Monday, 12 December 2016

गरूडभरारी


       
गरूड पक्षाबद्दल अभिमान होताच. पण त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागलं ते परवाची त्याच्याबद्दलची गोष्ट ऐकल्यावर.
गरूडाचं दु:ख समजलं. मी आणि माझ्यासारखे अनेक आज त्या दु:खातून जातो आहोत. तो आमच्यातील एक वाटला.
गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं, पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोथट आणि वाकडी होते.
त्याची नखं निकामी होतात.
त्याच्या पंखातील बळ कमी होतं.
सावज पकडणं त्याला जमत नाही.
जीवनातील शौर्य संपलं. आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते.
नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं.
कमालीचं नैराश्य. जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो ती मोडून टाकतो.
एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते. मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपटुन काढतो. किती वेदना होत असतील? पण तो ते सारं सहन करतो.
नखं पुन्हा येताच त्या नखांनी तो स्वत:च्या पंखांची पिसं उपटुन पंख फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो.
काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षे जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) .
एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.
ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माझ्यात आणि माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत.
वास्तविक नखांचं उचकटणं नव्हे तर वाईट आचार विचारांच्या नखांचं उचकटणं , पंखांचं फाडणं नव्हे तर गर्विष्ठ मनोवृत्तीचा बीमोड करणं हे तप माणसाला करावं लागेल.
नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरमीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
गरूडाला बोलता येत नाही तर त्यानं सांगितलं असतं त्याचं दु:ख आपणाला; परंतु शूर माणसाचं वैशिष्ट्य असतं , की तो दु:ख बायकीपणानं सांगत नाही. तो हसतमुखानं भोगतो ते.
शौर्य आणि तितिक्षा दोन्ही दृष्टीनं गरूड माझा गुरू झाला.
दुर्गम भागामध्ये शिक्षणाची सोय नसताना मैलो अन् मैल पायपीट करणा-या एखाद्या गरीब मुलाच्या जीवनात एका पायरीवर गरूड भिनावा आणि त्यानं भरारी मारावी , अनंत कष्ट सोसून त्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये नावं करावं .
नव्या तरूण पिढीला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करावं ही एका रानपाखरानं घेतलेली गरूडभरारीच नव्हे काय❓
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन .
नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात.
तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच.
उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं.
फाड पंख तुझ्या त्या नाकर्तेपणाचे ,
आणि पुन्हा एकटा वाट बघ.
या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल.
निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .
मग यमसुध्दा तुला पाहिल्यावर लटालटा  कापायला लागेल !!!
.....whatsapp shared.

Sunday, 11 December 2016

हिन्दू धर्म राष्ट्र ।


हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्र’ हवेच !
भारतात ‘हिंदु’ हा शब्द जरी उच्चारला, तरी निधर्मी म्हणवणार्यांना पोटशूळ उठतो. सर्व वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांची गरळओक चालू होतेे. गांधींच्या पावलांवर पाऊल ठेवून गांधी-नेहरू घराण्यातील नेत्यांनी भारताला ‘निधर्मी’ करण्याचा जणू विडाच उचलला. आजमितीस भारतात हिंदुत्वाची विचारसरणी असणार्या पक्षाची सत्ता असली, तरी अद्यापपर्यंत तरी हिंदूंच्या परिस्थितीत म्हणावा तसा पालट झालेला नाही. हिंदु हितार्थ आता ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय आहे.
१. भारताला ‘हिंदु राष्ट्र’ संबोधल्याने सेक्युलरवाद्यांना पोटशूळ !
‘गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी ‘मी हिंदु-ख्रिश्चन आहे’, तसेच ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहे’, अशी विधाने केल्यावर समस्त सेक्युलरवाद्यांना पोटशूळ उठला. यात काहीच आश्चर्य नाही. भारताची जी घटना अस्तित्वात आली त्यात ‘सेक्युलर’ किंवा ‘समाजवाद’ हे शब्द नव्हते, हे सेक्युलरवादी विसरतात.
२. घटनेमध्ये गांधी घराण्याने ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ हे शब्द घुसडले !
घटना निर्मिती करणार्यांनी ‘हे राष्ट्र सेक्युलर आहे’, असे कधीही म्हटले नव्हते; परंतु नेहरूंनी तसे सांगायला प्रारंभ केला. वर्ष १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी घटनेत ज्या काही दुरुस्त्या (तोडमोड) केल्या, त्यात त्यांनी स्वतःच्या आणि कम्युनिस्ट यांच्या दोन तृतीयांश बहुमतामुळे घटनेत ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ हे शब्द घुसडले. त्याविषयी जनसंघ आणि इतर हिंदुत्ववादी यांनी खेद व्यक्त केला; पण आकाडतांडव केला नाही.
३. जगाच्या पाठीवर एकही ‘हिंदु राष्ट्र’ नसणे, ही शोकांतिका !
जगात अनेक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत. मुसलमान राष्ट्रे आहेत. बुद्ध राष्ट्रे आहेत. संख्येने सर्वांत अल्प असलेल्या ज्यू धर्मियांचे इस्रायल हे स्वतंत्र राष्ट्र आहे. तथापि जगात १०० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंना स्वत:चे असे एकही राष्ट्र नाही, ही शोकांतिका आहे.
४. भारताला ‘हिंदु राष्ट्र’ संबोधल्याससेक्युलरवाद्यांनी आक्षेप घेणे चुकीचे !
संघावरील पहिल्या बंदीच्या नंतर पू. गोळवलकर गुरुजींना एका युरोपीयन पत्रकाराने विचारले, ‘आपण हिंदुस्थान हा केवळ हिंदूंसाठी आहे, असे का म्हणता ?’ त्यावर पू. गुरुजी म्हणाले, ‘‘हे तुम्हाला पटत नसेल, तर हिंदूंकरता हिंदुस्थान हा एकमेव देश आहे, हे सत्य आहे, असे तुम्हाला वाटत नाही का ?’’ उर्वरित सर्व धर्मियांना आपापले देश आहेत. हिंदु ही आमची भौगोलिक ओळख आहे. त्यामुळे या देशाला ‘हिंदु राष्ट्र’ म्हटले, तर सेक्युलरवाद्यांनी आक्षेप घेता कामा नये. इंग्लंडची राणी ‘Defender of Faith’ म्हणवून घेते. अमेरिका ‘In God we trust’ म्हणते. काही मुसलमान राष्ट्रे आम्ही ‘शरीयत प्रमाणे राज्य करणारी इस्लामी राष्ट्र आहोत’, असे म्हणतात. हे सेक्युलरवाद्यांना चालते, तर ‘हिंदु राष्ट्र’ का चालत नाही ?
५. हिंदुत्वनिष्ठांनी घटनेत ‘हिंदु राष्ट्र’ असा पालट
केल्यास कोणलाही आकाडतांडव करण्याचा काय अधिकार ?
कम्युनिस्टांना बहुमत मिळून ते जर वरील पालट करू शकतात, तर उद्या हिंदुत्ववाद्यांना बहुमत मिळाले आणि त्यांनी ‘सेक्युलर’ ‘सोशालिस्ट’ शब्द काढून ‘हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून ओळखले जाईल’, असे नमूद केले, तर कोणालाही आकाडतांडव करण्याचा काय नैतिक अधिकार ?
आम्ही हिंदू इतके असंस्कृत, असभ्य आणि कोत्या वृत्तीचे आहोत का, की त्यामुळे आम्हाला भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणण्याचाही हक्क नाही. हिंदूंना स्वत:चे ‘हिंदु राष्ट्र’ असायला हवे, असे जर सेक्युलरवाद्यांना वाटत असेल, तर त्यांचा मेंदू सडका आहे, असे म्हटले पाहिजे.’
- श्री. वसंत गद्रे, मुंबई

Saturday, 10 December 2016

इये द्रविडांचिये भूमी .......!

