Tuesday, 13 December 2016

हिमालयापेक्षा मोठा ‘सह्याद्री’!

हिमालयापेक्षा मोठा ‘सह्याद्री’!





काय वर्णन करावे बाळासाहेबांच्या वैभवाचे? त्यांच्या अस्थींचे दर्शन
घेण्यासाठीही लोकांची झुंबड उडाली आहे. जिवंतपणी सर्वत्र जयजयकार आणि
मृत्यूनंतर जगभरात हाहाकार अशी अतिविराट लोकप्रियता या देशात कधंीच कुणाला
लाभली नसेल. बाळासाहेबांचा अंत हा केवळ एका व्यक्तीचा अंत नाही, तो
हिंदुस्थानच्या इतिहासातील एका मोठ्या युगाचा अंत आहे. एक प्रसंग माझ्या
डोळ्यांपुढे अजून जसाच्या तसा उभा आहे. बाळासाहेबांना जाऊन पाच दिवस झाले



तरी तो प्रसंग माझ्या डोळ्यांपुढून हलत नाही. शिवसेनाप्रमुखांची
अंत्ययात्रा माहीमच्या रस्त्यावरून पुढे निघाली. पुढे माणसांच्या झुंडी,
मागे झुंडी, बाजूला झुंडी. बाळासाहेबांचे फोटो उंचावून जनसागर पुढे चालला
होता. ‘जयजयकार’ आणि ‘अमर रहे’च्या घोषणांत पुढे लाट उसळावी तसा गर्दीचा
लोट उसळत होता. भगवी निशाणे फडकत होती. मिनिटा-मिनिटाच्या अंतराने
शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावर खिडक्यांतून, गच्चीवरून, रस्त्यावर
टांगलेल्या फुलांच्या करंड्यांतून पुष्पवृष्टी होत होती. जो तो आपली मान
उंच करून शिवसेनाप्रमुखांचे दर्शन घेण्यासाठी झटापट करीत होता, पुढे
येण्याचा खटाटोप करीत होता, धक्के खात होता व देत होता. गर्दीचा लोट अंगावर
येताच माणसे तुडवली जात होती. त्यातून सावरून उठत ती पुन्हा गर्दीबरोबर
चालत होती. तप्त उन्हात त्यांना प्यायला पाणी नव्हते. विसावा नव्हता.
अन्नाचा कण नव्हता. काही पती-पत्नी आपल्या लहान मुलांना खांद्यावर बसवून
शिवसेनाप्रमुखांचे अंतिम दर्शन त्यांना देत होते. वय वर्षे दोन ते वय वर्षे
नव्वद असा प्रत्येक माणूस पंचवीस लाखांतील गर्दीचा एक भाग होऊन
भक्तिभावाने चालत होता. महाराष्ट्रात पन्नास वर्षे बाळासाहेबांना एकसारखे
पाहण्याची सवय झालेला परमेश्वरही त्या दिवशी रडला. महाराष्ट्र आणि
बाळासाहेब ठाकरे, मराठी माणूस आणि बाळासाहेब यांना वेगवेगळे पाहण्याची
कधीही आपत्ती न आलेला परमेश्वरही त्या दिवशी खिन्न मनाने गुडघ्यात मान
घालून बसला.



महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा
असे सेनापती बापट यांनी म्हटले. त्या महाराष्ट्राची शक्ती बाळासाहेब होते.
बाळासाहेबांमुळे महाराष्ट्राशी वैर घेण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.
बाळासाहेबांमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. ‘मुंबई महाराष्ट्रापासून
तोडण्याचा प्रयत्न करणार्याच्या नरडीचा घोट घेईन’ असा दम भरणारे फक्त
बाळासाहेब होते. विदर्भ महाराष्ट्रापासून तोडू इच्छिणार्यांचे लचके
तोडणारे फक्त बाळासाहेब होते. मुंबईवर आदळणारे लोंढे रोखलेच पाहिजेत असे
बजावून सांगताना राष्ट्राच्या अखंडतेस तडा जाऊ न देणारे बाळासाहेब होते.
एम.व्ही. नाहुसराज यांनी बाळासाहेबांची एक आठवण सांगितली. १९७० चा तो
कालखंड. शिवसेनेची स्थापना नुकतीच झाली होती. मराठी माणसांच्या म्हणजे
भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी आंदोलने सुरू होती. एअर इंडियातील वरिष्ठ पदांवर
अनेक अमराठी अधिकारी होते व त्यांच्यामुळेच मराठी माणसांना नोकर भरतीत
डावलले जात असल्याची भावना होती. हेच एम.व्ही. नाहुसराज त्यावेळी एअर
इंडियाच्या ‘रिक्रूटमेंट’ विभागाचे प्रमुख होते. श्री. नाहुसराज सांगतात,
‘‘मला एके दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी भेटायला बोलावले असल्याचा ‘आदेश’
आला. दादरच्या त्यांच्या घरी येण्याबाबत हा आदेश होता. बाळासाहेबांचे भाऊ
श्रीकांत हे मला बाळासाहेबांकडे घेऊन गेले. बाळासाहेब तेव्हा खूपच तरुण पण
आक्रमक होते. आधी ते हिंदीत बोलले, नंतर ते मराठीकडे वळले. ‘एअर इंडियाचे
ऑफिस तुमचे असेल, पण रस्ते आमच्या मालकीचे आहेत. The Air India Office may
be yours but road belongs to us. संदेश स्पष्ट होता. बाळासाहेबांना काय
सांगायचे आहे ते त्या एका वाक्यात समजले.’’ थंडपणे दिलेला तो आवाज म्हणजे
मराठीद्वेष्ट्यांना दिलेली गर्भित धमकी होती. एअर इंडियात नंतर जी मराठी
भरती सुरू झाली व विमानात



अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन - 25 de novembro de 2012 - denunciar abuso
भरती सुरू झाली व विमानात
‘जय महाराष्ट्र’चा गजर
सुरू झाला त्यामागे बाळासाहेबांची ही दमबाजी होती. मराठी माणसासाठी
बाळासाहेबांनी वाटेल ते केले. परळच्या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात
शिवसेनेने घुसून त्यांना संपवले. कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाईच्या खून
प्रकरणात शिवसैनिकांना अटका झाल्या, शिक्षा झाल्या. त्या सर्व आक्रमक
शिवसैनिकांना बाळासाहेबांनी कधीच वार्यावर सोडले नाही. परळच्या दळवी
बिल्डिंगमध्ये कम्युनिस्टांचे कार्यालय. शिवसैनिक त्या बिल्डिंगवर चाल करून
गेले. त्याची खंत बाळासाहेबांना कधीच वाटली नाही. उलट त्यावेळचे
मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना एकदा बाळासाहेब म्हणाले, ‘आम्हाला दळवी
बिल्डिंग जाळायची होती, पण इतर भाडेकरू हे मराठी व आमचे मतदार असल्यामुळे
पोरांना रोखावे लागले, पण त्यांनी नासधूस केली, टाइपरायटर वरून फेकला हे
खरे आहे!’ मराठी नोकरभरतीसाठी बाळासाहेबांनी आरसीएफवर प्रचंड मोर्चा काढला.



प्रकल्प महाराष्ट्रात आणि भरती उपर्यांची हे चालणार नाही त्यांनी ठणकावून
सांगितले. मराठी भरतीस विरोध करणार्या एअर इंडियाच्या नंदास कानफटवून
काढले. मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी
अस्मिता यासाठी बाळासाहेबांनी काय केले नाही! दादा कोंडके यांनी
‘सोंगाड्या’ चित्रपट काढला. दादरच्या कोहिनूर थिएटरमध्ये तो लावला, पण
मालकाने हिंदी चित्रपटासाठी ‘सोंगाड्या’ उतरवायला लावला तेव्हा हताश दादा
कोंडके शिवसेना भवनात पोहोचले. तिथे बाळासाहेब बसलेले होते. दादांनी
‘सोंगाड्या’ची कैफियत मांडताच कोहिनूरच्या मालकास असेल त्या स्थितीत हजर
करण्याचे फर्मान बाळासाहेबांनी सोडले. शिवसैनिकांनी कामगिरी चोख बजावली.
कोहिनूरच्या मालकाची शिवसेना भवनात पोहोचेपर्यंत चांगलीच धुलाई झाली होती.


