Saturday 26 August 2017

धारा ३७० : आणि काश्मीर महाराष्ट्र संबंध.......




नमस्कार राजे .. 



नुकताच माझ्या महाविद्यालयात एक कार्यक्रम झाला ... युवा संसदेसारखा .
.
. विविध वयोगटाचे आणि शाळेपासून तर 

शिकलेल्या मोठ्या माणसांपर्यंत चे सगळे लोक 

त्यात सहभागी होत असतात..आयोजक प्रत्येकाला

 पद देत असते .. जशी आपली लोकसभा असते न तसेच सगळे पक्ष असतात कॉंग्रेस भाजप 


तृणमूल द्रमुक वगरे वगरे भाग घेणार्यांना एका 
एका पक्षातल्या नेत्यांची भूमिका दिली जाते ..जशी मागल्या वेळेस मी  पंतप्रधान झालो होतो.. यंदा दुसरे लोक सोनिया गांधी राहुल बाबा मोदी  सुषमा जेटली वगरे झाले.. आणि मुद्दा होता धारा किंवा कलम ३७०.. सत्ताधार्यांना चर्चा घडवून आणून हि कलम रद्द करवून घ्यावयाचे लक्ष्य होते ..तर विरोधकांना ते संख्याबालाभावी हाणून पडण्याचे काम होते..लोकसभेत भाजप ची संख्या जास्त म्हणून काय तर ..विअजय आमचाच झाला ..म्हणजे भाजपचा ......   २ दिवस सकाळी ११ पासून ते संध्याकाळी ७ पर्यंत अगदी जशी लोकसभा चालते न तशीच चालते हि युवा संसद.....  दोन दिवस खुप्प उहापोह झाला काश्मीर मुद्द्याचा..त्यात पाकिस्तान नेहरू राजा हरीसिंघ श्यामाप्रसाद मुखेर्जींचे कर्तुत्व , मुरली मनोहर जोशींची लाल चौकात तिरंगा फडकवण्याची...  यात्रा ... आपले गोळवलकर गुरुजी...काश्मिरी पंडितांच्या समस्या इत्यादी सगळ्या गोष्टींचा खूप खालवर विचार झाला ..... 



 आणि मला हे कलम काश्मीर पेक्षा आपल्या महाराष्ट्रासाठी किती आवश्यक आहे याची जाणीव झाली....  मुळात काश्मीरची मुळ ओळख टिकून राहावी म्हणूनच नेहरूंना हे कलम ठेवण्यास बाध्य केले गेले होते ... काश्मिरियत ....म्हणजे तिथली मुळ भाषा भूषा लोकसंख्या अर्थात तिथले मुळचे लोक याबाबतची शाश्वती बहाल करण्यासाठी हे कलम होते... या कलमांतर्गत काही बाबी येतात जसे तिथे ६ वर्षांनी निवडणुका होता आणखी इतरही आहेत,,, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे .. जम्मू काश्मीर सोडून अन्य कुठल्याही भारतीय राज्यातील माणसाला काश्मीर मध्ये फिरायला जाता येते पण तिथे कायमची वस्ती करता येत नाही..अर्थात तिथे घर घेऊन किंवा भाड्याने राहण्याचा अधिकार अन्य भारतीयांना नाही..


म्हणजे आपल्याला तिथले मतदाता होता येत नाही , शिधापत्रिका किंवा domicile अर्थात तिथली नागरिकत आपल्याला मिळू शकत नाही .. एकूणच काय तर संचार स्वातंत्र्याचा पुर्नाधिकार हा काश्मिर मध्ये लागू होत नाहीई...  भारताचे साम्विधान्सुद्धा पूर्णतः तिथे लागू होत नाही..त्यांचे स्वतःचे संविधान आहे.. असो...

जेव्हा हा मुद्दा पेटलेला होता तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी गोळवलकर गुरुजींना पत्र लिहून काश्मीरच्या राजांशी म्हणजे महाराजा हरीसिंघ यांचेशी बोलून त्यांना काश्मीरचे भारतात विलीनीकरण करावयासाठी मन वळवायला जावे असे सुचवले होते.. हा शेवटचा प्रयत्न श्री गुरुजींनी केला व तो यशस्वी झाला आणि काश्मीर आपल्याला मिळाले ..तेही ३७० च्या कटकटी सोबत..पण हे मराठी माणसाचे कर्तुत्व दिल्लीधीशांनी आजवर दाबून ठेवले याला कुठेही स्थान दिले गेले नाही..... असो.....





धारा ३७० हि कलम आणि यातला कायमचे रहिवासी न होण्याचा अधिकार जर खरोखरीच एखाद्या राज्याला त्याचे मुळचे अस्तित्व टिकावे यासाठी बहाल करण्यात आलाय तर आज त्याची सर्वात जास्त आवश्यकता आपल्या महाराष्ट्ाला आहे...कारण गेल्या ७० वर्षात इथे उत्तर आणि दक्षिण भारतातून लाखो लोक राहायला आलेयत नोकरीच्या नावाने... एवढेच नाहीं तर उत्तर भारतातल्या समाजवादी पक्षासारख्या राजकीय पक्षाने राजकीय साम्राज्य्वाद्सुद्धा करण्याचे चंग बांधलेत....  हिंदी भाषिकांनी भाषिक साम्राज्यवाद सुरु केलाय... इथे यायच रिकाम्या जागांवर झोपडपट्ट्या उभारायच्या गुंडागर्दी करायची..इथल्या लोकांचे रोजगार हिसकावायचे..हळूहळू आपपल्या नातेवाईक ओळखी पाळखी च्या लोकांना बोलवायचं आणि इथेच गचागच करायचं पिल्लावळी जन्माला घालायच्या आणि राहायचं... यातून काही गुंड लोकांनी बाहुबली लोकांनी अबू आझमी राज पुरोहित सारख्यांनी भाषिक आधारवर मतदारसंघ बनवले आहेत.... मुंबईच्या या निवडणुकीत भाजपला ८२ जागा भैय्या बिहारी न गुज्जू लोकांमुळे मिळाल्या आहेत... सेनेच काम चांगल नाही म्हणून नाही.... 



