Friday, 30 December 2016

एकतीस डिसेंबर ..

बरे नसल्यामुळे गेल्या आठ्वड्यात  tv पाहणे सोडले होते. म्हणून खूप काही मिस झाले .पण वर्तमान पत्र वाचत होतो म्हणून काही माहिती मिळत होती चालू घडामोडींची .......  आता ३१ डिसेंबर म्हणजे न्यू इयर ..चे सेलिब्रेशन जवळ येतय ..मग tv आणि whatsapp वर विविध पोस्ट्स फिरतच असतात...... त्यात काही डाव्या तर उजव्या .....

  एक कॉमन विचार मांडला जातो तो म्हणजे थर्टी फर्स्ट साजरा करावा कि नको...... तसं  पाहिलं तर हा वादः विषयच नाहीय.. ज्याला जे वाटत ते त्यांनी कराव ..... पण या व्यक्ती स्वातंत्र्याच्या  नावावर टिश्यू पेपर वापरणाऱ्या भरलेल्या इंग्रजांची गुलामी मात्र करू नये.... आणि आपल्या देशातल्या निम्म्या लोकांची या ब्रिटानिया मानसिकतेची बळी कॉंग्रेस नि आधीच दिलेली आहे.

इथे नागपुरात गेल्या महिनाभरापासून एवढी प्रचंड थंडी आहे.कि दिवसासुद्धा पलंग सोडवा वाटत नाही आणि हे रात्रीचे उद्योग...... न प्रकृतीमध्ये काही बदल होत न वातावरणात आणि नोकर्या शिक्षण यातसुद्धा काहीच बदल होत नाही....तरी याचं नवीन वर्ष मात्र सुरूच असते... काय कथा आहे म्हणे या ब्रिटानिया नववर्षाची .... प्रभू यशुच्या जन्माच्या पाच सहा दिवसांनी नवे वर्ष साजरे करायचे...... आपल्याकडे पाचवी पूजतात ..तसे आता हे इंग्रजी नवे वर्ष आपल्याच पाचवीला पूजले आहे असे वाटते.....

जसे काही या २०१६ वर्षांआधी जग आणि समाज नव्हताच......  बुद्धाचा जन्म तर २५५६ वर्षांपूर्वी झाला पण त्यांच्या नावाने नाही होत एकही कालगणना ....
बरोबर आहे न राव आता बुद्धाच्या नावाने हिंदूंना आणि ब्राह्मणांना शिव्या दिल्या जातात तेवढेच बुद्ध उरले आता.... नवी कालगणना आणि नवे बुद्ध वर्ष अश्या नव्या व्यवस्था जन्माला घालण्यासाठी अक्कल लागते आणि  काहींनी टी अक्कलच हिंदू द्वेषात खर्चीली आहे मग कसे होणार स्वतःचे खरे स्वतंत्र तयार.. असो..




काही पुरोगाम्म्यांना खालील प्रश्न विचारायचे आहेत ...त्यांचे उत्तर द्या...




   इंग्रजी नवीन वर्षाच्या निमिताने हिंदू सणाच्या नावाने बारमाही बोंब मारणाऱ्या हिंदुस्थानातील तथाकथित ढोंगी पुरोगाम्यांना काही प्रश्न..........


१] ३१ DEC ला लाखो जनावरांची कत्तल होते तेव्हा बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

२] लाखो लिटर दारू ( बेकायदेशीर ) पिवून बेवडे रस्त्यावर पडलेले असतात तेव्हा बिनडोक ढोंगी पुरोगामी कोणते प्रबोधन करतात का हेच बिनडोक ढोंगी पुरोगामी पिवून टाईट असतात व गटारीची सोबत करत असतात का ?


३] मोठ्या हॉटेल मध्ये हजारो किलो अन्नाची नासाडी होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

४] मोठ मोठ्या हॉटेल मधून डॉल्बी (DJ) लावून प्रचंड ध्वनी प्रदुर्षण होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

५] ख्रिस्ती सणाच्या नावाखाली लाखो लिटर पाणी वाया जाते त्यावेळी हे बिनडोक पुरोगामी गप्प का ?

६] जनावरांची प्रचंड कत्तल केल्यानंतर उपयोगात न येणाऱ्या मांसाची विल्हेवाट गटर, तलाव, नदी मध्ये केली जाते किवा उघड्यावरच फेकले जाते ह्याने प्रचंड प्रदूषण होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

७] सरकारी खर्चाने ह्या उच्चभ्रू लोकांना संरक्षण दिले जाते (पुण्या मुंबई सारख्या टिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून ) त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?

८] इतर वेळी रात्री १० वाजले तरी हिंदूंचे सात्विक कार्यक्रम बंद पडायला पोलीस यंत्रणा लगेच सज्ज असते पण ३१ DEC ला रात्रभर अनैतिक कृत्य करायला सरकारच परवानगी देतंय हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का?
९] दुर्ग गड संवर्धन ह्या विषयाकडे दुर्लक्ष करून बेवड्याना गडावर दारू पिण्याकरिता जाण्यासाटी रोखण्याचे काम मावळ्यांनी करायचे मग हे बिनडोक पुरोगामी गप्प का ?