शिवसेना भवनात पोहोचताच त्याने बाळासाहेबांसमोर लोटांगण घातले. ‘सोंगाड्या’
पुढे पंचवीस आठवडे तुफान गर्दीत कोहिनूरवर झळकला व एका यशस्वी दादा
कोंडकेंचा उदय झाला. दादांनी त्यानंतर शिवसैनिक म्हणून त्यांचे सारे जीवन
बाळासाहेबांना समर्पित केले. बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या पोटाची चिंता
केली. पोटाची भाषा केली. मुंबई मराठी माणसांचीच आहे. या मुंबईतील सर्व
नोकर्या, उद्योग मराठी माणसांकडे हवेत. मुंबईतले हातभट्टीवाले, वेश्याही
मराठीच पाहिजेत अशी जहाल भूमिका फक्त बाळासाहेब घेऊ शकले. मुंबईतील किमान
साठ टक्के कुटुंबांस बाळासाहेबांनी रोजगार दिला. लोकमान्य टिळकांनंतर
बाळासाहेब ठाकरे हेच खर्या अर्थाने असंतोषाचे जनक म्हणायला हवेत. त्यांनी
लोकांत चीड व संताप निर्माण केला. बाळासाहेब म्हणत असत, ‘समाजामध्ये जी एक
जबरदस्त चीड निर्माण व्हायला पाहिजे ही चीड सध्या तात्पुरती दिसते. एक
जबरदस्त असा संतापलेला समाज मला हवाय. असा क्रोधी की, ज्या क्रोधाचे
शासनावर एक दडपण असायला पाहिजे. सतत अशी जनता मला हवी. त्याला मी जनता
म्हणेन नाहीतर नाही. सरळ मेंढरं म्हणतो मी त्यांना लोकशाहीतली!’ बाळासाहेब
जिथे गेले तिथे आग निर्माण केली. ज्या समाजात संताप नाही तो असून
नसल्यासारखा.
बाळासाहेबांनी मराठी माणसांत क्रोध निर्माण केला
म्हणून या आगीच्या वाट्यास कोणी गेले नाही. बाळासाहेब सर्वव्यापी आहेत
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन - 25 de novembro de 2012 - denunciar abuso



त्यांनी
निदान महाराष्ट्राला तरी आपल्या बरोबर सर्वव्याप्त करून टाकले. राष्ट्रीय
राजकारणाचे केंद्रस्थान हे नेहमी दिल्ली राहिले. दिल्लीने हिंदुस्थानवर
राज्य केले. राज्यांना गुलाम केले, पण दोन नेत्यांनी देशाचे राजकारण
महाराष्ट्राभोवती केंद्रित केले. पहिले लोकमान्य टिळक व दुसरे बाळासाहेब
ठाकरे. टिळकांनी पुण्यातून देशाचे राजकारण केले. ब्रिटिश साम्राज्याला
हादरे देण्याचे कार्य टिळकांनी पुण्यातून केले. त्यामुळे सार्या देशाचे
लक्ष तेव्हा पुण्याकडे लागलेले असायचे. टिळक आता पुण्यातून कोणती गर्जना
करणार, टिळक आता ‘केसरी’तून कोणता जहाल विचार मांडणार याकडे ब्रिटिशांचे
लक्ष लागलेले असे. कोलकात्यातून ब्रिटिशांनी त्यांची राजधानी हलवायचे ठरवले
तेव्हा त्यांच्या डोक्यातील नवी राजधानी पुणे होती. पुण्यात टिळक होते व
टिळकांवर लक्ष ठेवता येईल अशी त्यांची योजना होती. टिळकांनंतर बाळासाहेब
ठाकरे यांनी राजकारणाचा राष्ट्रीय केंद्रबिंदू महाराष्ट्रात आणला. मुंबईतून
त्यांनी देशाचे राजकारण केले व दिल्लीचे डोळे सतत मुंबईकडे लावणे भाग
पाडले. जगातल्या हिंदुत्वाची राजधानी त्यांनी ‘मुंबई’ केली. एखाद्या
विषयावर बाळासाहेब ठाकरे कोणती भूमिका घेतात, शिवसेनेचा ढाण्या वाघ कोणती
डरकाळी फोडतोय, शिवसेनाप्रमुखांची लेखणी ‘सामना’तून कोणती सिंहगर्जना
करतेय? बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट सामने, भ्रष्टाचार,
अत्याचार, दहशतवाद अशा प्रत्येक विषयावर बाळासाहेब मुंबईतून भूमिका मांडत व
देशाचे राजकारण त्यानुसार वळण घेत असे. हिमालयाइतकेच महाराष्ट्राच्या
सह्याद्रीला देशाच्या राजकारणात महत्त्व आले ते फक्त बाळासाहेबांमुळेच.
बाळासाहेब राष्ट्रीय पुढारी होते, पण दिल्लीत गेले नाहीत. 



सार्या
देशाबद्दल त्यांना आपलेपणा वाटे, पण महाराष्ट्रात स्वत:च्या घरासारखे वाटे.
मुंबईतच ते अधिक उत्साही असत. बाळासाहेब म्हणजे कधीही उकलले न जाणारे एक
आकर्षक तितकेच परस्परविरोधी कोडे होते. त्यांच्या जाण्याने हिमालय पर्वत
ढासळला आहे, सह्याद्रीचे कडे कोसळले आहेत. हिंदुस्थानच्या जनतेने एक अत्यंत
मौल्यवान खजिना गमावला आहे. महाराष्ट्राने त्यांचा दुसरा शूर शिवाजी
गमावला आहे यातच सर्व आले. हिंदुस्थानच्या इतिहासात जनतेने एकाच व्यक्तीवर
प्रेमाचा एवढा वर्षाव केल्याचा दाखला सापडणार नाही.
बाळासाहेबांनी सह्याद्रीस हिमालयाइतकेच मोठे केले. आज सह्याद्रीची ओळख हरवली आहे


अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन - 25 de novembro de 2012 - denunciar abuso



प्रेषक, सुधीर मुतालीक, Thu, 22/11/2012 - 17:50
उभा देश हबकला होता त्या
दीड दिवसात थिजलेल्या महाराष्ट्राकडे बघून ! बाळासाहेबांच्या जाण्याने
महाराष्ट्र इतका हादरेल याची कुणी कल्पनाही केली केली नव्हती. माझा पानवाला
दिन्या मंगलोर चा. बोला, मेरे को कोई डर नई है। लेकिन रिस्पेक्ट देने के
लिए दो दिन बंद रखेगा। शॅटरडे संडे को धंदा डब्बल रहता है, मगर रिस्पेक्ट
ज्यादा इम्पोर्टेन्ट है। ...... मी खलास. रविवारी दिवाळीच्या सुट्टीनंतरचा
नाशकातल्या उद्योगनगरीतला कामाचा पहिला दिवस. पण सातपूर, अंबड आणि सिन्नर
या तीनही वसाहतीत चिडीचूप सामसूम. हे अभूतपूर्व दृष्य बघून मी चाट पडलो.
कित्येक वेळा उद्योगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन बंदचे आव्हान नाशकात
इथल्या औद्योगिक संघटनांनी अनेकदा गेल्या दहाबारा वर्षात केले होते. पण
दहाबारा टक्क्यापेक्षा ज्यास्त प्रतिसाद कधी मिळाला नव्हता. त्यामुळे ती
सामसूम बघून मला झीट यायची पाळी आली.
प्रत्यक्ष मुंबईतली दृष्ये
तर आणखी चक्रावणारी होती. केवढा प्रचंड जनसमुदाय तो ! कुठून तरी आकडा आला
वीस लाख ! बापरे. इतके प्रचंड संख्येने लोक. तेही पूर्ण शांत. कुठेच खटखट
नाही. सगळे प्रचंड शोकात बुडालेले. हे सगळे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी.
दसऱ्याच्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेबांची थकलेली आवाहने ऐकून धाय मोकलून
रडणारे सैनिक मी पहिले त्यावेळी याची कल्पना नाही आली की केवढा प्रचंड
परिणाम एका व्यक्तिमत्वाचा इथल्या जनमानसावर असू शकतो ! मुंबईला प्रत्यक्ष न
पोहोचू शकणारी जनता तर या पेक्षा कित्येक पटीने ज्यास्त त्या त्या
गावांमध्ये असेल. 