 २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या ६ लोकसभेच्या जागांपैकी शिवसेना सोडून भाजप कॉंग्रेस राष्ट्रवादी या सर्वांनी परप्रांतीय माणसाला उमेदवारी दिली... असो....




सर्वात महत्त्वाचे हे कि २०११ च्या जन गणनेनुसार महाराष्ट्रात ज्यांची मातृभाषा मराठी आहे असे फक्त ६९% लोक आहेत म्हणजे उरलेले सगळे परप्रांतीय.... ११ टक्के हिंदी भाषिक.. ४ टक्के  गुज्जू ७ टक्के मुस्लिम ...आणि अन्य ...

 हा आकडा भयंकर आहे .देशातल्या अन्य कुठल्याही राज्यात मुळचे भाषिक हे ९५ टक्क्यांपेक्षा कमी नाहीत.... फक्त आणि फक्त महाराष्ट्र  हेच राज्य असे आहे जिथे हा भिकारवाडा होतोय लोकसंख्येचा....... 


येत्या जन गणनेत आपण ५०  टक्क्यांपेक्षा जास्त उरलो तरी आनंद होईल... 

कारण सध्या पर परप्रांतीयांशी इश्क़ लढवणारे महाराष्ट्र द्रोही समाज बुडवे मूर्ख मुख्यमत्री आहेत म्हणून.... ज्या माणसाला आपल्याच राज्यात आपली मातृभाषा   बोलायला लाज वाटते 

..परप्रांतीय लोकांच्या मतांसाठी हे मराठीत बोलत सुद्धा नाहीत... 
नागपूर आणि इतर महानगरपालिकांच्या योजना आणि शहरात लागलेले फलक सुद्धा हिंदी मध्ये आहेत... एवढी लाज का असावी मराठीची... ???

  म्हणून मला असा वाटत कि ३७० कलम अंतर्गत असलेला रहिवास चा अनुच्छेद महाराष्ट्राला विशेष दर्जा म्हणून देण्यात यावा... नाहीतर २० वर्षात महारष्ट्रात मराठी माणूस संपलेला असेल... आजच mpsc ची  भाषा हिंदी आणि उर्दू द्या अशी मागणी करतायत ..आणि ती मान्य केल्या जातीय उद्या काय करतील देव जाने..


देशाला महाराष्ट्रानी आजवर खूप काही दिलेय राज्याच्य बेयोंड जाऊन आम्ही संघ दिला अन्णा हजारे दिले... शिवाय एकटा मराठी माणूस देशाला २५ टक्के कर देतो... महाराष्ट्र देशाची एक चतुर्थांश तिजोरी भरतय...आणि ४० टक्के लोकांख्येचे हिंदी भाषिक  काय देतात फक्त ८ टक्के ... 

केंद्र राज्याला फक्त १० टक्के परत करत राज्य चालवायला आणि बाकी १५ टक्के युपी बिहारला जात...

आज युपितली ३६००० कोटींची ऋण माफी आमच्या मराठी खिशातून गेलीय आणि आमचाच पैसा आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिला जात नाही कारण त्यासाठी पैसे नसतात दिल्ली कडे ...असो महाराष्ट्राची खरी आवश्यकता अनुच्छेद ३७० आहे नाहीतर आपली पुढची पिढी भाषिक गुलामीत जगणार...... अल्पसंख्याक होऊन अस्तित्वच संपायची भीती आहे...


Wtevr I have written here is not for discretion of any society n person.. these are economical facts which are in public domain..n everyone can check it…  I have nothing hatred for any linguistic or religious community …. My sole intension is to protect the thousand year existence of ma holy land of पोषण संस्कृती...  … and nothing much……



तूर्तास जय महाराष्ट्र........ माय मराठी...  

Tuesday 22 August 2017

हेड्गेवारी विचारांची कत्तल आणि भिक मांगो वैद्य



नमस्कार राजे.......!

.गेल्या पंधरवाड्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या.... त्यातल्या दोन्ही महाराष्ट्राशीच संबंधित होत्या .... पण महारार्ष्ट्रीय जनांनी या भारत्भूमीस जे राष्ट्रीय संघटना व राजकारणाचे रक्तमय सामिधारूपी योगदान दिले त्याच्या छायेतून ह्या दोन गोष्टी काही सुटलेल्या नाहीत....


अर्थातच....   दिल्ली आज जेवढी सकारात्मक दिसतीय ती महाराष्ट्र्कारणे...... पण कोण जाणे नेहमीच या सह्याद्रीच्या नशिबी पांडवान्सारखे  वनवास किंवा लाक्षागृह यांसारख्या दुखद किंवा क्लेशकारकच फळे या भारत भूमीच्या साठीच्या आरंभिलेल्या यज्ञातून मिळतात....  लेखाची पूर्वपीठीका मांडण्याचा हा सावरकरी प्रयत्न इथेच थांबवून ..पुढे बघुयात.....




