्ति मधे रस असण्या र्यांनी हे संवाद जरुर वाचावेत

Thursday 22 December 2016

मनस्य उन्मेष:......!

राजे साष्टांग दंडवत प्रणाम ........!


 


 वरून बघताय न .........? तुमचा महाराष्ट्र ......... तुमची राजधानी ..... आणि....आपल्या महाराष्ट्राची आताची आपली मुंबई ....... जिचा अभिमान आहे आपल्याला.........  नाही कोणाच्या बापाची मुंबई आमच्या साहेबाची.....  ते साहेबसुद्धा गेले....... तुमच्याकडे.....



 ....... राजे.....चला आज तुम्हाला माझ्या चष्म्यातून आजचा महाराष्ट्र दाखवतो..... कोणता वालीच उरला नाही..... आता म्हणून तर ......  बारामतीचे लांडे ...फोफावलेत..... त्यांना वाटत आता तेच ज्येष्ठ आहेत ..म्हणून त्यांचीच चालणार....... 



राजे ..आज २१ डिसेम्बर वर्षातला सर्वांत छोटा दिवस....... आजच वाचल कि आपल्या छत्रपतींच्या अरबी समुद्रातल्या स्मारकासाठी ..... जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे २४ तारखेला ........


 आणि तेही कोणाच्या तर ........  भारत्जेत्त्या नरेंद्र मोदींच्या हस्ते ............! छत्रपतींच्या नावाने आशीर्वाद मागायचा........ आणि बनियागिरी करायची..खोटं  बोलायचं....... असे कित्येक उद्योग करूनही न  थकणारे ......... व्यापरी मानसिकतेचे लोक....... 




 बारामतीमध्ये येऊन काही बिन्पेन्द्याच्या लोट्यांना भ्रष्ट वादी म्हणायचे ...... 

मग नंतर त्यांच्याशीच संधी साधून युती आघाडी तोडायची......

 आणि त्यांच्याच भरोश्यावर मुख्यमंत्री व्हायचे....... 




 असे लुटारू लोक तुमचे भव्य दिव्य स्मारक बांधताहेत राजे......! बाळासाहेब  सांगतच असतील हे सर्व तुम्हाला ...... पण मलाही आज बोलायची इच्छा झाली तुमच्याशी..... 


शेवटी... शिवाजी काही एक व्यक्तित्व नाही इतिहासातल.......... !

शिवाजी तर श्वास आहे आमचा ...!

विश्वास आहे आमचा,,,,..... !


आमच्या हृदयातील प्रत्येक स्पंदन आहे शिवाजी..........


.शिवाजी ....खुदा का भेजा हुआं ....वो...... फरिश्ता.....है....... जिसने...... हमारी रूह को, हमारी   आत्मा को ...छुआ  है...... 

रीयाया कि भलाई कि सोच है शिवाजी...... !


राजे ...... आज सर्व वृत्तपत्रांमध्ये ..... मोठ्ठा समुद्र आणि त्यातले तुमचे स्मारक असलेल्या जाहिराती आल्या..... 


“आभाळागत माया तुमची आम्हावरी राहू दे “........ असे बिरुदहि चिकटवले .... होते तिथे.....   !


किती शिताफीने तुम्हालासुद्धा रामासारखे ..देवत्व बहाल केले.......



 ...शेटजी भटजी मानसिकतेच्या प्रभावातल्या 

समाजाने.......... भटजी व गांधीसारख्या शेटजींनी मिळून रामाचे पार 

बनियाकरण करून टाकलेच आहे आधी...... !


आता तुमच्यावरही तेच प्रयोग करत आहेत हे लोक...... राजे.......! पण काळजी नसावी महाराज .......

.बाळासाहेबांनी ..... पेरून ....जेजुरीच्या भंडार्या सारखं उधळून .. उरवलेल ... क्षात्रतेज आहे आमच्यात ...ठाकरी बाणा सुद्धा आहे....  

म्हणूनच तर शिवाजी एक विचार आणि व्यवस्था म्हणून कुठेतरी

 आमुच्या डोक्यात अद्यापहि उरलाय....  


..................... ज्यांनी कधीही शिव जयंती साजरी केली नाही......

 राजे ..ते तुमचा फक्त निवडणूक जिंकण्यासाठी तुमचा आशीर्वाद मागतात आणि 

लांड्यांची साथ घेऊन महाराष्ट्र मुघलांच्या दिल्ली सुलतानाच्या चरणी अर्पण करू बघतात............... !


.......
 राजे तुम्ही फक्त ओठीच का उरलाय..... हाच प्रश्न पडतो मला नेहमी..... काय होईल आता ...लोक येतील तुमचे स्मारक होईल......पण....... ती निर्भया...... ती अरुणा शानबाग ....... ती  सावित्री....... आणि अशा हजारो लाखो स्त्रिया....आजही..... भोगतायत भोग त्यांच्या .....वर  होणार्या अमानुष छळाचे....... 


अंजना ओम कश्यप जी पुछोना कैसे मैने रात गुजारी?........ 

कैसे ४२  साल गुजारे उस अरुणा ने.... 

