Thursday, 22 December 2016

मनस्य उन्मेष:......!

राजे साष्टांग दंडवत प्रणाम ........!


 


 वरून बघताय न .........? तुमचा महाराष्ट्र ......... तुमची राजधानी ..... आणि....आपल्या महाराष्ट्राची आताची आपली मुंबई ....... जिचा अभिमान आहे आपल्याला.........  नाही कोणाच्या बापाची मुंबई आमच्या साहेबाची.....  ते साहेबसुद्धा गेले....... तुमच्याकडे.....



 ....... राजे.....चला आज तुम्हाला माझ्या चष्म्यातून आजचा महाराष्ट्र दाखवतो..... कोणता वालीच उरला नाही..... आता म्हणून तर ......  बारामतीचे लांडे ...फोफावलेत..... त्यांना वाटत आता तेच ज्येष्ठ आहेत ..म्हणून त्यांचीच चालणार....... 



राजे ..आज २१ डिसेम्बर वर्षातला सर्वांत छोटा दिवस....... आजच वाचल कि आपल्या छत्रपतींच्या अरबी समुद्रातल्या स्मारकासाठी ..... जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे २४ तारखेला ........


 आणि तेही कोणाच्या तर ........  भारत्जेत्त्या नरेंद्र मोदींच्या हस्ते ............! छत्रपतींच्या नावाने आशीर्वाद मागायचा........ आणि बनियागिरी करायची..खोटं  बोलायचं....... असे कित्येक उद्योग करूनही न  थकणारे ......... व्यापरी मानसिकतेचे लोक....... 




 बारामतीमध्ये येऊन काही बिन्पेन्द्याच्या लोट्यांना भ्रष्ट वादी म्हणायचे ...... 

मग नंतर त्यांच्याशीच संधी साधून युती आघाडी तोडायची......

 आणि त्यांच्याच भरोश्यावर मुख्यमंत्री व्हायचे....... 




 असे लुटारू लोक तुमचे भव्य दिव्य स्मारक बांधताहेत राजे......! बाळासाहेब  सांगतच असतील हे सर्व तुम्हाला ...... पण मलाही आज बोलायची इच्छा झाली तुमच्याशी..... 


शेवटी... शिवाजी काही एक व्यक्तित्व नाही इतिहासातल.......... !

शिवाजी तर श्वास आहे आमचा ...!

विश्वास आहे आमचा,,,,..... !


आमच्या हृदयातील प्रत्येक स्पंदन आहे शिवाजी..........


.शिवाजी ....खुदा का भेजा हुआं ....वो...... फरिश्ता.....है....... जिसने...... हमारी रूह को, हमारी   आत्मा को ...छुआ  है...... 

रीयाया कि भलाई कि सोच है शिवाजी...... !


राजे ...... आज सर्व वृत्तपत्रांमध्ये ..... मोठ्ठा समुद्र आणि त्यातले तुमचे स्मारक असलेल्या जाहिराती आल्या..... 


“आभाळागत माया तुमची आम्हावरी राहू दे “........ असे बिरुदहि चिकटवले .... होते तिथे.....   !


किती शिताफीने तुम्हालासुद्धा रामासारखे ..देवत्व बहाल केले.......



 ...शेटजी भटजी मानसिकतेच्या प्रभावातल्या 

समाजाने.......... भटजी व गांधीसारख्या शेटजींनी मिळून रामाचे पार 

बनियाकरण करून टाकलेच आहे आधी...... !


आता तुमच्यावरही तेच प्रयोग करत आहेत हे लोक...... राजे.......! पण काळजी नसावी महाराज .......

.बाळासाहेबांनी ..... पेरून ....जेजुरीच्या भंडार्या सारखं उधळून .. उरवलेल ... क्षात्रतेज आहे आमच्यात ...ठाकरी बाणा सुद्धा आहे....  

म्हणूनच तर शिवाजी एक विचार आणि व्यवस्था म्हणून कुठेतरी

 आमुच्या डोक्यात अद्यापहि उरलाय....  


