हिमालयापेक्षा मोठा ‘सह्याद्री’!
काय वर्णन करावे बाळासाहेबांच्या वैभवाचे? त्यांच्या अस्थींचे दर्शन
घेण्यासाठीही लोकांची झुंबड उडाली आहे. जिवंतपणी सर्वत्र जयजयकार आणि
मृत्यूनंतर जगभरात हाहाकार अशी अतिविराट लोकप्रियता या देशात कधंीच कुणाला
लाभली नसेल. बाळासाहेबांचा अंत हा केवळ एका व्यक्तीचा अंत नाही, तो
हिंदुस्थानच्या इतिहासातील एका मोठ्या युगाचा अंत आहे. एक प्रसंग माझ्या
डोळ्यांपुढे अजून जसाच्या तसा उभा आहे. बाळासाहेबांना जाऊन पाच दिवस झाले
तरी तो प्रसंग माझ्या डोळ्यांपुढून हलत नाही. शिवसेनाप्रमुखांची
अंत्ययात्रा माहीमच्या रस्त्यावरून पुढे निघाली. पुढे माणसांच्या झुंडी,
मागे झुंडी, बाजूला झुंडी. बाळासाहेबांचे फोटो उंचावून जनसागर पुढे चालला
होता. ‘जयजयकार’ आणि ‘अमर रहे’च्या घोषणांत पुढे लाट उसळावी तसा गर्दीचा
लोट उसळत होता. भगवी निशाणे फडकत होती. मिनिटा-मिनिटाच्या अंतराने
शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावर खिडक्यांतून, गच्चीवरून, रस्त्यावर
टांगलेल्या फुलांच्या करंड्यांतून पुष्पवृष्टी होत होती. जो तो आपली मान
उंच करून शिवसेनाप्रमुखांचे दर्शन घेण्यासाठी झटापट करीत होता, पुढे
येण्याचा खटाटोप करीत होता, धक्के खात होता व देत होता. गर्दीचा लोट अंगावर
येताच माणसे तुडवली जात होती. त्यातून सावरून उठत ती पुन्हा गर्दीबरोबर
चालत होती. तप्त उन्हात त्यांना प्यायला पाणी नव्हते. विसावा नव्हता.
अन्नाचा कण नव्हता. काही पती-पत्नी आपल्या लहान मुलांना खांद्यावर बसवून
शिवसेनाप्रमुखांचे अंतिम दर्शन त्यांना देत होते. वय वर्षे दोन ते वय वर्षे
नव्वद असा प्रत्येक माणूस पंचवीस लाखांतील गर्दीचा एक भाग होऊन
भक्तिभावाने चालत होता. महाराष्ट्रात पन्नास वर्षे बाळासाहेबांना एकसारखे
पाहण्याची सवय झालेला परमेश्वरही त्या दिवशी रडला. महाराष्ट्र आणि
बाळासाहेब ठाकरे, मराठी माणूस आणि बाळासाहेब यांना वेगवेगळे पाहण्याची
कधीही आपत्ती न आलेला परमेश्वरही त्या दिवशी खिन्न मनाने गुडघ्यात मान
घालून बसला.
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा
असे सेनापती बापट यांनी म्हटले. त्या महाराष्ट्राची शक्ती बाळासाहेब होते.
बाळासाहेबांमुळे महाराष्ट्राशी वैर घेण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.
बाळासाहेबांमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. ‘मुंबई महाराष्ट्रापासून
तोडण्याचा प्रयत्न करणार्याच्या नरडीचा घोट घेईन’ असा दम भरणारे फक्त
बाळासाहेब होते. विदर्भ महाराष्ट्रापासून तोडू इच्छिणार्यांचे लचके
तोडणारे फक्त बाळासाहेब होते. मुंबईवर आदळणारे लोंढे रोखलेच पाहिजेत असे
बजावून सांगताना राष्ट्राच्या अखंडतेस तडा जाऊ न देणारे बाळासाहेब होते.