हर आधे घंटे
 मी...एक बलात्कार से एक हत्या और आत्महत्या से किसान और महिलाये गुजरती है.............. 

पुछोना कैसे...? 


तुम्ही तरी विचारा स्वतःला ...आणि आपल्या आतल्या मेलेल्या शिवाजी नावाच्या खर्या मर्दानगी ला... 

आमचे शेतकरी......रोज मरतायत...... 

उभा जगाचा पोशिंदा मरतोय आणि हा साखरेचा धोंडा मात्र तोंडाचा कर्करोग होऊनही वाचलंय .... का? 

कोणास ठाऊक...रोजच दीड लाखाचं  इंजेक्शन लागतय म्हणे ... बापरे दीड लाख आणि आमचे शेतकरी १० हजारासाठी मरतायत .......



    तुम्ही जोशी देशपांडेंना सत्ता देणार का....? शेट्टी हे आडनाव शेतकऱ्यांमध्ये ऐकल नाही मी कधी ?

 अशी भर सभेत जात काढणारी माजलेली धोंड स्वतःस जाणता राजां ....हे बिरूद शेखीने मिरवतायत  राजे.........!


जनतेच एकही दुख जाणूनही न जाणणारे  लोक तुमची उपाधी लावतायत..... !

कोणीतरी राज नावचा सरदार म्हणाला कि तुम्ही स्थापत्यविशारद होतात......!

 ...तुमच किल्ल्यांवरच प्रेम ..तुमची स्वतःची  दुर्ग संपदा जपायला हवी...तर त्या सच्च्या मर्दाचा विरोध...होतोय आजकाल... !


राजे रायगडावर दोन पर्यटकांनी दारू प्यायचे उद्योग केले... यांना बुडावर चांगलेच फटके पडले राजे........... सरकारने नाही तर खर्या मावळ्यांच्या सरकारने बडवले त्यांना राजे... 

राजे.. आजही तुम्ही आहात आमच्यात .......

शेवटी काय तर शिवाजीराजे घोषणेतच उरले  आमच्या राजकारण्यांच्या ..... 

शिवाजी एव्हाना ....मत मागण्यासाठीचा एक आयकॉनच झालाय......!

 ..... पण शिवाजी हे एक व्यवस्था तंत्र आहे....

शिवाजी इज अ governing model ............  .....


  ....
 न्याय व्यवस्थेपासून तर अर्थव्यवस्थे पर्यंतचे..... राजे..... तुम्हाला आजचा महारष्ट्र दाखवलाय मी... 

तुमचे खरे मावळे असेच नेहमी तुम्हाला एक विचार म्हणून आपल्यात जिवंत ठेवतील...आंणी  वेळ मिळालीच .........

आई भवानीने दिलीच तलवार तर अन्याyacha पुरता नाश करायलाही आम्ही मागेपुढे बघणार नाही.......... एवढे आश्वासन......    



हे मनातले पारिजात तूर्तास पूर्ण....उन्मेष   

Monday 19 December 2016

म्हणे मराठे राज्यघटना उध्वस्त करतील.........!

म्हणे मराठे राज्यघटना उध्वस्त करतील.........!

आज सकाळी लोकमत आणि महारष्ट्र TIMES वाचत होतो .दोन्हीकडे ठळक बातम्यांमध्ये काहीतरी चूक आणि घृणास्पद वाटले. काळ नागपुरात रावसाहेब कसबे नावाचे  एक सो कॉल्ड दलित विचारवंत आले होता. नागपूर पुरवणीच्या पहिल्याच पानावर लांजेवार स्मृती व्याख्यान आयोजित केल्याचा कार्यक्रमाची बातमी होती आणि व्यासपीठावर होते रावसाहेब कसा बे? आपली वर्हाडी बोली..नाही का मजाच नाही येत तिच्या वापराशिवाय तुमी काई बी मना बा .....!
ती बातमी अशी होती. कसबे महोदय मंचावर हातवारे  करत बोलत होते कि ,एकेकाळी वर्चस्व गाजवणारा मराठ्यांसारखा समाज आज आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अनुभव करत आहे.त्यांच्यात सामाजिक श्रेष्ठत्वाची भावना होती म्हणून आजवर जातीवादाविरोधात बोलला नाही.मात्र आज तरुणांमध्ये अस्वस्थता पसरत आहे.त्यातूनच मोर्रचे निघत आहेत.लाखो मोर्च्यांमुळे सामाजिक व राजकीय अस्वस्थता आणि अस्थिरता निर्माण झाली आहे.अशा वेळी त्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर ते राज्यघटना उध्वस्त करतील, तसेच सरकारसुद्धा हीच अपेक्षा बाळगून आहे अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.


कस्ब्यांचे कसब नावाचे पुस्तकच लिहावे लागेल आता....... साहेब या प्रतीवादाला  उत्तर द्यायची हिम्मत ठेवा आता.


 आपण म्हणता एकेवेळी वर्चस्व गाजवणारा मराठा समाज....


