Tuesday, 11 September 2018

दहाची नोट....!



स्थळ : पुणे रेल्वे स्थानक

एव्हाना गाडी यायची वेळ झाली होती. सगळे प्रवासी आपला बोगी नं स्क्रीन वर बघून त्या त्या जागी सामान घेऊन धडपड करत जात होते. रुळाच्या पलीकडे लोखंडाचा लांब पाईप होता ज्यातून रेल्वे गाडीत पाणी भरतात तो पाईप. आणि तिथेच लाल रंगाच्या फाटक्या कपड्यात ती उभी होती . पायात चप्पल सुद्धा नाही . त्या दगड गिट्टी असलेल्या रुळाच्या बाजूच्या जागेवर उभे राहावे लागणे तेही अनवाणी हे तिचे आणि तिच्यासारख्या कित्येकांचे दुर्दैव भारताला मिळालेल्या तथाकथित स्वातंत्र्याच्या 7 दशक पुरती नन्तर सुद्धा. ती चेहऱ्यावर सुरकुत्या असलेली , पंचविशीत असूनही चाळिशीकडे झुकलेली दिसत होती जणू अवेळी पडलेल्या पावसाने आमच्या विदर्भातली पराटी कापूस उद्धवस्त केली तशी. कृश आणि दरिद्री अवस्था.


तेवढ्यात गाडी आली माझा डबा एस 1 होता . 15 वी सीट साईड लोवर म्हणतात ना तीच. मी सामान घेऊन आत गेलो आणि बसलो. खिडकीतून सहज बाहेर पहिले असता ती हो तीच त्या रेल्वे मध्ये पाणी भरायच्या पाईप मधून ओंजळीने पाणी पीत होती. आपली तृष्णा भागवत होती. पण आयुष्यात असलेल्या दुर्दैवाचे काय तिला प्रश्न पडला नसेल काय? उणीव पुरुषत्वाची आणि स्त्रीत्वाचीही त्यात नशिबी आली गरिबी , जागोजागी रेल्वे मध्ये टाळ्या वाजवून पैसे मागण्याची वेळ. तरीही तीच हो ना तीच तो नाही म्हणता येत त्यांना कारण वैज्ञानिक दृष्ट्या ते एक्स झिरो फिमेल्स असतात.


अशीच पाणी पिऊन ती माझ्या डब्ब्यात चढली. आणि टाळ्या वाजवून पैसे मागू लागली. मी गाणी ऐकत बसलेलो, माझ्याकडे आली आणि इशाऱ्यात त्या केविलवाण्या चेहऱ्याने पैसे मागितले. मी क्षणाचाही उशीर न करता पाकिटातून 20 ची नोट काढून देऊन दिली. तिने डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. आणि निघून गेली.


 पण मला काही वेळासाठी विचार देऊन गेली जो भावनिक दृष्टीने जन्मभर मला दुःख पर्वताएवढे याची जाणीव देत राहील. मी आपला तेच अंतकरणातल्या देवाला विचारू लागलो देवा असे का असावे रे या लोकांचे नशीब  त्यांना ना पुरुष म्हणून जन्म दिला तू ना स्त्री म्हणून, तृतीय पंथी किंवा किन्नर अथवा (दुर्दैवाने हा शब्द लिहावा लागतोय) छक्का अशी शेलकी संबोधने कायमचीच त्यांच्या नशिबात. समाज बघून हसतो त्यांना. चीड उडवतो त्यांची. त्यांना कामे देत नाही. त्यांची अशी गत केलीय आपण. सृष्टीच्या सृजनाचे प्रतीक शालूका आणि लिंग यांच्या ने बनलेल्या शिवाच्या पिंडीला मानणारा समाज, अर्धनारीश्वर रुपी आदी पुरुषास भजणारा समाज या मानव रुपी देवाचा इतका तिरस्कार का करतो कोण जाणे?