एक घटना घडली ती अशी कि केंद्रीय सरकारने दर वर्षी प्रमाणे  यंदाही पद्म पुरस्कारांची  घोषणा केली...आणि त्यात आपल्या अति विश्वजेत्ता पंतप्रधान नरेंद्र भाई मोदिजींचे अत्यंत अत्यंत महान गुरुवर बारामतिअधिष्ठित सुप्रीयापीता तथैव अजितदादा रक्षक लखोबा लोखंडे समर्थक...श्री श्री पदच्युत शरदचंद्र पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला गेला.....




नरेंद्र मोदी या कर्तुत्व संपन्न आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाला कुठेतरी मलीनत्व येते ते याच सत्तेच्या
अधाशीपणामुळे......... नरेंद्रा तू संघकार्य तर केलेस पण संघाला जे हवेय ते काही राजकारणात आपण तेवत ठेवू शकत नाही आहात याची आता तरी  जाणीव असू द्या........ 
कधी बारामतीत सभा घ्यायची आणि म्हणायचे कि मी आठवड्यातून ४ दिवस शरद रावांना फोने करतो....शरदराव माझे राजकीय गुरु  आहेत........ हे अचानक फुकटचे प्रेम का उफाळू लागलेय तुम्हाला काय माहित?


कदाचित शिवसेनेला डिवचून गप्प बस्व्ण्यासाठीच हे सर्वे उद्योग महाराष्ट्रातील भट वादी कंपू म्हणजेच कमळाबाई करतीय....   ह्या साखरेच्या धोंडानी काय दिले मोदिजी तुम्हाला? तुमचे मुख्यमंत्रीपद जाणार होते तेव्हा बाळासाहेब उभे ठाकले होते तुमच्या पाठीशी म्हणून आज राजकीय रूपातही अस्तित्व आहे तुमच..... पण आपण हे विसरलेला आहात.....  सत्तेची नशा आणि हव्यास माणसाला ... समाजकारणापासून अति दूरवर नेऊन ...राजकारणीय यशस्वीतेच्या मदिरेची चव आणि चोचले इतपतच खितपत ठेवत असते आणि म्हणून....आज ...एक कर्तुत्वान माणूस एका महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी एवढा मोठ आयडो logical तडजोड करायला लागतो


 ....मोदिजी शेवटी तुम्हीसुद्धा धूर्त राजकारणी निघाले....बाळासाहेबांना भारतरत्न देण्याऐवजी या म्हातार्याला पद्मविभूषण देऊन कशासाठी.....इतकी वर्षे  भूखंडांचे श्रीखंड खाल्ले म्हणून????  यांनी पाणी फिरवून फिरवून पुरता पश्चिम महाराष्ट्राची जमीन अति सुपीक केली म्हणून कि वर्षानुवर्षे काळा पैसा विदेशी बँकांमध्ये जमवलाय म्हणून....?
वाः काय रीत म्हणावी भाजपची....

खरच खूपच मर्दानगीच काम केलेल दिसतंय तुम्ही शेटजी भटजींनी......

आता दुसरी बातमी ती म्हणजे रिक्काम टेकडा म्हातारा म्हणजे हे संघाचे भिश्म्म पितामह ...भिक मांगो वैद्य ..... द्रौपदीचे वस्त्र्हर्ण होत असतानाही .... तिला सोडवायला जाऊ न शकणारी विद्वत्ता आणि शौर्य ,,....मोठेपणा महिमा आणि वय ..यांचेही आज ९५ वर्षे आणि त्यांचेही महाभारतातल्या भिष्मचार्यांचेही तेवढेच असावे बहुधा ........    येऊन जाऊन काय तर म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करा ........ साला ज्यांनी कधीच राज्यासाठी काहीही केले नाही... नेहमी हिंदुत्व हिंदुत्व हाच राग आलापला...ज्यांना कधीच मराठी मनाच्या मुंबईत होणार्या हत्या दिल्या नाहीत .... मराठी जनता व तिचे दुखः दिसले नाही त्यांना काय अधिकार राज्याचे तीन तुकडे करा म्हणायचा????



आणि महाराष्ट्राचे ४ तुकडे कशाला करायचे?? अविकसित आहे म्हणून ?? हा तोच महाराष्ट्र आहे जो एवढ्या  वर्षांपासून लाखो परप्रांतीयांना पोसत आहे...  तोडायचं असेल न तर २१ कोटीचा उत्तर प्रदेश तोडा .. त्याचे क्षेत्रफळ महाराष्तरा एवढेच जवळपास ... पण लोकसंख्या २१.५० कोटी..... ४-४ कोटीचे ५ नाहीतर ५-५ कोटींचे ४ राज्य बनवा.... बुंदेलखंड , अवध  ,पूर्वांचल , हरित प्रदेश .... गेल्या ४ पिढ्यांपासून इथे घुसत आहेत आणि आपलेवार्ड तयार करत आहेत......  बिहार चे तुकडे करा.. राज्याचे क्षेत्रफळ छत्तिसगढ , तेलंगण ,विदर्भ एवढे यानुसार लोकसंख्या २-२.५० कोटी हवी होती.... ती आहे ११ कोटी.... देशात तब्बल १३ पोट्टे पैदा करणारा एकमेव  मुख्यमंत्री लालू यादव..जसा राजा तशी प्रजा  ,.................... हे तेच मागो वैद्य आहेत जे म्हणतात आम्ही पवारांचं समर्थन घेऊ.... भिकारी ....  कुठले..... 



असो........ माझा महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र ........