एम.व्ही. नाहुसराज यांनी बाळासाहेबांची एक आठवण सांगितली. १९७० चा तो
कालखंड. शिवसेनेची स्थापना नुकतीच झाली होती. मराठी माणसांच्या म्हणजे
भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी आंदोलने सुरू होती. एअर इंडियातील वरिष्ठ पदांवर
अनेक अमराठी अधिकारी होते व त्यांच्यामुळेच मराठी माणसांना नोकर भरतीत
डावलले जात असल्याची भावना होती. हेच एम.व्ही. नाहुसराज त्यावेळी एअर
इंडियाच्या ‘रिक्रूटमेंट’ विभागाचे प्रमुख होते. श्री. नाहुसराज सांगतात,
‘‘मला एके दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी भेटायला बोलावले असल्याचा ‘आदेश’
आला. दादरच्या त्यांच्या घरी येण्याबाबत हा आदेश होता. बाळासाहेबांचे भाऊ
श्रीकांत हे मला बाळासाहेबांकडे घेऊन गेले. बाळासाहेब तेव्हा खूपच तरुण पण
आक्रमक होते. आधी ते हिंदीत बोलले, नंतर ते मराठीकडे वळले. ‘एअर इंडियाचे
ऑफिस तुमचे असेल, पण रस्ते आमच्या मालकीचे आहेत. The Air India Office may
be yours but road belongs to us. संदेश स्पष्ट होता. बाळासाहेबांना काय
सांगायचे आहे ते त्या एका वाक्यात समजले.’’ थंडपणे दिलेला तो आवाज म्हणजे
मराठीद्वेष्ट्यांना दिलेली गर्भित धमकी होती. एअर इंडियात नंतर जी मराठी
भरती सुरू झाली व विमानात
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन - 25 de novembro de 2012 - denunciar abuso
भरती सुरू झाली व विमानात
‘जय महाराष्ट्र’चा गजर
सुरू झाला त्यामागे बाळासाहेबांची ही दमबाजी होती. मराठी माणसासाठी
बाळासाहेबांनी वाटेल ते केले. परळच्या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात
शिवसेनेने घुसून त्यांना संपवले. कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाईच्या खून
प्रकरणात शिवसैनिकांना अटका झाल्या, शिक्षा झाल्या. त्या सर्व आक्रमक
शिवसैनिकांना बाळासाहेबांनी कधीच वार्यावर सोडले नाही. परळच्या दळवी
बिल्डिंगमध्ये कम्युनिस्टांचे कार्यालय. शिवसैनिक त्या बिल्डिंगवर चाल करून
गेले. त्याची खंत बाळासाहेबांना कधीच वाटली नाही. उलट त्यावेळचे
मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना एकदा बाळासाहेब म्हणाले, ‘आम्हाला दळवी
बिल्डिंग जाळायची होती, पण इतर भाडेकरू हे मराठी व आमचे मतदार असल्यामुळे
पोरांना रोखावे लागले, पण त्यांनी नासधूस केली, टाइपरायटर वरून फेकला हे
खरे आहे!’ मराठी नोकरभरतीसाठी बाळासाहेबांनी आरसीएफवर प्रचंड मोर्चा काढला.
प्रकल्प महाराष्ट्रात आणि भरती उपर्यांची हे चालणार नाही त्यांनी ठणकावून
सांगितले. मराठी भरतीस विरोध करणार्या एअर इंडियाच्या नंदास कानफटवून
काढले. मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी
अस्मिता यासाठी बाळासाहेबांनी काय केले नाही! दादा कोंडके यांनी
‘सोंगाड्या’ चित्रपट काढला. दादरच्या कोहिनूर थिएटरमध्ये तो लावला, पण
मालकाने हिंदी चित्रपटासाठी ‘सोंगाड्या’ उतरवायला लावला तेव्हा हताश दादा
कोंडके शिवसेना भवनात पोहोचले. तिथे बाळासाहेब बसलेले होते. दादांनी
‘सोंगाड्या’ची कैफियत मांडताच कोहिनूरच्या मालकास असेल त्या स्थितीत हजर
करण्याचे फर्मान बाळासाहेबांनी सोडले. शिवसैनिकांनी कामगिरी चोख बजावली.
कोहिनूरच्या मालकाची शिवसेना भवनात पोहोचेपर्यंत चांगलीच धुलाई झाली होती.
शिवसेना भवनात पोहोचताच त्याने बाळासाहेबांसमोर लोटांगण घातले. ‘सोंगाड्या’
पुढे पंचवीस आठवडे तुफान गर्दीत कोहिनूरवर झळकला व एका यशस्वी दादा
कोंडकेंचा उदय झाला. दादांनी त्यानंतर शिवसैनिक म्हणून त्यांचे सारे जीवन
बाळासाहेबांना समर्पित केले. बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या पोटाची चिंता
केली. पोटाची भाषा केली. मुंबई मराठी माणसांचीच आहे. या मुंबईतील सर्व
नोकर्या, उद्योग मराठी माणसांकडे हवेत. मुंबईतले हातभट्टीवाले, वेश्याही
मराठीच पाहिजेत अशी जहाल भूमिका फक्त बाळासाहेब घेऊ शकले. मुंबईतील किमान
साठ टक्के कुटुंबांस बाळासाहेबांनी रोजगार दिला. लोकमान्य टिळकांनंतर
बाळासाहेब ठाकरे हेच खर्या अर्थाने असंतोषाचे जनक म्हणायला हवेत. त्यांनी
लोकांत चीड व संताप निर्माण केला. बाळासाहेब म्हणत असत, ‘समाजामध्ये जी एक
जबरदस्त चीड निर्माण व्हायला पाहिजे ही चीड सध्या तात्पुरती दिसते. एक
जबरदस्त असा संतापलेला समाज मला हवाय. असा क्रोधी की, ज्या क्रोधाचे
शासनावर एक दडपण असायला पाहिजे. सतत अशी जनता मला हवी. त्याला मी जनता
म्हणेन नाहीतर नाही. सरळ मेंढरं म्हणतो मी त्यांना लोकशाहीतली!’ बाळासाहेब
जिथे गेले तिथे आग निर्माण केली. ज्या समाजात संताप नाही तो असून
नसल्यासारखा.
बाळासाहेबांनी मराठी माणसांत क्रोध निर्माण केला
म्हणून या आगीच्या वाट्यास कोणी गेले नाही. बाळासाहेब सर्वव्यापी आहेत

त्यांनी
निदान महाराष्ट्राला तरी आपल्या बरोबर सर्वव्याप्त करून टाकले. राष्ट्रीय
राजकारणाचे केंद्रस्थान हे नेहमी दिल्ली राहिले. दिल्लीने हिंदुस्थानवर
राज्य केले. राज्यांना गुलाम केले, पण दोन नेत्यांनी देशाचे राजकारण
महाराष्ट्राभोवती केंद्रित केले. पहिले लोकमान्य टिळक व दुसरे बाळासाहेब
ठाकरे. टिळकांनी पुण्यातून देशाचे राजकारण केले. ब्रिटिश साम्राज्याला
हादरे देण्याचे कार्य टिळकांनी पुण्यातून केले. त्यामुळे सार्या देशाचे
लक्ष तेव्हा पुण्याकडे लागलेले असायचे. टिळक आता पुण्यातून कोणती गर्जना
करणार, टिळक आता ‘केसरी’तून कोणता जहाल विचार मांडणार याकडे ब्रिटिशांचे
लक्ष लागलेले असे. कोलकात्यातून ब्रिटिशांनी त्यांची राजधानी हलवायचे ठरवले
तेव्हा त्यांच्या डोक्यातील नवी राजधानी पुणे होती. पुण्यात टिळक होते व
टिळकांवर लक्ष ठेवता येईल अशी त्यांची योजना होती. टिळकांनंतर बाळासाहेब
ठाकरे यांनी राजकारणाचा राष्ट्रीय केंद्रबिंदू महाराष्ट्रात आणला. मुंबईतून
त्यांनी देशाचे राजकारण केले व दिल्लीचे डोळे सतत मुंबईकडे लावणे भाग
पाडले. जगातल्या हिंदुत्वाची राजधानी त्यांनी ‘मुंबई’ केली. एखाद्या
विषयावर बाळासाहेब ठाकरे कोणती भूमिका घेतात, शिवसेनेचा ढाण्या वाघ कोणती
डरकाळी फोडतोय, शिवसेनाप्रमुखांची लेखणी ‘सामना’तून कोणती सिंहगर्जना
करतेय? बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट सामने, भ्रष्टाचार,
अत्याचार, दहशतवाद अशा प्रत्येक विषयावर बाळासाहेब मुंबईतून भूमिका मांडत व
देशाचे राजकारण त्यानुसार वळण घेत असे. हिमालयाइतकेच महाराष्ट्राच्या
सह्याद्रीला देशाच्या राजकारणात महत्त्व आले ते फक्त बाळासाहेबांमुळेच.
बाळासाहेब राष्ट्रीय पुढारी होते, पण दिल्लीत गेले नाहीत.
सार्या
देशाबद्दल त्यांना आपलेपणा वाटे, पण महाराष्ट्रात स्वत:च्या घरासारखे वाटे.
मुंबईतच ते अधिक उत्साही असत. बाळासाहेब म्हणजे कधीही उकलले न जाणारे एक
आकर्षक तितकेच परस्परविरोधी कोडे होते. त्यांच्या जाण्याने हिमालय पर्वत
ढासळला आहे, सह्याद्रीचे कडे कोसळले आहेत. हिंदुस्थानच्या जनतेने एक अत्यंत
मौल्यवान खजिना गमावला आहे. महाराष्ट्राने त्यांचा दुसरा शूर शिवाजी
गमावला आहे यातच सर्व आले. हिंदुस्थानच्या इतिहासात जनतेने एकाच व्यक्तीवर
प्रेमाचा एवढा वर्षाव केल्याचा दाखला सापडणार नाही.
बाळासाहेबांनी सह्याद्रीस हिमालयाइतकेच मोठे केले. आज सह्याद्रीची ओळख हरवली आहे

प्रेषक, सुधीर मुतालीक, Thu, 22/11/2012 - 17:50
उभा देश हबकला होता त्या
दीड दिवसात थिजलेल्या महाराष्ट्राकडे बघून ! बाळासाहेबांच्या जाण्याने
महाराष्ट्र इतका हादरेल याची कुणी कल्पनाही केली केली नव्हती. माझा पानवाला
दिन्या मंगलोर चा. बोला, मेरे को कोई डर नई है। लेकिन रिस्पेक्ट देने के
लिए दो दिन बंद रखेगा। शॅटरडे संडे को धंदा डब्बल रहता है, मगर रिस्पेक्ट
ज्यादा इम्पोर्टेन्ट है। ...... मी खलास. रविवारी दिवाळीच्या सुट्टीनंतरचा
नाशकातल्या उद्योगनगरीतला कामाचा पहिला दिवस. पण सातपूर, अंबड आणि सिन्नर
या तीनही वसाहतीत चिडीचूप सामसूम. हे अभूतपूर्व दृष्य बघून मी चाट पडलो.
कित्येक वेळा उद्योगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन बंदचे आव्हान नाशकात
इथल्या औद्योगिक संघटनांनी अनेकदा गेल्या दहाबारा वर्षात केले होते. पण
दहाबारा टक्क्यापेक्षा ज्यास्त प्रतिसाद कधी मिळाला नव्हता. त्यामुळे ती
सामसूम बघून मला झीट यायची पाळी आली.
प्रत्यक्ष मुंबईतली दृष्ये
तर आणखी चक्रावणारी होती. केवढा प्रचंड जनसमुदाय तो ! कुठून तरी आकडा आला
वीस लाख ! बापरे. इतके प्रचंड संख्येने लोक. तेही पूर्ण शांत. कुठेच खटखट
नाही. सगळे प्रचंड शोकात बुडालेले. हे सगळे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी.
