Friday 28 September 2018

Invention Of Reliable source of electricity By Ancient Indian Scientist Agasti Rishi.

Invention Of Reliable source of electricity By Ancient Indian Scientist Agasti Rishi.

 विद्युत उत्पत्तीचा शोध : वैदिक वैज्ञानिक अगस्ती ऋषी

Danielle Cell In ancient Indian Way.


"त्वम् ज्ञानमायो विज्ञानमयोसि" असे एक वाक्य अथर्व शीर्षात आहे. विज्ञान हा शब्द आणि त्याचा सुयोग्य अर्थ  आदिकाळापासून भारतीयांना ज्ञात होता. आपले सर्व ऋषी हे वैज्ञानिक च होते. जुने संस्कृत
ग्रन्थ हे विज्ञाचा खजिनाच आहे।
आज आपण विद्युत उत्पत्तीच्या शोधाबद्दल माहिती घेणार आहोत. हजारो वर्षांपूर्वी एक महान ऋषी होऊन गेले त्यांचे नाव महामुनी अगस्ती. या ऋषींनी आपल्या अपार तपस्येने जे ज्ञान प्राप्त केले ते अगस्ती संहिता या ग्रंथात सामावलेले आहे.
त्यातील काही श्लोकांनुसार विद्युत उत्पत्तीचा शोध हजारो वर्षी आधीचाच आहे हे सिद्ध होते. त्यातील एक श्लोक ज्याचे विवरण आपण पुढे अर्थसहित बघणार आहोत त्यात श्लोकात विद्युत घटबद्दल माहिती दिलेली आहे. हा असा विद्युत घट नागपूर येथील स्वदेशी विज्ञान संस्था या संघटनेच्या माध्यमातून नागपुरातील प्राध्यापक श्री.प्रशांत होले यांनी प्रायोगिक रीतीने सिद्ध करून दाखविला.


                IN OUR GREAT WAY OF LIFE TO WHICH WE CALL HINDU. RUSHIS AND MUNIS ARE ALWAYS WORSHIPPED.  TECHNICALLY RUSHI MINS SCIENTIST. WE HAVE MANY  SUCH ANCIENT RUSHIS AND ONE OF THEM IS “AGASTI RUSHI”. HIS WOK IS GATHERED IN A BOOK NAMED “AGASTI SAMHITA”. FROM THE MEANING OF SOME SHLOKAS OF THE SAMHITA WE PREPARED AN ELECTRIC CELL CALLED AS “VIDYUTGHATAM”.  IT IS NOTHING BUT THE “DANIEL CELL” WHICH IS A RECENT INVENTION WHEN COMPARED TO AGASTI CELL.  THIS SHOWS THAT HOW SCIENTIFIC OUR ANCIENT INDIA WAS!

Introduction & Construction:  THE SHLOK GIVEN BELOW IS FROM AGASTISAMHITA WHICH HAS THE FOLLOWING MEANING.



“Place a cleansed copper plate in the clay pot. Apply layer of copper sulphate on it. Also scatter sawdust on it. Now place mercury dipped zinc plate on it.” we did the same and the cell is constructed as given below.




Description of Experiment: The two wires are connected through it to the voltmeter then we see that the cell exactly gives voltage of 1.01V. Which indicates the electric presence. we use simple clay pot for it and we added all the material as per the shloka.


The shloka further states that :

 “IF such hundred cells are connected then the electric power dissociate water into oxygen and hydrogen. The hydrogen gas when when filled in gas balloons and they are tied to spacecraft the craft goes upwards due to the lightest hydrogen .Also when this power is subjected to the solution of potash and water then gold and silver plating can be done.  ”

This power is called as ‘SHATKUMBHI’ i.e. SHAT-Hundred & KUMBHI-Pots.


Results And Graphs : Graphs indicates that when the experiment is performed with zinc the internal resistance is half of with amalgam. The cell exactly gives 1.01 Volts.

