Tuesday 24 October 2017

मध्यम मार्गाचा अभाव ....!...




नमस्कार राजे ...!


दिवाळीच्या या सुट्ट्यांमध्ये जरा चेपुवर चर्चांमध्ये सहभागी झालो.... काही चांगले तर काही वाईट अनुभव...आले...आजवर आयुष्यात जितकेही वेळा वेगेवगळ्या विषयांवर आपल्या आजूबाजूच्या जगताशी बोललो आहे...तीत्क्याही वेळा सदैव एक गोष्ट कायम लक्षात आलीय ती म्हणजे... बुद्धीप्रामाण्याचा अभाव... जे योग्य ते योग्य म्हणावे आणि जे अयोग्य ते अयोग्य मग ते आपल्या जातीच्या, भाषिक समुदायाच्या अथवा धर्माच्या बाजूने असो अथवा विरोधात असो.....
पण व्यर्थ असा सारासार विचार करणारा समाज आजही विकसित झालेला नाही....

मी नेहमीच कुठलीही भूमिका घेतली किंवा कुठल्याही विषयावर बोलायला लागलो किंवा लिहायला लागलो कि वाचकवर्ग नेहमीच.... मी डावा कि उजवा याच दृष्टीकोनाच्या आडून ते ऐकत बघत वाचत आणि ठरवत असतात ..... या देशात ..डावे आणि  उजवे किंवा आपल्या राज्यात पुरोगामी आणि प्रतिगामी असे दोन मतप्रवाह पडलेले आहेत...विविध संघटना आंदोलने या सर्व बाबींनी जनमानसावर एक विलक्षण प्रभाव पाडला गेलाय.... आपली जनता देखील या दोन मतमतांतरात विभागली गेलीय ...प्रत्येक गोष्टीकडे ..एकतर डाव्या नाहीतर उजव्या या दोनपैकी एक च चश्म्यानी पहिले जाते ... या दोन चष्मा शिवायही आणखी मोठे उदात्त खरेखुरे योग्य असे निश्चितच काही असू शकते ना? दृष्टीकोन बदलायला हवा कि नको...? जे जसा ते तसच का आपण स्वीकारत नाही?

उदाहरणार्थ...परवा नानासाहेब पेशव्यांवर चर्चा चालू होती एका समूहावर त्यात काही लोक त्यांच्या समर्थनात बोलत होते तर काही विरोधात ..खूप वेळ हि गंमत मी बघत होतो.. मग मी म्हणालो कि.... महाराष्ट्रात दोन प्रकारच्या विचारप्रणाली आहेत ....एक जी पेशवाई तल्या चुका मान्य करायला तयार नाही आणि दुसरी जी पेशवाईच कर्तुत्व मानायला तयार नाही....

Image result for नानासाहेब पेशवे

एकीकडे लोकांना बालाजी विश्वनाथ ते दुसरा बाजीराव सरसकट सगळे अत्यंत थोर पराक्रमी आणि महान वाटतात तर दुसरीकडे एक असा वर्ग आहे ज्या जिथेतिथे जातीवाद्च दिसतो.. घट कंचुकी चे खेळच सर्वत्र दिसतात आणि तलवारीचा पराक्रम दिसत नाही... कायम रिकामी असलेली तिजोरी दिसत नाही.... पानिपत वरच्या चुका दिसत नाही...आणि उरलेल्यांना नानासाहेबांचे चांगले काम दिसत नाही..


असेच अन्य खूप ठिकाणी होत असते ..... संस्कृत भाषावले आणि अभिजात मराठीवले पण असेच ... दक्षिणेतल्या भाषा या संस्कृतोद्भव नाहीत हे स्पष्ट दिसून येत कितीही खोल गेलात जुळवून जुळवून पहिला तरीही तमिळ मल्याळी कानडी तेलुगु आणि जुन्या कालातल मराठी हे संस्कृतोद्भव नाहीच.....
 पण नाही  हे संस्कृतवाले ऐकतच नाही... म्हणे जगातल्या सर्व भाषा आमच्याच भाषेतून जन्मल्या..... मग बोलून दाखवा तमिळ ,मल्याळी...
मग सांगाव लागत अरे बाबा मी पण संस्कृत्प्रेमीच आहे... उत्तरेतल्या मध्य भारतातल्या युरोप्तल्या भाषा संस्कृतोद्भव आहेत ,शिवाय संस्कृत हि विज्ञान भाषा सुद्धा आहे..ती महानच आहे तिची तुलना अन्य कुठल्याही भाषेशी होऊच शकत नाही... पण आपण संस्कृत प्रेमी म्हणून अन्य लोकांचे  प्रेम नाकारायचे का? खोट बोलायचं का?  ...



