Saturday 14 January 2017

काव्यरूपी शिवस्तुती ........!

छत्रपती

शिवरायांवर


 अनेक

 कवींनी

 सुंदर 

असे

 काव्य

 रचले 

आहे.


शिवछत्रपतींच्या

पराक्रमाच्या गाथा ऐकून उत्तरेहून कविराज छत्रपतींना भेटावयांस


आले.छत्रपतींशी रायगडावर राज्याभिषेकावेळी प्रत्यक्ष भेट झाल्यावर


त्यांच्या शब्दांना अमृतवाणी लाभली.बृज भाषेत छत्रपती शिवरायांवर अतिशय


सुंदर असे काव्य त्यांनी लिहिले आहे.कविराज भूषण यांच्या


छत्रपतीवरील काही निवडक काव्यांचा समावेश केला आहे.







सेर सिवराज है


इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर


रावण सदम्भ पर | रघुकुलराज है ||||


पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |


ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||||


दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |



भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||||



तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |


त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||||


जंभासुर


नावाच्या राक्षसाचा ज्याप्रमाणे इंद्राने वध केला,समुद्रावर जसा वडवाग्नी


कोसळतो,गर्विष्ठ रावणाचा जसा रघुकुलराज रामचंद्राने नाश केला;वादळ


ज्याप्रमाणे मेघांचा नाश करते,मदनाचा ज्याप्रमाणे


शंकराने,सहस्त्रार्जुनाचा ज्याप्रमाणे परशुरामाने संहार केला,दावाग्नी


ज्याप्रमाणे वृक्षांचा नाश करतो, हरिणांच्या कळपावर चित्ता ज्याप्रमाणे



तुटून पडतो,प्रकाश जसा अंधाराचा नाश करतो,कृष्णाने जसा कंसाचा वध केला


त्याचप्रमाणे शिवराजा म्लेंच्छांचा (शत्रूंचा) नाश करतो



चक्रवर्ती चकता चतुरंगिनी



चक्रवर्ती चकता चतुरंगिनी|


चारिऊ चापि लई दिसिचक्का ||||


भूप दुरीन दुरे भनि भूषन |


एक अनेकन बारिधि नक्का ||||


औरंगसाहिको साहि के नन्द |


लर्यो शिवसाहि बजाय कै डंका ||||


सिंह की सिंह चपेट सहै |


गजराज सहै गजराज का धक्का ||||


चक्रवर्ती


चुगताई घराण्याचा वंशज औरंगजेबाने आपल्या चतुरंगदलाने,


चारी दिशांना आपला

अंमल बसविला.कित्येक राजे डोंगरदरी मध्ये लपून बसले.


काही घाबरून समुद्रपार

गेले.पण अशा औरंगजेबविरुद्ध शाहजीनंदन 


छत्रपति शिवाजी महाराज डंके वाजवून


लढला.सिंहाच्या पंजाचा फटकारा सिंहच सहन करू शकतो


 आणि हत्तीचा धक्का

दुसरा हत्तीच !



पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने


पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने


मन कवी भूषण को, सिव की भगति जिचो,


सिव की भगति जिचो ,साधू जन सेवाने !!


साधू जन जीते या कठिन कलि काल,


कलि काल महाबीर महाराज महि मेवाने !!


जगत में जीते महाबीर महाराजनते,


महाराज बावनहु पातशहा लेवाने !!


पातशहा बावनु दिली के पातशहा जीती,


पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने !!



छत्रपती


शिवरायांचा उल्लेख कवी भूषणाने हिन्दूपति असा केला आहे,


भूषण म्हणतोय

कवीच्या मनाला शिव-भक्तिने,


शिव भक्तिस साधू-जनांच्या सेवेने,साधू जनास कलि

कालने,कलि कालास शुर आणि कीर्तिवान राजांनी,


शुर आणि कीर्तिवान


राजांना,बावन्न बादशहास जिंकणार्या औरंगजेबाने,आणि त्या बावन्न


बादशहांच्या बादशहास म्हणजे 


दिल्ली पति औरंगजेबास हिन्दू पति " शिवाजीने "

जिंकले..



चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज



चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज


चढत प्रताप दिन, दिन अति अंग में,


भूषण चढत मर हट्टन के चित्तजाव,


खग्गकुली चढत हे अरिन के अंग में !!


भौसिला के हात गडकोट हे चढत अरी,


जोट हे चढत एक मेरुगिरी स्रिंग में,


तुरकान गनव्योम यान हे चढत बिनु

,
मान हे चढत बद रंग अवरंग में !!


चतुरंग


सैन्य सज्ज

 करून,"शिवराज"घोड्यावर स्वार होताच.त्यांचा प्रताप दिवसेंदिवस

समरांगनात वाढतो आहे,


भूषण म्हणतोय इकडे मराठ्यांच्या मनातला उत्साह ही

वाढायला लागला आहे,


तर तिकडे उपसलेल्या तलवारी शत्रुच्या छातीत घुसत

आहेत,


भोसल्याच्या हाती एका-मागुन एक असे किल्ले येऊ लागले

 आहेत,तर तिकडे

शत्रुच्या टोळ्या एकत्र होउन मेरु पर्वतांच्या 


शिखरांवर चढू लागल्या आहेत,

तुरकांचे समुदाय युद्धात मरण मिळाल्या मूळे विमानात बसून


 आकाश मार्गे जात

आहेत ,


तर इकडे अवमान झाल्या मूळे औरंगजेब निस्तेज जाला आहे .

अली नवरंगजेब चंपा शिवराय है


अली नवरंगजेब चंपा शिवराय है...



कूरम कमल, कमधुज है कदमफुल,


गौर है गुलाब राना, केतकी बिराज है |


पाँढुरी पवार, जुहीसोहत है चंदावत

,
सरस बुंदेले सों चमेली साजबाज है ||


भूषण भनत मुचुकुंद बडगूजर है,


बघेले बसंत सब, कुसुम समाज है |


लेई रस ऐतिन को, बैठी न सकत है,


अली नवरंगजेब चंपा शिवराय है ||


कविराज


भुषण याने औरंगजेबाच्या मांडलिक राजांना 


एकेका फूलाची उपमा दिली

आहे.




जयपूरचे कछवाह हे कमळाप्रमाणे,

जोधपुरचे कबंधज हे कदंबप्रमाणे,गौड़

गुलाबावत तर चितोडचे राणे केतकीवत आहेत.


पवार पांढरीच्या फूलासारखे तर

चंदावताचे राजे जुईच्या फूलाप्रमाणे,बुंदेले चमेलीसारखे,गुजर


मुचकुंदाप्रमाणे आहेत.औरंगजेब हा भूंगा आहे.


भूंगा जसा फूलाफूलातून मध गोळा


करतो तसा औरंगजेब या सगळया राजांकडून कर गोळा करतो.पण शिवराय


चंपकपुष्पाप्रमाणे आहेत की ज्याच्या वाटेला 


भुंगा(औरंगजेब) कधीही जात

नाही.



सिव सर्जा निरसंक


दिल्लीय दलन दबयाके, सिव सर्जा निरसंक,


लुट लियो सुरती शहर, बंकक करी अति डंक 
!!
बंकक करी अति डंकक करी,अट संकक कुलिखल,

सोचत चकित,भरोचच चलिय,विमोचच चखजल !!


ठठ ठई,वन कठठ ठीक सई,रठठ ठील्लि,


सद्दत दिसी दिसी,भद्दत दबी भाई,रद्दत दिल्लीय !!


सर्जा


"
शिवाजी " ने निर्भय पणे दिल्लीच्या सैन्याचे परिपत्य केले,


आणि डंका

वाजवून सूरत शहर लूटले,अश्या प्रकारे डंका वाजल्याने 



शत्रूची दाना-दान

उडाली,ते आश्चर्य चकित होऊन आणि 


चिंता ग्रस्त होऊन,नेत्रातुन अश्रु वर्षाव

करत,भडोच शहराकड़े पळाले,


वारंवार विचार करून त्यानी निर्णय घेतला भडोच

शहराकड़े जाण्याचा


त्यामुळे दिल्ली दबून बसली,

आणि चहु कड़े 

तिचा अपमान

जाला.