परस्परविरोधे तू वयं पंचश्च ते शतम् ! परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकम शतम् !!


असा एक संस्कृत श्लोक आहे .एक गोष्ट तर संस्कृतचे धूर विरोधी सुद्धा मानतात कि या भाषेतले श्लोक खूपच relevent आहेत आजही ..!
वरील श्लोकाचा अर्थ असाय कि आल्यात जर परस्पर विरोध असला तर आपण केवळ पाचच राहतो आणि आपले शत्रू मात्र १०० होऊन जातात . आणि दुसर्यांमध्ये  म्हणजेच शत्रुमध्ये जर परस्पर विरोध झाला तर मग मात्र आपल्याकडे १०५ एवढे बळ राहते .अर्थातच काय एकीचे बळ  महत्त्वाचे .. आजही हेच तंतोतंत लागू पडते आपल्या भारतिय समाजाला .... गेली ७० वर्षे या देशातले दोन प्रवाह मुर्खासारखे एकमेकांशी लढत आहेत वेगवेगळ्या विषयांवर आणि यामुळेच देश प्रचंड मागे गेलाय आपला ...  

विश्वातल्या सर्व शक्तींना कित्येक वर्षांपासून हि मोरपीसाप्रमाणे  वैविध्याची श्रीमंती असलेली भूमी हस्तगत करायचीय..... ..त्यासाठीच तर breaking india हि strategy अमलात आंली जातीय . आणि देशातील काही सत्ताप्रीय लोक यांनाच हत्यार बनवले जातेय ..असो....!

आज आपण आर्य – द्रविड हि भानगड काय त्यावर बोलूयात ...!

गेल्या १०० वर्षांपासून भारतातल्या तथाकथित पुरोगामी ब्रिगेडी बहुजनी सुधारणावादी अंधश्रद्धा निर्मुलन आदी so called महान काम करायचा आव आणणाऱ्या लोकांना गेली कित्येक वर्षे बक्कळ पैसा पुरवून भारताला ईशान्य भारत विरुद्ध पूर्ण भारत , आर्य विरुद्ध द्रविड ,सवर्ण विरुद्ध दलित ,उत्तरीय विरुद्ध दक्षिणी भारत यांबद्दलच्या भम्पक कथांद्वारे देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न होतोय.

आर्य-द्रविड सिद्धांत म्हणजे नेमके काय?

इंग्रज या देशात आले तेव्हा इथे अस्पृश्यता व जातीवादाचे स्तोम माजले होते.ते कमी करायचा प्रयत्न करण्याऐवजी इथल्याच लोकांना आपले अस्त्र बनवून देशाला कायम अस्थिर करण्याचा कौरवी डाव आखण्यात आला.फोड आणि झोड हि  नीती......!
यासाठी ब्रिटिशांनी काही पाश्चात्य इतिहासकारांकडून आर्य द्रविड सिद्धांताचा इतिहास लिहून घेतला व जाणून बुजून त्या खोट्या वैज्ञानिक आधारहीन थेयरीझ णा देशातल्या दलित आदिवासी आणि दक्षिणेतील तामिळी आणि इतर द्रविड लोकांना शिकविण्यात आलेय .आणि याचाच पुरेपूर फायदा एवढी वर्षे काँग्रेसनी घेतला आणि अश्या मानसिकतेच्या पक्षांनी जनतेला मस्त लुटलंय .



यासाठी ब्रिटिशांनी aryan invasion theory लिहून घेतली व गेले शतकभर देशातल्या लोकाना वेगवेगळ्या प्रकारे तसेच  शिक्षण व्यवस्थेत सुद्धा ती शिकवली जातेय.हि थेयरी पुढील विचार उद्धृत करते.


१.invasion म्हणजे आक्रमण .एक सिद्धांत हा लिहिला गेला कि , काही हजार वर्षांपूर्वी युरोप व मध्य आशिया खंडातून आर्य नामक समूहाचे लोक मोठमोठ्या झुंडीत भारत देशावर आले.अर्थात या आर्यांच्या झुंडींनी भारतावार आक्रमण केले.या आर्यांनी इथे रहात असलेल्या मूलनिवासी लोकांवर ज्यांना द्रविड असे संबोधल्या जायचे त्यांच्यावर आक्रमण केले आणि त्यांना आक्रमणाद्वारे लढत लढत भारतीय उपखंडाच्या खालच्या भागाला ढकलले गेले . हे बाहेरून आलेले आर्य गोर्या रंगाचे होते कारण युरोप व मध्य आशियातील लोकसुद्धा गौर वर्णीय  आहेत.आणि द्रविड हे काळे होते जे आता दक्षिण भारतात ढकलल्या गेल्यामुळे राहतात. अर्थात उत्तर भारतीय लोक हे बाहेरून आलेले आक्रमणकारी  आहेत आणि देशाचे मूलनिवासी लोक द्रविड हे दक्षिणेत राहणारेच  आहेत. म्हणजे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय हे एकमेकांचे जनुकीय genetical brothers नाहीत.तर ते शत्रू आहेत अशी थेयरी मांडल्या गेली.

२.यालाच आडून आडून एक असाही विचार लिहिला गेला कि ब्राह्मण समाजातले लोक हे बाहेरून आलेले आर्य आहेत.त्यांनी आक्रमणाद्वारे वैदिक किंवा हिंदू धर्म सर्वांवर बळजबरीने लादला व सर्व बहुजनांना शुद्र दलितांना आपले गुलाम बनवले व वर्षानुवर्षे छळले.

या दोन उपोद्घातांचे आधार पुढीलप्रमाणे या थेयरी द्वारे मांडले गेले.
१.उत्तर भारतीय हे गोरे आहेत तर दक्षिण भारतीय कृष्णवर्णीय आहेत.हे उत्तरेतले लोक बाहेरून आलेले आहेत व दक्षिणेतले मूलनिवासी आहेत.
२.युरोपातील लोकांचा रंग व उत्तर भारतीयांचा रंग हा एकसारखाच गोरा आहे. शिवाय काळे लोक युरोप व मध्य आशियात शोधुनही सापडणार नाही.
३.मनुस्मृती द्वारे लोकांना गुलाम केले ते ब्राह्मन्नांनी.म्हणूनच ते बाहेरचे आहेत.
४.यासोबतच एक आधार हा आहे कि उत्तरेतल्या सर्व भाषा आर्य म्हणजेच संस्कृतोद्भव आहेत तर दक्षिणेतल्या भाषा द्रविड म्हणजे देशाच्या मूळ भाषा आहेत.अभिजात भाषा आहेत. याला आधार हा दिला गेलाय कि latin ग्रीक फ्रेंच इंग्लिश जर्मन आदी युरोपीय भाषा ह्या संस्कृतशी खूप जास्त साम्य असलेल्या आहेत. म्हणूनच तर हिंदी बंगाली पंजाबी गुजराती अन्य सगळ्या भाषांमध्ये एक लिंक दिसते तर मराठी तमिळ तेलुगु कन्नड मल्याळी या भाषा उत्तरेतल्यांना  बोलतासुद्धा येत नाहीत.कारण त्या भाषा अत्यंत वेगळ्या आणि गोंडी भाषेसारख्या आंडू  पांडूच्या म्हणजेच कठीण भाषा आहेत. अर्थात दक्षिणेतल्या भाषा अभिजात आहेत.आणि उत्तरेतल्या सर्व भाषा ह्या संस्कृतातून जन्मलेल्या आहेत.
५.उत्तरेतले लोक हे वैष्णव  आहेत कारण येथे विष्णूची पूजा जास्त होते शिवाय उत्तर भारतीय लोक पिवळे  उभे गंध लावत असतात ज्याला विष्णूगंध म्हणतात. तसेच खालचे लोक आडवे पांढरे अथवा लाल गंध लावतात.जे शिवगंध  आहे. यावरून शैव वैष्णव विवाद जन्माला घातला गेला. शंकराच्या भक्ताविरुद्ध विष्णूचे भक्त अशी हिंदुन्म्ध्येच जुम्प्न्याचा डाव साधला जातोय.