आणि हे दिड शाहणे दुसरे मूर्ख लोक.... म्हणतात मराठीवर संस्कृतच आक्रमण झालाय...मराठीला फारसीचा पर्याय द्या उर्दूचा द्या पण संस्कृत नको.....यांना शिवाजी राजांचा राज्यव्यवहार कोश माहितच नसावं परकीय भाषेच्या आक्रमणातून मराठी वाचावी म्हणून तिला संस्कृतमय स्वतः शिव छत्रपतींनी केलय हे या लांड्यांना ठाऊक नसत.....  किंवा यांना आर्य द्रविड आक्रमणाच्या खोटारड्या कथांनी ग्रासलेल असत.... असे दोन्ही विचारक लोकांची भर पडलीय आपल्या समाजात्त म्हणूनच मराठी मागे जातेय....
Image result for SANSKRIT



. पंजाबी भाषा कॅनडा ची राजभाषा झालीय कशामुळे फुकटची लेखणी घासून लिहिणार्यांमुळे कि हॉटेल, मोठमोठे  उद्योग करून स्वत च्या लोकांना तर नोकर्या दिल्याच पण कॅनडा च्या अर्थव्यवस्थेत सुद्धा  मोलाचा वाट आहे त्यांचा ..आणि आपण मुर्खासारख लढतोय...मराठी ला अभिजात द्या म्हणून.... त्या दर्जाचा काय फायदा...
Image result for PUNJABI CANADA OFFICIAL LANGUAGE
आज महाराष्टार्त सर्व शिक्षणाच्या  माध्यमांमध्ये राज्य सरकार राजभाषा मराठीला आणि राज्याच्या इतिहासाला अनिवार्य करू शकते.... तामिळनाडू बंगाल सारख्या खूप राज्यात हे आहेच... कर्नाटकात तर एक अस  वधेयक आणले जातेय कि खाजगी म्हणजे privet क्षेत्रातल्या  सगळ्या  २,३,४ श्रेणीच्या नोकर्या कानडी लिहिता बोलता येणाऱ्या लोकांनाच देण्यात याव्या.... 

Image result for MARATHI

याच राजकीय व्यवस्थे मध्ये आपल्या भाषिक हिताच संवर्धन रक्षण होऊ शकत...त्यासाठी तसे सरकार हवे...आणि आपल्या समाजाला उद्योगात अर्थकारणात पुढे नेणारे काही मातब्बर मंडळी सुद्धा.... आपण भाषणच छान देतो... व्यापारात ढ आहोत....  

एकूणच काय तर मध्यम मार्ग असावा जे योग्य ते मानायला हवे....अयोग्य टाकून द्यावे आणि पुढे जावे.... पण आज समाजात खरे बोलले तरीही तुम्हाला क्षणात बाम्सेफी ब्रिगेडी किंवा सन्घीय सदाशिवपेठी ठरवल्या जाऊ शकते.... कारण लोक डावी आणि उजवी पट्टी चिटकवून बसलेत डोळ्यावर......


असो.....


जय महाराष्ट्र ....!

Sunday 8 October 2017

प्रेम म्हणजे प्रेम असतं..................!!

प्रेम म्हणजे प्रेम असतं ..........!




प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं ....||धृ||

दुधावरच्या सायीसारख मऊ हळुवार असतं,
वेलीवरच्या जाईच सुगंधात ते  अपार असतं ...

लहानश्या छकुली पासून , नऊ वारीतल्या आजीपर्यंत
ते अपरंपार असतं , कारण

प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं

कृष्णाच्या बासरीवर.., आणि
अर्जुनाच्या धनुष्यावर ..
एकच तर नेम असतं....