Sunday 20 August 2017

सकल विद्या प्रवीण सरफोजी राजे भोसले

महाराष्ट्रापासून कोसो दूर तंजावरमध्ये गेली कित्येक शतके मराठी संस्कृती आकार घेत राहिली, ही नि:संशय विस्मयचकित करणारी बाब. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठय़ांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले.
तंजावर म्हणताच आपणास आठवतात ते व्यंकोजीराजे, सरफोजीराजे दुसरे, सरस्वती महाल ग्रंथालय, मराठी नाटक, भरतनाटय़म् आणि आणखी बरंच काही. शिवाजीराजांचे सावत्रबंधू व्यंकोजीराजे यांनी कावेरीच्या खोऱ्यात तंजावरी मराठी राज्य स्थापन केले. या राज्याचा पुढे फारसा विस्तार झाला नाही, परंतु इ. स. १८५६ पर्यंत- म्हणजे सुमारे १७५ वर्षे तंजावरचे राज्य अस्तित्व राखून होते. तंजावरमध्ये मराठी संस्कृतीचा प्रवाह  वाहता ठेवण्याचे श्रेय तंजावरच्या या राज्यकर्त्यांना जाते.
तंजावरच्या मराठय़ांचा दरबार विद्वान आणि कलावंतांनी गजबजलेला होता. तंजावरचे राज्यकर्ते स्वत: विद्वान व कलासक्त होते. परिणामी तिथे मराठी वाङ्मय, नाटक, नृत्य, कला, संगीत आदींची विस्मयकारक प्रगती झाली. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठय़ांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
तंजावरला पूर्वेचे व्हेनिस किंवा दक्षिणेचे एडन म्हणतात. ही एक यक्षनगरी होती. कावेरीचे सुपीक खोरे, आल्हाददायक हवा आणि उंचच उंच नारळांची झाडे असलेले तंजावर हे संस्थान फारच लहान होते. भारताच्या नकाशात तर ते टिपूसभरच भासे. परंतु या चिमुकल्या संस्थानामुळे महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाला प्रतिभाशाली इतिहासाची जोड लाभली. तंजावर संस्थानाला प्राचीन काळापासून उच्च अभिरुचीचा वारसा लाभला होता. तंजावरच्या मराठय़ांनी पूर्वसुरींपासून चालत आलेल्या या वारशाला मराठी संस्कृती व कलेची जोड दिली.
इ. स. १७९८ मध्ये सरफोजीराजांचे राज्यारोहण झाले. परंतु राज्याची सर्व सूत्रे इंग्रजांकडे होती. सरफोजीराजांची एकूण कारकीर्द ३४ वर्षांची! या राजाने कला, संगीत, नृत्य, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारे, त्यांनीच नावारूपाला आणलेले सरस्वती महाल ग्रंथालय आजही दिमाखात उभे आहे. पर्यटकांचेच नव्हे, तर पौर्वात्य व पाश्चात्य अभ्यासकांचे केंद्र असलेले हे सरस्वती महाल ग्रंथालय व मराठय़ांचा इतिहास सांगणारा बृहदीश्वराच्या मंदिरातील कोरीव लेख हे राजांचे खरेखुरे स्मारक होय.
सरफोजीराजांचा जन्म २४ सप्टेंबर १७७७ रोजी झाला. तंजावरचे राजे तुळजेन्द्रराजे दुसरे यांना अपत्य नसल्याने २३ जानेवारी १७८७ रोजी त्यांनी सरफोजीराजांना दत्तक घेतले. तुळजेन्द्रराजांचे बंधू अमरसिंह यांनी सत्तेच्या राजकारणात सरफोजीराजांना राजगादीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. परंतु डच मिशनरी शॉर्झ यांच्या प्रयत्नांनी त्यांचे चेन्नई येथील मिशनरी शाळेत शिक्षण झाले. तसेच त्यांना संस्कृत व मराठी शिकवण्यासाठी त्या, त्या भाषेच्या पंडितांची नेमणूक करण्यात आली होती. सरफोजीराजांची आई, गुरू शॉर्झ व इंग्रजांच्या मदतीने सरफोजीराजे गादीवर बसले. तथापि राज्याची सर्व व्यवस्था इंग्रजांकडेच होती. राजांची एकंदर कारकीर्द शांततेत गेली. त्यामुळेच त्यांनी आपली कारकीर्द शारदादेवीच्या सेवेत रुजू केली.
उंचपुरे, गोरे, झुबकेदार मिशा असलेल्या सरफोजीराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संपन्न होते. गुरू शॉर्झ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले. सरफोजीराजे ज्ञानी, ज्ञानप्रेमी, उदार, सुसंस्कृत व सर्वगुणसंपन्न होते. विद्याप्रसार, ग्रंथसंग्रह व विद्वानांची संगत यातच त्यांनी आपली सर्व हयात व्यतित केली. चित्रकला, बागकाम, नाणेसंग्रह, ग्रंथसंग्रह, रथांच्या शर्यती, शिकार, बैलांच्या झुंजी या सगळ्याची त्यांना आवड होती. तसेच संगीत, नृत्य, नाटय़ व विज्ञान यात त्यांना विशेष रुची होती. सरफोजीराजे खऱ्या अर्थाने भाषापंडित होते. मातृभाषेव्यतिरिक्त त्यांना संस्कृत, तामिळ, तेलगू, इंग्रजी, जर्मन, इटालियन, फ्रेंच, लॅटिन, अरेबिक इत्यादी भाषाही अवगत होत्या. राजे अतिशय कल्पक बुद्धिमत्तेचे व नावीन्याचे चाहते होते. पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या उदार, व्यासंगी व कलासक्त राजाने विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करून आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा तंजावरच्या इतिहासावर उमटविला. वाङ्मय, नृत्य व संगीत यांची अजोड सेवा राजांनी केली.
तामिळ, मराठी, तेलगु भाषेतून विपुल वाङ्मयीन रचना सरफोजीराजांनी स्वत: केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही करून घेतल्या. गोविंदकवी, विरुपाक्षकवी, गंगाधरकवी, अंबाजी पंडित, अवधूतकवी हे त्यांचे दरबारी होते. सरफोजींच्या आश्रयामुळे व आज्ञेमुळे आपण ग्रंथरचना करू शकलो, अशी कृतज्ञता  गोविंदकवी व विरुपाक्षकवी यांनी आपल्या ग्रंथांतून प्रकट केली आहे. ‘उमा-शंकरसंवाद निरूपण’, ‘श्री हरिलीला निरूपण’ ही आख्यानपर प्रकरणे, स्फुटपदे आणि कितीतरी साहित्य गोविंदकवी यांच्या नावावर पाहावयास मिळते. श्रावणमाहात्म्य, आदिकैलासमाहात्म्य आणि इतर अनेक पौराणिक विषयांवर विरुपाक्षकवीने रचना करून, ‘शरभेंद्रने (सरफोजी) सुरू केलेल्या शाळेत शिकून आपण ही काव्यरचना केली,’ अशी विनम्र कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आढळते.
सरफोजीराजांनी पुराणकथा रचल्या. या रचना पद, श्लोक, ओव्या, आर्या, दिंडी, सवाई, छंद, लावणी, दोहा, गोपीगीत इत्यादी प्रबंधांत केल्या आहेत. या रचना नृत्य, नाटय़ व संगीतमय आहेत. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा मराठय़ांचा इतिहास सांगणारा आशिया खंडातील सर्वात मोठा मराठी भाषेतील कोरीव लेख बृहदीश्वराच्या मंदिरात कोरून मराठय़ांचा इतिहास त्यांनी अजरामर केला. वाङ्मयाबरोबरच नाटय़कलेचीही सेवा सरफोजीराजांनी केली.
‘गंगाविश्वेश्वर परिणय’, ‘मोहिनी-महेश परिणय’, ‘देवेंद्र कोरवन्झी’, ‘सुभद्रा कल्याण’ आदी अनेक नाटके राजांच्या नावावर आहेत. ‘सुभद्रा कल्याण’ हे नाटक ताडपत्रावर तेलगु लिपीत लिहिलेले आहे. ही नाटकं त्याकाळी सादरही केली जात. ती पाहण्यास विद्वान व रसिक येत असत. ही  नाटकं तीन अंकी, चार अंकी वा पाच अंकी आहेत. त्याकाळी नाटय़तंत्रही चांगलेच विकसित झाले होते. या नाटकांतून स्थळ व काळाच्या सूचना दिलेल्या दिसतात. तसेच दोन अंकांतील घटना नाटय़ांतर्गत नाटक दाखवून सादर केलेल्या आहेत. या नाटकांतून नृत्य व गीते आहेतच; परंतु पद्यापेक्षा गद्याचा भाग अधिक असल्याने ही नाटकं वास्तवदर्शी वाटतात. ‘देवेंद्र कोरवन्झी’ हे वैशिष्टय़पूर्ण नाटक जगाचा भूगोल सांगण्यासाठी लिहिले गेले आहे. या नाटकात सूर्यमालेची माहिती, दिवस-रात्र कशी होते, पृथ्वीवरील पाचही खंडांची माहिती, पृथ्वीची गती इत्यादी गोष्टी आहेत. नाटय़ाबरोबरच संगीत व नृत्याची जाणही राजांना उत्तम होती.
सरफोजीराजांचा काळ हा संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्या दरबारात ३६० संगीत-तज्ज्ञ होते. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार  हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. आजही सहा जानेवारीला त्यागराजाच्या स्मरणार्थ तिरुवारुर येथे संगीत मैफल आयोजित केली जाते. त्यांच्या दरबारात पाश्चिमात्य संगीतकारही होते. तंजोर बँडची स्थापना त्यांनी केली. इंग्लिश वाद्यवृंदासाठी हिंदुस्थानी राग व बंदिशी त्यांनी इंग्लिश नोटेशन पद्धतीत बसविली. यावरून त्यांचे कल्पनाचातुर्य दिसते. हेच कल्पनाचातुर्य त्यांच्या नृत्यरचनांमध्येही आढळते. अठरा रचनांचे गुच्छ (निरूपण) करून त्या अठरा रागांमधून एकच कथासूत्र त्यांनी गुंफलेले दिसते.