६.शंकर हा आदिवासी भटके विमुक्त भिल्ल साधे भोले लोक यांचा देव आहे.तर विष्णु हा बुद्धिमान चतुर पण लुर्या व बनियावादी ,गोड बोलून मानसिक गुलाम करणाऱ्या शेटजी भटजींचा देव आहे असही एक आधार आहे.



आर्य द्रविड सिद्धांताचे खंडन  :

आता आपण तार्किक वैज्ञानिक व ऐतिहासिक दृष्टीने वरील सर्व गोष्टी कशा खोट्या ते सिद्ध करूयात .देशातले डावे उजवे आणि इतरही लेखक इतिहासकार व राजकारणी ज्या महान संशोधकाचा वारसा सांगतात तो म्हणजे मक्स्मुल्लर हा विदेशी लेखक. हा लेखक कडवा भारतविरोधी होता पण तो तेवढाच बुद्धीवादिसुद्धा होता.यानेच जगात सर्वप्रथम वेदांची भाषांतरे केली.त्यात मुदाम चुका केल्या.तो भारताचे शोषण करावे यासाठीच काम करायचा. आर्य आक्रमणाचा सिद्धांत यानेच लीहिल .याच महाशयांना डावे पुरोगामी आजही पूजतात. पण या देशाला symbolism  materialism  अर्धवट पणा याची घान सवय लागलेली आहे.तसेच झालेय. भारतद्वेष पसरवणाऱ्या साहित्याचा जनक हा मक्स्मुल्लर महाशयांनी मरतेवेळी खर बोलावे या मान्यतेप्रमाणे एक खरे काम करावे अये एक काम केले ते असे कि ,शेवटच्या काही दिवसात यांनी हे मान्य केले कि आर्य द्रविड सिद्धांत खोटा आहे.हा म्हणाला कि कोण कुठून आले हे सांगता येतच नाही.दस्तुरखुद्द मक्स्मुल्लर महाशयांना हे मानावेच लागले या मागे काहीही सत्य नाही.हे सर्व आपण प्रज्ञाभारती श्रीधर भास्कर वर्णेकर महोदयांच्या भारतीय तत्त्वज्ञानावरील पुस्तकात मिळते.

हे सर्व कुभांड रचणार्यांना आणि आजही ते मानणार्यांना एवढे सुद्धा लक्षात येत नाही.कि उत्तर भारतात विशत असा हिमालय पर्वत आहे हिमाचल प्रदेश हे नावच मुळी बर्फावरून देण्यात आलेले आहे.आपल्याला माहितच आहे कि काश्मीर हा बर्फाचा भाग आहे तिथे कित्येक महिने नुसता बर्फच बर्फ असतो .शिवाय युपी बिहार एवढी थंडी अन्यत्र कुठेच पडत नाही. दार्जीलिंग कुल्लू मनाली , सिक्कीम सोनमर्ग गुलमर्ग हि सगळी थंड हवेची ठिकाणे हि उत्तरेत आहेत कारण उत्तरेत हिमालय पर्वत आहे आणि तिथे थंडी जास्त पडते याच कारणामुळे तिथले लोक गोरे आहेत.पण याचा अर्थ असा सुद्धा होत नाही कि तिथे काळे लोक सापडणारच नाहीत .मायावती मुल्ला मुलायम हे कलेच आहेत तर जयललिता गोऱ्या  आहेत.शिवाय दक्षिण भारताचा नकाशा पहिला असता असे लक्षात येत कि भारतीय उपखंड हा दक्षिणेला निमुळता होत जातो म्हणूनच तर त्याला पेनिन्सुलर इंन्दिया म्हणतात . दक्षिण भारत उष्णकटीबंधात येतो .भौगोलिक संशोधन संस्थांनी वैज्ञानिक आधारावर हे सिद्ध केले आहे कि दक्षिण भारतातवर सूर्यकिरणे तीव स्वरूपात पडतात..
   आता प्रश्न भाषेचा .तर हे एकदम सत्य आहे कि दक्षिणेतल्या सर्व भाषा मराठी धरून अभिजात आहेत म्हणजेच क्लासिकॅल लांग्व्हेज आहेत .पण याचा आधार विदेशी लोकांनी देण्यापेक्षा स्वतः दक्षिण भारतीयांची पुराने धर्मग्रन्थ आणि तामिळी व अन्य भाषेतले २००० वर्ष जुने साहित्य शिलालेख त्यांच्या मान्यता काय सांगतात ते म्हण्त्त्वाचे आहे.तामिळी समाजामध्ये हि मान्यता दृढ आहे कि त्यांची भाषा हि भगवान कार्तिकेयाने व अगस्ती ऋषि ने  त्यांना शिकवलेली आहे.अगस्ती मुनी हे कावेरी जी  त्यांची पत्नी लोपामुद्रा आहे.तीच्य काठी बसून आपले जीवन घालविले .यांनीच तमिळ भाषा जन्माला घातली व पुढे कार्तिकेयाने तिचा प्रसार केला असे पक्के मत स्वतः तामिळी जनतेचे आहे . मुरुगन सुब्रामानिम स्वामी किंवा कार्तिकेय या नावाने कार्तिकस्वामी महारष्ट्रात जसा गणपती आराध्य म्हणून पुजला जातो तसा तिथे पुजला जातो.तामिळी लोक हे शैव कमी आणि कार्तिकेय पूजक जास्त आहेत.त्यांच्या गळ्यात सोन्याचे लोकेत असते ज्यावर कार्तिकेयाची प्रतिमा कोरलेली असते. ज्यांनी तामिल्नादूचा अभ्यास केलाय ते हे जाणतात .याशिवाय एक समाज असाही आहे कि भारत मुनींनी भरतनाटयम तामिल्नादुंत लिहिले व साक्षात शंकराला पाचारण केले तांडव करायला .येथे हे लक्षात घ्या कि भ्र्त्नात्याम चे दोन प्रकार आहेत एक तांडव जे पुरुष करतात आणि एक लास्य जे स्त्रिया करतात.शंकरांनी तांडव करत असताना डमरू वाजवला व त्यातून जे शब्द आले टी म्हजे तमिळ भाषा असाही एक समज रूढ आहे.
तसेच राहिला भाषांच्या लिपीचा प्रश्न तर दक्षिणेतल्या सर्व लिप्या ह्या ब्राह्मी भाषेतून विकसित झाल्या आहेत .हे द्राविडी लोकांनीच शोधून दाखवले आहे. शिवाय द्रविड हा शब्दही संस्कृतच आहे.द्रविड म्हणजे द्रवाने वेढलेला.संस्कृत भाषेचे युरोपीय भाषांशी विलक्षण साम्य निश्चितच आहे म्हणूनच भारतात फ्रेंच जर्मन शिकणारे लोक आधी संस्कृत शिकतात म्हणजे मग या भाषा अगदी सोप्या होऊन जातात.महादेवन कृष्णन कल्याणं हि संस्कृत नावे तर यांचीच जास्त असतात .तसेच महिषासुरमर्दिनी स्तोत्रम विश्नुसःस्र्नाम महालक्ष्मी अष्टक या सर्व स्तोत्रांना रेकॉर्ड करून गाण्यांच्या रुपात दक्षिणेतल्या लोकांनीच आणले.उत्तरेत मध्य भारतात संस्कृत आणि संस्कृती यांचा प्रभाव मोग्लांमुळे पुरता नष्ट झालाय हे सत्य मानावेच लागेल.