मी याच विचारात होतो तर कोणीतरी डोळयांसमोर 10 रुपयाची नोट धरली मी आश्चर्याने वर पहिले तर काही निमिषांनी परत आलेली तीच होती . आणि तेही 10 रुपये परत करायला आलेली विशाल हृदयी ती. मी दिलेल्या 20 रुपयातले 10 परत करावे किती हा मर्यादा असलेला स्वभाव. स्वतः जवळ काही नसून असलेले ते आचरणातले समाधान. तो विवेक जो धर्माच्या नावाने दुकाने पक्ष फेसबुक पासून नोकऱ्या सुद्धा चालविणाऱ्या लोकांमध्ये नाहीय. तो तिचे ठायी दरिद्री नारायणी रुपात विलसतो आहे. मी 10 ची नोट परत घ्यायला नाही म्हणालो. पण ती ऐकायला तयार नव्हती. ते दहा रुपये डोक्यावर ठेवून म्हणाली ठेव जपून कामात येईल. मला घ्यावीच लागली नोट परत. नमस्कार करून पाकीटातल्या दत्त गुरूंच्या फोटो च्या कप्प्यात ठेवली ती नोट. कायम जपून ठेवेन ती आता. अतिलोभो न कर्तव्य:। हा मर्यादेचा गुरु मंत्र देऊन गेली ती. आणि मी परत दुःखाच्या डोहात एक डुबकी मारून आलो.

असो ।

Tuesday, 4 September 2018

कृष्ण....!

कृष्ण

लहानपणी आपल्यासारखा एक छोटू बाला आपल्याला घरच्या  देव्हाऱ्यात बसलेला दिसतो. टकलू आणि नंगु असतो तो मग त्याला रोज आंघो ळ घालून मस्त अष्टगन्ध लावून छान मऊ कपडे घालून पाळण्यावर बसवताना सगळे आपण मोठे झालो पण तो कृष्ण आजही तितकाच आणि तसाच आहे तेवढाच गोंडस निरागस मोठे डोळे सगळीकडे फिरवून बघणारा सर्वांना आकर्षणारा द्वारकधीश कृष्ण. स्वतःचे नाव सार्थकी लावणारा एकमेव देव म्हणजे कृष्ण लक्ष्मी ची पूजा करा ती सर्वांना प्राप्त होत नाहीं. पण कृष्ण म्हणजे काळा नाही. कर्षती आकर्ष यति स: कृष्ण:. आकर्षणारा तो म्हणजे कृष्ण. तो आकर्षून ठेवतोच .



घरी लोणी काढलं कि पहिला वाट त्याचाच एक बाळ नेहमी सर्व घरात असते ते म्हणजे कान्हा। ज्याला त्याची आई दोऱ्यात बांधून ठेवू शकली नाही. तो कृष्ण ज्याने ब्रह्मांड स्वतःच्या सामर्थ्याने बद्ध केले तो कृष्ण हे लिहितांना माझे मन दास्यत्वात गेलय त्याच्या कारण तो कैवल्य देणारा मुकुंद आहे. पूर्णावतार आहे योगेश्वर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचा देव कुठला असेल तर तो हा प्रेमातून शाश्वत सुख देणारा राधावल्लभ.

सुनीतीचा महामेरू आणि चंचलतेचा कारक. सत्य आणि त्रेता युगातून मृत्यू लोकांस नवे तत्वज्ञान देणारा दार्शनिक. अगाध प्रेम शिकविणारा कायस्थ , भौतिक जगात शांती स्थापविणारा क्षत्रिय आणि अद्वैताचं ज्ञानामृत पाजणारा विप्र, परसावी च्या हातून केळाची साले खाणारा शूद्र आणि चातुर्वर्ण सृजन करणारा चतुर्भुज श्रीहरी. जिथे मन त्याच्या श्वासातल्या बासरी तुन निघणाऱ्या वृंदावनी सारंगाला कायमचे वश होते असा मुरली मनोहर.  सगळे राग त्याचे ख्याल, प्रेमाची गीते, शृंगार म्हणजेच कृष्ण. नीर भरन कैसे जाऊ सखी अब या टिलक कामोद रंगापासून ते बन बन ढुंढन जाऊ या वृंदावनी सारंग पर्यंत प्रत्येक राग त्यालाच वाहिलेला आहे.



धर्मवार कायम तटस्थ असणारा निश्चल आणि धर्मासाठी रणांगण पळून जाणारा रण छोड अन्यांस हसवून मग त्यांचे हसे करणारा हा महायोद्धा. ऐहिक सुख दुःखाच्या वर शाश्वत सुख प्रदान करणारा केशव गलीमल हरण नाम. गोपिकाप्रिय रासरसेश्वर तडत ध्वीती.