 मग निखील वागळे सोबतच्या तब्बल तीन तासाच्या मुलाखतीत आपण म्हणालात कि महाराष्ट्रात  वर्चस्व फक्त १६९ मराठा घराण्यांचे आहे.हे राजकारणी व व्यापारी मराठा घराणी यांच्याचळे आपले राज्य मागास आहे. शिवाय काही दिवसांआधी एका साहित्य संमेलनात तुम्ही शिवाजी महाराजांना त्याकाळच्या बामणांनी शुद्र मानले व तेव्हापासू मराठ्यांवर खूप अत्याचार झाले असेही आपण बोलले होतात .मग???  एकेकाळी वर्चस्व म्हणजे काय? एक मराठा छत्रपती झाला याचा अर्थ सर्व समाजच काय तो वर्चस्व गाजवत होता असा होत नाही साहेब.तेव्हासुद्धा मराठा समाज गरीब निर्धन होता.आणि शिवाजी राजांचे राज्य हे सर्वांचे होते मोरोपन्तांपासून तर रायबा महारापर्यंत म्हणूनच राज्य भरभराटीला आल होत आपल....हे विसरलात तुम्ही...... वर्षानुवर्षापासून वर्चस्व तलवारीच्या धरीवर आणि बुद्धीच्या बळावर क्षत्रिय व ब्राह्म्नानंनी गाजवले साहेब.आम्ही मोगलांचे गुलाम नाही झालो...तुमच्यासारखे .... फक्त आपल्या जातीच कल्याण केल असते न तर  युपी बिहार आणि इंग्लड च्या लोकांसारखे पैश्याच्या माजात जगत असतो. अर्ध्याहून अधिक आयुष्य आमच्या पूर्वजांनी घोड्यावर व लढाईत घालवल म्हणून आज तुम्ही सुखाने जगताय नाही तर मोग्लाईतच आयुष्य जगत असते. एक काय ते बोला ....दोन्ही तबल्यावर हात ठेवण्याचे कसब तबल्जींना शोभते तुम्हा लेखकांना नाही.


पुढे तुम्ही म्हणता कि मराठे जातीविरोधात बोलले नाही...

बजाजी नाईकांना सखुबाई दिली हे काय कमी होत.महार मंगांना कामे दिली अस्पृश्यता नावाचा शब्दसुद्धा नव्हता त्या काळी.. ज्योतिबा फुलेंचे अस्पृश्यता व जाती निवारणाचे काम आपण नाकारता का? ज्योतीबांचे पूर्वज पुण्यात पेशव्यांच्या जागेत फुलांची लागवण करीत असत.त्यांचे मुळचे आडनाव क्षीरसागर होते आणि ते मराठा होते .पुढे फुलाचा व्यवसाय करणारा म्हणून फुले हे आडनाव झाले .स्वतः ज्योतीबांचे आडनाव हे सुद्धा गुणकर्मविभागशः पडलेले आहे हे विसरू नका. तुम्ही आणि तुमचे २५% लोकसंख्या असलेले पूर्वज बाबासाहेबांच्या आधी काय करत होते .मूक राहून अत्याचाराला समर्थनच करत होते न? आम्ही लढलो म्हणून आज महाराष्ट्रात बायका शिकलेल्या आहेत सावित्रीबाई जिजाबाई ताराबाई यांचे काम विसरू  कसे शकता तुम्ही. कोल्हापूरच्या छत्रपतींनी तर १९०२ मध्येच म्हणजे जेव्हा आंबेडकर पाचवीत असतील तेव्हा महार मातंग यांना आपल्या राज्यात आरक्षण देऊ केले होते..मग कोण उभ झाल तुम्हाला आरक्षणाची सवलत देऊन तुमचा विकास करायला.?

बडोद्याचे महाराज सयाजीरावांनी बाबासाहेबांची सर्व फी भरली त्यांना लंडनला पाठवले शिकवले ..म्हणू राजर्षींची आरक्षणाची संकल्पना बाबासाहेबांना SAMVIIDHANAT टाकता आली आणि तुमच्यासारखे लेखणी धरून शिकू लागले. आणि असे टोचून बोलू लागले... अशी कित्येक उदाहरणे देता येतील..... मराठे आडवे आले नसते तर तुम्हा लोकांची वाट असती युपी बिहारच्या दलीतान्सारखी.......
महार्ष्ट्रातल्या दलितांना दलितांचे वेगळे राजकारण नको आहे कारण त्यांना सामावून घेतल्या जाते.सुशीलकुमार शिन्देसारखा माणूस फुकटच १० वर्षे केंद्रीय मंत्री होत नाही मुख्यमंत्री होत नाही.....

खोटे आरोप लावतांना विचार करा साहेब.....




पुढे तुम्ही म्हणता कि मराठ्यांचे प्रश्न मार्गी नाही लागले तर ते राज्यघटना उध्वस्त करतील..... 