नृत्य, नाटय़, संगीत यांचा विकास होत असताना शिक्षण व ग्रंथालयांकडेही त्यांनी विशेष लक्ष पुरवले. देशी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा सरफोजीराजांनी सुरू केल्या. तंजावरपासून वीस किलोमीटर अंतरावर मायावरम् येथे त्यांनी इंग्रजी शाळा सुरू केली. ख्रिश्चन शाळांना छत्रम्चाच भाग समजून आर्थिक साहाय्य दिले जात असे. चर्चच्या शेजारी शिक्षकांच्या राहण्याची सोय होती. त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती शिक्षक म्हणून नियुक्त केल्या जात. स्त्री-शिक्षक नेमून मुलींसाठी शाळा सुरू करून त्यांनी समाजक्रांतीच्या दिशेने फार मोठे पाऊल उचलले. भूगोल व इतिहासाच्या पाठय़पुस्तकांचे मराठी व तामिळ भाषेत भाषांतर केले. विज्ञान, वेदशास्त्र, खगोलशास्त्र, संगीत, शिल्पकला अशा विविध विषयांचे अध्यापन त्यांत केले जात असे. लोकांना हसत-खेळत भूगोलाचे ज्ञान देण्यासाठी ‘देवेंद्र कोरवन्झी’ हे वैशिष्टय़पूर्ण नाटकही त्यांनी लिहिल्याचे आधी सांगितलेच आहे.
शिक्षणासाठी ग्रंथालयांची आवश्यकता ओळखून आणि सरफोजीराजांना ग्रंथवाचन आणि ग्रंथसंग्रह यांच्या असलेल्या आवडीतून तंजावरचे प्रसिद्ध ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ आकाराला आले. मराठी मोडीतील असंख्य हस्तलिखितांचा संग्रह, तेलगु, तमिळ, संस्कृत व इंग्रजी भाषेतील ग्रंथ, ताडपत्रांवरचे संग्रह हे या ग्रंथालयाचे खास वैशिष्टय़ आहे. सरफोजीराजांना यात्रेची खूप आवड होती. त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी देताना त्या, त्या ठिकाणच्या विद्याकेंद्रांनाही भेटी देऊन तेथून ग्रंथ खरेदी करून आणले. इतकेच नव्हे तर त्या ग्रंथांचे प्रतलेखन करण्यासाठी त्या, त्या भाषेतील पंडितांची नियुक्ती केली. एकदा तर त्यांनी दूरच्या प्रदेशातून आलेल्या गृहस्थांकडून हस्तलिखिते विकत घेण्यासाठी आवश्यक निधीच्या अभावामुळे आपल्या गळ्यातील रत्नहारच त्याला देऊन ती हस्तलिखिते ताब्यात घेतली. स्वाभाविकपणेच या ग्रंथालयास ‘राजा सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालय’ हे नाव अत्यंत सार्थ ठरले आहे. इतिहास, संगीत, वैद्यकशास्त्र, वाङ्मय अशा विविध विषयांतील संशोधकांसाठी हे ग्रंथालय तीर्थक्षेत्रच आहे. या ग्रंथालयाच्या रूपाने सरफोजीराजांनी मिळवलेले हे अक्षरसाम्राज्य अक्षय टिकणारे आहे.
या आवडींबरोबरच सरफोजीराजांना वैद्यकशास्त्राचीही आवड होती. सरफोजीराजांनी वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी ‘धन्वंतरी महाल’ची स्थापना केली. मानवी रुग्ण व प्राणी या दोहोंच्या औषधोपचाराची सोय व संशोधन या महालात चालत असे. आधुनिक वैद्यकशास्त्र, युनानी, आयुर्वेद या तिन्ही शाखांचे संशोधन येथे होत असे. विविध औषधे व जडीबुटी यांचे उपयोग सांगणारे अठरा खंड सरस्वती महाल ग्रंथालयात उपलब्ध आहेत. रुग्णांवर केलेल्या उपचारांसंबंधीची कागदपत्रे (केस पेपर) या ग्रंथालयात जतन करून ठेवलेली आहेत. धन्वंतरी महालात रुग्णाला सांगितलेल्या उपचारांसंबंधीची एक कविता उपलब्ध आहे. त्या कवितेला ‘शरभेंद्र वैद्य मुरईगल’ असे म्हणतात. यात विविध आजारांवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती आहे.
सरफोजीराजांना नेत्रचिकित्सेत रस होता. ते स्वत: नेत्रचिकित्सा करून डोळ्यांवर शस्त्रक्रिया करीत. राजांनी केलेल्या नेत्रचिकित्सेसंबंधीची कागदपत्रेही उपलब्ध आहेत. त्यात अनेक आकृत्या आहेत. त्यातील काही नोंदी मोडीत, तर काही इंग्रजीत आहेत. राजे स्वत: मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत पारंगत होते. रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी ते आयुर्वेद, युनानी व इंग्रजी औषधांचा उपयोग करीत असत. गर्भवती स्त्री व तिचे आरोग्य, मुलांचे आरोग्य, बालरोग, नेत्ररोग, वातरोग, कावीळ, हगवण, दमा, सर्दीपडसे, अ‍ॅनिमिया, क्षयरोग, कर्करोग, इत्यादी रोगांची माहिती ‘शरभेंद्र वैद्य मुरईगल’ या काव्यग्रंथात आढळते. धन्वंतरी महालात युरोपीय व भारतीय डॉक्टरांची नियुक्ती केली जात असे. नवीन औषधांचा उपयोग करण्यापूर्वी त्या औषधांची चाचणी केली जात असे. औषधे तयार करण्याची पद्धती, त्या औषधांची यादी, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासावर औषधे ‘स्त्रियांचे दोषास्पद’ या हस्तलिखितात आहेत. ‘अस्थिविद्या’ किंवा ‘अस्थिवर्णन’ हा द्वैभाषिक कोश स्वत: सरफोजीराजांच्या हस्ताक्षरात आहे. हा कोश राजांनी स्वत:च्या माहितीसाठी केला असावा. मुख्य नोंद इंग्रजी भाषेत व तिचा अर्थ मोडी लिपीत दिला आहे.