बस यापुढे केवळ कृष्ण कृष्ण आणि कृष्णच.

©Sagar Ghorpade

Sunday, 26 August 2018

भगवा दहशतवाद :An engineered conspiracy........

हा लेख प्रत्येक भारतीयाने निक्षून वाचावा। उद्या आपली मुले आतंकवादी ठरवली जाऊ शकतात।



शरद पवार या माणसाशिवाय महाराष्ट्रात एक पानही हलू शकत नाही असा एक सार्वत्रिक समज आहे. झालेला म्हणा, हेतुपुरस्सर करविलेला म्हणा...पण या माणसाला चर्चेत रहायला आवडतं हे खरं...माणुस तसा चलाख आणि जात्याच हुशार!
रावण, कर्ण, कंस, दुर्योधन, मिर्झाराजे जयसिंग हे सर्वही नव्हते का हुशार! अगदी तसाच! फ़रक फ़क्त आपण आपली निष्ठा कुठे वाहतो त्यावर पडत असतो...
या सर्वांनी आपापल्या निष्ठा सत्याच्या शत्रूंच्या चरणी वाहिल्या आणि इतिहासात ते खलनायक म्हणून अजरामर झाले. नमनालाच हे घडाभर तेल ओतण्याचे कारण पुढचे नाटक मोठे व गंभीर आहे... लक्ष देऊन वाचा...१००% लक्ष इकडेच असूद्यात...
जगात इस्लामी दहशतवाद अमेरिका व सोव्हियत रशियानेच जागा केला असा एक सार्वत्रिक भ्रम पैदा करण्यात एव्हाना कम्युनिस्टांना अर्थात डाव्यांना पुरेसे यश आलेले आहे. स्वत:ला बुद्धीमान समजणारे अनेक बुद्धीजीवी यावर तावातावाने बोलून तुम्हाला गप करतील! परंतु तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांचा अनुभव मात्र पराकोटीचा वेगळा असतो! आणि अनुभव हा तर सर्वात जवळचा गुरु आहे!
मुघल, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, इमादशहा, बरीदशहा या सर्वांनी भारतात ७०० वर्षे घातलेला धुडगूस हा इस्लामिक दहशतवादच होता, याकडे हे पुरोगामी जाणीवपूर्वक काणाडोळा करतात. तरीदेखील स्वातंत्र्यानंतर भारतात झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हटलं तर दाऊद इब्राहिम या मुसलमानाने घडवून आणलेले मुंबईतील साखळी बॉंबस्फ़ोट...


