Saturday, 28 January 2017

*!!मराठयांच्या इतिहातील एक सोनेरी दिवस!!

........🚩जय भवानी🚩 ...........       

                            *!!मराठयांच्या इतिहातील एक सवर्ण दिवस!!*
*१)----------*आज तोच दिवस आणि  तीच रात्र आहे. आषाढ  पौर्णिमा शके १५८२:श्रीगुरूपौर्णिमा .छत्रपतीशिवाजीराजे  सिद्दी जौहरचा वेढा भेदून नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या समवेत किल्ले पन्हाळा वरून किल्ले खेळण्याकडे(विशाळगड)निघाले.
 महाराज्यांची रात्री १०वाजता गड सोडला. शिवाजीराजांनी स्वतःच्या बचावाकरीता एका पालखीत शिवाजी(शिवा काशिद)नावाच्या सारखा दिसणाऱ्या  एका न्हाव्यास बसून ती पालखी नेहमीच्या लवाजम्यासह नेहमीच्या रस्त्याने पाठविली व स्वतः दुसऱ्या पालखीत बसून दुसऱ्या जास्त अवघड रस्त्याने निघाले .शत्रूंनी पहिली पालखी चांदण्यात सहज पकडली व गोटात आणली.शिवा न्हाव्या मुले महाराज शत्रू पासून दूर जाऊ शकले.आपला मृत्यू अटळ असूनही शिवा काशिद हसत हसत पालखीत बसला कारण   शिवाजी महाराज बनण्याची संधी भाग्यवंतालाच मिळते.                 

                                                 Image result for bajiprabhu deshpande

 *🚩नरवीर शिवा काशिद ह्यांना त्रिवार मुजरा*.


 *२)-----------*रात्री छत्रपती शिवाजी महाराज रायाजी बांदल बाजी प्रभू देशपांडे त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे आणि ६००मावळे प्रत्येकाकडे हत्यार भाला ,विटा ,पट्टा, तरवार,गुर्ज, कट्यार ,वाघनख,बिचवा सोबत घेऊन महाराज्यांची पालखी भर पावतात नेली. तुम्ही आज थोडा  अभ्यास करा बाहेरच वातावरण बघा कि आपण ५किलोमीटर तरी जाऊ शकतो का शेतातून भर पावसात.महाराज्यांची पौर्णिमेच का निवडली? मग तुम्हाला तिथीच महत्व कळेल.




*३)----------*स्वप्नातलेही वचन पाळतो आम्ही महाराजांना आम्ही वचन दिल आहे.

दोन प्रहर (१प्रहर३तास)पर्यंत खिंड झुंजवत ठेवतो.तिथवर तुमी विशाळगड गाठा गनिमास रीतभर पुढे सरकू देत नाही.झुंज होणार आम्ही सर्व झुंजू .तोफे आधी ना मरे बाजी सांगा मृत्यूला.



*४-----------*रात्रभर धावून सर्व दमले होते.दिवसाच्या पहिल्या प्रहरी शिवाजीमहाराज पांढऱ्या पाण्यावर विसावतात न विसावतात तोच पिछाडीवरील टेहळ्याने  मलकापूरच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येत असल्याचे रायाजी बदलास सांगितले.बाजी प्रभूनी त्वरित निर्णय घेऊन पांढरे पाणी तिढ्यावर २५धारकरी ठेवण्यास रायजीस सांगितले.अजून शत्रूस निश्चित मग लागला नोव्हता.हे लक्षात घेऊन आणि विजापुरी सैन्याची संख्या लक्ष्यात न येऊन त्या २५धारकऱ्यांवर विजापुरी सैन्य रोखण्याची कामगिरी सोपवण्यात आली.अणुस्कुराघाटाची आम रस्त्याची तत्कालीन वाट सोडून महाराज उजवीकडील प्राचीन लमाण वाहतूक घोडखिंड मार्गाने निघाले.कळत नकळत पांढऱ्या पाण्यावरील मसलतीत ठरविल्याप्रमाणे मार्गस्थ होईपर्यंत त्या दिवसाचा पहिला प्रहार संपून दुसरा प्रहर चालू झाला.