राहिला प्रश्न ब्राह्मणाचा तर त्यातल्या काहिंनी गेली कित्येक वर्षे बहुजन्नांना लुबाडले आहे व आजही येन केन प्रकारे लुबाडत आहेतच.पण या लुटीला फुले शाहु साने सावरकर यांरखे विरोधक कमीच का मिळाले?? शिवाय पेशवे घराणे आनंदीबाई जोशी संत द्न्यानेश्वरांचे आई बाबा तसेच सर्वच ब्राह्मण महिला यांनाही तितकेच लुटले गेले?? आणि गावापासुन शहरापर्यंतच्या जमिनदार ठाकुर पाटील देशमुखांनी दलितांना काय कमी लुटले? क्षत्रियांनी आपले काम बजावले नाही। म्हनुनच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ते भिक्षुकशाहीचे बंड झाले। अर्थात काही चांगले अपवाद वगळता.मुद्दामच माझ्या ब्लोगच नावात काही शब्द घातलाय मी म्हणजे कोणालाही वाईट वाटू नये.ह्यावर अजूनही मला तोडगा सापडला नाही माझा ब्लॉग वाच्नार्यांनो तुमच्याकडे यावर समाधान असेल तर सांगा.
आता शैव वैष्णव विवाद . विष्णूच सगळे अवतार राम कृष्ण बुद्ध हे क्षत्रिय कुळात झाले .परशुरामाची आई रेणुका हि राजाची लेक होती शिवाय परशुरामाने आयुष्यभर क्षत्रिय कार्यच केले त्यामुळे विष्णु हा ब्राह्मणांचा देव नसून आम्हा क्षत्रियांचा देव आहे.क्षत्रियांना म्हणजे राजा पाटील देशमुख उत्तरेतले ठाकूर राजपूत जमिनदार यांना उगाचच अन्नदाता नाही म्हणत एवढ्या वर्षांपासून .जसा विष्णु पालान्हार तसा क्षत्रिय पण.राजापण. आणि हो शाक्त्य गाणपत्य सौर कापालिक या संप्रदायाचे लोक मग काय अंटारटीका खंडातून टपकले भारतात ?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी annhilation of caste या पुस्तकात आर्य द्रविड सिद्धांताला सरळ सरळ खोटे मानले आहे.एवढेच नाही तर who were shudras ? या पुस्तकात चक्क शुद्र हेच क्षत्रिय असल्याचेही म्हटले आहे. काँग्रेसी व पुरोगामी पिल्ले स्वतःला आम्बेडकर महोद्यांपेक्षा शहाणे समजतात का? काँग्रेसनी तर १९९१ मध्ये त्यांच्या मृत्यु नंतर ४० वर्षांनी त्यांना भारतरत्न दिला तेवा नाही रे केकाटले तुम्ही ?? हे सर्व लोक आंबेडकरी विचारांचे मारेकरीच आहेत .
उत्तर पुर्वेतले लोक तिथल्या वातावरणामुळे थोडे चीनी दिसतात त्यांच्या तर हत्या झाल्या दिल्लीमध्ये मग त्यासाठीप्न एखाद सिद्धांत लिहायला पाहिजे हो न? समाजात एकता आणायला काय केले आजवर?



सगळेच भारतीय लोक हे संस्कृतीने निश्चितच द्रविड आहेत . आर्य शब्दाचा अर्थ विवेकी असा होतो म्हणूनच कृण्वन्तो विश्वमार्यम म्हणजे विवेकी समाज घडवणे. उत्तरेतून संस्कृती नष्ट झाली मोगल तुर्क अफगाण शान कुशन हून यांचेमुळे उत्तरेत युरोपीय मानसिकतेचा प्रभाव आहे .गोरेपणाला महत्त्व उत्तरेत आहे दक्षिणेत नाही.सगळे पंजाबी कपुरांचे पोट्टे फक्त गोर्या चामडी मुळे हिरो बनवले जात आहेत .पण आर माधवन ट.गोपीचंद नितीन कुमार यांसारख्या खर्या सुंदर कलाकरांना काहीही किंमत उरली नाहीय . उत्तर व मध्य भारतीयांनी निश्चितच भारतीयत्व स्वताहून सोडले हे अगदीच खरे आहे .
हि भारतभूमी द्रविडांचीच आहे यात काहीच शंका नाही.


महाराष्ट्र आर्य कि द्रविड यावर पुढचे पारिजात ओव्न्यात येईल तूर्तास आपले आभार .....








Friday, 9 December 2016

मनाची किती हाय....... स्थित्यंतरे .....!

 
by saurabh vaishampayan


खुळ्या सांजवेळा खुळा तोच गहिवर कुणी रोज त्याला कसे सावरे ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..
उन्हासोबतीने असे चालते की जणू सावलीशी न नाते जुळे
झुगारून देई जुन्या रीतभाती मिठी मारते वादळाला खुळे
फिरे धुंद, संदिग्ध पण सोवळेसे, थव्यातून फिरती जशी पाखरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .......!



दिवे लागणीची जशी वेळ येते दिसे अंगणी सांजवातीपरी
जणू होत स्मरणे विरागी स्वरांनी फिरे अंतराळी जशी सावरी
तमा ना कुणाची कशाची मनाला, जसे मन म्हणे ते तसे वावरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ......!









निळ्या सावळ्याशा दिगंतावरी ते नवा खेळ खेळे दिशांसोबती
कधी पूर्व तर अन् कधी पश्चिमेला मिती शोधते आपुल्या भोवती
कधी एकटे तर कधी संगतीने गवसती कशी त्यास गत्यंतरे ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .......!

Wednesday, 7 December 2016

म्हणे मराठे शुद्र



काल जय महाराष्ट्र वर मराठा आरक्षणा बद्दल एक चर्चा बघत होतो . मला वाटत निखील वागळे ला तिथूनही सोडचिठ्ठी मिळाली .काहीही असो त्या पत्रकारामधे अवघ्या दोन महिन्यात टीआरपी उचलण्याची क्षमता आहे .जय  महाराष्ट्र हि वाहिनी आणखी लोकांपर्यंत वागळे मुळेच पोचली .शेवटी काय आहे न प्रत्येक पत्रकार हा व्यक्तिगत स्तरावर चांगलाच असतो .प्रत्येक वृत्त वाहिनीचा वेगवेगळ्या विषयावर काही अजेंडा असतो तोच सेट करण्याचा प्रयत्न ह्यांना करावा लागतो .शेवटी ते हि तिथे नोकरीच करतात विचारे ! त्यांनाही मजुरासारखा तासाप्रमाणे पगार असतो . असो........!