एवढी प्रसिद्धी ! एवढी मान्यता ! एवढे प्रेम !
त्यानंतर रोज खरेतर या
प्रसंगाचे चित्र डोकावतंय. अनेक वेगवेगळे विचार त्यानिमित्ताने मनात
धिंगाणा घालतात. मंथन हा एक भीषण प्रकार आहे. त्यातून किती काय काय बाहेर
पडेल याचा नेम नाही. बरेच मुद्दे. बरीच उत्तरे. बरेच प्रश्न. बऱ्याच शंका.
नेल्सन मंडेला आठवले. नेल्सन मंडेलांचे एक वाक्य ओप्रा विनफ्रेने तिच्या शो
मध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उच्चारल्याचे आठवले. " The
deepest concern is not that we are inadequate. The deepest concern is we
are powerful beyond measure." हे विधान सातत्याने मला माझ्या क्षमतेचे
ऑडीट करायला भाग पाडते. माझी अस्सल कुवत किती आहे आणि त्या कुवतीच्या
जोरावर मी काय करू शकतो याचा किमान अंदाज बांधता यायला लागल्यावर फसल्याचे
प्रमाण तर कमी होतेच पण कुठे हात घालायचा आणि कुठे पोळणार आहे याचा अंदाज
तरी येतो. ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील एक अनुभव सांगतात. "
एक चोरांची टोळी चोरी करून पळत होती आणि आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो.
आम्ही गाडीत होतो आणि ते जंगलातून आड वाटेने पळत होतो. बराच वेळ पाठलाग
चालला होता. त्यांचा पळणं अथक चालू होतं.भानावर येऊन काही वेळाने मी किती
किलोमीटर पाठलाग करतोय हे बघितलं आणि पागल झालो. ते चोर सुमारे चोपन्न
किलोमीटर सतत पळत होते ...............!!!!



अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन - 25 de novembro de 2012 - denunciar abuso
"चिंता याची नाहीय की आमच्या मध्ये काही कमतरता आहे, चिंता याची आहे की आमची क्षमता किती आहे याचा अंदाज आम्हाला नाही"
इतकी प्रचंड शक्ती एका
व्यक्तीवर केंद्रित झाली होती तरी महाराष्ट्र आज खड्यात कसा गेला ? एवढ्या
प्रचंड शक्तीला राजकीय सिंहासनाची गरजच नाही. त्यामुळे सत्ता मिळाली नाही
म्हणून काया पालट झाला नाही हे मान्य करता येणं शक्य नाही. दंडशक्ती
राजसत्तेवर वचक ठेऊ शकते हे चाणक्यापासून, जिजाऊ पासून अगदी अलीकडे अण्णा
हजारे यांच्या पर्यंत कित्येक राजसत्तांच्या इतिहासात स्पष्ट दिसते आहे.
अनेक ऋषीमुनी दंडशक्तीचे काम करीत होते हे रामायण महाभारता मध्ये आपण
वाचलंय. मुद्दा राजकारणाचा नव्हता त्यामुळे राजकीय वल्कले काढून ठेऊन आपले
प्रेम आणि श्रद्धा सगळ्यांनी व्यक्त केल्या . संजय दत्त, खा. प्रिया दत्त,
शरद पवार, समस्त राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चन, शबाना, पृथ्वीराज
....वगैरे. 

प्रतिकार।

क्षमा दया ताप त्याग मनोबल सबका लिया सहारा,
पर नरव्याध सुयोधन तुमसे कहो कहाँ कब हरा?







क्षमाशील हो रिपुसमक्ष तुम विनीत हुए जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको कायर समझा उतनाही,







क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हैं,
उसका क्या जो दंतहीन विषरहित विनीत सरल हैं?







तीन दिवस तक पंथ मांगते रघुपति सिंधुकिनारे,
बैठे पढते रहे छंद अनुनय के प्यारे प्यारे,







उत्तर मे जब एक नाद भी नहीं उठा सागर से,
उठी अधीर धधक पौरुष की आग राम के शर से,





सिंधु देह धर त्राहि-त्राहि कर आ गिरा शरण मे,
चरण पूजे दासता ग्रहण की, बंधा मूढ़ बंधन मे,







सच पूछो तो शर मे ही बसती हैं दीप्ती विनय की,
संधिवचन सम्पूज्य उसीका, जिसमे शक्ति विजय की,







सहनशीलता क्षमा दया को तभी पूजता जग हैं
बल का दर्प चमकता उसके पीछे जब जगमग हैं...






- क्रन्तिकवि रामधारी सिंह "दिनकर"

Monday, 12 December 2016

लांगूलचालनाचा एक नवीन अध्याय

लांगूलचालनाचा एक नवीन अध्याय: इस्लामिक बँक
प्रेषक, वटवट, Tue, 22/11/2016 - 14:36
गाभा:
कोणत्याही लोकशाहीचा एक मूळ नियम असावा कि कायदे सर्वांसाठी सारखे असावेत. आणि हा नियम पाळला जावा. असे कायदे असतील तरंच सर्वजण कायदे इतमामाने पाळतील. त्यांचा आदर राखतील. इथे सर्वांसाठी म्हणजे सर्व धर्मीयांसाठी असे अभिप्रेत आहे. ह्या नियमाला हा देश स्वतंत्र झाल्या झाल्या तडाखा बसला. हिंदू कोड बिलाने...
आंबेडकर आणि नेहरू प्रचंड आग्रही होते म्हणून हे बिल पास झालं.. आणि फक्त हिंदूंना हे बिल लागू करण्यात आले. आधी हिंदू कोड बिल हे एकंच होतं... पण त्याला प्रचंड विरोध होता म्हणून त्याचे चार तुकडे पाडण्यात आले. १. हिंदू मॅरेज ऍक्ट २. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट ३. हिंदू अडॉप्शन अँड गार्डीयनशिप ऍक्ट आणि ४. हिंदू सक्सेशन ऍक्ट... जाणून बुजून मुस्लिमांना ह्यातून वगळण्यात आलं. त्यांना त्यांच्या शरियत प्रमाणे वागायला अनुमोदन दिलं... कारण त्यांनी असला भारताने पारित केलेला कायदा मान्य केला नसता म्हणून... तुम्ही आमचे कायदे मानत नसाल तर त्यांना बाहेरचा दरवाजा किंवा योग्य ती शिक्षा दाखवली गेली नाही...तर त्यांच्यासाठी कायदे वगळले गेले. त्यांच्या धर्मासोबत चाटण्याचा धर्मसुद्धा अवलंबिला गेला... गरज नसताना... त्यांच्या कट्टरतेला खतपाणी घालायला इथून सुरुवात झाली...
नंतर स्पष्ट उल्लेख करायचा झाला आणि कशी आपल्या संसदेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला कचऱ्याची टोपी दाखवून, नं पटणारे मुस्लिम लांगुलचालन केले ह्याचा दाखला द्यायचा झाला तर खूप गाजलेली शाह बानो केस सांगावीच लागेल..
तर झालं होतं असं कि ह्या शाह बानोचा मोहम्मद अहमद खानशी निकाह झाला होता १९३२ साली. २ मुलं आणि ३ मुली ह्यांचा नंतर जन्म झाला. मोहम्मद अहमद खाननं साधारण १९७५ च्या सुमारास ह्या शाह बानो ला घरातून बाहेर काढलं. तिने सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत महिना ५०० रुपयांच्या पोटगीसाठी याचिका दाखल केली, इंदोरच्या मॅजिस्ट्रेटसमोर. (सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत कोणतीही बायको, घटस्फोटिता, पालक, पाल्य पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात.) १९७८ मध्ये मोहम्मद अहमद खाननं तिला तलाक दिला. त्यानंतर तिने दुसरं लग्न केलं नाही. आता बचाव करताना मोहम्मद अहमद खाननं सांगितलं कि शाह बानो त्याची बायको नाही. तेंव्हा त्याची तिला पोटगी द्यायची काहीही जबाबदारी नाही. (मुस्लिम पर्सनल लॉ नुसार तलाकनंतर नवऱ्याची बायकोप्रती जबाबदारी फक्त दोनच बाबतीत असते. एक म्हणजे मेहेर, आणि दुसरं म्हणजे इद्दत पुरती पोटगी. मेहेर ही एक रक्कम असते कि जी निकाह करतेवेळेस निश्चित केलेली असते कि जी तलाक, जर झाला तर, नंतर नवर्याने बायकोला द्यायची असते. आणि इद्दत म्हणजे तलाकनंतरचा फक्त तीन महिन्याचा काळ, अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर तलाकनंतर तीन मासिक पाळ्यांचा कालावधी. तोही ८७ दिवसांचा... संपलं.) मोहम्मद अहमद खाननं असा बचाव करायचं कारण म्हणजे त्याने आधीच दोन वर्षे २०० रुपये प्रति महिना तिला पोटगी दिलेली होती आणि त्याचबरोबर ३००० रुपये कोर्टात डिपॉझिट केलेहोते, मेहेरम्हणून... तरीही कोर्टाने त्याला अतिरिक्त २५ रुपये प्रति महिना शाहबानोला द्यायची ऑर्डर केली. पोटगीची रक्कम खूप कमी होती म्हणून शाहबानो ने मध्यप्रदेशच्या हायकोर्टात अपील दाखल केलं. हायकोर्टाने ते अलाउ करून १७९.२० रुपयाची पोटगी द्यायची ऑर्डर केली. त्याच्याविरुद्ध मोहम्मद अहमद खाननं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं, जे त्या न्यायालयाने फेटाळून लावलं... आणि ऐतिहासिक निर्णय दिला कि इद्दत च्या कालावधीनंतर सुद्धा मुस्लिम नवर्याने बायकोला पोटगी द्यावी, सीआरपीसीच्या सेक्शन १२५ च्या अन्वये.
"इस्लाम खतरेमे है" च्या आरोळ्या सुरु झाल्या. सर्व तथाकथीत मुस्लिम विचारवंत ह्यांच्या बैठका वाढू लागल्या. पहिल्यांदाच न्यायालयाने त्यांच्या धर्मात हात घातला होता.. इतरांच्या बाबतीत जे काही करायचं ते करा पण इस्लामला हात नाही कोणी लावू शकत हा त्यांचा स्टॅन्ड होता... अख्खे मुस्लिम जनमानस ढवळून निघाले. राजीव गांधीचे सरकार होते. सर्व मुल्ला, मौलवी गेले त्यांना भेटायला. गंभीर इशारे दिले. सरकारला धोका उत्पन्न करण्याची गर्भित धमकी दिली. राजीव गांधी घाबरले, टरकले... आणि संसदेला हाताशी धरून "मुस्लिम वूमन (प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन डायव्होर्स) ऍक्ट १९८६" पास केला. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली. आणि सीआरपीसीचा सेक्शन १२५ हा मुस्लिमांना लागू होणार नाही आणि लागू करायचा असेल तर दोघांनी तसं ऍफेडेव्हिट सादर करावं असं सांगितलं गेलं. आता कोण मुस्लिम नवरा नसती आफत ओढवून घेईल असं ऍफेडेव्हिट सादर करून?? आता पुन्हा तो इद्दतचा नियम लागू केला गेलाय..
इथं काय झालं??? मुस्लिम जनता सर्वोच्च न्यालयाचा निर्णय कि जो कायदाच असतो, तो मानायला तयार नव्हती तेंव्हा कायदा पुन्हा वळवला गेला... त्यांचे बूट चाटण्यासाठीच ना?
आणि आता पुन्हा हाच मुद्दा आपल्यासमोर येतोय "इस्लामिक बँकेच्या रूपात"
शरियत कायद्यानुसार कर्जावर व्याज घेणे पाप आहे. हा कायदा बरेच मुस्लिम लोक पाळतात. बरेच मुस्लिम लोकं बँकेचे व्यवहार करीत नाहीत. त्यामुळे त्यांचे पैसे बँकेच्या व्यवहारात येत नाहीत. त्यामुळे जर त्यांचे पैसे बँकेच्या व्यवहारात आणायचे असतील तर शरियतच्या कायद्यानुसार चालणारी बँक असावी ह्या पायावर इस्लामिक बँक उभी आहे. ह्या बँकेत कर्जावर व्याज आकारले जात नाही कारण शरियत कायद्यानुसार कर्जावर व्याज घेणे पाप आहे. मग ह्या बँका कशा चालतात... त्या प्रत्यक्षरित्या नाही पण अप्रत्यक्ष रित्या व्याज घेतातंच.
उदाहरण द्यायचं झालं तर... एकाला होमलोन घ्यायचं आहे.. तर बँक ते घर एकतर विकत घेईल किंवा बांधून देईल. त्यानंतर त्याव्यक्तीकडून त्या घराचे भाडे आकारेल. ह्या अश्या भाड्यामधून बॅंक नफा मिळवते. जर धंद्यासाठी कर्ज हवे असेल तर प्रॉफिट-लॉस शेअरिंगच्या तत्वावर ही बँक चालते, प्रत्यक्ष व्याज नं घेता. आखातात हि बँक जोरात चालते (अर्थात तिथे काही पर्यायच नाही म्हणा). तिथे मूळ व्यवसाय हा तेलाचाच आहे म्हणून तोट्याची शक्यता खूप कमी. प्रॉफीटशेअरिंगच जास्त चालतं. काही प्रगत राष्ट्रांमध्येही इस्लामिक बँकेचं फायदेशीर आस्तित्व आहे, कारण त्यांच्याकडे कर्ज वसुलीचे तगडे मेकॅनिझम आहे. भारतात बँकेचा जास्त लोचा हा कर्जवसुलीचाच आहे. त्यामुळेच तो बॅलेन्सशीटचा फुगवटा येतो. उद्या हे असं झालं तर त्याचा बोजा प्रत्यक्षरित्या इतर जनतेवर येणार नाही हे कशावरून?
तर ह्या अश्या बँका भारतात कितपत चालतील हा प्रश्न आहे.
पण मुळात गोष्ट अशी आहे आता पुन्हा एकंच विषय अधोरेखित होत आहे कि, इथेही मुस्लिम लोकं रेग्युलर बँकिंग स्वीकारत नाहीयेत म्हणून आम्ही आमचे कायदे वळवत आहोत, पुन्हा एकदा... युनिफॉर्म मॉनिटरी कोडसाठी काही काळानंतर लढा द्यावा लागेल कि काय अशी स्थिती उद्भवायला काहीच वेळ नाही लागणारे... हे लांगूलचालन नाही तर काय आहे? जे काही बँकिंग आपण सर्व जण वापरत आहोत. त्याचंच कंपल्शन जर त्यांच्यावर केलं तर नाही का चालणार? कि हे गृहितंच धरायचं कि ते हे मान्य करणार नाहीत?
इलेक्शनच्या बाबतीत पण इस्लाममधे दोन प्रवाह आहेत. सुन्नी म्हणतात इलेक्शन हि सुन्नत (म्हणजे प्रॉफेट महम्मदने अंगिकारलेली) आहे. आणि शिया वारसाहक्काच्या बाजूने आहेत, इलेक्शनच्या नाही.. तर मग उद्या आपण भारतात शिया पंथीयांसाठी एक वेगळा प्रांत उभारणार आहोत कि जिथे निवडणूक नसेल? हे कुठे चाललंय? हे योग्य आहे?
बर्याचदा आपली न्यायालये पण भेदभाव करतात कि काय असं वाटतं... त्या याकूब मेननसाठी मध्यरात्री २.३० वाजता सुनावणी होते. सलमान साठी ७.३० पर्यंत कोर्ट उघडं होतं. कर्जावर व्याज मंजूर नाही पण जर मेहेर दिलेली नसेल तर त्या अनपेड मेहेरवर व्याज घेणं मंजूर आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. (हमीरा बीबी वि. झुबैदा बीबी)
हेच आहे का आपले "धर्मनिरपेक्ष शासन"?
भाजपा हि भगवी काँग्रेस आहे हे कोणीतरी म्हणालं होतं ते खरंच आहे कि काय?
केरळ सरकार ह्या अश्याच बँकेच्या स्थापनेच्या प्रयत्नात होतं तेंव्हा डॉ. सुब्रमनियम स्वामींनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली तीही अत्यंत आदर्श कारणे देत (जर कोणाला हे जजमेंट हवं असेल तर माझ्याकडे आहे)
ह्याच आदर्शाच्या नावाखाली जगभर पसरलेला दहशतवाद त्यांना दिसत नाही?
मला मुस्लिमांबद्दल कसलाच आकस नाही पण जाणून बुजून हि जी काही वेगळी वागणूक दिली जातीये त्या विरोधात मी नक्कीच आहे.
(ह्या लेखावर टीका जरूर करावी पण कुठलंतरी एक वाक्य घेऊन मागचा पुढचा संदर्भ हेतुपुरस्सर वगळून, एनडीटीव्ही स्टाईलने, टीका करणे टाळावं, ही मनापासून विनंती...
मार्गावरून भटकू नये वा दुसऱ्याला भटकवू नये. कारण मिपावर काही सन्माननीय सदस्य असे आहेत कि जे सोलापुरवरून पुण्याच्या गाडीत बसतात आणि हि गाडी हैद्राबादला कशी जात नाही हे बघतो, ह्या अट्टाहासात असतात)

गरूडभरारी


       
गरूड पक्षाबद्दल अभिमान होताच. पण त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागलं ते परवाची त्याच्याबद्दलची गोष्ट ऐकल्यावर.
गरूडाचं दु:ख समजलं. मी आणि माझ्यासारखे अनेक आज त्या दु:खातून जातो आहोत. तो आमच्यातील एक वाटला.
गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं, पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोथट आणि वाकडी होते.
त्याची नखं निकामी होतात.
त्याच्या पंखातील बळ कमी होतं.
सावज पकडणं त्याला जमत नाही.
जीवनातील शौर्य संपलं. आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते.
नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं.
कमालीचं नैराश्य. जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो ती मोडून टाकतो.
एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते. मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपटुन काढतो. किती वेदना होत असतील? पण तो ते सारं सहन करतो.
नखं पुन्हा येताच त्या नखांनी तो स्वत:च्या पंखांची पिसं उपटुन पंख फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो.
काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षे जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) .
एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.
ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माझ्यात आणि माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत.
वास्तविक नखांचं उचकटणं नव्हे तर वाईट आचार विचारांच्या नखांचं उचकटणं , पंखांचं फाडणं नव्हे तर गर्विष्ठ मनोवृत्तीचा बीमोड करणं हे तप माणसाला करावं लागेल.
नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरमीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
गरूडाला बोलता येत नाही तर त्यानं सांगितलं असतं त्याचं दु:ख आपणाला; परंतु शूर माणसाचं वैशिष्ट्य असतं , की तो दु:ख बायकीपणानं सांगत नाही. तो हसतमुखानं भोगतो ते.
शौर्य आणि तितिक्षा दोन्ही दृष्टीनं गरूड माझा गुरू झाला.
दुर्गम भागामध्ये शिक्षणाची सोय नसताना मैलो अन् मैल पायपीट करणा-या एखाद्या गरीब मुलाच्या जीवनात एका पायरीवर गरूड भिनावा आणि त्यानं भरारी मारावी , अनंत कष्ट सोसून त्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये नावं करावं .
नव्या तरूण पिढीला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करावं ही एका रानपाखरानं घेतलेली गरूडभरारीच नव्हे काय❓
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन .
नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात.
तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच.
उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं.
फाड पंख तुझ्या त्या नाकर्तेपणाचे ,
आणि पुन्हा एकटा वाट बघ.
या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल.
निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .
मग यमसुध्दा तुला पाहिल्यावर लटालटा  कापायला लागेल !!!
.....whatsapp shared.

Sunday, 11 December 2016

हिन्दू धर्म राष्ट्र ।


हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्र’ हवेच !
भारतात ‘हिंदु’ हा शब्द जरी उच्चारला, तरी निधर्मी म्हणवणार्यांना पोटशूळ उठतो. सर्व वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांची गरळओक चालू होतेे. गांधींच्या पावलांवर पाऊल ठेवून गांधी-नेहरू घराण्यातील नेत्यांनी भारताला ‘निधर्मी’ करण्याचा जणू विडाच उचलला. आजमितीस भारतात हिंदुत्वाची विचारसरणी असणार्या पक्षाची सत्ता असली, तरी अद्यापपर्यंत तरी हिंदूंच्या परिस्थितीत म्हणावा तसा पालट झालेला नाही. हिंदु हितार्थ आता ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय आहे.
१. भारताला ‘हिंदु राष्ट्र’ संबोधल्याने सेक्युलरवाद्यांना पोटशूळ !
‘गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी ‘मी हिंदु-ख्रिश्चन आहे’, तसेच ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहे’, अशी विधाने केल्यावर समस्त सेक्युलरवाद्यांना पोटशूळ उठला. यात काहीच आश्चर्य नाही. भारताची जी घटना अस्तित्वात आली त्यात ‘सेक्युलर’ किंवा ‘समाजवाद’ हे शब्द नव्हते, हे सेक्युलरवादी विसरतात.
२. घटनेमध्ये गांधी घराण्याने ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ हे शब्द घुसडले !
घटना निर्मिती करणार्यांनी ‘हे राष्ट्र सेक्युलर आहे’, असे कधीही म्हटले नव्हते; परंतु नेहरूंनी तसे सांगायला प्रारंभ केला. वर्ष १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी घटनेत ज्या काही दुरुस्त्या (तोडमोड) केल्या, त्यात त्यांनी स्वतःच्या आणि कम्युनिस्ट यांच्या दोन तृतीयांश बहुमतामुळे घटनेत ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ हे शब्द घुसडले. त्याविषयी जनसंघ आणि इतर हिंदुत्ववादी यांनी खेद व्यक्त केला; पण आकाडतांडव केला नाही.
३. जगाच्या पाठीवर एकही ‘हिंदु राष्ट्र’ नसणे, ही शोकांतिका !
जगात अनेक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत. मुसलमान राष्ट्रे आहेत. बुद्ध राष्ट्रे आहेत. संख्येने सर्वांत अल्प असलेल्या ज्यू धर्मियांचे इस्रायल हे स्वतंत्र राष्ट्र आहे. तथापि जगात १०० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंना स्वत:चे असे एकही राष्ट्र नाही, ही शोकांतिका आहे.
४. भारताला ‘हिंदु राष्ट्र’ संबोधल्याससेक्युलरवाद्यांनी आक्षेप घेणे चुकीचे !
संघावरील पहिल्या बंदीच्या नंतर पू. गोळवलकर गुरुजींना एका युरोपीयन पत्रकाराने विचारले, ‘आपण हिंदुस्थान हा केवळ हिंदूंसाठी आहे, असे का म्हणता ?’ त्यावर पू. गुरुजी म्हणाले, ‘‘हे तुम्हाला पटत नसेल, तर हिंदूंकरता हिंदुस्थान हा एकमेव देश आहे, हे सत्य आहे, असे तुम्हाला वाटत नाही का ?’’ उर्वरित सर्व धर्मियांना आपापले देश आहेत. हिंदु ही आमची भौगोलिक ओळख आहे. त्यामुळे या देशाला ‘हिंदु राष्ट्र’ म्हटले, तर सेक्युलरवाद्यांनी आक्षेप घेता कामा नये. इंग्लंडची राणी ‘Defender of Faith’ म्हणवून घेते. अमेरिका ‘In God we trust’ म्हणते. काही मुसलमान राष्ट्रे आम्ही ‘शरीयत प्रमाणे राज्य करणारी इस्लामी राष्ट्र आहोत’, असे म्हणतात. हे सेक्युलरवाद्यांना चालते, तर ‘हिंदु राष्ट्र’ का चालत नाही ?
५. हिंदुत्वनिष्ठांनी घटनेत ‘हिंदु राष्ट्र’ असा पालट
केल्यास कोणलाही आकाडतांडव करण्याचा काय अधिकार ?
कम्युनिस्टांना बहुमत मिळून ते जर वरील पालट करू शकतात, तर उद्या हिंदुत्ववाद्यांना बहुमत मिळाले आणि त्यांनी ‘सेक्युलर’ ‘सोशालिस्ट’ शब्द काढून ‘हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून ओळखले जाईल’, असे नमूद केले, तर कोणालाही आकाडतांडव करण्याचा काय नैतिक अधिकार ?
आम्ही हिंदू इतके असंस्कृत, असभ्य आणि कोत्या वृत्तीचे आहोत का, की त्यामुळे आम्हाला भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणण्याचाही हक्क नाही. हिंदूंना स्वत:चे ‘हिंदु राष्ट्र’ असायला हवे, असे जर सेक्युलरवाद्यांना वाटत असेल, तर त्यांचा मेंदू सडका आहे, असे म्हटले पाहिजे.’
- श्री. वसंत गद्रे, मुंबई

Saturday, 10 December 2016

इये द्रविडांचिये भूमी .......!

परस्परविरोधे तू वयं पंचश्च ते शतम् ! परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकम शतम् !!


असा एक संस्कृत श्लोक आहे .एक गोष्ट तर संस्कृतचे धूर विरोधी सुद्धा मानतात कि या भाषेतले श्लोक खूपच relevent आहेत आजही ..!
वरील श्लोकाचा अर्थ असाय कि आल्यात जर परस्पर विरोध असला तर आपण केवळ पाचच राहतो आणि आपले शत्रू मात्र १०० होऊन जातात . आणि दुसर्यांमध्ये  म्हणजेच शत्रुमध्ये जर परस्पर विरोध झाला तर मग मात्र आपल्याकडे १०५ एवढे बळ राहते .अर्थातच काय एकीचे बळ  महत्त्वाचे .. आजही हेच तंतोतंत लागू पडते आपल्या भारतिय समाजाला .... गेली ७० वर्षे या देशातले दोन प्रवाह मुर्खासारखे एकमेकांशी लढत आहेत वेगवेगळ्या विषयांवर आणि यामुळेच देश प्रचंड मागे गेलाय आपला ...  

विश्वातल्या सर्व शक्तींना कित्येक वर्षांपासून हि मोरपीसाप्रमाणे  वैविध्याची श्रीमंती असलेली भूमी हस्तगत करायचीय..... ..त्यासाठीच तर breaking india हि strategy अमलात आंली जातीय . आणि देशातील काही सत्ताप्रीय लोक यांनाच हत्यार बनवले जातेय ..असो....!

आज आपण आर्य – द्रविड हि भानगड काय त्यावर बोलूयात ...!

गेल्या १०० वर्षांपासून भारतातल्या तथाकथित पुरोगामी ब्रिगेडी बहुजनी सुधारणावादी अंधश्रद्धा निर्मुलन आदी so called महान काम करायचा आव आणणाऱ्या लोकांना गेली कित्येक वर्षे बक्कळ पैसा पुरवून भारताला ईशान्य भारत विरुद्ध पूर्ण भारत , आर्य विरुद्ध द्रविड ,सवर्ण विरुद्ध दलित ,उत्तरीय विरुद्ध दक्षिणी भारत यांबद्दलच्या भम्पक कथांद्वारे देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न होतोय.

आर्य-द्रविड सिद्धांत म्हणजे नेमके काय?

इंग्रज या देशात आले तेव्हा इथे अस्पृश्यता व जातीवादाचे स्तोम माजले होते.ते कमी करायचा प्रयत्न करण्याऐवजी इथल्याच लोकांना आपले अस्त्र बनवून देशाला कायम अस्थिर करण्याचा कौरवी डाव आखण्यात आला.फोड आणि झोड हि  नीती......!
यासाठी ब्रिटिशांनी काही पाश्चात्य इतिहासकारांकडून आर्य द्रविड सिद्धांताचा इतिहास लिहून घेतला व जाणून बुजून त्या खोट्या वैज्ञानिक आधारहीन थेयरीझ णा देशातल्या दलित आदिवासी आणि दक्षिणेतील तामिळी आणि इतर द्रविड लोकांना शिकविण्यात आलेय .आणि याचाच पुरेपूर फायदा एवढी वर्षे काँग्रेसनी घेतला आणि अश्या मानसिकतेच्या पक्षांनी जनतेला मस्त लुटलंय .



यासाठी ब्रिटिशांनी aryan invasion theory लिहून घेतली व गेले शतकभर देशातल्या लोकाना वेगवेगळ्या प्रकारे तसेच  शिक्षण व्यवस्थेत सुद्धा ती शिकवली जातेय.हि थेयरी पुढील विचार उद्धृत करते.


१.invasion म्हणजे आक्रमण .एक सिद्धांत हा लिहिला गेला कि , काही हजार वर्षांपूर्वी युरोप व मध्य आशिया खंडातून आर्य नामक समूहाचे लोक मोठमोठ्या झुंडीत भारत देशावर आले.अर्थात या आर्यांच्या झुंडींनी भारतावार आक्रमण केले.या आर्यांनी इथे रहात असलेल्या मूलनिवासी लोकांवर ज्यांना द्रविड असे संबोधल्या जायचे त्यांच्यावर आक्रमण केले आणि त्यांना आक्रमणाद्वारे लढत लढत भारतीय उपखंडाच्या खालच्या भागाला ढकलले गेले . हे बाहेरून आलेले आर्य गोर्या रंगाचे होते कारण युरोप व मध्य आशियातील लोकसुद्धा गौर वर्णीय  आहेत.आणि द्रविड हे काळे होते जे आता दक्षिण भारतात ढकलल्या गेल्यामुळे राहतात. अर्थात उत्तर भारतीय लोक हे बाहेरून आलेले आक्रमणकारी  आहेत आणि देशाचे मूलनिवासी लोक द्रविड हे दक्षिणेत राहणारेच  आहेत. म्हणजे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय हे एकमेकांचे जनुकीय genetical brothers नाहीत.तर ते शत्रू आहेत अशी थेयरी मांडल्या गेली.

२.यालाच आडून आडून एक असाही विचार लिहिला गेला कि ब्राह्मण समाजातले लोक हे बाहेरून आलेले आर्य आहेत.त्यांनी आक्रमणाद्वारे वैदिक किंवा हिंदू धर्म सर्वांवर बळजबरीने लादला व सर्व बहुजनांना शुद्र दलितांना आपले गुलाम बनवले व वर्षानुवर्षे छळले.