राजांनी पशुवैद्यकाचा अभ्यास करून पशुवैद्यक विभाग धन्वंतरी महालात सुरू केला. सरफोजीराजे अश्वपरीक्षेतही पारंगत होते. कोणता घोडा जय मिळवून देणार व कोणता नाही, घोडय़ाची शुभ व अशुभ चिन्हे, अश्वाची गती, उंची, तसेच अश्वांच्या आयुष्याविषयीचा राजांचा अभ्यास दांडगा होता. यातूनच त्यांच्या ‘गजशास्त्र प्रबंध’, ‘गजशास्त्र सार’ या ग्रंथांची निर्मिती झाली. राजांनी पक्षीजगताचा अभ्यासही केल्याचे आढळते. पक्षीलक्षण व चिकित्सा यांसंबंधीचे ग्रंथ या ग्रंथालयात आहेत. हे सर्व ग्रंथ त्या, त्या विषयातील तज्ज्ञांकडून माहिती घेऊन लिहून घेतले असावेत. या त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याबरोबरच राजे वैयक्तिक आयुष्यात अत्यंत धार्मिक व जनकल्याणकारी होते.
राजे वैयक्तिक आयुष्यात धार्मिक व धर्मसहिष्णु होते. त्यांनी हिंदू धर्माबरोबरच ख्रिश्चन धर्माचाही आदर केला. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक यज्ञयाग केले. काशी, गया, प्रयाग या त्रिस्थळी यात्रा केल्या. तंजावर-रामेश्वरम् मार्गावर तंजावरपासून चौदा मैलांवर मुक्तंबापूर छत्रम् उभारले. या छत्रम्ला लागून शाळा होती. त्यात तमीळ, तेलगु व इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जात असे. या छत्रम्ला जोडून आरोग्यशाळा होती. एखादा यात्रेकरू तेथे वास्तव्याला असताना आजारी पडल्यास त्याला बरे वाटेपर्यंत त्याच्यावर सरकारी औषध-कोठीतून मोफत औषधोपचाराची व्यवस्था होती. यात्रेकरूंपैकी एखादी स्त्री गर्भवती असल्यास तिच्याकडे विशेष लक्ष दिले जात असे. योगायोगाने ती स्त्री तिथेच प्रसूत झाल्यास तिच्याकडे व बाळाकडे तीन महिने लक्ष पुरविले जात असे.
तंजावरातील पाण्याची अडचण लक्षात घेऊन शिवगंगा तलावातून पिण्याचे पाणी जलसूत्राद्वारे घरोघरी पोहोचविले जात असे. स्वच्छतेच्या दृष्टीने भुयारी गटारांची बांधणी केली गेली होती. त्यांच्या कारकीर्दीत अनेक विहिरी व तलाव बांधले गेले. राजे वारंवार राज्यात दौरे करून रयतेची काळजी घेत असत. त्यांनी मनोरला जहाजांसाठी गोदी व बंदर बांधले. तंजावरपासून ५० कि. मी. अंतरावर हवामान खात्याचे केंद्र त्यांनी उभारले; जे व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त होते. याशिवाय त्यांच्या कार्यकाळात नौकानयन ग्रंथालय तसेच नौकानयन भांडार उभारून नौकानयनाचे तंत्र विकसित केले गेले.
तंजावरच्या कर्तृत्वशाली राजपरंपरेतील अत्यंत लोकप्रिय राजे सरफोजी यांनी आपली कारकीर्द शारदेच्या सेवेत तसेच जनकल्याणार्थ व्यतीत केली. ‘पेरियकोविल’ (मोठे देऊळ)च्या प्रांगणातील भिंतीवर मराठी रियासत कोरून त्यांनी दगडांना बोलके केले! राजांच्या या सर्व कर्तृत्वातून कल्पकता व दूरदृष्टी जाणवते. या बहुआयामी नृपतीची कीर्ती हिंदुस्थानपुरतीच सीमित नव्हती, तर ती इंग्लंडमध्येही पोहोचली होती. इंग्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीने सरफोजीराजांची विद्वत्ता व संशोधनवृत्तीचे अवलोकन करून त्यांना आपल्या संस्थेचे सन्मान्य सभासदत्व बहाल केले. राजांचे विचार अतिशय उदार आणि उदात्त होते. त्यांनी अनेक अज्ञानी व धर्मभोळ्या समजुती बाजूस सारून राज्यात अनेक सामाजिक व शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. काळाची पावले ओळखून आधुनिकतेची कास धरली. अशा या द्रष्टय़ा राजाच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण चिरकाल लोकांच्या मनात कायम न राहते तरच नवल.

Tuesday 1 August 2017

क्षेत्रीय पक्ष आणि समज गैरसमज .......



काल महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या नामी पत्रकार असलेल्या एका महाशयांचा ब्लोग वाचत होतो. त्यात एक लेख होता. तमिळनाडूच्या राजकारणातल्या जयललीतांच्या नंतरचे बदल फार सुखावह आहेत असे काहीतरी त्यांना सुचवायचे होते. 


एकूणच काय तर आज तामिळनाडू मध्ये जयललिता नाहीत त्यामुळे त्यांचा पक्ष विभागला गेला आणि त्याचे अस्तित्व ओसरत चाललेय.. तसेच द्रमुक चे मुख्य करुणानिधी यांनी पंच्यान्नव वर्षे पार केल्यामुळे ते म्हातारे होऊन बसलेत आणि पक्षाची सूत्रे स्टालिन ला दिल्यामुळे दुसरा मुलगा दयानिधी मारन वेगळा गट  करून बसलाय.....


.. म्हणूनच आज तामिळनाडू मधील दोन प्रमुख पक्ष ज्यांनी सर्वदूर तिथले राजकारण ६० च्या दशकापासून स्वाहातात ठेवले आणि आपल्या प्रांतीय अस्मितेचे रक्षण केले ते दोन्ही पक्ष  आज विनाहाच्या भयाण सावटाखाली सापडलेले आहेत...

यामुळेच आजवर ५ दशक पासून  कधीही सत्ता न उपभोगलेल्या  कॉंग्रेस आणि देशावर भगवा फादक्व्ण्याच्या संघ भाजप च्या नेत्यांना तामिल्नादूचे राजकारण खुणावू लागलेय ... त्यासाठी भाजपने रजनीकांत या मराठी पण तामिळी जनतेच्या गळ्यातल्या ताईत  असलेल्या अभिनेत्याला साकडे घातलेय.तर  कॉंग्रेस अन्य मार्ग चाचपडून पाहतीय... 