Conclusion : The cell is very effective. We can firmly say that india is the epicenter of science from ancient period or the complete world had made such inventions in recent 200 years which we knew from thousands of years. The shloka also gives very essential info about lightest nature of hydrogen and flying the spacecraft by using hydrogen gas. Also gas balloons were known to us. Its very useful and admirable work of our rushis which the modern world must be aware of.

{John Frederic Daniell

London, England. A great advance in battery technology was the invention of what came to be known as the Daniell cell, which John Frederic Daniell made public in 1836. It was the first reliable source of electric current.}



हेच संशोधन जॉन डॅनियल ने 1836 साली एका सेल चा शोध लावून केले. ज्याला आधुनिक विज्ञान जगतामध्ये प्रसिद्ध अशा डॅनियल सेल च्या नावाने ओळखले जाते.
वरील माहितीववरून हे सिद्ध होतेच कि भारतीयांना विद्युत शक्तीचा शोध फार आधीपासून माहित होता. हा विद्युत घट विद्युत उत्पत्तीचा विश्वसनीय स्रोत आहे.पण विद्युत निर्मिती साठी पाणी जमीन आदी प्रकृतीचे दोहन होते आणि तेही अचक्रीय स्वरूपाने म्हणूनच असे विज्ञान जे अप्राकृतीक आहे ते आपल्या आदी पुरुषांनी नाकारले.

© Sagar Ghorpade


Thursday 20 September 2018

हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा।

हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। 
बरं मग। 
भाग 61



मी: राजे आपणास मनाचा मुजरा। वरून बघताय न ...राजे......? तुमचा महाराष्ट्र ......... तुमची राजधानी ..... आणि....आपल्या महाराष्ट्राची आताची आपली मुंबई ..

जींचा फार अभिमान आहे आपल्याला।

राजे: हं बरं मग


मी: राजे बघा ना आज काय अवस्था झालीय तुमच्या महाराष्ट्राची सर्वत्र हाहाकार आहे। हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत। त्यांना कोणी वालीच उरला नाहीय।

राजे: बरं मग


मी: राजे हेच नाही तर आता हिंदुत्वाचा भगवा फडकवणाऱ्या आपल्या राज्यात भर दिवस शेकडो बलात्कार होतात। जिथे आपण शत्रू च्या पत्नीस देखील आईसाहेब म्हणून साडीचोळी दिली। तिथे असे होतंय राजे।

राजे: बरं मग


मी:राजे तुम्ही बारा बलुतेदारांना एकत्र केलं। भट बामन महार मांग रामोशी तेली तांबोळी कुणबी माली 92 कुळी 96 कुळी। पण राजे आज सगळे तुटले। प्रत्येकाला जात महत्त्वाची झालीय। जातीच्या आधारावर मोर्चे आणि राजकारण होतंय राजे आज। त्यात शेकडो लोकांचे बळी गेलेत राजे। पाण्यासारखा पैसा वाया जातोय। समाजाचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय राजे।


राजे: बरं मग।


मी: राजे एवढंच नाही आपली राजभाषा मराठी ला सुद्धा वाईट दिवस आलेत राजे। परप्रांतीयांमुळे मराठीची पायमल्ली होतेय राजे। आज सत्तेला धोंडा सुद्धा त्यांचाच हस्तक आहे।

राजे:बरं मग


मी: राजे तुमचे किल्ले पडीक अवस्थेत आहेत। रायगडी तर दारू पिण्याचे उद्योग सुद्धा केले काहींनी। त्यांना आम्ही चोपले।

राजे:बरं मग


मी: राजे तुमच्या नावाने मत मागून सत्तेत आलेले लोक तुमचे स्मारक बांधत आहेत अरबी समुद्रात तब्बल 100 कोटी खर्चून। पण तुमच्या रयतेला मात्र अवघ्या 10 हजाराच्या कर्जासाठी आत्महत्या करावी लागतेय।