*५)------------*विजापुरी घोडळाची तुकडी पांढर पाणी येथे आली आणि " हर हर महादेव"गर्जना  करीत मराठा वीर आषाढातील विजेसारखे कडाडले.
त्या २५धारकऱ्यांनी तुंबळयुद्ध केलं .त्या वीरांपुढे समोरून येण्याची कोणाची हिम्मत नोव्हती.विजापुरी वाढत्या लोंढ्यापुढे ते जास्त काळ टिकाव देऊ शाकले नाही .त्यांना घेरून पाठीमागून वार केले गेले.ह्या रणधुमाळीत हे २५वीर मारले गेले .पण सिद्दी मसूद  मात्र फसला महाराज पुढे गेले असावे समजून त्याने "येळवण जुगाई"पर्यंत घोडदौड केली.आता दिवसाचा दुसरा प्रहर पण संपला दुपारचे१२वाजले .रायजीचा सेनापती या नात्याने बाजी प्रभू पुढे सरसावला आणि घोडखिंडीच्या पलीकडील मुखावर  बाजी प्रभू ह्यांनी उभ्याउभ्याच निर्णय घेतला.३००मावळ्यांचा एक गट करून उर्वरित मावळे पालखीसोबत नेमले.महाराजना पालखीतून बाहेर येऊ दिले नाही.आणि जबरदस्त आत्मविश्वासाने महाराजांना शब्द दिला.महाराज आपण नि्मे लोक घेऊन गडावर निघोन जाणे.तो पावेतो ह्या खिंडीमध्ये आपण नि्मे  मावळेंनीसी दोन प्रहर पावेतो आपल्या पाठीवर दुष्मनाची फौज येवो देत नाही.गनीम थोपवोन खिंड चढो देत नाही.साहेब नोघोन जाणे.आपण साहेब कामावरी मारतो.साहेब कामावरी पडलो तरी मुलालेकरास अन्न देणार महाराज आहेत.शिवराय म्हणाले ,उत्तम किलियावरी पावलो म्हणजे तोफेची इशारत करू नंतर तुम्ही निघोन येणे.खिंडीतील मावळ्यांचा व बाजींचा  मुजरा स्वीकारून महाराज खिंडीतून घोडमाळावरून रवाना झाले.



                                              Image result for baji prabhu deshpande घोडखिंड
*६)----------*महाराज्यांची पालखी जाताच मावळ्यांनी बाजींच्या सांगण्यानुसार  दगडांच्या राशी ठीक ठिकाणी जमा करण्यास सुरवात केली.कुणी गोफणीतून मारा करण्यासाठी वाटोळे दगड जमा करत होते तर काही मोठ्या शिळा जमा करत होते.झाडाझुडपात लांबलचक फळी उभारून फार मोठी संख्या असल्याचा भास केला.गनिमिकाव्याच्या युद्धात कसलेली ति बांदलांची ती फौज बाजींचे आदेश क्षणात आकलन करीत होती.जीत पर्यंत गनीम कासारी चा ओढा ओलांडून घोडमाळ चढून वर येत नाही तो वर कमरेच्या समशेरील हात लावायचा नाही.गोफण गुंड्याचा मारा आणि वर येत असलेल्या गनिमावर शिलाखंड लोटून गनीम थोपवायचा.महाराजांना विशाळगड पोहचण्याचा अवधी द्यायचा,हे सर्व मावळ्यांना ध्यानी होते. *७)-----------*सिद्दी मसूद आणि फाजलखानच्या घोडदळांच्या टापा घोडखिंडीच्या जवळ येऊ लागल्या.पहिली टोळी खिंडीत थबकली आणि मराठ्यांच्या गोफणी भराभर गरगरल्या आणि त्या टोळीवर उल्कापात झाला .अकस्मात झालेल्या हल्ल्याने घोडे आणि स्वार जखमी झाले आणि माघारा फिरले.दुसरी टोळी आली मागे फिरली .तिसरी टोळी आली मागे फिरली.चौथी आली.पाचवी आता मात्र खिंडीच्या तोंडावर येण्याची कोणाची हिम्मत होईना.खिंडीपासून काहीसे दूर राहून मसूद आणि फाजल विचार करू लागले.खुद्द शिवाजी महाराज खिंडीत युद्ध करण्यास उभे आहेत अस वाटलं. आणि फाजल ला आठवले प्रतापगडावरचे रण. मसूद शिवरायांच्या गनिमी काव्यापासून अपरिचित होता.म्हणून तो खिंडीत आला त्याला तिथे कुणी दिसले नाही