तुम्ही स्वतःच ती आधीच उध्वस्त केलीय .. उरली कुठे ती  आता?  तुमच्या मुख वादनात ? .बाबासाहेबांनी तर फक्त १० च वर्ष आरक्षण सांगितला होत मग? तुम्ही खान्ग्रेस्सला वोट देऊन ते ७० वर्ष उपभोगल  आणि आजही उपभोगतच आहात .आंबेडकरी विचारांची हत्या तुम्ही आणि तुमची कॉन्ग्रेस्स्नीच केली. आधीच जर आरक्षण बंद केल असत तर आज आरक्षण हा मुद्दाच नसता राहिला आणि त्यामुळे जातीवाद नसता वाढला... समाजात काही लोकांना आरक्षण मिळते आनि काहींना मिळत नाही म्हणूनच असंतोष निर्माण होतो.दुसऱ्यांनाही वाटत कि आपल्यालाही मिळाव... साहेब जर १३ टक्के दलित मागास असू शकतात तर मग ३५ टक्के मराठे तर तीन पट मागास आहेत आज...
राज्यघटना उध्वस्त करायची असती न तर आधीच केली असती तुम्ही एवढे बोलू शकता कारण आम्ही गप्प आहोत... कोणती राज्यघटना इंग्रजांची तारखांवर तारीख देऊन न्यायला हुलकावणी देणारी...राजकारण्यांचे पोट भरणारी..फक्त पाच वर्षात एक मत मागणारी कोणती व्यवस्था ? हम बोला आता......

साहेब न्यायाधीश पी बी सावंत म्हणतात त्याप्रमाणे सर्वच आरक्षण काढून कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवावी ..तेव्हाच समाजात आर्थिक आणि सामाजिक स्थिरता  येईल..... आनि या इंग्रजांच्या सर्व्या संविधानिक व्य्वस्थांमुळे हे शक्य झाले नाही गेली ७० वर्षे आतातरी जागा .... बदला ह्या व्यवस्था..


कसबे साहेब फुकटचे मुख वादन करण्यापेक्षा तबला शिका जमेल तुम्हाला..नाहीतर  तुमच्या समाजातील मुलांना नैतिक मूल्यांचे शिक्षण द्या जेणेकरून बलात्कार होणार नाहीत आणि हो ATROCITY कायद्याचा गैरवापर होणार नाही . आजवर या कायद्याचा तुम्ही गैरवापर केला म्हणूनच आज हे मूक आंदोलन होत आहे.राज्यघटनेची हत्या तुम्ही लोक करताहेत...कळलं  का ?  जाटांची आंदोलन जर झाली असती ण महारष्ट्रात तर समजल असत तिथे हरयाणामध्ये ४०० लोक हिंसाचारात मेले . १०००० कोटींचे सरकारचे नुकसान झाले .... आंम्ही एका रुपयाचेही नुकसान केले नाही कळले न?

साध्याच सरकार व्यवस्थित काम करट आहे उगाच आपली नाक खुपसू नका ... तब्बल २१ वर्षांनी विदर्भाकडे मुख्यमन्त्रीपद आलय तेवा गप्प बसा....... काम करू द्या सरकारला

तुम्ही म्हणता आंबेडकर गांधींचे विरोधक नव्हे वाह क्या बात है..... आंबेडकर काय म्हणतात तेही तुम्हीच ठरवणार का आता ,,...हुकुमशाही आहे का तुमची समाजावर ....
शिवाय कसबे जी आंबेडकरांना गांधींबद्दल काय वाटायचे त्यांचे अभिमत काय हे बाबासाहेबांनी जिवंतपणी स्वहस्ते गांधी खरचं महात्मा होते का हे पुस्तक लिहून समाजाला सांगितलाय..त्यामुळे तुही आपल्या गोंधळ घालण्याच्या व आडून आडून क्काहीही सुचवण्याच्या कसबांचे उपद्रव थांबवा नाहीत प्रकाश आम्बेडकरांसारखी गत होईल तुमची...

ह्या कसबेंच्या कसबामुलेच मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही..ह्यांनी बापट आयोगात विरोधात मतदान केले म्हणूनच मराठा आरक्षण मिळू शकले नाही.... ब्रिगेडी आणि इतर मराठ्यांनो यावर नाही रे बोलत तुम्ही?
मराठ्यांना चक्क विध्वंसक समाज असे उद्बोधिले यांनी आणि तुम्ही गप्प.....


बोलान आता का.... तुम्ही यांच्याच पैशावर बामनांना शिव्या घालता का/? म्हणूनच मिठाला जगताय का?

Saturday 17 December 2016

Vivekasy Aanandam....!