 विषय होता मराठा आरक्षणाच्या च्या आजच्या म्हणजे ७ डीसेंबर च्या उच्च न्यायालयातील सुनावणीचा. शेवटी न्यायलय म्हणजे फक्त तारीख पे तारीखच आहे हे आता तरी सर्वांनी मान्य करायला पाहिजे निदान मराठा आंदोलकांनी तरी मानायलाच हवे . त्याचा तसा प्रत्यय सुद्धा आलाच असेल आज. दोन महिन्यांनी हि केस न्यायालयाच्या समोर आली सरकारने मेहनत करून प्रतिज्ञापत्र देखील सदर केले तेही २००० च्या वर पानांचे पण काय झाले तेच जे नेहमी होते आता पुढची सुनावणी ३० जानेवारी पर्यंत ढकलली गेलीय . ते प्रतिज्ञापत्र याचिका कर्त्यांना द्यावे असे सुनवण्यात आलेय .
या वरच चर्चा सुरु   होती . त्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड , कोलशे पाटील म्हणजे माजी न्यायमूर्ती , स्वतः विनोद पाटील जे याचिकाकर्ते आहेत ते आणि एक देवळे  नावाचे व्यक्ती चर्चेला बसले होते .. आणि तो आपला ह(राम ) कदम सुद्धा होता .भाजप मध्ये गेल्यापासून  लय गोड बोलायला लागलाय पठ्ठा .... एकदम बनिया झालाय .. मनसेतला  मराठा भटजींनी बाटवला ..आणि हा संधिसाधू मस्त भूमिका मांडत होता . 

काही नाही चर्चा नेहमी चालते तशी सुरु होती .
काही वेळानी प्रवीण गायकवाडला त्याचे मत विचारण्यात आले . तेव्हा तो काय बोलला ते ऐकून भारी कीव आली मला ........ बघा तो की म्हणतो ते –

या गायकवाड महाशयांनी म्हणे एक पुस्तक लिहिलंय “मराठे शुद्र” अश्या नावाचे ! त्यात आदिकालापासुनच्या दाख्ल्यान्द्वारे  सिद्ध केलाय म्हणे कि मराठे हे शूद्रच होते . त्याच्या आधारासाठी पुढील पैलू देण्यात आले त्याचे सविस्तर खंडन करण्यासाठी हा ब्लॉग

  १ .  भगवान परशुरामाने म्हणे २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली आणि म्हणूनच कलियुगात क्षत्रिय वर्ण लोप पावला . वैश्य वर्ण सुद्धा काही कारणांमुळे नामशेष झाला असेही वदले या महाभागांनी .म्हणूनच मराठे हे शुद्र आहेत कारण कलियुगात दोनच वर्ण उरले एक ब्राह्मण आणि एक शुद्र .



प्रतिवाद :
गायकवाड  आपण भगवान परशुरामांना मानता त्यांचे कार्य मानता हे ऐकून खूपच आश्चर्य वाटते मला . एकीकडे म्हणायचं कि हिंदूंच्या सर्व पुराणकथा या भाकडकथा आहेत .यांचे सर्व धर्मग्रंथ अंधश्र्द्धेनी भरलेले आहेत .राम कृष्ण झालेच नाही हनुमान झालेच नाही.खर्च एक वानर आकाशात उडू शकतो का असेही म्हणता तुम्ही लोक. पुष्पक विअमा मंत्रसिद्धी या सर्व गोष्टी म्हणजे थोतांड आहेत असे नेहमीच ब्रिगेडी पुरोगामी लोकांकडून सांगण्यात येते .
मग प्रश्न असा पडतो कि परशुरामाने सर्व पृथ्वी नि:क्षत्रिय केली हे तुम्ही कसे काय मानता? हि तर स्पष्ट शब्दात अंधश्रद्धा आहे . म्हणजे पृथ्वी हि हिंदूंना अगदी पुरांकालापासून  माहिती होती यातून हेही स्पष्ट होतेच. जर हंदू धर्म ग्रंथ हे ब्राह्मणी थोतांड आहे तर मग हे कसे मानले जाऊ शकते ? अआदिकालात कोणी परशुराम झाला मुळात हीच अंधश्रद्धा आहे कारण तुमच्या नुसार संस्कृत भाषा वापरून हे सर्व थोतांड रचलेले आहे न? यालाच तर आ ह काळोखे साहेब संस्कृत भाषेचे गौडबंगाल म्हणतात . एकूणच काय तर आम्हा हिंदूंपेक्षा तुम्हीच जास्त पुराणमतवादी आहात.तुमचे हे रेकॉर्डेड अभिमत तुमची पुराणमतवादी भूमिका स्पष्ट करते .

बर आता माझ्या सर्व वाचकांनो मला सांगा बर ज्या पुराणकथा आपण पहिल्या नाहीत फक्त ऐकल्या वाचल्या आहेत त्यावर विश्वास ठेवणे  योग्य कि  अयोग्य ? म्हणे कोणी परशुराम झाला होता ज्याला विष्णूचा सहावा अवतार मानण्यात येते .पृथ्वीवरील काही क्षत्रिय सगळेच नाही ह काही क्षत्रिय म्हणजे राजे खूप माजले होते अत्याचारी झाले होते त्यांचा बिमोड करून जनतेला सुख व धर्माचे शासन मिळावे म्हणून विष्णूने अवतार घेतला .तोच हा परशुराम अवतार . जमदग्नी ऋषी व रेणूक राजाची कन्या रेणुका यांच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला तो म्हणजे परशुधारी राम परशुराम .
यांची आई राजकन्या होती आणि वडील ऋषि होते .ब्राह्मण म्हणून जन्माला आले आणि परशु हे शस्त्र घेऊन निहित कार्य पूर्ण केले म्हणूनच यांना इदं ब्रह्मम इदं क्षात्रं किंवा शापादपि शराद्पि असेही म्हणतात . जर प्रवीण गायकवाड यांचे नुसार      हे पुराणातले थोतांड सत्य मानले तर  परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली हे मानावे लागते.

जर असे मानले तर प्रश्न असा पडतो कि एकवेळ पृथ्वीला नि:क्षत्रिय केल्यावर म्हणजेच सगळे क्षत्रिय मारल्यावर पुढच्या २० वेळी मारायला क्षत्रिय उरणारच  कसे?  बर असे मानले कि फक्त पुरुष मारले बायका पोरांना हात सुद्धा नाही लावला तर मारलेल्या क्षत्रियांचे कारटे मोठे होऊन क्षत्रिय व्हायला निदान २५ वर्षे तरी लागलेच असतील नाही का? २५  वर्षात साधारण एक पिढी जन्माला येते .

मग एकवीस पिढ्यांचा हिशोब बघुयात .