राजे: बरं मग


मी: राजे नागपुरातल्या शेटजी भटजींनी तुम्हालाही शस्त्र हीन करून देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा विरोध झाला राजे। तुमचे राम कृष्णासारखे बनियाकरण होतंय राजे।

राजे: बरं मग


मी : राजे बारामती तले ख्वाजे स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतायत तुमची जागा घेऊ पाहतायत ते लुटारू। 

राजे: बरं मग


मी:राजे एक घाणेरडी जमात जन्मलीयं मूठभर लोकांची जी तुमच्या जाजवल्य इतिहासाचे मुडदे पाडत आहे। माहिलांबद्दल अश्लील लिहिते आहे। तुम्हाला मुस्लिम आक्रमकांचे समर्थक ठरवते आहे।

राजे : बरं मग।


मी:राजे आज सर्वत्र शोषण आहे। आमचे दुःख दूर करण्यास तुम्ही परत  या राजे। अन्याय दूर करण्यास परत सह्याद्रीच्या कुशीत जन्म घ्या राजे।

राजे: अरे वेड्या सागरा मी काय फक्त एक माणूस आहे का रे? 

मी एक विचार नाहीय का? एक कर्तृत्वाचं आचरण नाहीय का? मी फक्त ओठीच का रे उरलो तुमच्या। आचरणात का नाही? 

मासाहेबांनि आम्हास कृष्ण राम शिकवले। गीता शिकवली त्यातल्या 12 व्या अध्यायात श्लोक आहे ना 

मय्येव मन आध्तस्व मयि बुद्धिम निवेशय।
निवशिष्यसी मयि एव अत ऊर्ध्वम न संशय:।।
याचा अर्थ नीट समजून घेतल्यावरच मी स्वराजाचा संकल्प केला।

शेवटी राम कृष्णा सारखं शिवाजी हे सुद्धा एक क्षत्रतेजाचं आचरण आहे। 

शेवटी शिवाजी काय आहे रे तुमच्यासारखाच एक मुलगा जो ध्यास घेतो स्वराज्य स्थापनेचा। लढतो जनकल्याणासाठी। 

शिवाजी तुमच्यातच असतो रे तुम्ही आपले अंतरंग झाकून ठेवता त्यात बघ बरं जरा डोकावून
तुझ्यात आणि सर्वात आहेच मी । त्या सुप्त क्षत्रतेजास जागव ध्यास धर जनकल्याणाचा।
तुम्हीच शिवाजी व्हा। घडवा सुखी समाज।


शिवाजी तुमच्यातच जन्माला येईल रे। मी तर फक्त प्रेरणा आहे। तुमचं युद्ध शिवाजी होऊन तुम्हासच लढणे आहे।
असो आम्ही निघतो।

मी:🙏😊🤗 राजे परत भेटा कधीतरी असेच।

राजे: जय भवानी।

मी:जय शिवाजी।
.


Tuesday 11 September 2018

दहाची नोट....!



स्थळ : पुणे रेल्वे स्थानक

एव्हाना गाडी यायची वेळ झाली होती. सगळे प्रवासी आपला बोगी नं स्क्रीन वर बघून त्या त्या जागी सामान घेऊन धडपड करत जात होते. रुळाच्या पलीकडे लोखंडाचा लांब पाईप होता ज्यातून रेल्वे गाडीत पाणी भरतात तो पाईप. आणि तिथेच लाल रंगाच्या फाटक्या कपड्यात ती उभी होती . पायात चप्पल सुद्धा नाही . त्या दगड गिट्टी असलेल्या रुळाच्या बाजूच्या जागेवर उभे राहावे लागणे तेही अनवाणी हे तिचे आणि तिच्यासारख्या कित्येकांचे दुर्दैव भारताला मिळालेल्या तथाकथित स्वातंत्र्याच्या 7 दशक पुरती नन्तर सुद्धा. ती चेहऱ्यावर सुरकुत्या असलेली , पंचविशीत असूनही चाळिशीकडे झुकलेली दिसत होती जणू अवेळी पडलेल्या पावसाने आमच्या विदर्भातली पराटी कापूस उद्धवस्त केली तशी. कृश आणि दरिद्री अवस्था.