स्वामी विवेकानंद यांनी १८९३ साली आजच्या दिवशी शिकागो धर्मपरिषदेमध्ये पहिले भाषण केले होते. प्राचीन भारतीय तत्वज्ञानाची पाश्चात्त्यांना ओळख करून देऊन विश्वबंधुत्वाचा संदेश दिला होता.
Sisters and Brothers of America,
It fills my heart with joy unspeakable to rise in response to the warm and
cordial welcome which you have given us. I thank you in the name of the most
ancient order of monks in the world. I thank you in the name of the mother of
religions, and I thank you in the name of millions and millions of Hindu people
of all classes and sects.
My thanks also to some of the speakers on this platform who, referring to the
delegates from the Orient, have told you that these men from far-off nations
may well claim the honor of bearing to different lands the idea of toleration.
I am proud to belong to a religion which has taught the world both tolerance
and universal acceptance. We believe not only in universal toleration but we
accept all religions as true.
I am proud to belong to a nation which has sheltered the persecuted and the
refugees of all religions and all nations of the earth. I am proud to tell you
that we have gathered in our bosom the purest remnant of the Israelites, who
came to Southern India and took refuge with us in the very year in which their
holy temple was shattered to pieces by Roman tyranny. I am proud to belong to
the religion which has sheltered and is still fostering the remnant of the
grand Zoroastrian nation.
I will quote to you, brethren, a few lines from a hymn which I remember to have
repeated from my earliest boyhood, and which is every day repeated by millions
of human beings:
As the different streams having their sources in different places all mingle
their water in the sea, so, O Lord, the different paths which people take
through different tendencies, various though they appear, crooked or straight,
all lead to Thee.
The present convention, which is one of the most august assemblies ever held,
is in itself a vindication, a declaration to the world of the wonderful
doctrine preached in the Gita:
Whosoever comes to Me, through whatsoever form, I reach them; all are
struggling through paths which in the end lead to Me.
Sectarianism, bigotry, and its horrible descendant, fanaticism, have long
possessed this beautiful earth. They have filled the earth with violence,
drenched it often and often with human blood, destroyed civilization and sent
whole nations to despair. Had it not been for these horrible demons, human
society would be far more advanced than it is now. But their time is come; and
I fervently hope that the bell that tolled this morning in honor of this
convention may be the death-knell of all fanaticism, of all persecutions with
the sword or with the pen, and of all uncharitable feelings between persons
wending their way to the same goal.

Tuesday 13 December 2016

MICRO-SCOPE मधून : नरेंद्र मोदी

२०१४ च्या निवडणुकीने देशाला राष्ट्रीय स्तरावर एक कणखर आणि कर्तृत्ववान नेतृत्व लाभले. गेली अडीच वर्षे देशाला एक अत्यंत व्यवस्थित सरकार मिळालेय ते केवळ त्यांच्यामुळेच . याआधी तर सरकार होते कि नव्हते सर्व मोकळे रान होते आनि लुटेरे लुटत होते असाच अनुभव आला देशातल्या सर्वच जनतेला. गेल्या दहा वर्षात देश पूर्णतः विदेशी शक्तींच्या हातात असलेल्या कॉंग्रेस आणि त्यांच्या डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या तावडीत होता. म्हणूनच देशात सर्वत्र आपापला विदेशी म्हणजेच भारत्द्वेशी अजेंडा राबवण्यात हे लोक यशस्वी ठरले. एकीकडे म्हणायचं आतंकवादाचा धर्म नसतो आणि मग हिंदूंना आतंकवादी म्ह्नायच इथपर्यंत मजल मारली माजलेल्या राजकारण्यांनी. अर्थातच मोदिजींवर चांगले आणि वाईट असे खूप आरोप करण्यात आलेयत आणि आजही होतात. याची यथायोग्य शहनिशा व्हावी म्हणूनच आपल्या पंतप्रधानांचे मी केलेले एक समीक्षण .




नरेन्द्रभाई एक अत्यंत सध्या गरीन गुजराती कुटुंबात जन्मले. त्यांची आई अगदी भांडी घास्न्य्पासून अन्य सर्वे कामे करायच्या.वडील लवकरच वारल्यामुळे आईवर सगळी जवाबदारी आली. त्यांचे आणखी तीन भाऊ आहेत.लहानपणी नरेंद्र भाईंनी रेल्वे मध्ये चहा विकण्याचे काम केले. एवढ्या बिकट परिस्थितीतही त्यांनी शिक्षण घेतले.याच काळात त्यांचा संघाशी संपर्क आला .लहानपणापासून शाखेत नियमित रित्या ते जात असत यातूनच त्यांना अगदी कडक असे अनुशासन मिळाले. त्याकाळी गुजरात मध्ये बालविवाह होत असत. नरेंद्र भाई यांचा विवाह देखील  यशोदा बेन यांचेशी अगदी काहीही ण समजणाऱ्या वयात झाला .प्रथेनुसार लग्न केल्यावर मुलगी मोठी होईपर्यंत आपल्या आई बाबांकडेच राहते .मग काही वर्षांनी मुले मोठी झाल्यावर पाठवणीचा कार्यक्रम होतो ज्याला गौना असे म्हणतात. लग्न झाल्यावर नरेंद्र भाई पूर्ववत आपले जीवन जगत होते ते चहा विकायचे शाळेतही जायचे आणि नियमितपणे संघाच्या शाखेतही त्यांचे जाने सुरूच होते.काहीई काळ असाच निघाला या कालामध्ये देशाचे बदलते वातावरण ,राजकारणात कॉंग्रेसची असलेली विश्वसनीयता व त्याद्वारे जनतेवर झालेले अत्याचार देशातल्या बहुसंख्य समाजावर होयत असलेला अन्याय हे सर्व बदल लहानसा नरेंद्र बघतच मोठा झाला. ऐन वयात आल्यावर यशोदा बेन यांना गौना करून परत आणण्यासाठी त्यांना विचरण करण्यात आली पण आता त्यांना लग्नाचा अर्थ कळत होता. त्यांना आपल्या आयुष्याचे ध्येयही कळत होते. अर्थात ते लग्न स्वीकारायला तयार नव्हते.संसार थाटायला तयार नव्हते म्ह्नुनच ते तब्बल तीन वर्षांकरता कोणालाही ण सांगता हिमालयात निघून गेले.तिथे त्यांनी अभ्यास व साधना केल्याचे ऐकिवात येते .त्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक अध्यात्मिक दिशा मिळाली.ते परत आले व संघाचे प्रचारक म्हणून देशभरात सेवाकार्य करू लागले. लहानपणी ण समजणाऱ्या वयात आधी लग्न लावली जायची त्यात त्या चिमुकल्यांचा काय दोष ? असो,,,