२५  वर्षे एक पिढी तर २१ पिढ्यांना :

२५ * २१ =  ५२५ वर्षे

अबब हे काय तब्बल ५२५ वर्षे लागली असतील परशुरामाला २१ पिढ्या संपवायला म्हणजे त्यांचे वय ५२५ वर्षे असणार . खर्च सांगा कोणीतरी ५२५ वर्षे जगू शकतो का ? विज्ञानानुसार तर ह्युमन लाइफ फक्त १०० वर्षाचे आहेत .म्हणजेच हि पुराने काहीही सांगतात आणि ह्यांच्यावर विश्वास ठेवणारे हे पव्या सारखे लोक आम्हा हिंदूंना अंधश्रद्ध म्हणत असतांना हे लोक स्वतःच किती मूर्ख आणि अंधश्रद्ध आहेत याचाच परिचय इथे येतो.




  २ .  १९०२ पासूनच म्हणे राजर्षी शाहू महाराजांनी मराठ्यांना आरक्षण दिले .ते आरक्षण १९५० येत पर्यंत गुप्तरीत्या नामशेष झाले अथवा करण्यात आले.


प्रतिवाद: शाहू महाराजांचे आधिपत्य फक्त कोल्हापुरात होते पूर्ण महाराष्ट्रात नाही प्रवीण भाई ...! १९५० पर्यंत दिल्लीचा नियम आणिक कायदा लागू झाला सर्वत्र ...! आणि मग हे मराठ्यांचे एका जिल्हा पर्यन्तचे आरक्षण काढले कोणी? निश्चितच तुमच्या लाडक्या नेहरूंनी ... आणि त्यावेळच्या यशवंतराव चव्हाण यासारख्या  दम नसलेल्या  सो कॉल्ड मराठा  महाराष्ट्रातल्या नेत्यांनी .  एवढी वर्षे दिल्लीच्या कॉंग्रेसची बूट polish केली तरी वर काय चाललाय ते लक्षात नाही आल तुम्हा मराठा नेत्यांना. ७० वर्षे मराठा समाजाला मतपेटी समजून तुम्ही त्यांच्या भरोशावर सत्ता उपभोगली आणि त्यांना मागास करून ठेवले . आता ब्राह्मण मुख्यमंत्री झाला म्हणून हे मोर्च्याच शहाणपण सुचत आहे .आधी का नाही विचार केला याचा . शोधून काढा कोणी तुमचे अधिकार हिरावले ते ... 


  ३ .  सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींनी त्यांच्या काळात धर्मसंसद बोलावून धर्मचार्यांकडून मराठे हे शूद्रच आहे स्पष्ट केले होते .. व  निर्णय हाच झाला कि मराठे हे शूद्रच आहेत.


प्रतिवाद: हे  राजे लोकल होते त्यांना इंग्रजांनी फक्त नावची राजा हि पदवी दिली होती त्यांना वास्तविक राजे हे इंग्रज होते देशाचे आजही आणि तेव्हाही देशात कायदा प्रशासनिक मॉडेल हे इंग्र्जांचेच आहे . या राजावर हसायला येत मला ...
यांना छत्रपती शिवाजी व संभाजी राजांचे वंशज मानायचेच कसे? छत्रपतींनी सर्व नियम व्यवस्था स्वतः बनवल्या होत्या शूद्रांच्या घरी रोटी बेटी व्यवहार सुरु केले होते.सखु बाईंना दिले होते शूद्राला. शिवाजी राजांनी स्वतःला क्षत्रियकुलावतंस म्हणवून घेतले होते .हे ब्राह्मणी भट  धर्माचे गुलाम फुकाच्या धर्म संसदेचा दाखला देतात .आमच्याच उपकारावर जगणारे भटजी सांगतील का आमची जात ? अश्या राजा मुळेच समाज अधोगतीला गेलाय ......  
यांना मानणारे तुम्ही त्या भिक्षुकक्षाहीच्या त्या अधर्माच्या संसदेच्य निर्णयाला मानत आहात त्याचा पुरावा देत आहात वाह ... रे... वाह .. क्या बात है....?

पव्या तूच आमच्या पेक्षा जास्त गुलाम आहेस त्या भिक्शुक्षाहीच्या थोतंडाचा ..आणि आम्हाला चालले सांगायला म्हणे हिंदू धर्म थोतांड आहेत ब्राह्मण असे ण तसे . मग तूम्ही कशाला मानता  हे सर्व ??/  

  ४.  पुढे हे म्हणतात कि विविध आयोग जसे कि मंडळ आयोग आणि अन्य आयोगांनी मराठे हे जातीय आणी सामाजिक दृष्ट्या मागास आहेत. हे सिद्ध केलय.



प्रतिवाद: अरे एवढ सगळ होत तर मग तुच्या काँग्रेसनी सर्व पुराव्यानिशी वट हुकुम किंवा संविधान संशोधन करूनच सुधारित विधेयक मराठा आरक्षणाचे का नाही काढून घेतले?



  ५.  dr.पंजाबराव देशमुखांनी तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मराठ्यांना मागासच किंवा शूद्राच म्हटले आहे . मग मराठ्यांना आरक्षण का दिले जात नाही .
प्रतिवाद: मग आधीच द्यायचे होते कि आरक्षण .... 
का नाही दिले ? नाही तर नाही मग मराठ्यानंना गेली ७० वर्षे मागास का ठेवले .....




हे सगळे महामूर्ख लोक आहेत समाजाला फसवत आहेत ...



मराठा म्हणजे –

वाघाच्या जबड्यात घालतो हात मोजतो दात हि आमची जात .......

आणि ब्रिगेडी पुरोगामी लोकांची औकात फक्त हात वापरून घाण  घाण  लिहिण्याची...   





जय महाराष्ट्र 



Monday, 5 December 2016

my own answer to a whatsapp post on hatred for modi

उत्तर

पीएम.साहेब रडत रडत बोलतात की.. मी देशा साठी घरदार सोडले - त्याग केला.💥
कोणते घर सोडले साहेबांनी, आई वडिलांचे की यशोदाबेन चे...!!!

-----  नरेंद्र मोदींनी देशसेवेसाठी घर सोडले वयाच्या १५ व्या वर्षी पासून ते प्रचारक म्हणून अरुणाचल ते केरळ पर्यंत सेवाकार्य करत आहेत . ते गुजराती आहेत आसामी नाही लग्न झाल्यावर बायकोच्या  घरी जाणारे ! 

गुजरात राजस्थानमध्ये आधीच्याकली अगदी लहान वयात म्हणजे ७-८ वर्षे वयातच मुला मुलीनींची लग्ने लावली जात असत . तसेच मोदिजींचेही लावले गेले .मोठे झाल्यावर त्यांच्या बायकोचा गौना म्हणजे वयात आल्यावरच विवाहित मुलगी सासरी येते ते करावे लागते ते झाले नाही कारण मोदिजींनी संसार न थाटायचे ठरवले . कायद्याने १८ वर्षे वय झाल्यावर नवरा बायको दोघेही जर कोर्टात सिद्ध register करत नाहीत तर विवाह आपोआप संपुष्टात येतो . हा तुमचाच कायदा आहे गांधी वाद्यांनो. ते तरी लक्षात ठेवा . आयुष्य देशासाठी अर्पित केले त्यांनी . गांधी कुटुंबासारख पिढ्यानुपिढ्या लुटायची शिकवण नाहीय त्यांच्यावर .

साहेबांकडे कोणता राजमुकुट होता गौतम बुद्धां प्रमाणे ज्याचा त्यांनी त्याग केला...!!!
साहेबांकडे कोणती IAS  ची नौकरी होती सुभाषचंद्र बोस यांच्या सारखी जिचा त्यांनी त्याग केला...

--- ते राजा असते तर नक्कीच मुकुट त्यागला नसता बुद्धासारखा . पूर्ण प्रजेला एक व्यवस्थित शासन दिले असते रामासारखे ,शिवाजीराजासारखे .  बुद्धाला संसार करायचा नव्हता तर मग लग्नच का केले ??  बुद्धांनी बायको सोडली हा त्या स्त्रीवर अन्याय नाहीय का ??? 
सुभाषचंद्र बोसे हे जहाल विचाराचे होते . तुम्ही गांधीवादी एक गाल पुढे केला कि दुसरा पुढे करून फुकाची अहिंसा शिकवणारे . त्यांचे नावही घ्यायचा अधिकार नाहीय.
शेवट पर्यंत  मरमर मेला तो माणूस देशासाठी.गांधी नेहृसार्ख आगाखान palace मध्ये इंग्रजांची मेजवाणी नाही चाखली . अशा पोस्ट लिहून फिराव्नार्यांनो तुम्ही काय केले देशासाठी ? सोडून दाखवा न घर .. खूप मेहनत करून गुजरातला विकसित करून मोदिजी पंतप्रधान झाल आहेत , राजीव अन  राहुल सारख बापदाद्यांच्या भरोशावर नाही .



साहेब बँरिस्टर होते का महात्मा गाँधीजी प्रमाणे ज्यांनी सूट बूट सोडून स्वातंत्र्य चळवळीत जीवन झोकून दिले व पूर्ण आयुष्य एका पंचा त घालवले...!!!

------barister असणार्या गांधीमुळेच तर हि तर हि तारीख पे तारीख वाली अन्याय्प्र्णाली आहे देशात . मोदिजी राजे आहेत तुमचा गांधी बनिया होता . राजा व्यवस्थितच राहणार . तुम्ही एवढेच गांधीवादी आहात तर एकाच पंचात राहा. आणि हो गांधी आपल्या भाषणात कित्येक वेळा शिवाजी राजांना वाट चुकलेले असे म्हणत असत .याच्या रेकॉर्डस पण आहेत .ते रोज रामाचे नाव घ्यायचे रामभक्त होते ,. तुम्ही आहात का?? तुम्ही खान्ग्रेस्स्सी लोकांनी तर सर्वोच्च न्यायालयात रामसेतू तोडायला राम नावाचे काहीही नव्हते हि भाकडकथा आहे असे affedavit सदर केले होते. तेवा नाही सुचला हा गांधीवाद .

साहेब नेहरू सारख्या सधन परिवार चे चिरंजीव होते का ज्यांनी आपल्या आयुष्यातील 10 वर्षा पेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला...!!!
साहेब तर दहा लाखाचा सूट दिवसातून पाच वेळा बदलने म्हणजे त्याग समजतात काय...!!!


---- नेहरू गांधींना इंग्रज विशेष सुविधा द्यायचे तेवा आणि हो नेहरूंनी कधीच १० वर्षे वगरे नाही  घालवली तुरुंगात . नेहरूंनी डिस्कवरी ऑफ india मध्ये शिवाजी राजांना चक्क लुटेरा म्हटले आहे अशा माणसाची लायकीपण नाही मोदींशी तोलायची .तुम्ही नेहरू समर्थक आहात म्हणजे शिवाजी राजांना ज्या दृष्टीने नेहृने पहिले तशीच तुम्हीसुद्धा मोदींना बघता .
तो सुट भेटलेला आहे विकत नाही घेतलाय .आणि तो नीलाम करून पैसे गरिबांना वाटले आहेत .रोज काही दहा लाखाचे कपडे नाही घालत आमचे पंतप्रधान . नेहरू नाहीय परिस वरून कपडे इस्त्री करायला



प्रायव्हेट विमानातून लक्ष्मी पुत्रांना फायदा पोहचवन्या साठी जग प्रवास करने म्हणजे त्याग आहे का...!!!

--- व्यापारी गुंतवणूक यावी म्हणून फिरतात मोदिजी . निवेश आला कारखाने कंपन्या आल्या तरच नोकर्या निर्माण होतील .देश पुढे जाईल म्हणून फिरतात .जग फिरून पाकिस्तानला एकटे पाडण्यात देश यशस्वी झालाय . एक नागरिक म्हणून तुम्ही कोणता त्याग केलाय ????




करोडो च्या गाड्या मधून फिरता 500 कमांडो च्या सुरक्षा घेऱ्या त राहता आणी जिवाला धोका आहे असे गळे काढता...!!!

पी एम  ची जी गाडी आधी होती आजही तीच आहे तुमच्या लाडक्या मौनिबाबाची .
५०० कमांडो असलेल्या नेत्यांचीही हत्या झाली आहे जगात . मोदिजी हिट  लिस्टवर आहेत हे गुप्तचर खात्यानीही सांगितले आहेत




पी एम.साहेब देशाच्या सर्वोच्च पदावर आहात तुम्ही, सर्व यंत्रणा तुमच्या हातात आहे, कोणाकडून धोका आहे तुमच्या जिवाला.. गाठोडं वळून आत टाकु शकत नाही का तुम्ही त्यांना...!!!

गाठोड वाळल तर तुम्हीच लोक केकाटत सुटतंय .धोका देशाच्या बाहेरून आहे अंतर्गत नाही. तुमच्या थोरपराक्रमी गांधी नेहरू सरकारने देश एवढा बिघडू दिला म्हणूच हि वेळ आलीय   त्यांना कधीतरी विचारलाय का हा प्रश्न.


साहेब देशाचे पंतप्रधान आहात तुम्ही 125 करोड पेक्षा जास्त जनतेचे प्रतिनिधि आहात तुम्ही त्या पदास साजेशी भाषा वापरा, सोशल मिडिया तील ट्रोल ची भाषा वापरणे शोभत नाही तुम्हाला...!!!

अच्छा मग मी काय तुमच्या राहुल सारखा छोटा भीम बघू का आणि शेटजी भटजी न्सारखा गोड्बोली भाषा वापरू ??


 
पण सर्व मोदी भक्तांना एकचं प्रश्न विचारावा वाटतो.... 
किती काळा पैसा बाहेर आला...? 

आताप्र्यन्त्चे आकडे जारी केले आहेत पुढचे आणखी करूच. यामुळेच येणाऱ्या बजेटमध्ये तुमच्यातील सरकारी लोकांना साडे तीन लाखापर्यंत कर मुक्त उत्पन्न करतोय ./


सव्वाशे कोटी जनतेच्या घरांची व खिशाची झडती घेतली तुम्ही...! 
होतं नव्हतं तेवढं बॅंकेत टाकलं... ! 
हा काळा पैसा वाटतो काय ..
??? 

झडती मोठ्या लोकांची घेतलीय मी.
 गरिबांच्या खात्यात काळा पैसा असणार्यांनी पैसे ओतले हे सत्य नाहीय का. फक्त जुन्या नोटा बँकेतून बदलाव्या लागल्या गरिबांना . धन्नासेठा सारखी अमाप कमाई  नाही बुडली त्यांची  


भक्तांनी डोळ्यावर पट्टी बांधली असेल... 
पण मनमोहन सिंग सारखा तज्ञ बोलतो ते खोटंयं का..
.??? 