तेवढ्यात गाडी आली माझा डबा एस 1 होता . 15 वी सीट साईड लोवर म्हणतात ना तीच. मी सामान घेऊन आत गेलो आणि बसलो. खिडकीतून सहज बाहेर पहिले असता ती हो तीच त्या रेल्वे मध्ये पाणी भरायच्या पाईप मधून ओंजळीने पाणी पीत होती. आपली तृष्णा भागवत होती. पण आयुष्यात असलेल्या दुर्दैवाचे काय तिला प्रश्न पडला नसेल काय? उणीव पुरुषत्वाची आणि स्त्रीत्वाचीही त्यात नशिबी आली गरिबी , जागोजागी रेल्वे मध्ये टाळ्या वाजवून पैसे मागण्याची वेळ. तरीही तीच हो ना तीच तो नाही म्हणता येत त्यांना कारण वैज्ञानिक दृष्ट्या ते एक्स झिरो फिमेल्स असतात.


अशीच पाणी पिऊन ती माझ्या डब्ब्यात चढली. आणि टाळ्या वाजवून पैसे मागू लागली. मी गाणी ऐकत बसलेलो, माझ्याकडे आली आणि इशाऱ्यात त्या केविलवाण्या चेहऱ्याने पैसे मागितले. मी क्षणाचाही उशीर न करता पाकिटातून 20 ची नोट काढून देऊन दिली. तिने डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. आणि निघून गेली.


 पण मला काही वेळासाठी विचार देऊन गेली जो भावनिक दृष्टीने जन्मभर मला दुःख पर्वताएवढे याची जाणीव देत राहील. मी आपला तेच अंतकरणातल्या देवाला विचारू लागलो देवा असे का असावे रे या लोकांचे नशीब  त्यांना ना पुरुष म्हणून जन्म दिला तू ना स्त्री म्हणून, तृतीय पंथी किंवा किन्नर अथवा (दुर्दैवाने हा शब्द लिहावा लागतोय) छक्का अशी शेलकी संबोधने कायमचीच त्यांच्या नशिबात. समाज बघून हसतो त्यांना. चीड उडवतो त्यांची. त्यांना कामे देत नाही. त्यांची अशी गत केलीय आपण. सृष्टीच्या सृजनाचे प्रतीक शालूका आणि लिंग यांच्या ने बनलेल्या शिवाच्या पिंडीला मानणारा समाज, अर्धनारीश्वर रुपी आदी पुरुषास भजणारा समाज या मानव रुपी देवाचा इतका तिरस्कार का करतो कोण जाणे?

मी याच विचारात होतो तर कोणीतरी डोळयांसमोर 10 रुपयाची नोट धरली मी आश्चर्याने वर पहिले तर काही निमिषांनी परत आलेली तीच होती . आणि तेही 10 रुपये परत करायला आलेली विशाल हृदयी ती. मी दिलेल्या 20 रुपयातले 10 परत करावे किती हा मर्यादा असलेला स्वभाव. स्वतः जवळ काही नसून असलेले ते आचरणातले समाधान. तो विवेक जो धर्माच्या नावाने दुकाने पक्ष फेसबुक पासून नोकऱ्या सुद्धा चालविणाऱ्या लोकांमध्ये नाहीय. तो तिचे ठायी दरिद्री नारायणी रुपात विलसतो आहे. मी 10 ची नोट परत घ्यायला नाही म्हणालो. पण ती ऐकायला तयार नव्हती. ते दहा रुपये डोक्यावर ठेवून म्हणाली ठेव जपून कामात येईल. मला घ्यावीच लागली नोट परत. नमस्कार करून पाकीटातल्या दत्त गुरूंच्या फोटो च्या कप्प्यात ठेवली ती नोट. कायम जपून ठेवेन ती आता. अतिलोभो न कर्तव्य:। हा मर्यादेचा गुरु मंत्र देऊन गेली ती. आणि मी परत दुःखाच्या डोहात एक डुबकी मारून आलो.