फुलाच्या राजाच ते रातराणीवर
सेम असतं.... कारण....

प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं.....


चंद्राचं रोहिणीवर ..आणि
कर्णाचं वृषाली वर ते असीम असतं ...

कोरड्या धरतीच 
पहिल्या पावसावर ..आणि
मधुरात्रीत परीनीतेच 
परीनितावर ते कृत्रिम असतं..
.
कारण .... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
         तुमचं आमचं सेम असतं   ...



कामासक्त मदनाच रतीवर...आणि..
यौवनाच ललनाच्या लावण्यावर
ते सकाम असतं .....

मेघनादाला घाबरून 
प्रियकराच्या बाहुपाशात 
प्रेयसीचे शिरणे हेही
प्रेमचं असतं ...



पुरूषाच शौर्यावर 
आणि..स्त्रीच सौन्दर्यावर 

ते कायम  असतंच

कारण ...
प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं ..........


ध्वनीच स्वरांवर ..आणि
गायकीच नृत्यावर ते कायम असतं..

वाऱ्याचं  गंधावर आणि
मुंगीच साखरेवर ते असतच असत ..


ब्रेक अप झाला तर 
रडायचं नसत,
शहाणे होऊन ,
जुळवून घाय्याच असत 

कारण... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
        तुमचं आमचं सेम असतं ............


चाहत्यांचं नटांवर आणि...
नेत्यांचं सत्तेवर .
.ते उगीचच असतं..

भक्ताच देवावर आणि..
मातेचं  लेकरावर
ते निष्काम असतं...

कारण... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
      तुमचं आमचं सेम असतं.........



विवाहेतेनी परत केलं
तर ते क्रीटीसिझम असत..
पण पुरूषाच मात्र
ते सोशलिझम असतं...

कारण... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं,.....


काँग्रेसनी केलं तर ते
सेक्युलरिझम असतं...
पण आम्ही केलं तर
ते कॉम्युनलीझम असतं ...

कारण ... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं....


स्वप्नातल्या परीच ....
स्वप्नाळूवर ते निस्सीम असतं..

जसं लेखकाच ते शब्दांवर असतं
आणि गायकाच स्वरांवर असत..

शेवटी..काय ? प्रेमचं तर असतं ना....





Saturday 7 October 2017

भारतीय मिडिया (प्रसार माध्यमे) कोणाची...???

भारतीय मिडिया (प्रसार माध्यमे) कोणाची...???

 Image result for indian media anti hindu bias

नमस्कार राजे....!


भारतीय राज्यव्यवस्थेत प्रसार माध्यमे म्हणजेच मिडिया यांना फार महत्त्व आहे..... भारतीय व्यवस्था हि चार प्रमुख खांबांवर उभी आहे असे म्हणतात... त्यातील पहिले तीन म्हणजे संसद , न्यायपालिका आणि सेना आणि चौथी म्हणजे मिडिया अर्थात हि सगळी प्रसार माध्यमे .....




अर्थातच प्रसाराच एकच मध्यम नाही ती अनेक आहेत.. आणि हो याशिवाय पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेतच कि....

बघा मिडियाचे पुढील प्रकार ...




१.प्रिंट मिडिया – म्हणजे वर्तमानपत्रे.... मासिक पाक्षिक साप्ताहिके ...शिवाय चालू घडामोडी वर  वेगवेगळ्या लेखकांनी केलेले विश्लेषणपर पुस्तके....
Image result for इंडियन मीडिया
२. इलेक्ट्रोनिक मिडिया- या मध्ये प्रामुख्याने वृत्त वाहिन्या म्हणजेच न्यूज channels येतात..शिवाय काही अन्य मार्ग सुद्धा आहेत....
 Image result for इंडियन मीडिया
३.सोशल मिडिया- हा आजकाल सर्वांनाच माहित असलेला प्रकार आहे... यात मुख्यत्वेकरून फेसबुक ,ट्विटर आणि इतर अप्लीकेश्न्स येतात...
 Image result for social media

याशिवाय सुद्धा आपल्या आजूबाजूची माणसे हे सर्वात प्रभावी प्रसार मध्यम आहेच..... अर्थातच आज जगात काय घडतंय याची सगळी माहिती आपल्याकडे पोचवण्याचे मुख्य मध्यम हि मिडिया झालेली आहे..आणि म्हणूनच का होईना..