प्रचारक म्हणून चांगले काम केल्यामुळेच ते लवकरच सर्वांचे आवडते event manager झाले .अयोध्येतील राम जन्मभूमीचे आंदोलण जोमात सुरु होते.लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वात राम जन्मभूमीवर सोम्नाठ्पासून भिअर मध्य प्रदेश होऊन अयोध्येत यात्रा काढली जाणार होती .नरेंद्र भाई तोपर्यंत अडवाणी जींचे खासम्खास बनले होते या रथयात्रेचे आयोजनाचा सर्व भर त्यांच्यावर होता. एवढेच नाही तर लाल्कृष्णाच्या रथाचे सारथ्य सुद्धा त्यांनाच हि करावयाचे होते. ते त्यांनी अगदीच सफल पूर्ण केले. हि घटना १९९२मध्ये घडली .त्यानंतरच्या गुजरातच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले . २००२ पर्यंत भाजपने गुजरातला तब्बल ३ मुख्यमंत्री दिले पण सर्वांना टी धुरा सांभाळता आली नाही .गुजरातच्या भूकंपाचे धक्के केशुभैन्च्या पथ्यावर पडले आणि त्यांना पायउतार व्हावे लागले .१९९८-२००२ हि वर्षे गुजरातच्या राजकारणासाठी अत्यंत अस्थिरतेची होती. शंकरसिंग वाघेला केशुभाई पटेल यांसारखे दिग्गज एवढेसे राज्य सांभाळू शकले नाही. शेवटी वेगळा पर्याय म्हणून एका युवा नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजप आणि संघाने घेतला. नारेन्द्राभाई गुजरातच्या गाडीचे मालक झाले.

पण गुजरात अस्थिरच होता. अवघ्या ३ महिन्यातच गोधरा या अहमदाबाद शहराजवळ च्या ठिकाणी एक भीषण घटना घडली. अयोध्येहून साबरमती कडे येणाऱ्या एक्स्प्रेस ला गोध्र स्टेशन ला अडवले गेले.या रेल्वे गाडीत अयोध्येचे दर्शन घेऊन गुजरातला परत येणारे हिंदू भाविक होते. त्यात लहान मुले म्हातारे सगळेच होते. पण घडले असे कि या गाडीच्या बोगी नंबर ६ ७ मध्ये गाडी थांबल्यावर २००० लोकांचा मुस्लीम समुदाय घुसला व ह्या दोन बोग्या चक्क पेटवून देण्यात आल्या. त्यात ५९ निष्पाप लोक मारले गेले. झाल याची प्रतिक्रिया म्हणून गुजरातमध्ये दंगे भडकले . अवघ्या तीन दिवसात ७०० च्या जवळपास मुसलमान मारले गेले. पहिल्याच दिवशी पोलीस दंगे आटोक्यात आणू शकत नव्हती म्हणूनच नरेन्द्र  भाई नी  वाजपेयी सरकारला सैन्याच्या तुकड्या मागवल्या पण काश्मिरातून त्यांना यायला १-२ दिवस लागले आणि तोवर प्रसार माध्यमे , तुष्टीकरणाचे राजकारण करायला तापून बसलेली कॉंग्रेस आई इतरांनी आपापल्या पोळ्या ईतक्या भाजल्या त्यांची राख निर्दोष मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना तब्बल १२ वर्षे रोज प्रतिमेला काळे फासण्यासाठी वापरण्यात आली. भ्जाप्नी त्यांचा राजीनामा मागितला पण बाळासाहेब ठाकरे आडवे आले . जाहीरपणे साहेब भाजपला म्हणाले कि मोदी गेला तर गुजरात गेला. शेवटी त्यांचे मुख्यमंत्री पद वाचले.

पण इतका कुप्र्चार कोणाचाही झाला नसेल तेवढा नरेंद्र मोदींना सहन करावा लागला.पण त्याचेही त्यांनी सोने केले गुजरातला ३ वेळा मुख्यमंत्री होऊन प्रचंड विकसित केले. एवढे कि दोनदा महार्ष्ट्रापुढे जाऊन गुजरात नंबर एकचे राज्य झाले. गुजरातचा विकास नाकारता येणार नाही कारण कि युपी बिहारचे लोंढे बरेचसे तिकडे वळले आहेत ,आणि एवढेच नाही तर तिथेही त्यांच्या तमाशामुळे गुजराती जनतेने तुरळक ठिकाणी हिंदी विरुद्ध उठाव केलेलाच आहे.

