1) १९९८-९९ च्या काळात मायावती, जयललिता आणि ममता बॅनर्जी यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नाकात दम आणला होता. मंत्रिपदावरून हट्ट आणि अडेलतट्टू भूमिकांमुळे वाजपेयीं कोंडीत सापडले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अटलजींना सांगितले होते, ....की शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचे मी राजीनामे घेतो. आमच्या वाट्याची दोन मंत्रिपदे त्यांना द्या. पण तुमचे सरकार राष्ट्रहिताचे आहे. ते वाचले पाहिजे.
(२) गुजरात दंगलीच्या वेळेस भाजप मधले सगळे वरिष्ठ नेते मोदी हटाव च्या बाजूने होते, तेव्हा बाळासाहेबांनी वाजपेयी अणि आडवाणींना निक्षुन सांगितले, "मोदी गया तो समझो गुजरात गया". बाळासाहेब मोदींच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहिले आणि मोदी मुख्यमंत्री म्हणून टिकले,जर मुख्य मंत्री पद गेले असते तर, मोदी राजकारणातून 15 वर्षपूर्वीच बाहेर पडले असते,
(३) उत्तर प्रदेश.., पिलिभीत मधे संजय गांधी यांचे पुत्र भाजप नेते"वरून गांधी"यांनी.., एका भाजपच्या कार्यक्रमात मिडिया समोर बोलले होते की.., "अगर कीसीने हींदु के उपर हात उठाया..,तो वो हात मे काट डालूंगा"त्यांना अटक झाली त्या वेळी भाजप ने त्यांची साथ सोडली होती मग बाळासाहेब त्यांच्या पाठिशी ठाम पणे उभे राहिले.,, वरून गांधी जेल मधून सुखरूप बाहेर आले
(४) मुंडे साहेब जेव्हा भाजप मधे खुप नाराज होते आणि भाजप सोडून कॉंग्रेस मधे जाण्याच्या तयारीत होते.., तेव्हा बाळासाहेबांनी मुंडेंना मातोश्री वर बोलावले आणि गणपतीच्या समोरील भगवा टिळा मुंडेंच्या कपाळावर लावला.., आणी साहेब बोलले की गोपीनाथजी ह्या भगव्याचा रूबाब कमी होऊ देऊ नका..,मुंडेचा निर्णय बदलला मी मरे पर्यंत भाजप मधेच राहणार.., माझं मृत्यू नंतर माझे मृतदेह भाजप कार्यालयातूच उठेल..,
(५) गुजरातचे मुख्यमंत्री असताना शंकर वाघेला त्यावेळी नरेँद्र मोदिँवर नाराज होते...., ते शिवसेनेत येण्यास तयार होते.., पण बाळासाहेबांनी त्यांना रोखले आणि युती धर्म पाळला..., जर ते शिवसेनेत आले असते तर (शंकर वाघेला गुजरात मधे शिवसेनेचे मुख्यमंत्री असते)
शिवसेनेने नेहमीच भाजपाला आणि भाजपा नेत्याना अडीअडचणीत मदत केली.. सोबत खंबीरपणे उभे राहिले.. कदाचीत हेच शिवसेनेच चुकल.. मैत्रीधर्म शिवसेनेने स्वतःच्या सन्मानापेक्षा आणि राजकिय महत्त्वकांक्षे पेक्षा जास्त जपला... त्याचच हे फळीत
No comments:
Post a Comment