आपल्या अभिमातावर या मिडीयाचा फार मोठा आणि भयंकर प्रभाव हा नेहमीच पडत असतो... एखाद्या मुद्द्यावर आपण काय विचार करावा हे आताशा हि मिडिया ठरवू लागलेली आहे... कुठलीही घटना घडली कि तीच भांडवल कस करायचं ? आणि कोणाच्या विरोधात करायचं हे आत्ता हि मिडिया घराणी ठरवू लागली आहेत... शिवाय ह्या भांडवलातून यांची टीआरपी वाढते तो फायदा मिळतो वेगळाच... पण आजकाल मिडिया मधले पत्रकार किंवा न्यूज anchor हे एका प्रकारचे नेतेच झालेले आहेत... या लोकांना फेसबुक ट्विटर यावर फार मोठ्ठी fan following आते... एखादी घटना कशी वळवायची ती कुठवर 
 न्यायची हे सगळं हेच लोक ठरवतात....
Image result for इंडियन मीडिया
 Image result for indian media

उदाहरण....म्हणजे गोधरा चे दंगे.... अयोध्येहून साबरमतीला हिंदू भाविक ट्रेन ने दर्शन घेऊन येत होते.... गोध्रा जवळ २००० मुस्लिमांनी हि गाडी थांबवून बोगी नं.६ व ७ चे दरवाजे बाहेरून बंद केले आणि दोन्ही डब्ब्यांवर रॉकेल ओतून आतमध्ये असलेल्या आबालवृद्धांना अग्निज्वालेच्या हवाली केले गेले... ..यामध्ये ५९ निष्पाप हिंदू मारले गेले ...अगदी कोळसा झाला दोन डब्ब्यांचा..... हि बातमी गुजरातेत वणव्यासारखी पसरली व हजारो हिंदू संघटना आणि लोक बाहेर पडली व मुस्लिमांचा नरसंहार झाला....

 पण तेव्हा सुद्धा देशात भाजप च सरकार होत आणि गुजरातमध्ये सुद्धा म्हणून मिडीयाने ५९ हिंदुंवर झालेली क्रूर क्रिया दाखवलीच नाही उलट त्यांनंतर जे झाला ते एवढ आणि इतक दाखवल गेला कि त्यामुळे नरेंद्र मोदी जे तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते यांना तब्बल १२ वर्ष मिडिया ट्रायल करून बदनाम करण्यात आले...

या दंग्यात एकूण १००० लोक मारले गेले..ज्यात दोन्ही धर्माचे लोक होते ... १९८४ च्या दंग्यात १०००० शीख कॉंग्रेस नि जिवंत जाळले होते आणि एकही काँग्रेसी मारला गेला नव्हता फक्त आणि फक्त शिखांचाच नरसंहार झालेला होता तरीसुद्धा...त्यावेळी आणि आजसुद्धा या दंग्याबाद्द्ल  कोणीही बोलताना दिसत नाही असे का? असा प्रश्न वारंवार मला आणि कित्येक भारतीय माणसांना पडलाच असेल ..याचेच शमन म्हणून हा लेखप्रपंच... 


यासोबतच अश्या कित्येक गोष्टी आहेत.......
अगदी सगळ्याच घटना भारतीय मिडिया आजवर स्व्तःनुसार दाखवत आलेली आहे...क्रिया कधीही दाखवायची नाही पण त्यावरील प्रतिक्रियेला मात्र नेहमीच बदनाम करायचे.. आणि हिंदू किंवा उजवे लोक मरत असतील तर मग यांना पर्वणीच असते खोट्या बातम्या दाखवायची.... हे असे रोज रोज सुरु असते.... या मुळेच अशी शंका वारंवार मनाला येतेच कि ह्या भारतीय मिडीयाचा बोलता बोलवता धनी कोण?