पुढे म्हणजे गेली १० वर्षे जी राजकीय नेतृत्वाची पोकळी या देशात होती ती स्व कर्तुत्वावर नरेंद्र मोदींनी भरून काढली लोकमान्य व बालासाहेब ठाकरे यांच्या नंतर गेल्या १० वर्षात झालेल्या काँग्रेसी घोटाळे आणि अधर्म याच्यामुळे जन्मलेल्या असंतोषाचे ते जनकच म्हणावे लागेल.एक चहावाला ते स्वयंघोषित पन्तप्रधान पदाचे उमेदवार. आणि आता दोन वर्षांपासून तर स्वाहती संपूर्ण सत्ता केंद्रित ठेवलेल्या राजाप्रमाणेच त्यांचे व्यक्तित्त्व आहे.खरचं नरेंद्र भाई मोदी हे शेटजी भटजींच्या भाजप मधील  प्रथम क्षत्रिय म्हणावे लागतील. पहिल्यांदा भारतीयत्व मानणाऱ्या विचारांची सत्ता देशावर आहे.

आता दुसरी बाजू बघुयात. आपल्या क्षत्रीय्त्वाच्या गुणांमुळे देशभरात मोदिजींचे कोट्यावधी लोक भक्तच झालेले आहेत. भक्त तर मीपण आहे त्यांचा पण अंध भक्ती नाही.भावनांमध्ये वाहून जाने म्हणजे गांधीवाद.....आणि तो आम्ही साहेबांचे सैनिक कधीच करणार नाही. मोदी भक्तांना जे वाटते हा काही अवतार वगरे आहे त्यांनी हि मिथ्या धारणा  सोडून द्यावी. नरेंद्र मोदिजी हे स्वाभिमानी हिंदू नक्कीच आहेत पण एक हिंदू राजा म्हणून ते कमी पडतील.आणि पडत आहेतच. त्याचे कारण असे कि गोधरा नंतर तब्बल बारा वर्षे त्यांच्याविरुद्ध जो दुष्प्रचार झाला त्याचा काहीसा धसका त्यांनी निश्चीतच घेतलेला आहे.या बारा वर्षात त्यांनी गुजरातमधल्या मुसलमान व्यापारी बडे उद्योगपती यांची खूप मदत केलेली आहे एवढेच काय तर सरश जफरवाला नावच मर्सिडीज चा एक मोठा उद्योजक सलमान खान तसेच अन्य मुस्लीम पुढारी यांचेमध्ये त्यांची चांगली ओळख निर्माण करण्यात त्यांना चांगले यश आलेले आहे. त्यामुळे काही लोक जे म्हणत असत कि भाजपा हि भगवी कॉंग्रेस आहे ते पूर्णतः खरेच आहे.बहुधा काही वर्षांनी हे लोक मोदी हा काँग्रेसी किंवा गांधीसारखा खोटा हिंदू आहे हे सुद्धा या लोकांना म्हणावे लागेलच. 




हे मी यासाठी म्हणतोय कारण पुढीलप्रमाणे आहेत.



१.       1खूप दिवसांपासून पांचजन्य मध्ये येत होते कि काँग्रेसी देशात इस्लामिक बँकिंग आणणार आहेताहे.आणि हे बँकिंग आला कि हिंदूंच्या पैशावर मुस्लिमांना धर्मिक फंडिंग दिले जाईल आणि म्ह आतंकवाद वगरे या सर्व गोष्टी त्यात होत्या. इस्लामिकर्ण आणि तेच या सर्व लोकांचे अजेंडाझ राबवून देश बुडवला जाईल वगरे वगरे .आता परिस्थिती अशी आहे कि मागे रिझर्व बँक of india नि सरकारच्या आदेशावरून इस्लामिक बँकिंग आण्याचा प्रस्ताव तयार करणे चालू केले आहे. सरकार म्हणजे हेच मोदी सरकार . आता सगळे गप्प का? हे सरळ सरळ तुष्टीक्र्ण आहे.आणि यापेक्षा म्हण्त्त्वाचे म्हणजे यामुळे देशाची सुरक्षा आणि एकात्मता धोक्यात येईल.एका धर्माच्या लोकांसाठी वेगळा न्याय करप्रणाली वगरे देन हे देश तोडण्यासारखे आहे. शिवाय संघ व इतरही अभ्यासकांच्या मते हे इस्लामिक बँकिंग धोकादायकच ठरू शकते.


२.       2.india टीव्ही वरचा रजत शर्मा यांचा गाजत असणारा कार्यक्रम मोदी और मुसलमान हा you tube वरून डाउनलोड करून सर्वांनी बघावा .त्यात पंच मुसलमानांनी येऊन मोदींनी गुजरात मध्ये संघ भाजप व विश्व हिंदू परीषद यांचा सफाया कसा केला याचे सप्रमाण दाखले तिथे मिळतील.


