Tuesday, 4 September 2018

कृष्ण....!

कृष्ण

लहानपणी आपल्यासारखा एक छोटू बाला आपल्याला घरच्या  देव्हाऱ्यात बसलेला दिसतो. टकलू आणि नंगु असतो तो मग त्याला रोज आंघो ळ घालून मस्त अष्टगन्ध लावून छान मऊ कपडे घालून पाळण्यावर बसवताना सगळे आपण मोठे झालो पण तो कृष्ण आजही तितकाच आणि तसाच आहे तेवढाच गोंडस निरागस मोठे डोळे सगळीकडे फिरवून बघणारा सर्वांना आकर्षणारा द्वारकधीश कृष्ण. स्वतःचे नाव सार्थकी लावणारा एकमेव देव म्हणजे कृष्ण लक्ष्मी ची पूजा करा ती सर्वांना प्राप्त होत नाहीं. पण कृष्ण म्हणजे काळा नाही. कर्षती आकर्ष यति स: कृष्ण:. आकर्षणारा तो म्हणजे कृष्ण. तो आकर्षून ठेवतोच .



घरी लोणी काढलं कि पहिला वाट त्याचाच एक बाळ नेहमी सर्व घरात असते ते म्हणजे कान्हा। ज्याला त्याची आई दोऱ्यात बांधून ठेवू शकली नाही. तो कृष्ण ज्याने ब्रह्मांड स्वतःच्या सामर्थ्याने बद्ध केले तो कृष्ण हे लिहितांना माझे मन दास्यत्वात गेलय त्याच्या कारण तो कैवल्य देणारा मुकुंद आहे. पूर्णावतार आहे योगेश्वर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचा देव कुठला असेल तर तो हा प्रेमातून शाश्वत सुख देणारा राधावल्लभ.

सुनीतीचा महामेरू आणि चंचलतेचा कारक. सत्य आणि त्रेता युगातून मृत्यू लोकांस नवे तत्वज्ञान देणारा दार्शनिक. अगाध प्रेम शिकविणारा कायस्थ , भौतिक जगात शांती स्थापविणारा क्षत्रिय आणि अद्वैताचं ज्ञानामृत पाजणारा विप्र, परसावी च्या हातून केळाची साले खाणारा शूद्र आणि चातुर्वर्ण सृजन करणारा चतुर्भुज श्रीहरी. जिथे मन त्याच्या श्वासातल्या बासरी तुन निघणाऱ्या वृंदावनी सारंगाला कायमचे वश होते असा मुरली मनोहर.  सगळे राग त्याचे ख्याल, प्रेमाची गीते, शृंगार म्हणजेच कृष्ण. नीर भरन कैसे जाऊ सखी अब या टिलक कामोद रंगापासून ते बन बन ढुंढन जाऊ या वृंदावनी सारंग पर्यंत प्रत्येक राग त्यालाच वाहिलेला आहे.



धर्मवार कायम तटस्थ असणारा निश्चल आणि धर्मासाठी रणांगण पळून जाणारा रण छोड अन्यांस हसवून मग त्यांचे हसे करणारा हा महायोद्धा. ऐहिक सुख दुःखाच्या वर शाश्वत सुख प्रदान करणारा केशव गलीमल हरण नाम. गोपिकाप्रिय रासरसेश्वर तडत ध्वीती.

बस यापुढे केवळ कृष्ण कृष्ण आणि कृष्णच.

©Sagar Ghorpade

No comments:

Post a Comment