पण वरून गरगर करत येणारे दगड गोटे गनिमंचा वेध घेत होते.ताज्या दामच घोडदळ येईपर्यंत मसूद ने माघार घेतली.मसुदने आपल्या सैन्यास दोन्ही बाजूनी जाण्यास मार्ग आहे का बघण्यास सांगितले.परत आलेल्या सैनिक म्हणाले दोन्ही बाजूनी खोल दरी आहे .जाण्याचा हाच एकमेव रस्ता आहे .पुढे जावं तर दगडांचा वर्षाव होतो .आणि  वर गच्चं रानामुळे किती मावळे आहेत हे कळेना मसूद व फाजलने हाय खादली. तेव्हा दिवसाचा तिसरा प्रहर (दुपारचे३वाजून गेले) उलटला.




*८)-----------*आता मात्र पिडनाईकाच्या पायडळाची मदत पिछाडीस येऊन आता तिघेही अवसान बांधून पुढे सरसावले.खिंडीचा उत्तर उतरू लागले .गोफण गुंडे गरगरत होते पाऊस कोसळत होता.मेलेल्या घोडयांच्या आणि जखमी मानवी मुडद्याना ओलांडून शे-दोनशे लोक ओढ्यात पोहचले बाकीचे त्यांना रेटा करून बिलगले आणि आता खिंडीचा चढ चढणार तोच वरून शिलाखंड घोडदळावर आढळू लागले.घोडे जायबंदी होऊ लागले .ते पाहून पिडनाईकाच्या पायडळाने कच खादलि. मराठी सैन्याचा मागमूस लागत नोव्हता.वरून रानभर चहूंकडून दगडाचा वर्षाव होत होता.एका झुडपा आडून दगड मारला कि मराठा दुसऱ्या झुडपातून शिळा लोटी त्यामुळे मराठे असंख्य असल्याचा भास होत होता. अश्या प्रकारच्या युद्धाची विजापुरी सैनिकस कल्पना नोव्हती.त्याच्या हातातील नागवी तलवार त्याच्या हातातच राहिली.ते मात्र न लढतच धरणीवर उताणे पडून आसमान पाहू लागले.काही पालथे पडून धरणी चाटू लागले.अदृश्य राहून मावळ्यांनी मांडलेल्या दगडी युद्धात विजापुरी घोडदळानें माघार घेतली.            





*९)------------*आता मात्र पिडनाईकाचे घोडदळ पायउतार झाले .सिद्दी मसूद आणि फाजल खान यांनी एकत्रित खिंडचढण्याचा प्रयत्न केलं .आता विजापुरी लोंढा वाढत होता.आता मात्र हातघाईची लढाई होणार होती दिवसाचा तिसरा प्रहार कधीच संपला होता.झाडाझुडपातून एकच आवाज आसमंतात गुंजला "हर हर महादेव"
"जय भवानी जय शिवाजी" तिथून आवाज येत होता अल्लहु अकबर दिन दिन.मराठ्यांच्या फळीच्या  मध्यावर दोन्ही हातात पट्टे घेऊन साक्षात शिवशंकर ह्यांचे भैरवस्वरूप बाजी गर्जत होते.पट्टे फिरताना रणमंडल विस्तारले जात होते.त्या लवळवत्या शेष्याच्या जीभासमोर विजापुरी सैन्या कच खाऊ लागले.बाजी समोर कुणाची येयची शामत होईना .बाजी गनिमास ललकारत यार म्होरं विजापुरी सैन्य मागे हटे. आता मात्र गनिमांची संख्या वाढत होती.बाजी आपल्या मावळ्यांना सांगत राजे पोहचले नाही गडावर हि खिंड झुंजवत ठेवायची आहे .तेव्हढेच मावळे त्वेषाने लढत.आता मात्र मराठ्यांची संख्या कमी होऊ लागली.
एक एक मावळा दहा जणांचे वारं झेलत होता पर्तवत होता.ज्याची ढाल तुटली त्यां मराठ्याने शत्रूचे वारं डोईचे पागोटे हातात गुंडाळून त्याचावर झेलले.ज्या मराठ्यांचे खडग तुटले त्याने भाला हाती घेऊन पवित्र घेतला.ज्या मावळा जवळील भालाही मोडला त्या मावळ्याने कमरपट्ट्यातील खंजीर काढून सिहं व्याघ्रावत झेपावत शत्रू रोखला.सरतेशेवटी स्वरुधिराने न्हाऊन कोसळत होता पण अपसव्य हातातील पकड दिली होत नोव्हती.