शिव सर्जा सल्हेरी


शिव सर्जा सल्हेरी ढीग,कृध्द्दद धरिके युद्ध


गतबल खान दलेल हुअ,खान बहादूर मुद्ध,


शिव सर्जा सल्हेरी ढीग,कृध्द्दद धरिके युद्ध !!


कृध्द्दद धरिके युद्धद धरी,अरी अद्धद धरी धरी,


मुंडत ड़रीत उरुंड डकरत, ड़ुं ड़ुं डिगभरी !!


छेदित दरवर छेदित दयकरी,मेदत दतीथल,


जंगक गतिसुनी ,रंगक गली अवरंगक गतबल !!



सर्जा "शिवाजी


"
ने साल्हेर किल्ल्या जवळ,जेव्हा रागा-रागाने युद्ध केल,तेव्हा


दिलेर-खान हतबल जाला,या युद्धात शत्रु सैन्याचा फडशा



पडला,तेव्हा शिरा

वेगळी झालेली धड डरकाळया फोडू लागली,


शत्रु सैन्याला कापून काढलं आणि


त्याना दह्या प्रेमाने घुसळुन काढलं,


या युद्धात झालेली दुर्गति औरंगजेबाने

जेव्हा समजली,


तेव्हा तो निस्तेज जाला आणि त्याचे अवसान खचलं.



ज्यापर साही तने सिवराज


ज्यापर साही तने सिवराज


सुरेस की ऐस की सभा सुभ साजे,


यो कवी भूषण जम्पत हे लकी,


सम्पति को अलका पति लाजे !!


जा मदि तिन हु लोक् को दिपती,


एसो बडो गड राज बिराजे,


वारी पताल सी माची माहि,


अमरावती की छबी ऊपर छाजे !!


या


रायगड किल्ल्यावर शाहजी पुत्र " शिवाजी "ची सभा इंद्र सभे प्रमाणे


शोभते,भूषण म्हणतोय इथली सम्पति 


पाहून प्रत्यक्ष कुबेर देखिल 

लाजू

लागला,हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल 


आहे की या ठिकाणी

 तिन्ही लोकिचे

वैभव साठवलेले आहे,


किल्ल्या खालील भूभाग जलमय पाताळा प्रमाणे,मची पृथ्वी

प्रमाणे आणि वरील प्रदेश इन्द्र पूरी प्रमाणे शोभतायत.



शिवरायांवर जेवडे लिहिले गेले आहे ते तेवडे खूप कमीच आहे


पृथ्वीतलावरचे एकच युगपुरुष


छत्रपती शिवाजी महाराज


यांच्या पराक्रमाला आज २१ व्या शतकात हि तोड नाही


यांची तुलना जगातल्या कोणत्याही राज्याशी करणे म्हणजे


 मूर्खपणाच होय


रवींद्रनाथ टागोरांनीही महाराजांवर काव्य लिहिले आहे,



,
रवींद्र टागोरांनी हि महाराजांवर काव्य लिहिले आहे त्यांनी


 शिवरायांचे चरित्र आणि महत्व बंगाली भाषेत तिथल्या लोकांना

 पटून दिले आहे


 कविराज रविद्रनाथ टागोर यांनी खास लिहिलेले काव्य

बंगाली मध्ये कविता 

..
माराठिर साथे आजि हे वाङालि, एक कण्ठे बलो जयतु शिवाजी ।


माराठिर साथे आजि हे वाङालि, एक संगे चलो महोत्सव साजि ।


आजि एक सभातले भारतेर पश्चिम - पुरब दक्षिणे ओ बामे ।


एकत्रे करुक भोग एकसाथे एकटि गौरव एक पुण्य नामे ॥








मराठी मध्ये रुपांतर


 ...
कृतांत सिंहासनी विराजे मूर्तिमंत अमरत्व


उन्नत भालावरी झळाळे किरीटद्युति कर्तृत्व


ओळखलें प्रभु ओळखलें रे तुला भूपाला


वंग भूमीच्या करभारांची कंठी मंगल माला


पंच प्राणांची पंचारति, तुजला ओवीळाया


महाप्रतापी शिवराया हो प्रसन्न वंग जना या


वंगसुतांनो मराठ्यांचिया संगे बांधा कमरा


शिवभूपाचा एक सुराने जयजयकार करा


एकरुप व्हा महाराष्ट्रसह जागृत बंगाली


जयोस्तु जय जय ये शिव उदया आज अंशुमाली


शिवरायांच्या महोत्सवाच्या पर्वणीत पाही


पूर्व-पश्चिमा, उत्तर-दक्षिण मिळती दिशा दाही


एकरुप एकत्रच भोगू गौरव सर्वांही


एक नाम जयघोष घुमू दे शिवशाही




महात्मा फुले यांचा शिवाजी राजांचा पोवाडा





कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा !


छत्रपती शिवाजीचा !!


लंगोट्यास येइ जानवी पोशिंदा कुणब्यांचा !


काल तो असे वचनांचा !!


शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा !


असे तो डौल जाह्गीरीचा !!


१५४९ साल फळले !


जुन्नर ते उदयासी आले !!


शिवनेरी किल्ल्यांमध्ये बाल शिवाजी जन्मले !



जिजाबाईस रत्न सापडले !!


हातापायांची नाख बोट शुभ्र प्याजी रंगीले !


ज्यांनी कमला लाजविले !!


वर खाली टिर्या पोटर्या गाठे गोळे बांधिले.!


स्फातीकापारी भासले !!





सांग कटी सिहापुरी छाती मांस सुनावले !


नाव शिवाजी शोभले !!


राजहौसी उंच मन माघे मौंडे बोम्बीले !


असा का फणीवर डौले !!


एकसारखे शुभ्र दंत चमकू लागले !


मोती लडी गुंतविले !!


रक्तवर्ण नाजूक होठी  हासू चापविले !



म्हणोन बोबडे बोले !!


सरळ नित नाक विशाल डोळ्या शोभले !


विश्वे मृग बनी बोले !!


नेत्र तिखे बानी भवया कामठे तानिले !


 
ज्यांनी चंद्र हटविले !!


सुंदर विशाळ माळ्वती जावळ लोम्बले 

!
कुरळ केस मोघीले !!


आजानबाहू पायापेक्षा हात लांबलेले !


चिन्हे गाडीचे दिसले !!


अडवाची कडी तोंडे सर्व अलंकार केले !


धाकट्या बाळा लेवविले !!


किंखाम्बी टनकोचे मोती घोसाने जोडले !


कालाबुतांचे घोडे शोभले !!


लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले !


आग लाळीचे पडलेले !!


हातापायाचे अंगठे चोखी मुखामयी रोळे !


पायी घुंगरू खुळखुळे !!


मारी लागोपाठ लाथा बुक्क्या आकाश  शोभले !


खेळण्यावर डोळे किरीवले !!


मजवर हा कसा खेलना नाही आवडले !


चिन्ह पाळणी दिसले !!


दाही पेटे रडू लागला सर्व घाब

रले !

पाळण्य हालवू लागले !!


धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो केले !


गातो गीत तिने केले !!










समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी


रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!


घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले !


तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले !


खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले !



बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी !


रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!


या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची !


दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची !


पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची !


जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी !


रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!


करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा !


कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा !


करात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा !


शिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी !


रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!


पोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे !


स्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे !


श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे !


मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी !


रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!

भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो !


रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो !


हे सह्याचाल, हे सातपुडा !” शब्द अंतरा विदारतो !


त्या रक्ताची, त्या शब्दाची” शपथ अमुच्या जळे उरी !


रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!


जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे !


वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे !


तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे !


स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी !


रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !



कविवर्य कुसुमाग्रज


No comments:

Post a Comment