नमस्कार महाराष्ट्र
मी महाराष्ट्राच्या उपराजधानीत राहणारा एक उच्च मध्यमवर्गीय घरातील मुलगा
लेखन आणि विचार यासाठी आपली भूमी जाणली जातेच मग मी यातून वेगळा कसा राहणार
शालेय शिक्षण हडस हायस्कूल मधून घेतलेले आहे हडस हि नागपुरातील नामवंत शाळांपैकी एक शाळा आहे.
प्रत्येक सामान्य मराठी मुलाप्रमाणेच इतिहास राजकारण चालू घडामोडी यांच्या संपर्कात असण्याचा छंद आहेच .
आजवर मी जेजे पहिले अनुभवले निरीक्षण केले तेते सर्व येथे विदित करण्यात येईल
पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व यापेक्षा महाराष्ट्रीयत्व नावाची विशेष विचारशैली मी निर्माण करून तिच्या आधारे आसेतुहिमचल पर्यंतच्या सर्व गोष्टी मी बघत असतो.
मी भगव्याला मानणारा एक मावळा आहे .हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांना मानणारा एक स्वाभिमानी आणि खरा क्षत्रीय देखील आहे .
यातल्या काही पोस्ट यांत्र्जालावर मिळाल्या आणि खूप आवडल्या त्या माझ्या नसूनही साठवून ठेवता याव्या म्हणून इथे टाकण्यात आल्या आहेत
मला असे वाटते कि काहीही बोलताना लिहितांना समुदाय अथवा जात धर्म याविषयी आपण काही हा शब्द वापरावा म्हणजे आपले म्हणणे योग्यरीत्या मांडता येईल.म्हणूनच या ब्लॉगचे नाव काही मनसोक्त असे ठेवले आहे
माझी कुठलीही पोस्ट वाचण्याआधी माझ्या या भूमिकेच्या चष्म्यातून म्हणजेच ज्याला संस्कृतमध्ये उपनेत्र म्हणतात ते आपणाला बुद्धीच्या डोळ्यांवर धारण करावे लागणार आहे .
हि उपनेत्राची पहिलीवहिली पोस्ट सर्वांना अर्पित !
No comments:
Post a Comment