यानंतर आजतागायत भारतात अनेक मुसलमानांनी हजारो बॉंबस्फ़ोट करून लाखो निरपराधांचा जीव घेतलेला आहे. (स्फ़ोटांची संख्या १८,८४२ सौजन्य: jihadwatch.org)
परंतु तरीही हा पहिला हल्ला महत्वाचा आहे! कारण हा हिंदु समाजाला पहिलाच धक्का होता. या काळात विठठलाची शासकीय पूजा कधीही न केलेले महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन मुंबईत ११ स्फ़ोट झालेले असूनही १२ स्फ़ोट झाल्याचा खोटाच निर्वाळा दिला होता! सर्व ११ स्फ़ोट हिंदुबहुल भागात होऊन ३५० च्या वर हिंदू मारले गेलेले असताना १२ वा स्फ़ोट मशीदीसमोर झाला असा धादांत खोटा दावा करून हिंदूंच्या भडकणा-या भावनांना भ्रमित करण्याचे “महत्कार्य” राज्यातील सर्वोच्च संवैधानिक पदावर बसून पवारांनी करून दाखविले होते. दाऊदला मुंबईबाहेर पळून जाण्यातही त्यांनी मदत केल्याची वृत्ते पुढे अनेक वर्षे अधून मधून येत असत. हिंदु समाज विसराळू आहे. त्यामुळे त्यांना अधुन मधुन असे पुराणातील दाखले द्यावे लागत असतात. असो.
याचा ले. कर्नल पुरोहित आणि मोदी यांच्याशी काय संबंध ? सांगतो..सर्व सविस्तर सांगतो!
मुंबई स्फ़ोटापासून सुरु झालेले स्फ़ोटांचे सिलसिले पुढे इतके विकोपाला गेले की भारतात कुठेही एखादा स्फ़ोट होणार, त्यात हिंदु किडामुंगीसारखे मरणार व एखादी इस्लामी दहशतवादी संघटना त्या स्फ़ोटाची जबाबदारी स्वीकारून मोकळी होणार, लोकही काही दिवस हवालदिल होऊन,  चरफ़डून पुन्हा आपापल्या कामाला लागणार. पोलीस तपास संथगतीने सुरु रहाणार, काही दहशतवाद्यांना अटक झालीच तरी तारीख पे तारीख च्या खेळात वेळ दवडत ते आरामात तुरुंगात सरकारी खर्चाने मटण बिर्याणीवर ताव मारत रहाणार...पुढच्या स्फ़ोटाची वाट पहात भयाने पछाडलेली जनता देवळात जातानाही पोलीसापुढे हात वर करून त्याला अंगझडती घेण्यास पूर्ण सहाय्य करणार! परंतु एकालाही असे वाटत नसे की काय संबंध माझी झडती घ्यायचा? मी का अपराधी म्हणून संशयाने पाहिला जात वावरतोय? तेही माझ्याच देशात, माझ्याच भूमीत आणि माझ्याच देवाला जाताना!  पण छे हो! पुरोगामी महाराष्ट्रात असला अभद्र विचार करून कसा चालेल!
पण इकडे इस्लामी दहशतवादाचे नियोजन करणारी मंडळी मात्र चांगलीच चिंतेत पडली होती, कारण गेल्या अनेक शतकांत अनेक धर्मांच्या लोकांना, संस्कृतींना जसे हिंदुंनी निपचित पडलेल्या अजगराने हरीण पचवावे तद्वत पचवून भगवाच ढेकर दिला होता तसेच हे हल्लेही हिंदुंनी पचवून टाकले. मुसलमान ना? तो बॉंब फ़ोडायचाच! जन्मसिद्ध हक्कच आहे तो त्याचा! अशाच थाटात सगळे विचार करू लागले! इतकेच काय! मुसलमानांना वाईट वाटू नये म्हणून शिवराय आमरण मुसलमानांशीच लढले हे ठाऊक असूनही सर्वजनीक जीवनात मात्र त्यांच्या  सैन्यात कसे मुसलमान होते हे हिंदूच अहमहमिकेने सांगू लागले.
भारतात नागरी युद्धे भडकून एकदाचा तो देश छिन्नविच्छिन्न करावा व त्याचे ज्याला जितके हवेत तितके तुकडे त्यांनी तोडून घ्यावेत या विचाराने मग ख्रिश्चन-मुसलमान व डावे असे सर्व गट एकत्र आले.
यात धर्मप्रसारासाठी झटणारे इवांजलिस्ट, कम्युनिस्ट, मारक्सिस्ट, नक्षलवादी, फ़ुटीरतावादी, मुसलमान अतिरेकी गट, पुरोगामी इतकेच काय पण फ़ितुर झालेले काही जन्महिंदुही सामील झाले. याच्या पुराव्यांसाठी जिज्ञासूंनी राजीव मल्होत्रांचे ब्रेकिंग इंडिया हे पुस्तक अवश्य वाचावे. आता या सर्वांचे अर्थकारण कसे चालायचे? ती जबाबदारी अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए. व पाकची आय.एस.आय. यांनी उचलली! हे हवेत मारलील बाण नसून रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेचे एक जबाबदार अधिकारी आर.एस. एन. सिंग यांनी २०१४ साली याचे पुरावे सादर केले होते, तेही इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