या दोन उपोद्घातांचे आधार पुढीलप्रमाणे या थेयरी द्वारे मांडले गेले.
१.उत्तर भारतीय हे गोरे आहेत तर दक्षिण भारतीय कृष्णवर्णीय आहेत.हे उत्तरेतले लोक बाहेरून आलेले आहेत व दक्षिणेतले मूलनिवासी आहेत.
२.युरोपातील लोकांचा रंग व उत्तर भारतीयांचा रंग हा एकसारखाच गोरा आहे. शिवाय काळे लोक युरोप व मध्य आशियात शोधुनही सापडणार नाही.
३.मनुस्मृती द्वारे लोकांना गुलाम केले ते ब्राह्मन्नांनी.म्हणूनच ते बाहेरचे आहेत.
४.यासोबतच एक आधार हा आहे कि उत्तरेतल्या सर्व भाषा आर्य म्हणजेच संस्कृतोद्भव आहेत तर दक्षिणेतल्या भाषा द्रविड म्हणजे देशाच्या मूळ भाषा आहेत.अभिजात भाषा आहेत. याला आधार हा दिला गेलाय कि latin ग्रीक फ्रेंच इंग्लिश जर्मन आदी युरोपीय भाषा ह्या संस्कृतशी खूप जास्त साम्य असलेल्या आहेत. म्हणूनच तर हिंदी बंगाली पंजाबी गुजराती अन्य सगळ्या भाषांमध्ये एक लिंक दिसते तर मराठी तमिळ तेलुगु कन्नड मल्याळी या भाषा उत्तरेतल्यांना  बोलतासुद्धा येत नाहीत.कारण त्या भाषा अत्यंत वेगळ्या आणि गोंडी भाषेसारख्या आंडू  पांडूच्या म्हणजेच कठीण भाषा आहेत. अर्थात दक्षिणेतल्या भाषा अभिजात आहेत.आणि उत्तरेतल्या सर्व भाषा ह्या संस्कृतातून जन्मलेल्या आहेत.
५.उत्तरेतले लोक हे वैष्णव  आहेत कारण येथे विष्णूची पूजा जास्त होते शिवाय उत्तर भारतीय लोक पिवळे  उभे गंध लावत असतात ज्याला विष्णूगंध म्हणतात. तसेच खालचे लोक आडवे पांढरे अथवा लाल गंध लावतात.जे शिवगंध  आहे. यावरून शैव वैष्णव विवाद जन्माला घातला गेला. शंकराच्या भक्ताविरुद्ध विष्णूचे भक्त अशी हिंदुन्म्ध्येच जुम्प्न्याचा डाव साधला जातोय.

६.शंकर हा आदिवासी भटके विमुक्त भिल्ल साधे भोले लोक यांचा देव आहे.तर विष्णु हा बुद्धिमान चतुर पण लुर्या व बनियावादी ,गोड बोलून मानसिक गुलाम करणाऱ्या शेटजी भटजींचा देव आहे असही एक आधार आहे.



आर्य द्रविड सिद्धांताचे खंडन  :

आता आपण तार्किक वैज्ञानिक व ऐतिहासिक दृष्टीने वरील सर्व गोष्टी कशा खोट्या ते सिद्ध करूयात .देशातले डावे उजवे आणि इतरही लेखक इतिहासकार व राजकारणी ज्या महान संशोधकाचा वारसा सांगतात तो म्हणजे मक्स्मुल्लर हा विदेशी लेखक. हा लेखक कडवा भारतविरोधी होता पण तो तेवढाच बुद्धीवादिसुद्धा होता.यानेच जगात सर्वप्रथम वेदांची भाषांतरे केली.त्यात मुदाम चुका केल्या.तो भारताचे शोषण करावे यासाठीच काम करायचा. आर्य आक्रमणाचा सिद्धांत यानेच लीहिल .याच महाशयांना डावे पुरोगामी आजही पूजतात. पण या देशाला symbolism  materialism  अर्धवट पणा याची घान सवय लागलेली आहे.तसेच झालेय. भारतद्वेष पसरवणाऱ्या साहित्याचा जनक हा मक्स्मुल्लर महाशयांनी मरतेवेळी खर बोलावे या मान्यतेप्रमाणे एक खरे काम करावे अये एक काम केले ते असे कि ,शेवटच्या काही दिवसात यांनी हे मान्य केले कि आर्य द्रविड सिद्धांत खोटा आहे.हा म्हणाला कि कोण कुठून आले हे सांगता येतच नाही.दस्तुरखुद्द मक्स्मुल्लर महाशयांना हे मानावेच लागले या मागे काहीही सत्य नाही.हे सर्व आपण प्रज्ञाभारती श्रीधर भास्कर वर्णेकर महोदयांच्या भारतीय तत्त्वज्ञानावरील पुस्तकात मिळते.

हे सर्व कुभांड रचणार्यांना आणि आजही ते मानणार्यांना एवढे सुद्धा लक्षात येत नाही.कि उत्तर भारतात विशत असा हिमालय पर्वत आहे हिमाचल प्रदेश हे नावच मुळी बर्फावरून देण्यात आलेले आहे.आपल्याला माहितच आहे कि काश्मीर हा बर्फाचा भाग आहे तिथे कित्येक महिने नुसता बर्फच बर्फ असतो .शिवाय युपी बिहार एवढी थंडी अन्यत्र कुठेच पडत नाही. दार्जीलिंग कुल्लू मनाली , सिक्कीम सोनमर्ग गुलमर्ग हि सगळी थंड हवेची ठिकाणे हि उत्तरेत आहेत कारण उत्तरेत हिमालय पर्वत आहे आणि तिथे थंडी जास्त पडते याच कारणामुळे तिथले लोक गोरे आहेत.पण याचा अर्थ असा सुद्धा होत नाही कि तिथे काळे लोक सापडणारच नाहीत .मायावती मुल्ला मुलायम हे कलेच आहेत तर जयललिता गोऱ्या  आहेत.शिवाय दक्षिण भारताचा नकाशा पहिला असता असे लक्षात येत कि भारतीय उपखंड हा दक्षिणेला निमुळता होत जातो म्हणूनच तर त्याला पेनिन्सुलर इंन्दिया म्हणतात . दक्षिण भारत उष्णकटीबंधात येतो .भौगोलिक संशोधन संस्थांनी वैज्ञानिक आधारावर हे सिद्ध केले आहे कि दक्षिण भारतातवर सूर्यकिरणे तीव स्वरूपात पडतात..
   आता प्रश्न भाषेचा .तर हे एकदम सत्य आहे कि दक्षिणेतल्या सर्व भाषा मराठी धरून अभिजात आहेत म्हणजेच क्लासिकॅल लांग्व्हेज आहेत .पण याचा आधार विदेशी लोकांनी देण्यापेक्षा स्वतः दक्षिण भारतीयांची पुराने धर्मग्रन्थ आणि तामिळी व अन्य भाषेतले २००० वर्ष जुने साहित्य शिलालेख त्यांच्या मान्यता काय सांगतात ते म्हण्त्त्वाचे आहे.तामिळी समाजामध्ये हि मान्यता दृढ आहे कि त्यांची भाषा हि भगवान कार्तिकेयाने व अगस्ती ऋषि ने  त्यांना शिकवलेली आहे.अगस्ती मुनी हे कावेरी जी  त्यांची पत्नी लोपामुद्रा आहे.तीच्य काठी बसून आपले जीवन घालविले .यांनीच तमिळ भाषा जन्माला घातली व पुढे कार्तिकेयाने तिचा प्रसार केला असे पक्के मत स्वतः तामिळी जनतेचे आहे . मुरुगन सुब्रामानिम स्वामी किंवा कार्तिकेय या नावाने कार्तिकस्वामी महारष्ट्रात जसा गणपती आराध्य म्हणून पुजला जातो तसा तिथे पुजला जातो.तामिळी लोक हे शैव कमी आणि कार्तिकेय पूजक जास्त आहेत.त्यांच्या गळ्यात सोन्याचे लोकेत असते ज्यावर कार्तिकेयाची प्रतिमा कोरलेली असते. ज्यांनी तामिल्नादूचा अभ्यास केलाय ते हे जाणतात .याशिवाय एक समाज असाही आहे कि भारत मुनींनी भरतनाटयम तामिल्नादुंत लिहिले व साक्षात शंकराला पाचारण केले तांडव करायला .येथे हे लक्षात घ्या कि भ्र्त्नात्याम चे दोन प्रकार आहेत एक तांडव जे पुरुष करतात आणि एक लास्य जे स्त्रिया करतात.शंकरांनी तांडव करत असताना डमरू वाजवला व त्यातून जे शब्द आले टी म्हजे तमिळ भाषा असाही एक समज रूढ आहे.
तसेच राहिला भाषांच्या लिपीचा प्रश्न तर दक्षिणेतल्या सर्व लिप्या ह्या ब्राह्मी भाषेतून विकसित झाल्या आहेत .हे द्राविडी लोकांनीच शोधून दाखवले आहे. शिवाय द्रविड हा शब्दही संस्कृतच आहे.द्रविड म्हणजे द्रवाने वेढलेला.संस्कृत भाषेचे युरोपीय भाषांशी विलक्षण साम्य निश्चितच आहे म्हणूनच भारतात फ्रेंच जर्मन शिकणारे लोक आधी संस्कृत शिकतात म्हणजे मग या भाषा अगदी सोप्या होऊन जातात.महादेवन कृष्णन कल्याणं हि संस्कृत नावे तर यांचीच जास्त असतात .तसेच महिषासुरमर्दिनी स्तोत्रम विश्नुसःस्र्नाम महालक्ष्मी अष्टक या सर्व स्तोत्रांना रेकॉर्ड करून गाण्यांच्या रुपात दक्षिणेतल्या लोकांनीच आणले.उत्तरेत मध्य भारतात संस्कृत आणि संस्कृती यांचा प्रभाव मोग्लांमुळे पुरता नष्ट झालाय हे सत्य मानावेच लागेल.

