Friday, 15 September 2017

Engineer's Day.....!

*देशोदेशी वेगवेगळ्या दिवशी इंजिनिअर्स डे साजरा केला जातो.*






*भारतात तो १५ सप्टेंबरला साजरा होतो. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा वाढदिवस. त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल आदरांजली म्हणून भारत सरकारने त्यांचा वाढदिवस इंजिनिअर्स डे म्हणून जाहिर केला आहे. १८६१- १९६२ असं ९९ वर्षांचं आयुष्य लाभलेले विश्वेश्वरय्या हे शिक्षणानं सिव्हिल इंजिनिअर होते.*
*त्यांनी त्यांच्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उपयोगाची कामे करण्यासाठी केला.




 नवीन शोधही लावले. एकेकाळी घेतलेल्या सर्व्हेनुसार ते कर्नाटकातले सर्वात जास्त प्रसिद्ध व्यक्ती होते.*
*त्यांच्या कामाचं आणि हुशारीचं महत्व इतकं होतं की ब्रिटिश साम्राज्यालाही त्यांची दखल घ्यावी लागली होती. तर आजच्या या  खास दिवशी पाहूयात ’फादर ऑफ मॉडर्न म्हैसूर- सर विश्वेश्वरय्या’ यांच्या कार्याबद्दल काही माहिती-*

*इंग्रज सरकारकडून ’सर’ हा किताब*
*१५ सप्टेंबर १८६१ला कर्नाटकच्या एका खेड्यात  जन्मलेले एम. विश्वेश्वरय्या १९१२ ते १९१८ या काळत म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. त्यांची हुशारी  आणि समाजोपयोगी कामे पाहून  राजा जॉर्ज (पाचवा) याने त्यांना १९१५ मध्ये  ’सर’ ( Knight Commander)  हा किताब दिला.*

*भारत सरकारकडून भारतरत्न*
*भारत सरकारने सन १९५५मध्ये विश्वेश्वरय्यांचा ’भारतरत्न’ या देशातल्या सर्वोच्च बहुमानाने सत्कार केला.*
*या शिवाय लंडलच्या सिव्हिल इंजिनिअर्स इन्स्टिट्यूटने त्यांना मानद सभासदत्व दिलं होतं. त्यांना भारतातल्या आठ युनिव्हर्सिटीजची मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली होती, तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने विश्वेश्वरय्यांचा फेलोशिप देऊन सत्कार केला होता.*

*आपोआप उघडणारे धरणाचे दरवाजे*
*पाण्याची पातळी वाढल्यावर आपोआप उघडणार्‍या धरणाच्या दरवाज्यांची कल्पना सर विश्वेश्वरय्यांचीच. नुसत्या कागदावर ती कल्पना न मांडता १९०३ साल खडकवासला धरणात असे दरवाजे बांधून त्यांनी ती अंमलात देखील आणली. खडकवासल्यामध्ये ही यंत्रणा व्यवस्थित चालते आहे हे पाहून पुढे ग्वाल्हेरच्या टिग्रा आणि कर्नाटकातल्या कृष्णराजसागर या दोन धरणांमध्येही असे दरवाजे बसवण्यात आले.*

*कृष्णराजसागर धरण*
*म्हैसूरला गेल्यावर वृंदावन गार्डन्सला भेट दिली नाही असं होत नाही.*
*आता त्या गार्डनमधल्या नाचर्‍या कारंज्यांचं कौतुक राहिलं नसलं तरी एकेकाळी ते म्हैसूरचं मोठं आकर्षण होतं. हे गार्डन आहे कृष्णराजसागर धरणाच्या इथेच.*
*सर विश्वेश्वरय्यांनी या धरणाच्या बांधकामाची देखेरेख केली होती. या धरणामुळे त्या काळचं आशिया खंडातलं सर्वात मोठं जलाशय तयार झालं होतं.*
*विशाखापट्टणम बंदर*
*विशाखापट्टणम बंदराची समुद्राच्या पाण्यामुळं झीज होत होती.*
*ते रोखण्याचं श्रेय सर विश्वेश्वरय्यांना जातं. इतकंच नाही, तर हैद्राबादची पूर संरक्षण यंत्रणेची संकल्पना त्यांचीच होती.*

*फादर ऑफ मॉडर्न म्हैसूर*
*इंग्रज सरकारच्या काळात कर्नाटक राज्य हे म्हैसूर स्टेट होतं. तेव्हाच्या सरकारच्या साहाय्यानं सर विश्वेश्वरय्यांनी म्हैसूरमध्ये बर्‍याचशा फॅक्टरीज आणि  शाळा-कॉलेजेस चालू केल्या. म्हैसूर सोप, पॅरासिटॉएड लॅब, भद्रावतीमधली म्हैसूर आयर्न ऍंड स्टील वर्क्स, श्री जयचामाराजेंद्र पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट, बेंगलोर शेतकी विद्यापीठ,बेंगलोरमधलं  युनिव्हर्सिटी विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही त्यातली काही उदाहरणं. स्टेट बँक ऑफ म्हैसूर चालू करण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. या सर्व कार्यामुळं त्यांना मॉडर्न म्हैसूरचा पिता मानण्यात येतं*
*त्यांचं  वेळेचं मॅनेजमेंट आणि कामाबद्दलची तळमळ खरोखरीच अतुलनीय आहे. *

No comments:

Post a Comment