                                              Image result for bajiprabhu deshpande


*१०)-----------*सिद्दी मसूद वैतागला होता .बाजींना पाहून तो फाजल ला म्हणतो आदमी नही ये शैतान हे .आणि बाजी खिंडीत असे पर्यंत आपण खिंड पार करू नाही शकत हे सिद्दीला समजलं होत .बाजी गर्जत होते पट्टा आसमंतात फिरत होता शत्रूचा वेध घेत होता.अक्षरशः देवांनाही हेवा वाटावा अस युद्ध या पावनखिंडीत चालू होत .वय वर्ष ५०आठ मुलांचा बाप आणि काय हे शौर्य काय हि स्वामीनिष्ठा.असंख्य घाव झेलून बाजी खिंड लढवत होते.रुधिराने अंग शेंदूर फसलेल्या हनुमंता प्रमाणे भासत होते.आता मात्र सिद्दी मसूद ने मागे असलेल्या पिडनाईकाचे बंदूक धरी सैन्य मागवलं ते दहा जण खिंडी पाशी आले  त्यांनी बंदुकी बाजींवर रोखल्या बंदुकीचे दहा बार उडाले .त्यातील एक गोळी बाजींच्या दंडात शिरली फिरणारा पट्टा थांबला विजापुरी सैन्यानी बाजींनी कोंडी केली. एका हाताने बाजी तरीही पट्टा फिरवीत होते जस रक्त जळत जयी तसे बाजी हतबल होई असंख्य वार बाजींवर झाले.बाजी धरणीवर पडले.अजूनही अंगात रग होती.मागच्या मावळ्यांनी बाजी पडले पाहताच धाव घेतली  जोरदार मुसंडी मारली विजापुरी लोंढा माघे केला बाजींना  मावळ्यांनी मागे नेलं शीर तुटलं तरी धड लढतय.हा पराक्रम पाहण्यासाठी मृत्यूचा देव यम तो पण थांबला बाजींनी मावळ्यास विचारले तोफांचा बार झाला कि नाही .मावळा म्हणाला बाजी तुम्ही आराम करा आम्ही खिंड लढवतो. म्हणजे तोफेचा बार झाला नाही तोवर हा बाजी मरणार नाही वचन दिल आहे आम्ही राजांना ,स्वप्नातीलही वचन पाळतो आम्ही, बाजींनी आपला विटा मागविला त्याच्या आधार घेत बाजी पुन्हा खिंडीत गेले.बाजींना पाहून विजापुरी सैन्य मागे होई.कि ज्याच्या अंगावर घावाला जागा नाही त्याच्या दंडात गोळी लागली आहे .तरी तो विटाचा आधार घेत खिंडीत उभा आहे.तोवर तोफांचे तीन बार झाले  धडाम धूम बाजींच्या चेहऱ्यावर अक्राळविक्राळ हास्य उमटले धन्य झालो. 