यासाठी काही संशोधन केल्यावर असे  दिसते..कि... १९४७ पासूनच देशातली अधिकृत सरकारी माध्यमे व अधिकतर वर्तमानपत्रे हि कॉंग्रेस सरकारच्या सरळ नियंत्रणाखाली असायची ..आणि कित्येक वर्तमानपत्रे तर सरळ कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मालकीची होती..जसे आपला लोकमत हा दर्डा या कॉन्ग्रेसच्या नेत्याचा पेपर आहे... नेहमी कॉंग्रेसच्या फेवर मधेच बातम्या येत असतात.... याशिवाय ब्रिटीश काळापासून times ऑफ इंडिया यारखे वर्तमानपत्र आणि अशी  कित्येक माध्यमे सरळ इंग्रज सरकार किंवा मग विदेशी उद्योजक अथवा चर्च , मिशनरी यांच्याकडून चालविल्या जात असत.... जे आजही चालू आहेच...
भारतात फक्त इंग्रजांच्या व्यवस्थाच नाही तर वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांचे सुद्धा एक अधिराज्य आहेच...जे देशाच्या सार्वभौमत्वास धोक्याचे ठरत आहे....... देशातील काही वाहिन्या व वर्तमानपत्रांचे मालक यांची यादी देतो...







Let us see the ownership of different media agencies.

NDTV: A very popular TV news media is funded by Gospels of Charity in Spain that supports Communism. Recently it has developed a soft corner towards Pakistan because Pakistan President has allowed only this channel to be aired in Pakistan. Indian CEO Prannoy Roy is co-brother of Prakash Karat, General Secretary of Communist party of India.His wife and Brinda Karat are sisters.

India Today which used to be the only national weekly which supported BJP is now bought by NDTV!! Since then the tone has changed drastically and turned into Hindu bashing. 

CNN-IBN: This is 100 percent funded by Southern Baptist Church with its
branches in all over the world with HQ in US. The Church annually allocates 
$800 million for promotion of its channel. Its Indian head is Rajdeep 
Sardesai and his wife Sagarika Ghosh.

Times group list: Times Of India, Mid-Day, Nav-Bharth Times, Stardust , Femina, Vijaya Times,Vijaya Karnataka, Times now (24- hour news channel) and many more. Times Group is owned by Bennet & Coleman. 'World Christian Council' does 80 percent of the Funding, and an Englishman and an Italian equally share balance 20 percent. The Italian Robertio Mindo is a close relative of Sonia Gandhi.

Star TV: It is run by an Australian, Robert Murdoch, who is supported by St. Peters Pontificial Church Melbourne.

Hindustan Times: Owned by Birla Group, but hands have changed since Shobana Bhartiya took over. Presently it is working in Collaboration with Times Group.

The Hindu: English daily, started over 125 years has been recently taken over by Joshua Society, Berne, Switzerland. N.Ram's wife is a Swiss national. 

Indian Express: Divided into two groups. The Indian Express and new Indian Express (southern edition) .ACTS Christian Ministries have major stake in the Indian Express and latter is still with the Indian counterpart. 

Eeenadu: Still to date controlled by an Indian named Ramoji Rao. Ramoji Rao is connected with film industry and owns a huge studio in Andhra Pradesh. 

Andhra Jyothi: The Muslim party of Hyderabad known as MIM along with a 
Congress Minister has purchased this Telugu daily very recently. 

The Statesman: It is controlled by Communist Party of India. Kairali TV: It 
is controlled by Communist party of India (Marxist)

Mathrubhoomi: Leaders of Muslim League and Communist leaders have major investment.

Asian Age and Deccan Chronicle: Is owned by a Saudi Arabian Company with its chief Editor M.J. Akbar. 

The ownership explains the control of media in India by foreigners. The
result is obvious.  

  I suppose this leaves out Doordarshan and ZEE NEWS and AAJ TAK.  don't they have their own political agenda? Have your own assessment and views.



  यावरून हे स्पष्ट होतेच कि देशावर आजही बाहेरील देशातल्या लोकांचे राज्य आहे.. ज्या देशातली प्रसार माध्यमेच विदेशी पैशा वर चालतात तो देश गुलाम होत जात असतो आणि आज आपला भारत याच मार्गावर आहे.......







मिडिया हि अशी  सत्ता आहे कि जिला कधीही निवडणुका लढाव्या लागत नाही...मीडियाची देशातल्या लोकमनावर शाश्वत सत्ता असते...... 

