Thursday, 20 September 2018

हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा।

हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। 
बरं मग। 
भाग 61



मी: राजे आपणास मनाचा मुजरा। वरून बघताय न ...राजे......? तुमचा महाराष्ट्र ......... तुमची राजधानी ..... आणि....आपल्या महाराष्ट्राची आताची आपली मुंबई ..

जींचा फार अभिमान आहे आपल्याला।

राजे: हं बरं मग


मी: राजे बघा ना आज काय अवस्था झालीय तुमच्या महाराष्ट्राची सर्वत्र हाहाकार आहे। हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत। त्यांना कोणी वालीच उरला नाहीय।

राजे: बरं मग


मी: राजे हेच नाही तर आता हिंदुत्वाचा भगवा फडकवणाऱ्या आपल्या राज्यात भर दिवस शेकडो बलात्कार होतात। जिथे आपण शत्रू च्या पत्नीस देखील आईसाहेब म्हणून साडीचोळी दिली। तिथे असे होतंय राजे।

राजे: बरं मग


मी:राजे तुम्ही बारा बलुतेदारांना एकत्र केलं। भट बामन महार मांग रामोशी तेली तांबोळी कुणबी माली 92 कुळी 96 कुळी। पण राजे आज सगळे तुटले। प्रत्येकाला जात महत्त्वाची झालीय। जातीच्या आधारावर मोर्चे आणि राजकारण होतंय राजे आज। त्यात शेकडो लोकांचे बळी गेलेत राजे। पाण्यासारखा पैसा वाया जातोय। समाजाचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय राजे।


राजे: बरं मग।


मी: राजे एवढंच नाही आपली राजभाषा मराठी ला सुद्धा वाईट दिवस आलेत राजे। परप्रांतीयांमुळे मराठीची पायमल्ली होतेय राजे। आज सत्तेला धोंडा सुद्धा त्यांचाच हस्तक आहे।

राजे:बरं मग


मी: राजे तुमचे किल्ले पडीक अवस्थेत आहेत। रायगडी तर दारू पिण्याचे उद्योग सुद्धा केले काहींनी। त्यांना आम्ही चोपले।

राजे:बरं मग


मी: राजे तुमच्या नावाने मत मागून सत्तेत आलेले लोक तुमचे स्मारक बांधत आहेत अरबी समुद्रात तब्बल 100 कोटी खर्चून। पण तुमच्या रयतेला मात्र अवघ्या 10 हजाराच्या कर्जासाठी आत्महत्या करावी लागतेय।

राजे: बरं मग


मी: राजे नागपुरातल्या शेटजी भटजींनी तुम्हालाही शस्त्र हीन करून देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा विरोध झाला राजे। तुमचे राम कृष्णासारखे बनियाकरण होतंय राजे।

राजे: बरं मग


मी : राजे बारामती तले ख्वाजे स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतायत तुमची जागा घेऊ पाहतायत ते लुटारू। 

राजे: बरं मग


मी:राजे एक घाणेरडी जमात जन्मलीयं मूठभर लोकांची जी तुमच्या जाजवल्य इतिहासाचे मुडदे पाडत आहे। माहिलांबद्दल अश्लील लिहिते आहे। तुम्हाला मुस्लिम आक्रमकांचे समर्थक ठरवते आहे।

राजे : बरं मग।


मी:राजे आज सर्वत्र शोषण आहे। आमचे दुःख दूर करण्यास तुम्ही परत  या राजे। अन्याय दूर करण्यास परत सह्याद्रीच्या कुशीत जन्म घ्या राजे।

राजे: अरे वेड्या सागरा मी काय फक्त एक माणूस आहे का रे? 

मी एक विचार नाहीय का? एक कर्तृत्वाचं आचरण नाहीय का? मी फक्त ओठीच का रे उरलो तुमच्या। आचरणात का नाही? 

मासाहेबांनि आम्हास कृष्ण राम शिकवले। गीता शिकवली त्यातल्या 12 व्या अध्यायात श्लोक आहे ना 

मय्येव मन आध्तस्व मयि बुद्धिम निवेशय।
निवशिष्यसी मयि एव अत ऊर्ध्वम न संशय:।।
याचा अर्थ नीट समजून घेतल्यावरच मी स्वराजाचा संकल्प केला।

शेवटी राम कृष्णा सारखं शिवाजी हे सुद्धा एक क्षत्रतेजाचं आचरण आहे। 

शेवटी शिवाजी काय आहे रे तुमच्यासारखाच एक मुलगा जो ध्यास घेतो स्वराज्य स्थापनेचा। लढतो जनकल्याणासाठी। 

शिवाजी तुमच्यातच असतो रे तुम्ही आपले अंतरंग झाकून ठेवता त्यात बघ बरं जरा डोकावून
तुझ्यात आणि सर्वात आहेच मी । त्या सुप्त क्षत्रतेजास जागव ध्यास धर जनकल्याणाचा।
तुम्हीच शिवाजी व्हा। घडवा सुखी समाज।


शिवाजी तुमच्यातच जन्माला येईल रे। मी तर फक्त प्रेरणा आहे। तुमचं युद्ध शिवाजी होऊन तुम्हासच लढणे आहे।
असो आम्ही निघतो।

मी:🙏😊🤗 राजे परत भेटा कधीतरी असेच।

राजे: जय भवानी।

मी:जय शिवाजी।
.


1 comment: