Thursday 10 November 2016

प्राजक्त


*प्राजक्त....*
हिवाळा सुरु झाला की प्राजक्त बहरायला लागतो...
सकाळी सकाळी झाडाखाली फुलांचा अगदी सडा पडलेला असतो.
झाडावरुन प्राजक्त ओघळतो...
त्याचा आवाज होत नाही...
याचा अर्थ असा नाही
की त्याला इजा होत नाही...


"प्राजक्त किंवा पारिजातक....
किती नाजुक फुलं..!


कळी पूर्ण उमलली की, इतर फुलाझाडांप्रमाणे फुल खुडायचीही गरज नसते.... डबडबलेल्या डोळ्यांतुन अश्रु ओघळावा, तसं देठातुन फ़ुल जमिनीवर ओघळतं...


"सुख वाटावे जनात, दुःख ठेवावे मनात" हे या प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं...
एवढसं आयुष्य त्या फुलांचं....


झाडापासुन दुर होतानाही गवगवा करीत नाहीत.... छोट्याशा नाजुक आयुष्यात आपल्याला भरभरुन आनंद देतात... आणि केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या कुंपणात लावलेल्या झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणातही पडतात की...


*खरंच... माणसाचं आयुष्यही असंच... एवढसं क्षणभंगुर प्राजक्ता सारखं... कधी ओघळुन जाईल माहीत नाही... आज आहे त्यातलं भरभरुन द्यावं हेच खरं...!!!*
*स्वस्थ रहा, मस्त रहा,*


*प्राजक्ताच्या सुगंधाप्रमाणे दरवळत रहा*🌹सुप्रभात🌹

No comments:

Post a Comment