या सर्वांनी अखेरीस असे ठरविले की मूर्ख हिंदूंना अजून भ्रमित करण्यासाठी “हिंदु दहशतवाद” नावाचा नवा बागुलबुवा उभा करायचा!  कटाची सर्व सिद्धता झाली! आधीच या अभद्र युतीत सामील असलेले काही राजकारणी दिमतीला होतेच! आणि एक दिवस अचानक मुंबईत ७ “हिंदु दहशतवादी” शिरले! सर्वांच्या हातात सिद्धिविनायकाच्या बाहेर डेव्हीड कोलेमन हेडली नामक अमेरिकन माणसाने विकत घेऊन त्यांना दिलेले भगवे गंडे दोरे होते. कपाळी कुंकु होते! इतकेच काय कानाला भोकेही पाडली होती, नव्हे नव्हे उत्तम फ़ारसी विरहित हिंदी बोलण्याचे वर्ग पूर्ण करून ही मुले आली होती! आणि त्यांनी तासाभरातच भारताची आर्थिक राजधानीच वेठीला धरली!  या कटाची पुसटशी कल्पना असलेले काही उमदे अधिकारी याच काळात अचानक काही कारण नसताना एकाच गाडीत बसवून या “हिंदू” मुलांपुढे पेश केले गेले, ज्यात एटीस प्रमुख करकरे, पवारांचे अनेक वर्षे अंगरक्षक राहिलेले अशोक कामटे व दाउदची अर्धी गॅंग टिपणारे शार्पशूटर साळस्कर यांचा समावेश होता. होत्याचे नव्हते झाले. “बडे बडे शहरोंमे छोटी छोटी बाते होती रहती है।“ असे वाक्य बोलावयास लाऊन या काळात एका चांगल्या नेत्याची धुळधाण करवली गेली.  व पुढे तोच नेता मुखाच्या कर्करोगाने देवाघरी गेला. त्याचा बोलविता धनी मात्र त्याच रोगातून जिवंत वाचला! आहे की नाही कमाल! इतक्यात घात झाला! ज्ञानोबा-तुकोबांच्या या महाराष्ट्रात आपल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवणा-या त्या आईची कूस धन्य करीत हवालदार तुकाराम ओंबाळे यांनी गोळ्यांचा अक्शरश: पाऊस आपल्या छातीवर सिंहासारखा झेलत त्यातल्या एका पोराला जिवंत पकडला आणि सगळाच दाव उलटला!
जगातला सगळ्यात मोठा हिंदु दहशतवादी हल्ला क्षणात इस्लामी ठरला व अजमल कसाब भारताच्या तावडीत सापडला! क्षणात सूत्रे हलली व तत्कालीन भारत सरकारच्या सर्व पाईक नेत्यांना सूचना गेल्या की भगवा दहशतवाद हा शब्द लोकांच्या मनावर बिंबवा! आणि मग राहुल गांधी असो, सुशीलकुमार शिंदे असो, पी. चिदंबरं असो की दिग्विजय सिंग असोत सर्वजण एकमुखाने भगव्या दहशतवादाची कोल्हेकुई करू लागले!
इकडे याच काळात हिंदु धर्माचा पाया खिळखिळा करता यावा या करिता “मराठा सेवा संघ” नमक एक संघटना पाकिस्तानच्या निधीतून कामाला लागली.मराठा हे नाव दिसले की महाराष्ट्र डोळे झाकून विश्वास ठेवत असे. या विश्वासाला तडा देणारी हीच ती संघटना! त्यांना हिंदू धर्मात फ़ूट पाडण्याचे कार्य सोपविण्यात आले. विशेषत: हिंदू धर्माची प्रखर ज्योत ज्यांच्या मुळे तेवत राहिली त्या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज व रामदास स्वामी यांना टार्गेट करून या लोकांनी शिवधर्म नामक एक धर्म स्थापन केला व हिंदूंना मूळ धर्मापासून दूर नेण्यास या लोकांनी सुरुवात केली. यासाठी संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड या व अशा शेकडो फ़ुटकळ संघटना पाकिस्तानातील शोहदा ब्रिगेड, ३१३ ब्रिगेड, जमात-ए-इस्लामी आदींच्या तालावर नाचू लागल्या. अभ्यास नसलेल्या हिंदू मुलांना जाळ्यात ओढून नासवू लागल्या. या सर्व घडामोडींचा सविस्तर अहवाल एक राष्ट्रनिष्ठ सैनिक तयार करीत होता व वेळोवेळी केंद्र सरकारला कळवीत होता. त्याचे नाव ले. कर्नल श्रीकांत पुरोहित. अनेक वर्ष भारतीय तोफ़खान्यात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या या अधिका-याला स्वेच्छेने लष्करी गुप्तवार्ता विभागाचा देवळाली कॅंपमधील कारभार सोपविण्यात आला होता. परंतु केंद्रातील सरकारच मुळी त्या काळात व्हॅटिकन व इस्लामाबाद येथून हलत होते! त्यामुळे या राष्ट्रनिष्ठ सैनिकाचीच गुप्त वार्ता महाराष्ट्राकडे पाठविली गेली व त्याचा बंदोबस्त करण्याचे आदेश आले. वरील सर्व घटनाक्रमात पवार साहेबच सरकारात होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. मालेगावला असाच एक स्फ़ोट मुसलमानांनी घडवून आणल्यावर पवार साहेबांनी अलीबागला एक चिंतन शिबीर घेऊन सर्व स्फ़ोटांनंतर मुसलमानांनाच का अटक करता? असे विचारत पोलीसांना जणू हिंदुंनाही कटात गोवण्याचे आदेशच दिले!    आणि तिथुन पुढे घडलेल्या प्रत्येक स्फ़ोटात या कर्तबगार लषकरी अधिका-याला गोवण्यात आले!
ज्या एटीएस ला पुरोहितांनी अधिकृतपणे अरबी व फ़ारसी भाषा शिकवली, कुराण वाचायला शिकवले त्यांनाच अटक करण्याची नामुष्की पोटासाठी या पोलीसांवर आली. याला कारण केवळ शरद पवार होते .
पुढे पवारांच्या संपर्कातील अनेक नेते, कार्यकर्ते हीच री ओढू लागले व इस्लाम बद्दल कुणी बोलू लागला की त्याला मालेगाव, समझोता एक्सप्रेस , इशरत जहां असले तेच ते दाखले देऊ लागले. अभ्यास करणे रक्तातच नसलेल्या हिंदूंनाही हे शब्द मग अंगवळणी पडले व कुठेही स्फ़ोट झाला की आता हा कुणी केला? मुसलमानांनी की हिंदूंनी असे तेच विचारू लागले! या दरम्यान एक मोठेच सत्तांतर या देशाने अनुभवले! व अशाच एका “हिंदू दहशतवाद” फ़ेम दंगलीतून अर्थात गोध्रा कांडातून मोदी नामक एका महानायकाचा उगम झाला! नव्हे नव्हे पुरोगाम्यांनीच तो केला! मोदींना जितके मोठे हिंदुंनी नाही केले तितके मोठे त्यांच्या विरोधात अपप्रचार करून ते काम माध्यमांनी व त्यांच्या अन्नदात्यांनी केले. वरील सर्व बाबींचा तटस्थ अभ्यास रॉ मधील काही लोक करत होते, त्यांनी थेट मोदींनाच हे पुरावे सादर केले! आणि गम्मत पहा! पुढच्याच दिवशी मोदी बारामतीत हजर झाले! सगळीकडे एकच बोंब उठली! मोदींना हे करण्याची काय गरज होती? वगैरे वगैरे, परंतु एकदाही आमदारकीची निवडणूक न लढवता जो मनुष्य थेट त्या आमदारांचा बाप अर्थात मुख्यमंत्री होतो व एकदाही खासदारकीची निवडणूक न लढवता जो मनुष्य थेट खासदारांचा मुखिया अर्थात पंतप्रधान होतो त्याला आपण राजकारण शिकविणारे कोण हे या पोलोटिकल पंडितांना सांगावे तरी कुणी! असो. परंतु या भेटीने पवारांची जी गाळण उडाली ती आजतागायत कायम आहे! ज्यांचे बोट धरून राजकारणात आपण आलो त्यांनाच बुडविणा-या पवार साहेबांना म्हणुन तर मोदींचे ते वाक्य फ़ारच झोंबले “मी पवार साहेबांचे बोट धरूनच राजकारणात आलेलो आहे!”
मित्रो! आगे आगे देखो होता है क्या! समझने वालोंको इशारा काफ़ी है! नासमझ हो तो इशरत भी क्या कम है!
जल्दी नितीश कुमार बनो! नही तो तुम्हारा शरद पवार हो जायेगा!
एका अत्यंत कर्तबगार लष्करी अधिका-याची, राष्ट्रसेवेची, ऐन उमेदीची ९ वर्षे तुरुंगात खितपत घालविणा-यांना त्याची फ़ळे तर नक्कीच मिळणार! परंतु आपण आता तरी शहाणे होऊयात आणि हा हिंदु दहशतवाचा बागुलबुवा पवार साहेबांच्या हयातीतच फ़ोडून टाकुयात! एकेकाळी पंतप्रधानपदाचा हक्काचा दावेदार असणा-या माणसाला आज बारामतीतूनही निवडून येण्यासाठी जंग जंग पछाडावे लागत आहे याचे रहस्य संगतीत दडलेले आहे! “असंगाशी संग प्राणाशी गाठ “ हे काही कुणी उगाचच नाही म्हटलेले!