राहिला प्रश्न ब्राह्मणाचा तर त्यातल्या काहिंनी गेली कित्येक वर्षे बहुजन्नांना लुबाडले आहे व आजही येन केन प्रकारे लुबाडत आहेतच.पण या लुटीला फुले शाहु साने सावरकर यांरखे विरोधक कमीच का मिळाले?? शिवाय पेशवे घराणे आनंदीबाई जोशी संत द्न्यानेश्वरांचे आई बाबा तसेच सर्वच ब्राह्मण महिला यांनाही तितकेच लुटले गेले?? आणि गावापासुन शहरापर्यंतच्या जमिनदार ठाकुर पाटील देशमुखांनी दलितांना काय कमी लुटले? क्षत्रियांनी आपले काम बजावले नाही। म्हनुनच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ते भिक्षुकशाहीचे बंड झाले। अर्थात काही चांगले अपवाद वगळता.मुद्दामच माझ्या ब्लोगच नावात काही शब्द घातलाय मी म्हणजे कोणालाही वाईट वाटू नये.ह्यावर अजूनही मला तोडगा सापडला नाही माझा ब्लॉग वाच्नार्यांनो तुमच्याकडे यावर समाधान असेल तर सांगा.
आता शैव वैष्णव विवाद . विष्णूच सगळे अवतार राम कृष्ण बुद्ध हे क्षत्रिय कुळात झाले .परशुरामाची आई रेणुका हि राजाची लेक होती शिवाय परशुरामाने आयुष्यभर क्षत्रिय कार्यच केले त्यामुळे विष्णु हा ब्राह्मणांचा देव नसून आम्हा क्षत्रियांचा देव आहे.क्षत्रियांना म्हणजे राजा पाटील देशमुख उत्तरेतले ठाकूर राजपूत जमिनदार यांना उगाचच अन्नदाता नाही म्हणत एवढ्या वर्षांपासून .जसा विष्णु पालान्हार तसा क्षत्रिय पण.राजापण. आणि हो शाक्त्य गाणपत्य सौर कापालिक या संप्रदायाचे लोक मग काय अंटारटीका खंडातून टपकले भारतात ?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी annhilation of caste या पुस्तकात आर्य द्रविड सिद्धांताला सरळ सरळ खोटे मानले आहे.एवढेच नाही तर who were shudras ? या पुस्तकात चक्क शुद्र हेच क्षत्रिय असल्याचेही म्हटले आहे. काँग्रेसी व पुरोगामी पिल्ले स्वतःला आम्बेडकर महोद्यांपेक्षा शहाणे समजतात का? काँग्रेसनी तर १९९१ मध्ये त्यांच्या मृत्यु नंतर ४० वर्षांनी त्यांना भारतरत्न दिला तेवा नाही रे केकाटले तुम्ही ?? हे सर्व लोक आंबेडकरी विचारांचे मारेकरीच आहेत .
उत्तर पुर्वेतले लोक तिथल्या वातावरणामुळे थोडे चीनी दिसतात त्यांच्या तर हत्या झाल्या दिल्लीमध्ये मग त्यासाठीप्न एखाद सिद्धांत लिहायला पाहिजे हो न? समाजात एकता आणायला काय केले आजवर?



सगळेच भारतीय लोक हे संस्कृतीने निश्चितच द्रविड आहेत . आर्य शब्दाचा अर्थ विवेकी असा होतो म्हणूनच कृण्वन्तो विश्वमार्यम म्हणजे विवेकी समाज घडवणे. उत्तरेतून संस्कृती नष्ट झाली मोगल तुर्क अफगाण शान कुशन हून यांचेमुळे उत्तरेत युरोपीय मानसिकतेचा प्रभाव आहे .गोरेपणाला महत्त्व उत्तरेत आहे दक्षिणेत नाही.सगळे पंजाबी कपुरांचे पोट्टे फक्त गोर्या चामडी मुळे हिरो बनवले जात आहेत .पण आर माधवन ट.गोपीचंद नितीन कुमार यांसारख्या खर्या सुंदर कलाकरांना काहीही किंमत उरली नाहीय . उत्तर व मध्य भारतीयांनी निश्चितच भारतीयत्व स्वताहून सोडले हे अगदीच खरे आहे .
हि भारतभूमी द्रविडांचीच आहे यात काहीच शंका नाही.


महाराष्ट्र आर्य कि द्रविड यावर पुढचे पारिजात ओव्न्यात येईल तूर्तास आपले आभार .....








Friday, 9 December 2016

मनाची किती हाय....... स्थित्यंतरे .....!

 
by saurabh vaishampayan


खुळ्या सांजवेळा खुळा तोच गहिवर कुणी रोज त्याला कसे सावरे ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..
उन्हासोबतीने असे चालते की जणू सावलीशी न नाते जुळे
झुगारून देई जुन्या रीतभाती मिठी मारते वादळाला खुळे
फिरे धुंद, संदिग्ध पण सोवळेसे, थव्यातून फिरती जशी पाखरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .......!



दिवे लागणीची जशी वेळ येते दिसे अंगणी सांजवातीपरी
जणू होत स्मरणे विरागी स्वरांनी फिरे अंतराळी जशी सावरी
तमा ना कुणाची कशाची मनाला, जसे मन म्हणे ते तसे वावरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे ......!









निळ्या सावळ्याशा दिगंतावरी ते नवा खेळ खेळे दिशांसोबती
कधी पूर्व तर अन् कधी पश्चिमेला मिती शोधते आपुल्या भोवती
कधी एकटे तर कधी संगतीने गवसती कशी त्यास गत्यंतरे ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. मनाची किती हाय! स्थित्यंतरे .......!