३.       3.नरेंद्र मोदी हे अति महात्त्वाकांशी व्याक्त्तीत्व आहे ज्यांना कुटुंब नसते त्यांच्यात राजकीय महत्त्वकांक्षा खूप जास्त प्रमाणात असते हे आतातरी लक्षात यायलाच पाहिजे. आपले पद वाचवायला हे लोक काहीही करू शकतात. आणि या देशात सर्व काही vatican funded, अमेरिका आणि कॉंग्रेसच्या प्रभावातल्या मिडीयाच्या हाती असते . कॉंग्रेसची वोट बँक आणि दिल्लीच्या माजलेल्या मीडियाची  audience बँक एकच आहे आणि यांना आपले globalisation आणि तुष्टीकरनातून trp  क्न्वायचे धंदे मोदींना वाज्पेयीन्सार्खेच महागात पडतील.



४.       4.सुभाष  वेलिंगकर यांसारखा व्यक्ती संघातून बाहेर पडणे हे पर्रीकर आणि मोदी यांचे अपयश आहे. शिवाय हि सत्ता जर आपण देशाच्या खर्या विकासासाठी आणली आहे तर मग article 93 या RTE च्या हिंदूंसाठी जुलमी असलेल्या कायद्यात बदल करायलाच हवा.या देशात गेल्या ७० वर्षात अल्पसंख्याकांसाठी तुष्टीकरणाचे अनेक कायदे राबवले गेले हे मूर्ख अज्ञानी हिंदूंना माहितीपण नाही. जर ४ टक्के गोवे येथील ख्रिस्ती लोक आपले धर्मशिक्षण देऊ शकतात तर ८० टक्के हिंदू शाळांना तो अधिकार का नाही? अशा कित्येक व्यवस्था बदलायला हव्या पण व्यर्थ....!


५.       5हे सरकार कित्येक व्यवस्था बदलवायला आणलेले आहे याचा विसर पडलाय यांना.फक्त एक कौतुक आहे ते कि FCRA म्हणजे फॉरेन CONTRIBUTION रेगुलेशन ACT यात बदल केला गेला विदेशातून भारतात देश बुडवायला कामाला लावणाऱ्या संघटना वगरेंना तो मिळेनासा झालाय. पण अजूनही मिशनरी व इस्लामिक राष्ट्रांतून येणारा पैसा थांबला नाही तो तसाच येतोय. शिवाय काही गरज नसतांना मदर तेरेसाच्या संतपद समारंभाला सुषमा बाईंना पाठवायचे नव्हते.काहीपण केले तरी हे लोक तुम्हाला मत देत नाही.याची जाणीव असू द्या.


६.    6.   मोदिजींमुळे देशत नव्या व्यवस्था बनायला हव्या .कुठलाही देश व्यवस्थांवर चालतो .राजकारण्यांवर नाही . दिल्ली मध्ये आपण राहत आहात पण तिथे देशविरोधी भारताचे तुकडे करण्याचे नारे लागतात पण आपण राजा असून हतबल का? कारण व्यवस्था आड येतात . जोपर्यंत मेकॉलेच्या व्य्वाथा बदलत नाहीत तोवर कोण देव जरी आला तरी देश बुडतीला जाण्यापासून वाचवू शकत  नाही.


७.    7.   एकूणच काय तर मोदिन्पेक्षा संघांनी आता कसलेले शिव्सैनिकांसारखे काहीही करायला ण घाबरणारे राजकारणी  तयार करावेत . अर्थात काही लोकांकडून उडत उडत ऐकलय कि भाजप आता एक सशक्त राजकीय पक्ष झालाय त्याकडे कॉंग्रेस सारखे स्वतःचे कार्यकर्ता आहेत.आता २०१९ च्या निवडणुकीत त्याला संघाची गरज राहणार नाही. मोदिजींकडून भारतीयत्वाला खूप काही मिळणार नाही असेच दिसते .म्हणजे संघ आणि कॉंग्रेस दोघेही २०१९ ला लाटेत ओसरून टाळला जाणार.


8.शेवटचे पण सर्वाधिक महत्त्वपूर्ण म्हनजे मोदी यान्चे पवार प्रेम। काही संबंध राजकीय आवश्यकता नसताना मोदी पवारांशी खुपच जवळीक करताना दिसतात। बारामतिमधुन भ्रष्ट वादी कान्ग्रेस म्हनुन प्रचार करतात आनि तिथेच पवारांसोबत कार्य क्रम करतात। म्हने मि आठवडयातुन ४ वेळा पवारांना फोन करतो।एवढ उतु जाउ देने हे चुक आहे। परवा म्हने कि लहान पनापासुन बोट धरुन राजकारण शिकवलय पवारांनि मोदिन्ना हा फाल्तुपणा अंगवळणी येउ सकते हि मोदी यान्च्या व्यक्ति मत्तवाला असलेलि बनियावादाचि झालर आहे।इथे हि दुटप्पि भुमिका पटत नाहीं। पवार ते पवार तिकडे मोदिलक अन् इकडे देवेन्द्र ला दाबायचि कुवत ठेवतात। बाळासाहेबांमुळे वाचलेले मोदि त्यांचिच शिवसेना संपवायला निघाले। पन ति काही संपत नाहीं। तुमिच भोगा आता मराठयांचि आंदोलने आनि ब्रिगेड चा त्रास।

    तूर्तास इति शम !



पुढचे पारिजात नन्तर कधी ओवीन .......