१०] ३१ DEC ला बऱ्याच टिकाणी चुकीच्या पाश्च्यात संस्कृतीमुळे बलात्कार ,विनयभंग, छेदचाड सारखे प्रसंग घडतात प्रसंगी खून, मारामाऱ्या ही होतात हे बिनडोक पुरोगामी गप्प का? सोयीस्कररीत्या अश्या घटनेकडे कानाडोळा करणारे हे नालायक ढोंगी पुरोगामी काय कामाचे ......


११] आतिषबाजीच्या नावाखाली प्रचंड हवेचे प्रदूषण होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?



१२] हजारो पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर असतात त्यावेळी ह्या पोलीस बांधवांचे मानसिक आरोग्य धोक्यात येवून मानवी अधिकाराच्या हक्काचे अवमूल्यन होते त्यावेळी हे बिनडोक ढोंगी पुरोगामी गप्प का ?


१३] कुटल्या ढोंगी पुरोगाम्याने आज पर्यंत दुर्ग संपत्तीचे म्हणजे गडांचे तिथे अपप्रकार घडू नये म्हणून प्रयत्न केले आहेत काय ? कसे करणार ह्यांना हिंदुत्ववाद्यांविरुध बोंब मारण्याशिवाय दुसरे काम नाही !


१४] ढोंगी पुरोगाम्यानो ह्या विरुद्ध आवाज काढा नाहीतर तुमचे ढोंगीपणा म्हणजे तुम्ही औरंग्या आफ्झ्ल्याचीच औलाद आहात हेच सिद्ध होईल !...........


अश्या बऱ्याच गोष्टी ह्या ३१ DEC च्या निमिताने घडत असतात त्याविषयी कोणी बोलत नाहीत ... आपण १ जानेवारीला शुभेच्या नाही दिल्या, दारू नाही पिली तर आपला बाप काय स्वर्गात जाणारच नाही अशी धारणा केलेल्या हलकट पुरोगामी, उच्चभ्रू, अति आधुनिक ( म्हणजे माणसात नसलेल्या ) लोकांचा हा नालायाकापणा आहे... नाहीतर वर्षभर काहीना काही निमित्य काढून दारू पार्टी झोडत असता तेव्हा जरा गांभीर्याने विचार करा .......






उत्तरार्धात एवढेच सांगीन माझ्या वाचकांनो दृष्टी सगळीकडे असू द्या ...प्रत्येक गोष्टीला व्यापकतेच्या चष्म्याने बघा.....

भारत हा उत्सवप्रिय देश आहे कितीही भिकारी असलो आपण तरीही उत्सवांचा उरक काही संपल्या संपत नाही आपल्या रक्तातून..कित्येक लोक या उत्सवप्रिय भारतीयातेतून अगदी छानपणे उत्सव साजरे करत असतात.....
 खूप ठिकाणी सगळे नातेवाईक जमतात आणि रात्रभर छान गप्पा होतात सग्ल्यांच्या हातचे  जेवण मिळते .......

 आत्याच्या हातची पनीरची डिश तर मामीच्या हातची मस्त मसालेदार गरम गरम बासुंदी मिळते.......

 मामाने मध्ये मध्ये घुसून पळी फिरवलेला काजू गाजर वाटणे आणि केसर  टाकलेला नवरत्न पुलाव सुद्धा मिळतो कुठेकुठे......

 तर कोणाला चुलीवरच्या स्वयंपाकाची मेजवानी असते अंगणात किंवा गच्चीवर चूल पेटवून साधेसे एक दोन पदार्थ खाण्यातही मजाच असते न ... ....

मला आठवत काही वर्षांपूवी आम्ही मामाकडे ३१ डिसेंबर ला पिठलं भाताचा बेत केला होता घरच्या बायकांना हे करायला फारसा त्रासही झाला नाही कारण सोपेच काम असते.........
 ...गरम गरम पिठलं भात आणि त्यावर तळलेली दह्याची मिरची याची मेजवानी ह्या थंडीत काही खासच असते राव... नंतर सगळे मूलं  मिळून नाच मारामार्या मस्ती पत्ते अश्या खूप गोष्टी..घडल्या होत्या....

असा उत्सव कोणी करत असेल माझ्याकडून शुभेच्छा..........!
ह्यात एक दिवस निमित्त करून कुटुंब एकत्र येत असत ...जवळीक वाढते ... कुटुंबाचे महत्त्व कळते ..शेवटी हिंदुस्तान आणि भारतीय समाज २००० वर्षे टिकला त्याच एकच कारण आहे ते म्हणजे कुटुंबव्यवस्था.............

 ती  टिकावी म्हणून या ब्रिटानिया सणांचे उत्सवाने भारतीयकरण करा ..आज विदेशी गोष्टींना सकारात्मक करण्याखेरीज काही उपाय नाहीय आपल्याकडे...सरळ विरोध करून काहीच पदरी पडणार नाही ..कारण आता युद्ध इंग्रजांशी लढतोय आपण...आता शिवाजी राजांची बुद्धिमत्ता यावर भर द्यावा लागेल... इति शम .....





No comments:

Post a Comment