..................... ज्यांनी कधीही शिव जयंती साजरी केली नाही......

 राजे ..ते तुमचा फक्त निवडणूक जिंकण्यासाठी तुमचा आशीर्वाद मागतात आणि 

लांड्यांची साथ घेऊन महाराष्ट्र मुघलांच्या दिल्ली सुलतानाच्या चरणी अर्पण करू बघतात............... !


.......
 राजे तुम्ही फक्त ओठीच का उरलाय..... हाच प्रश्न पडतो मला नेहमी..... काय होईल आता ...लोक येतील तुमचे स्मारक होईल......पण....... ती निर्भया...... ती अरुणा शानबाग ....... ती  सावित्री....... आणि अशा हजारो लाखो स्त्रिया....आजही..... भोगतायत भोग त्यांच्या .....वर  होणार्या अमानुष छळाचे....... 


अंजना ओम कश्यप जी पुछोना कैसे मैने रात गुजारी?........ 

कैसे ४२  साल गुजारे उस अरुणा ने.... 

हर आधे घंटे
 मी...एक बलात्कार से एक हत्या और आत्महत्या से किसान और महिलाये गुजरती है.............. 

पुछोना कैसे...? 


तुम्ही तरी विचारा स्वतःला ...आणि आपल्या आतल्या मेलेल्या शिवाजी नावाच्या खर्या मर्दानगी ला... 

आमचे शेतकरी......रोज मरतायत...... 

उभा जगाचा पोशिंदा मरतोय आणि हा साखरेचा धोंडा मात्र तोंडाचा कर्करोग होऊनही वाचलंय .... का? 

कोणास ठाऊक...रोजच दीड लाखाचं  इंजेक्शन लागतय म्हणे ... बापरे दीड लाख आणि आमचे शेतकरी १० हजारासाठी मरतायत .......



    तुम्ही जोशी देशपांडेंना सत्ता देणार का....? शेट्टी हे आडनाव शेतकऱ्यांमध्ये ऐकल नाही मी कधी ?

 अशी भर सभेत जात काढणारी माजलेली धोंड स्वतःस जाणता राजां ....हे बिरूद शेखीने मिरवतायत  राजे.........!


जनतेच एकही दुख जाणूनही न जाणणारे  लोक तुमची उपाधी लावतायत..... !

कोणीतरी राज नावचा सरदार म्हणाला कि तुम्ही स्थापत्यविशारद होतात......!

 ...तुमच किल्ल्यांवरच प्रेम ..तुमची स्वतःची  दुर्ग संपदा जपायला हवी...तर त्या सच्च्या मर्दाचा विरोध...होतोय आजकाल... !


राजे रायगडावर दोन पर्यटकांनी दारू प्यायचे उद्योग केले... यांना बुडावर चांगलेच फटके पडले राजे........... सरकारने नाही तर खर्या मावळ्यांच्या सरकारने बडवले त्यांना राजे... 

राजे.. आजही तुम्ही आहात आमच्यात .......

शेवटी काय तर शिवाजीराजे घोषणेतच उरले  आमच्या राजकारण्यांच्या ..... 

शिवाजी एव्हाना ....मत मागण्यासाठीचा एक आयकॉनच झालाय......!

 ..... पण शिवाजी हे एक व्यवस्था तंत्र आहे....

शिवाजी इज अ governing model ............  .....


  ....
 न्याय व्यवस्थेपासून तर अर्थव्यवस्थे पर्यंतचे..... राजे..... तुम्हाला आजचा महारष्ट्र दाखवलाय मी... 

तुमचे खरे मावळे असेच नेहमी तुम्हाला एक विचार म्हणून आपल्यात जिवंत ठेवतील...आंणी  वेळ मिळालीच .........

आई भवानीने दिलीच तलवार तर अन्याyacha पुरता नाश करायलाही आम्ही मागेपुढे बघणार नाही.......... एवढे आश्वासन......    



हे मनातले पारिजात तूर्तास पूर्ण....उन्मेष   

No comments:

Post a Comment