असो ।

Tuesday 4 September 2018

कृष्ण....!

कृष्ण

लहानपणी आपल्यासारखा एक छोटू बाला आपल्याला घरच्या  देव्हाऱ्यात बसलेला दिसतो. टकलू आणि नंगु असतो तो मग त्याला रोज आंघो ळ घालून मस्त अष्टगन्ध लावून छान मऊ कपडे घालून पाळण्यावर बसवताना सगळे आपण मोठे झालो पण तो कृष्ण आजही तितकाच आणि तसाच आहे तेवढाच गोंडस निरागस मोठे डोळे सगळीकडे फिरवून बघणारा सर्वांना आकर्षणारा द्वारकधीश कृष्ण. स्वतःचे नाव सार्थकी लावणारा एकमेव देव म्हणजे कृष्ण लक्ष्मी ची पूजा करा ती सर्वांना प्राप्त होत नाहीं. पण कृष्ण म्हणजे काळा नाही. कर्षती आकर्ष यति स: कृष्ण:. आकर्षणारा तो म्हणजे कृष्ण. तो आकर्षून ठेवतोच .



घरी लोणी काढलं कि पहिला वाट त्याचाच एक बाळ नेहमी सर्व घरात असते ते म्हणजे कान्हा। ज्याला त्याची आई दोऱ्यात बांधून ठेवू शकली नाही. तो कृष्ण ज्याने ब्रह्मांड स्वतःच्या सामर्थ्याने बद्ध केले तो कृष्ण हे लिहितांना माझे मन दास्यत्वात गेलय त्याच्या कारण तो कैवल्य देणारा मुकुंद आहे. पूर्णावतार आहे योगेश्वर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचा देव कुठला असेल तर तो हा प्रेमातून शाश्वत सुख देणारा राधावल्लभ.

सुनीतीचा महामेरू आणि चंचलतेचा कारक. सत्य आणि त्रेता युगातून मृत्यू लोकांस नवे तत्वज्ञान देणारा दार्शनिक. अगाध प्रेम शिकविणारा कायस्थ , भौतिक जगात शांती स्थापविणारा क्षत्रिय आणि अद्वैताचं ज्ञानामृत पाजणारा विप्र, परसावी च्या हातून केळाची साले खाणारा शूद्र आणि चातुर्वर्ण सृजन करणारा चतुर्भुज श्रीहरी. जिथे मन त्याच्या श्वासातल्या बासरी तुन निघणाऱ्या वृंदावनी सारंगाला कायमचे वश होते असा मुरली मनोहर.  सगळे राग त्याचे ख्याल, प्रेमाची गीते, शृंगार म्हणजेच कृष्ण. नीर भरन कैसे जाऊ सखी अब या टिलक कामोद रंगापासून ते बन बन ढुंढन जाऊ या वृंदावनी सारंग पर्यंत प्रत्येक राग त्यालाच वाहिलेला आहे.



धर्मवार कायम तटस्थ असणारा निश्चल आणि धर्मासाठी रणांगण पळून जाणारा रण छोड अन्यांस हसवून मग त्यांचे हसे करणारा हा महायोद्धा. ऐहिक सुख दुःखाच्या वर शाश्वत सुख प्रदान करणारा केशव गलीमल हरण नाम. गोपिकाप्रिय रासरसेश्वर तडत ध्वीती.

बस यापुढे केवळ कृष्ण कृष्ण आणि कृष्णच.

©Sagar Ghorpade