यावर संघ भाजप वाल्या आणि राज्यांच्या बियोंड भारत आहे असे मानणाऱ्या काही पत्रकारांना असे 
वाटते कि आता तामिळनाडू मुख्य किंवा राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याच्या सुवर्ण वाटेवर आगेकूच करणार आहे... 

बस हेच वाक्य मला खटकते.. आजवर खुपदा हिंदी किंवा राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर खूप चर्चांमध्ये ऐकलय कि क्षेत्रीय दलांमुळे राष्ट्रहितास धोका आहेत क्षेत्रीय पक्ष राष्ट्राला म्हणजे केंद्र सरकारला मोठे निर्णय घेऊ देत नाहीत ..वगरे वगरे....  मला या गोष्टींचाच राग येतो.... 



राष्ट्र हे विविध राज्यांपासून बनले आहे..राज्यांचे हित ते राष्ट्राचे हित...एखादा निर्णय जर राज्यांसाठी घातक असेल तर तोः देशासाठी फायद्याचा कसा ठरेल..?? 

नेहमी उदाहरण दिले जाते राजीव गांधी सरकारचे आणि श्रीलंका संबंधाचे....
अर्थात राजीव गांधींनी तामिळी जनमानस समजून घेतले असते त्यांच्यावरचे वर्षानुवर्षाचे अत्याचार समजून घेतले असते तर कदाचित  त्यांचा मृत्यू नसता झाला....

 तमिळ राष्ट्रवाद नावाची संकल्पना आणि त्याला जनतेतून मिळणारे समर्थन या गोष्टी जन्मालाच आल्या नसत्या जर तामिळींच्या हत्या आणि अत्याचार जे श्रीलंकेत आणि तामिळनाडू झाले ते झाले नसते तर... एखाद्या राज्याला असुरक्षित किंवा आपले अस्तित्व कोणी साम्पाव्तेय असे केव्हा वाटते ?? जेव्हा डोळ्यादेखत अत्याहार होतात्तेव्हा यासठी ४०० वर्षापसून तामिळी जनतेच्या मनात ब्रिटीश आणि बहुजन वाद्यांनी भरलेले विष आणि आधीची भटवादी परंपरांची गुलामी याचा अभ्यास करायला हवा... तेव्हाच समजेल...आजही हजारो तामिळी मासेमार पकडून नेतो श्रीलंका पण एवढ्याशा देशाला आपला एवढा मोठा भारत नमवू शकला नाही.. तामिळी जनतेच्या समस्या समजल्या गेल्या नाही म्हणून प्रांतीयता वाढतीय....




शिवाय भाजप न कॉंग्रेस अनेक राज्यात पसरलेले पक्ष आहे ......

म्हणून ते राष्ट्रीय आहेत आणि इतर सर्व पक्ष राष्ट्रीय नाहीत...

 म्हणजे राष्ट्रवादी नाहीत असा अर्थ कोणीच काढू नये.....


..उलट दक्षिण भारतीयांचे अस्तित्व भाषा विकास आदी गोष्टी

 त्यांच्या प्रांतीय अस्मितेवारच्या प्रेमामुळेच टिकून आहे नाहीतर

 महाराष्ट्राचे आणि देशाचे हिंदु राष्ट्र  होण्याआधी  हिंदी राष्ट्र

 होतेय तेही लाखोंच्या झुंडी घुसल्यामुळे.... 





प्रदेहिक पक्षांमुळे कोणतेही ......

नुकसान राष्ट्रीय राजकारणाला नाही हा फक्त बागुलबुवा आहे...


 तामिळी जनता आजवर काय मुख्य प्रवाहात नव्हती ?

आपल्या लोकांख्येच्या ४ टक्के जास्त जीडीपी ते राज्य देशाला सातत्याने देताय... तुमचा राष्ट्रवादी झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेश किती देतो? अथवा आजवर कॉंग्रेस व भाजप ची सत्ता असलेले राज्य किती देतायत?? याचाही अभ्यास असू द्या?? 




मला तर असे वाटते कि क्षत्रिय पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि समर्थपणे चालवून दाखवावे ... आणि नाही असे झाले तरी .. क्षेत्रीय पक्ष संपून जावे हि मानसिकता फार धोकादायक आहे.... आज महारष्ट्रात शिवसेनेचं व मनसेचं सरकार असत तर आपली लोकसंख्या रोजगार आणि कित्येक गोष्टी शाबूत असत्या ..... भाजप हा भैय्या लोकांची हिते आणि मते जपणार पक्ष झालाय .... राष्ट्रवाद हा राज्याच्या अस्मितेपेक्षा काय वेगळा असतो...??



 राज्ये मिळूनच राष्ट्र बनते... कुठलेही राज्य टोकाची भूमिका तेहाच घेते जेव्हा त्याला त्याचे अस्तित्व म्पाव्ण्याची भीती दिसते.... असो.....   


किमान दक्षिण भारतीय लोकांचे आणि भाषांचे अस्तित्व टिकवून ठेवायला मनसे शिवसेना द्रमुक अण्णाद्रमुक सारखे पख असायलाच हवे.....  कॉंग्रेस राहत्रीय पक्ष असूनही सर्वात जास्त राष्ट्रविरोधी काम याच पक्षाने केले.... बिजद सेना यांचे राष्ट्रद्रोही काम काहीही नाही तरीही आम्ही प्रांतीय क्षत्रप बदनाम  आहोत ,,... एकंदरच काय तर ... छोट्या पक्षांचे  अस्तित्व असावे ....