मन्नू तज्ञ आहे म्हणे हा हा हा ! किती जोक माराल . सर्व देश बुडवला या माणसांनी . कागदी डिग्री ला  काही अर्थ नसतो . जमिनीवर काम करावे लागते .  १० वर्ष दिली न यांना मग काय केल सोनिया म्हणजेच आपल्या antonia maeno च्या बोटावर नाचले . अशी फुकाची शेखी मिरवणारे काहीच करू शकत नाही .

जागतिक ख्यातीचे dr. भगवती. स.गुरुमूर्ती सुब्रमण्यम स्वामी या सर्वांनी स्तुतीप्न केलीय टी दिसत नाही लोकांना .


ज्या मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीत देश वाचवला... दहा हजारी पगारदार पन्नास हजार पगार घेवू लागला....! 
ही अर्थक्रांती नव्हती काय...??
? 



आर्थिक मंदी युरोपात होती . भारत देशाची  अर्थव्यवस्था मिश्र स्वरुपाची आहे .हि कृषी छोटे घरगुती उद्योग सरकारी नोकर्या यांवर ६०% अवलंबून आहे म्हणून वाचली.
आपण अमेरिकी आणि आखाडी देशांचे खाण्याप्सून वापर्ण्यापार्यान्त्च्या सामाणासाठी गुलांम नाही म्हणून वाचलो . शिवाय भारतीय माणूस हा खर्चिक नाहीय युरो अमेरिकन लोकांसारख आपण साठवनुकीवर भर देणारे लोक आहोत . देशातील ८०% लोक पैसा साठवून ठेवतात ह्या एतद्देशीय saving mentality मुले देश मंदीतून वाचला .  मोठ्या कंपन्या बुडल्याच मान्नुच्या काळात इन्फोसिस विप्रो reliance वगरे त्यांना हा का वाचवू शकला नाही???

अरे बाबा पगार वाढला तो रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे . जे २००४ ला १०००० ला मिळायचे ते आता२०१३-१४ ला  ५०००० ला मिळते . फक्त आकडा वाढला . पगार नाही रे मित्रां कसा रे तू आपल डोक law कि जरा .... आज लाखाला किंमत नाहीय कारण रुपया १० वर्षात पडला .


अरे भक्तांनो अपप्रचाराची पण पध्दत असते... 
व्यापार्यांच्या हातात देश गेला की कशी झडती होते याचं आत्मचिंतन करावे वाटत नाही काय..??? 
व्यापारामुलेच देश अर्थव्यवस्था  चालते . व्यापार विरोधी आहात तर मग भाजी पाला पासून  पेट्रोल पर्यंत वस्तू विकत घेऊ नका तशेच जगा  
सध्या सरकार आमचे आहे आणि अपप्रचार तुम्ही करताय जसा १२ वर्षे पुरोगामी दिल्लीच्या मिडीयाने मोदींना ३ वेळा निवडून आणल्यावरही बदनाम केल तसा . साले लालू मुल्ला मुलायम हे बदमाश नाही आणि काम करवून दाखवणारा माणूस बदनाम आहे. विदेशी पैसा कॉंग्रेसकडून असलेले पाठबळ यांचे जे लोक स्वतः गुलाम आहेत ते आम्हाला विचारतात वाह रे वाह !

आम्ही निश्चितच मोदी  भक्त आहोत तुमच्यासारखे कॉंग्रेसचे गुलाम नाही. भक्ताला देवाशी भांडता येते  शिव्या घालता येतात .देव व निष्ठा बदलता येते .जसे  आमचा विष्णू बळीराजाच्या भक्तीमुळे त्याच्या राज्याचा चौकीदार पण  होतो .कृष्णासारखा मित्र पण होतो . तुम्हा गुलामांना यातले एकही करता येते का ?? नाही.फक्त तुमचा वैचारिक मालाक congress सांगेल ते वेळोवेळी बोलायचे .आपल डोक काही लावायचे नाही . धडावर डोके तुमच्या नाहीय .
म्हणूनच भक्ती कधीही चांगली गुलामीपेक्षा .


धावणारा देश रांगेत उभा केला यात कसली आलीय अर्थक्रांती...??? 
विचार करा... देशप्रेमाची गोळी देणार्यांच्या मातीत ( गुजरातेत) जवान किती झालेत..?? 


--- हा प्रस्ताव महार्ष्ट्राच्या अर्थक्रांती संघटनेचे अजय बोकील आणि त्यांची टीम गेली १६ वर्षे सांगतायत आम्ही त्यांचे ऐकून हे केले आहे .आपल्याच मनानी नाही . आम्ही काहीतरी वेगळे करतोय नेहमीसारख routine सरकार नाहीये हे . देशासठी लढणारे जवान यांची प्रांतीय अस्मिता नसते आणि किती लढले याचा हिशोब ठेवायला आम्ही काँग्रेसी नाही .यांनी तर मुस्लीम किती याचा हिशोब काढायचा प्रयत्न केला होता.जवानानंची जात काढण्याची भाषा खूप शोभून दिसते कॉन्ग्रेस्स्जान्नांना . 


त्या सरकरनं सैन्य भरतीसाठी कधी सैनिक स्कूल काढलेत काय...??? 

रक्षा खाते हा केंद्राचा विषय आहे राज्याचा नाही . जेवढे जवान लागतात तेवढी भरती संरक्षण मंत्रालय करत असते सैनिक school राज्य शासन काढत नसते रे बाबा . मोदी  विरोध करायचा म्हणून काहींही लिहितात लोक . माहित नाही ण काही नाही चालले लिह्हाय्ला पप्प्पूचे मित्र


सीए व मॅनेजमेंन्ट च्या शाळा काढून देशातल्या जनतेला लुटणारे हे... आता देशभक्तीचा गळा काढून देशचं लुटत आहेत...!!! 
सावध व्हा.. अंधभक्तीतून मुक्त व्हा...!!!!


ca ची शाळा नसते ग काकू त्यासाठी icai नावाचे केंद्रीय central  राज्याचे नाही देश स्तरावरचे एक institute असते ते परीक्षा घेते . आणि शिकवणी बाहेर लावाव्या लागतात .आपल्या महाराष्ट्रातच जास्त लोक  ca होतात कारण इथे tutions ची सोय जास्त आहे .  management चे colleges देशात सर्वीकडे आहेत फक्त गुजरात मधेच नाही .  काहीही बोलतात लोक.


देश एवढी वर्षे  कॉंग्रेस नि लुटला ७० वर्षात लोकांना साधे अन्न वस्त्र निवाराही देता आला नाहि.याचा जाब विचार आधी .
अंध्भक्ती तुम्ही करताय आम्ही नाही .मोदी द्वेष गेली १५ वर्ष चाललाय देशात राहिला भक्तीचा प्रश्न तर आम्ही टी  आत्ता आता करायला लागलोय त्या माणसांनी आपले कर्तुत्व सिद्ध केल्यावर . चार पिढ्यांपासून एका कुटुंबाचे गुलाम नाही आम्ही .




हि पोस्ट सर्वीकडे जाणार आहे तेव्हा सर्वांनो एकच सांगतोय स्वतः शहनिशा करायला आई लिहायला शिका याचे त्याचे उष्टे


पसरवण्यापेक्षा दिसामाजी काहीतरी ते लिहावे हा मंत्र आचरणात उतरवा .