दसऱ्याच्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेबांची थकलेली आवाहने ऐकून धाय मोकलून
रडणारे सैनिक मी पहिले त्यावेळी याची कल्पना नाही आली की केवढा प्रचंड
परिणाम एका व्यक्तिमत्वाचा इथल्या जनमानसावर असू शकतो ! मुंबईला प्रत्यक्ष न
पोहोचू शकणारी जनता तर या पेक्षा कित्येक पटीने ज्यास्त त्या त्या
गावांमध्ये असेल.
एवढी प्रसिद्धी ! एवढी मान्यता ! एवढे प्रेम !
त्यानंतर रोज खरेतर या
प्रसंगाचे चित्र डोकावतंय. अनेक वेगवेगळे विचार त्यानिमित्ताने मनात
धिंगाणा घालतात. मंथन हा एक भीषण प्रकार आहे. त्यातून किती काय काय बाहेर
पडेल याचा नेम नाही. बरेच मुद्दे. बरीच उत्तरे. बरेच प्रश्न. बऱ्याच शंका.
नेल्सन मंडेला आठवले. नेल्सन मंडेलांचे एक वाक्य ओप्रा विनफ्रेने तिच्या शो
मध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उच्चारल्याचे आठवले. " The
deepest concern is not that we are inadequate. The deepest concern is we
are powerful beyond measure." हे विधान सातत्याने मला माझ्या क्षमतेचे
ऑडीट करायला भाग पाडते. माझी अस्सल कुवत किती आहे आणि त्या कुवतीच्या
जोरावर मी काय करू शकतो याचा किमान अंदाज बांधता यायला लागल्यावर फसल्याचे
प्रमाण तर कमी होतेच पण कुठे हात घालायचा आणि कुठे पोळणार आहे याचा अंदाज
तरी येतो. ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील एक अनुभव सांगतात. "
एक चोरांची टोळी चोरी करून पळत होती आणि आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो.
आम्ही गाडीत होतो आणि ते जंगलातून आड वाटेने पळत होतो. बराच वेळ पाठलाग
चालला होता. त्यांचा पळणं अथक चालू होतं.भानावर येऊन काही वेळाने मी किती
किलोमीटर पाठलाग करतोय हे बघितलं आणि पागल झालो. ते चोर सुमारे चोपन्न
किलोमीटर सतत पळत होते ...............!!!!

"चिंता याची नाहीय की आमच्या मध्ये काही कमतरता आहे, चिंता याची आहे की आमची क्षमता किती आहे याचा अंदाज आम्हाला नाही"
इतकी प्रचंड शक्ती एका
व्यक्तीवर केंद्रित झाली होती तरी महाराष्ट्र आज खड्यात कसा गेला ? एवढ्या
प्रचंड शक्तीला राजकीय सिंहासनाची गरजच नाही. त्यामुळे सत्ता मिळाली नाही
म्हणून काया पालट झाला नाही हे मान्य करता येणं शक्य नाही. दंडशक्ती
राजसत्तेवर वचक ठेऊ शकते हे चाणक्यापासून, जिजाऊ पासून अगदी अलीकडे अण्णा
हजारे यांच्या पर्यंत कित्येक राजसत्तांच्या इतिहासात स्पष्ट दिसते आहे.
अनेक ऋषीमुनी दंडशक्तीचे काम करीत होते हे रामायण महाभारता मध्ये आपण
वाचलंय. मुद्दा राजकारणाचा नव्हता त्यामुळे राजकीय वल्कले काढून ठेऊन आपले
प्रेम आणि श्रद्धा सगळ्यांनी व्यक्त केल्या . संजय दत्त, खा. प्रिया दत्त,
शरद पवार, समस्त राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चन, शबाना, पृथ्वीराज
....वगैरे.

No comments:
Post a Comment