शुक रंभा संवाद..
शुक..
शुक मुनी म्हणजे वैराग्य..ईश्वर भक्ति..
तर रंभा म्हणजे कामदेवता..सौंदर्य देवता..श्रृंगार व प्रणयाची देवता..
या दोघांचे वाद संवाद वाचण्या जोगे आहेत
..
सुरवातिलाच रंभा आरंभ करते...
रम्भा :
मार्गे मार्गे नूतनं चूतखण्डं खण्डे खण्डे कोकिलानां विराब: ।
रावे रावे मानिनीमानभड्गॊ भड्गे भड्गे मन्मथ: पञ्चबाण:
मार्गा-मार्गा वर नवीन आंब्याची झाडे शोभून दिसत आहेत. प्रत्येक झाडावर कोकिळा सुमधुर कूजन करित आहेत.
हे कूजन ऎकून मानी स्त्रियांचे गर्वहरण होत आहे आणि गर्व नष्ट होताच पाच बाणांना धारण करणारा कामदेव मनाला बेचैन करित आहे..
तर त्याला शुकमुनी उत्तर देतात..
.
मार्गे मार्गे जायते साधुसड्ग सड्गे सड्गे श्रूयते कृष्णकीर्ति: ।
कीर्तो कीर्तो नस् तदाकारवृत्ति: वृत्तो वृत्तो सच्चिदानंदभास:
हे रंभा, मार्गा-मार्गा वर मला साधुंचा सहवास लाभत आहे. प्रत्येक सहवासात भगवान कृष्णाचे गुणगान ऎकावयास मिळत आहे.
ते ऎकत असताना आमची चित्तवृत्ति भगवंतात लीन होत आहे आणि ह्या ध्यानात सच्चिदानंदाचा सहवास लाभत आहे.
जिवनाची इति कर्तव्यता सांगताना रंभा वदते..व वाद रंगत जातो..
रम्भा :
पीनस्तनी चन्दनचर्चिताड्गी विलोलनेत्री तरूणी सुशीला ।
नालिड्गिता प्रेमभरेण येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्
भरदार स्तन असलेल्या, शरीरावर चंदनाचा लेप असलेल्या, चंचल नेत्र असलेल्या अशा सुंदर स्त्रिला ज्याने प्रेमयुक्त अलिंगन दिले नाही त्याचे जीवन व्यर्थ गेले
तर शुक मुनी उत्तर देतात..
अचिन्त्यरूपो भगवान्निरञजनो विश्वम्भरो ज्ञानमयश्चिदात्मा ।
विशोतिधो येन हदि क्षणं नो वृथा गतस्य नरस्य जीवितम्
ज्याच्या रूपाचे चिंतन होऊ शकत नाही, जो निरंजन, विश्वाचे रक्षण करणारा आहे; अशा ज्ञानाने परिपूर्ण चित्स्वरूप परब्रम्हाचे ज्याने हदयापासून स्मरण केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले
पुढे..रंभा म्हणते..
ताम्बूलरागैः कुसुमप्रकर्षै सुगन्धितैलेन च वासितायाः ।
न मर्दितो येन कुचौ निशायां वृथा गतस्य नरस्य जीवितम्
सुगंधित पान, उत्तम फूल, सुगंधित तेल आणि अन्य पदार्थांनी सुवासित शरीर असलेल्या कामिनीच्या स्तनाचे ज्याने रात्री मर्दन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले.
मुनी त्यावर म्हणतात
ब्रम्हादिदेवोऽखिलविश्वदेवो मोक्षप्रदोऽतीतिगुणःप्रशान्तः ।
धृतो न योगे न हदि स्वकीये वृथा गतस्य नरस्य जीवितम्
ब्रह्म इत्यादिंचा देखील देव, संपूर्ण जगाचा स्वामी, मोक्ष देणार्या, निर्गुण, अत्यंत शांत भगवंताचे ज्याने योगाद्वारे ध्यान केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले.
व वाद रंगत जातो..व शेवटी..
सुगन्धैः सुपुष्पैः सुशय्या सुकान्ता वसन्तो क्रतु: पूर्णिमा पूर्णचन्द्रः ।
यदा नास्तिपुस्त्वं नरस्य प्रभूतं ततः किं ततः किं ततः किं ततः किं
सुंदर सुगन्धित पुष्पांनी सुशोभित शय्या असेल, मनोनुकूल स्त्री असेल, वसंत ऋतु असेल, पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे असेल परंतु ज्या पुरुषामध्ये परिपूर्ण पौरुष नाही त्याच्या जीवनाचा त्रिवार धिक्कार असो.
शुक :
सुरूपं शरीरं नवीनं कलत्रं धनं मेरूतुल्यं वचश्र्चारू चित्रम् ।
हरेरंडिघ्रयुग्मे मनश्र्चेदलग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं
सुंदर शरिरसंपदा, सुंदर भार्या, मेरु पर्वताएवढे धन, मनाला भुरळ घालणारी मधुर वाणी असेल पण जर भगवान शंकराच्या चरणी मन एकाग्र होत नसेल त्या जीवाचा त्रिवार धिक्कार असो.
असे हे वाद संवाद आहेत...
सनातन धर्मात काम व मोक्ष दोन्हीत हि महत्त्व आहे..
विरक्ति मधे रस असण्या र्यांनी हे संवाद जरुर वाचावेत
No comments:
Post a Comment