॥ www.dasbodh.com ॥

Monday, 6 August 2018

मित्र दिन

Tukaram Chinchanikar is feeling यदि वेदा: प्रमाणं स्यु: जीवेय
मित्र दिन साजराच करायचा असेल तर अशा चिंतनाने करा.
वेदवाणी !
Image result for mahabharat krishna with arjun

*ॐ दृते॒ दृᳯह॑ मा मि॒त्रस्य॑ मा॒ चक्षु॑षा॒ सर्वा॑णि भू॒तानि॒ समी॑क्षन्ताम् ।*
*मि॒त्रस्या॒हञ्चक्षु॑षा॒ सर्वा॑णि भू॒तानि॒ समी॑क्षे । मि॒त्रस्य॒ चक्षु॑षा॒ समी॑क्षामहे॥*
यजुर्वेद ३६.१८
देवता ईश्वरो देवता
छंद - भुरिग् जगती
स्वर - निषादः
ऋषि - दध्यङ्ङाथर्वण ऋषिः
अर्थ - *हे अविद्यारूपी अंध:काराचा निवारक जगदीश्वर! ज्याने सर्वजण मित्राच्या दृष्टीने मला सम्यक् पाहतील, मी मित्राच्या दृष्टीने सर्वांस सम्यक् पाहु शकेन, अशा प्रकारे सर्व आम्ही लोक परस्परांस मित्रदृष्टीने पाहु असे आम्हांस दृढसंकल्प करा.*
पुन्हा ऋग्वेद - १०.१९१ शेवटच्या सूक्तात म्हणतो. आदरणीय मोदींनी पंतप्रधानपदाच्या प्रथम अभिभाषणांत लाल किल्ल्यावरून हा उच्चारलेला मंत्र.
हे संघटन सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे.
*ॐ संस॒मिद्यु॑वसे वृष॒न्नग्ने॒ विश्वा॑न्य॒र्य आ ।*
*इ॒ळस्प॒दे समि॑ध्यसे॒ स नो॒ वसू॒न्या भ॑र ॥*
*ॐ सं ग॑च्छध्वं॒ सं व॑दध्वं॒ सं वो॒ मनां॑सि जानतां ।*
*दे॒वा भा॒गं यथा॒ पूर्वे॑ संजाना॒ना उ॒पास॑ते ॥*
*ॐ स॒मा॒नो मंत्रः॒ समि॑तिः समा॒नी स॑मा॒नं मनः॑ स॒ह चि॒त्तमे॑षां ।*
*स॒मा॒नं मंत्र॑म॒भि मं॑त्रये वः समा॒नेन॑ वो ह॒विषा॑ जुहोमि ॥*
*ॐ स॒मा॒नी व॒ आकू॑तिः समा॒ना हृद॑यानि वः ।*
*स॒मा॒नम॑स्तु वो॒ मनो॒ यथा॑ वः॒ सुस॒हास॑ति ॥*
अग्निः - देवता
छंद - विराडनुष्टुप्
स्वर - गान्धारः
संवनन संवाद
अर्थ - *हे सुखवर्षक अग्निदेव! आपण संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात. समस्त तत्वांमध्ये आपणच विद्यमान आहात. यज्ञवेदी अथवा पृथ्वी आपणच प्रकाशित होतात. आपण आम्हांस विभिन्न प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करा.*
*हे मनुष्यानो! तुम्ही सर्व एकत्र चला, एकत्र बोला, तुमचं मन समान ज्ञानसंपन्न हो, जसे पूर्वीचे देव लोक एक समान ज्ञानसंपन्न होऊन आपल्या ध्येयांस प्राप्त करते झाले, तसेच तुम्ही एकत्र कार्य करा.*
*हे स्तुती करणार्यांनो ! आपणा सर्वांची प्रार्थना एकसमान होवो, परस्परसंबंध एकच होवो. आपले विचारतंत्र समानरुप होवो.*
*हे स्तोताओं, मी आपल्या जीवनांसच एकाच मंत्राने अभिमंत्रित करतो. एक समान आहुती प्रदान करून यज्ञमय करतो.*
*हे स्तोताओ ! तुमचं हृदय एक समान होवो, तुमचे मन एक होवो, संकल्प एक होवो, तुम्ही संगठित होऊन आपले सर्व कार्य संघटित करु शकाल.*
शुभाशिष !