भारतीय मीडियाची काही लक्षणे :

  
१.   नेहमी प्रतिक्रियेला दोष देणे क्रिया दाखवायचीच नाही...पण हिंदूंनी प्रतिक्रिया दिली कि बोम्बलायचे..


२.   एखाद्या विषयावरील चर्चेत उजव्या  विचाराच्या फक्त एकच माणसाला बोलवायचे पण डावे ४-४ विचारक बोलवायचे ..आणि त्यांना उज्व्यावर प्रश्नांचा भडीमार करू द्यायचा पण बिचार्या उजव्या माणसाला बोलायला वेळही नाही द्यायचा.... आणि शिवाय हे मिडिया अँकर स्वतः डावे म्हणूनच चर्चा चालवत असतात...

३.   निखील वागले उदय निरगुडकर यासारखे तर अगदी प्रसिद्ध आहेत त्यांच्याडाव्या विचारासाठी....

४.   आपल्याला हव्या त्या दिशेनी चर्चा वळवायची व चालवायची... जसे भाऊ कदमचा गणपती ..यात मुद्दा एवढा होता कि भाऊंना काय बसवायचं काय नाही तो त्यांचा अधिकार आहे... आणि त्यांना जाती धर्मातून बाहेर काढू असे म्ह्णनारे चूक आहेत पण आमच्या नम्रता वागळे नी पूर्ण चर्चा प्रबोधनावर नेली म्हणे भाऊंचे प्रबोधन करायला हवे होते..... पण त्यांना धमकी देणार्यांवर काहीही ब्र शब्द हे लोक बोलले नाहीत....  हेच जर एखाद्या मुसलमानाबद्दल  असते तर टाहो फोडला असता यांनी....

Image result for indian media
५.   गायीच्या मांसाला स्वस्त अन्न म्हणून मान्यता देण्याची मागणी करावी...  times ऑफ इंडिया ने तर याकुब मेमनच्या स्मृती  प्रीत्यर्थ संपूर्ण पहिले पान  त्याच्या मुलीचा  कळवळा घेऊनच लिहिले होते ... हि माध्यमे देश तोडायचे काम करत आहेत...


६.   अमेरिका युरोप व चर्च यांना आगळ्या जगावर राज्य करायचे असल्यामुळे विदेशी कंपन्या , वृत्त वाहिन्या ,वर्तमानपत्रे याद्वारे आपले agent आणि विचार दुसर्या देशात पसरवायला हे सगळे होत आहे....


७.   भारताला भाषिक आर्थिक आणि आत्ता तर वैचारिक दृष्टीने सुद्धा कसे गुलाम करायचे ते हे लोक बघत असतात.. गौरी लंकेश ,पानसरे कलबुर्गी.दाभोलकर या सर्व हत्यांना उजव्या देशभक्त लोकांना दोषी ठरवायचे हे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे...


८.   आपण काय विचार करावा ? कोणत्या माणसा बद्दल नेत्या बद्दल पक्षाबद्दल काय ठरवावे हे मिडिया ठरवत असते ... भारतीय जनतेचे डोके mind control करण्याचेच हे एक तंत्र होत आहे....
Image result for indian media

९.   एखादी गोष्ट खोटी असेल तरीही ती वारंवार खरी असल्याचे भासवायचे हे विशेष जमते या लोकांना...


१०.                  मराठी तामिळी कानडी आणि हिंदू या समुदायचे भाषिक धार्मिक अस्तित्व संकटात आहे तरीही आमचे समूह स्वातंत्र्य नाकारायचे.... अश्या वेळी राज ठाकरे, कन्नड जनता ,तामिळी लोक, हिंदुत्ववादी ,मोदिजी भागवतजी यांना बदनाम करायचे आणि मुस्लीम उत्तर भारतीय यांची आपली मते पक्की करून घ्यायची.....


११.                  कॉंग्रेसच्या वोट बँक पोलिटिक्स ने आणि या मिडीयाच्या audience बँक पोलिटिक्स ने देशाचं खूप नुकसान केलाय.....


आणखी खूप काही लिहिता येईल....पण

तूर्त इति शम ,......!