राजे तुमच्या बाजींने शब्द पळाला दोन प्रहर हि खिंड झुंजवत ठेवली.महाराज ह्या बाजीचा तुम्हाला अखेरचा मुजरा .बाजी धरणीवर कोसळले उरलेले ५,५०मावळे जंगलात पसार झाले.चिडलेल्या मसूद ने घोडदल अंगावर घातले.विशाळगड खाली असलेला दळवी आणि सर्वे ह्यांचा वेढा मारून महाराज संध्याकाळी ६ला गडावर पोहचले.महाराजांनी लगेच बाजींसाठी पालखी पाठवली कधी बाजींना घट्ट मिठी मारतो अस महाराजांना झालं होत.आजवर कित्तेक युद्ध बाजींनी शिरावर घेतली होती.आणि एव्हड्या मोठ्या संकटातून बाजींनी राजांची सुटका केली हाती.थोड्याच वेळात पालखी घेऊन मावळे आले राजे म्हणले शेला आणा आम्ही स्वतः बाजींना घालणार मावळ्यांनी राज्यांचा हात धरला .तुम्हाला बघवणार नाही.राजांनी पडदा बाजूला केला जगदंब जगदंब जगदंब शरीरावर कुठे जागा नोव्हती चेहऱ्यावर सुद्धा वर होते.तुटलेल्या मनगटात अजून पट्टा घट्ट पकडलेला होता.जणू काही थोफांचा बार झाला नसता तर हे मनगट लढत असत.हातातील पट्टा बाजूला काढून राजांनी बाजीचा हात हातात घेतला.गहिवरून आलेले राजे म्हणाले का मला अशे सोडून चालत मी राजा झाल्यावर मिरवणारी कोण नाचणार कोण .महाराज्यांनि बाजी आणि मावळ्यांचा अंतविधी पार पडला.आणि महाराज कोकणात उतरले.



*!!इथेच फुटला बांध खिंडीला बाजीप्रभूच्या छातीचा !!*
*!!इथेच फुटली छाती परिना दिमाख हरला जातीच!!*



🚩नरवीर बाजी प्रभू देशपांडे ह्यांना त्रिवार मुजरा.


*आपण आज या युद्धाची आणखी माहिती घेऊ.*




*१)*किल्ले पन्हाळा ते विशाळगड हे अंतर ४२मैलांचे आहे.म्हणजे ६७किलोमीटर हे अंतर पार करण्यासाठी महाराजांना ७प्रहर म्हणजे(१प्रहर३तास)२१तास लागले.बाजींनी खिंड दीड प्रहार रोखली म्हणजे साडेचार तास.महाराज विशाल गडावर संध्याकाळी६वाजता पोहचले.म्हणजे महाराज घोडखिंडीत दुपारी१२च्या आसपास पोहचले .म्हणजे महराज्याना पन्हाळ गड ते पावनखिंड

येण्यासाठी जवळपास१५तास लागले हे अंतर ५०किलोमीटर आहे.
पावनखिंड ते विशाळगड फार दूर नाही १७किलोमीटर दूर आहे.

*२)*महत्वाचा मुद्दा महाराजांनी विशाळगड का निवडला?

त्याच उत्तर आहे.स्वराज्याच तोरण बांधताना महाराजांनी बरीच राजकारण केली आहेत.युद्ध न करता सर्व काही मिळवायचं स्वराज्य वाढवायचं .महाराष्ट्रात बरेच छोटे मोठे स्वयंघोषित राजे होते.त्यातील एक होते.जावळीत मोरे जवळी ८संघ राज्य होती.त्याचा एक प्रमुख होता तो राव बिरुद धारण करी.हणमंतराव मोरे ह्यांची मुलगी उपवर होती.म्हणून महाराजांनी हणमंतराव मोरेशी सोयरिकेचे बोलणे केले.पण आडदांड मोरेने नकार दिला.पण हीच संधी पाहून विशालगडावरील शंकरराय मोरे ह्यांनी संधी साधली आणि आपली उपवर मुलगी शिवरायांना दिलि.लक्ष्मीबाईसाहेब शिवराज्ञी झाली.शंकरराय मोरे ह्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला म्हणून महाराजांनी त्यांना विरारे म्हटलं


पुढे मोरे ,विचारे उपनाम पावले.

आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल कि महाराज न सांगता विशाळगडावर का गेले.कारण ते लक्ष्मीबैसाहेबांच माहेर आहे .आणि तीथे दगाफटका नाही होणार हे महाराजांना माहित होते.



*३)*आता आपण पाहू कि बाजी ना खिडीत ६तास का राहावं लागले.     



बाजी आणि महाराज्याचं खिंडीत बोलणं झालं .आम्ही विशाळगड गाठतो आणि थोफांचे तीन बार करतो तुमी निघोन येणे.पावनखिंड ते विशालगड १७किलोमीटर आहे.म्हणजे फार लांब नाही आणि आता दिवस आहे. आणि तितपर्यंत तुम्ही खिंडलढवा.पण विशालगडला विजापुरी सरदारांचा वेढा होता हे महाराजांना माहित नोव्हत.पालवणीचा यशवंतराव दळवी व शृंगारपूरचा सूर्यराव चव्हाण उर्फ सुर्वे आणि महाराजांना तेथे तुंबळ युद्ध करावं लागलं कारण तेहि याच मातीतले कडवी झुंज द्यावी लागली.


बाजी इथे चिंतेत होते कि महाराज का फोहचले नाहीत आपण खिंड सोडून विशालगडाकडे गेलो तर अनर्थ होईल विजापुरी सैनाईकांचा लोंढा रोखणे कठीण होईल .बाजींनी आपली दिलेली जवाबदारी सांभाळली खिंड झुंझवत ठेवली.जर विशालगडला वेढा नसता तर इतिहास वेगळा असता.पण देवालाही ह्या क्षणाची प्रतीक्षा होती.आणि तो रणसंग्राम ह्या घोडखडीत झाला.महाराज्यांची त्या खिंडीच नाव बदलून पावनखिंड ठेवलं.



*४)*किल्ले विशालगडाहुन शिवराय किल्ले राजगडावर जाताना वाटेत अगत्याने बाजी प्रभूंच्या  सिंद गावी गेले.बाजींची आई दिपाईआवा व मंडळींचे सांत्वन केले.दिपाईआवाच्या विनंतीस मन देऊन शिवरायांनी बाजींच्या जेष्ठ पुत्रास महादजी उर्फ मायाजी ह्यास सरदारी दिली.इतर सात पुत्रांना पालखीचा मान व तैनाती दिल्या.बांदलांच्या माणसाना गडावर कारखानदारी वतने दिली.राजगडच्या दरबारात आणखी एक निर्णय घेतला गेला.प्रतापगडाच्या युद्धात जेधे ह्यांच्या जमावाने मर्दुमकी गाजविली.त्यामुळे कान्होजी जेधे ह्यांच्या जमावास दरबारात शिवरायांना तरवारीच्या पात्याने प्रथम मुजरा करावयाचा मान मिळाला होता.(स्वार्ड ऑफ ऑनर)कान्होजींनी समजूत घालून तो मान परत मागितला.कान्होजींनी संमती देताच,घोडखिंडीतील बांदल जमावाचा पराक्रम अतुलनीय,त्यागश्रेष्ठ हे जाणून बांदलास शिवरायांना दरबारात तरवरीच्या पात्याने मुजरा करण्याचा मान शिवरायांनी दिला. घोडखिंडीतील युद्ध श्रेष्ठ मानले गेल्याचा हा पुरावा.ह्यामुळे बाजी प्रभूंचे बलिदान शिवदरबारात आणि इतिहासात श्रेष्ठ ठरले.


*🚩जय भवानी🚩*


( वरील माहिती मी आषाढ पौर्णिमेला आणि वद्य प्रतिपदेला क्रमशः लिहली हाती .आपणास हि माहिती मी एकत्र करून पाठवली आहे.आपणास लिखाणात काही चुकीचं वाटलं तर नक्की सांगा.)
लेखनसीमा..
मर्यादेयविराजते...
धन्यवाद.............!!
📖लेखक-गुरुवर्य श्री.आप्पा परब
संदर्भ.पावनखिंड
📝लेखन-श्री.भूषण हरिश्चंद्र ठाकूर
(९०२९४५९६८७)

No comments:

Post a Comment