Saturday, 14 July 2018

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत

Syamantak Bandekar"s article 


विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते*
सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो)
*विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते*
माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.
उदय-अस्ताचे प्रमाणे |
जैसे न चालता सूर्याचे चालणे |
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे |
कर्मींचि असता ||
सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध आहे.
मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,
शुक्र-शोणिताचा सांधा |
मिळता पाचांचा बांधा |
वायुतत्व दशधा |
एकचि झाले ||
शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.
सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते.
पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे.
माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.
पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा |
तरी हा भूगोलचि काखे सुवावा |
तैसा विस्तारू माझा पाहावा |
तरी जाणावे माते ||
भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.
पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.
परंतु माऊली ज्ञानोबाराय 725 वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.
तया उदकाचेनि आवेशे |
प्रगटले तेज लखलखीत दिसे |
मग तया विजेमाजी असे | सलील कायी ||
सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो.
ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी,
मी सूर्याचेनि वेषे |
तपे तै हे शोषे |
पाठी इंद्र होवोनि वर्षे |
मग पुढती भरे ||
विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.
या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलीं ज्ञानोबारायांनी 725 वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे
अस्तित्व सांगतात,
ना तरी भौमा नाम मंगळ |
रोहिणीते म्हणती जळ |
तैसा सुखप्रवाद बरळ | विषयांचा ||
किंवा
"जिये मंगळाचिये अंकुरी |
सवेचि अमंगळाची पडे पारी |
किंवा
ग्रहांमध्ये इंगळ |
तयाते म्हणति मंगळ |
या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल.
विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्या-या संत वाड़मयाच्या सहवासात यावे.
🚩जय जय राम कृष्ण हरी🚩

Saturday, 9 June 2018

सौ भाग्यदा लक्ष्मी .......!


नमस्कार ......!

पंडित भीमसेन जोशी यांचे एक कानडी गाणे ऐकले . मनाला खूपच भावले गायला अत्यंत सोपे आहे. शिवाय शंकर महादेवन आणि सूर्य गायत्री आणि आर्या आंबेकर नेही छान गायले आहे .अर्थ आणि सर्व दुवे देतोय नक्की ऐकून बघा...



भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, नम्मम्मा नी सौ |
गेज्ज काल्गळा ध्वनिय तोरुता हेज्जय मेले हेज्जय निक्कुत | सज्जन साधु पूजय वेळगे मज्जिगे-ओळगिन बेण्णयन्ते ॥1II कनक वृष्टिया करेयुत बारे  मनकामनया सिद्धिय तॊरॆ । दिनकर कॊटि तॆजदि  होळयुव जनकरायन कुमारि बेगा || 2 II अत्तित्तलगलद भक्तर  मनयलि नित्य महॊत्सव नित्य सुमंगळ । सत्यवतॊरुव साधु-सज्जनर चित्तदि होळेवापुत्तळिबोंबे || 3 II संख्येइल्लद भाग्यव कोट्टु कंकण कैया तिरुवुत बारे । कुंकुमान्किते पंकज लॊचने वेंकटरमणन बिन्कद राणी || 4 II सक्करे तुप्पद कालुवे हरिसि शुक्रवारद पूजय वॆळगे । अक्करे-उळ्ळ अळगिरि रंगन चोक्क पुरंदर-विट्ठलन राणी || 5 II ========================================== Meaning:  Oh, Goddess of Fortune ! Lakshmi Devi ! Please come (implied: to my house). Like butter coming out of buttermilk (slowly but surely), come, placing one feet after the other, your anklets ringing.

O Daughter of Janaka who shines like countless suns, shower us with a rain of gold and fullfill our wishes. Without moving around, stay forever in your devotees’ houses, receiving daily services and worship. You shine like a beautiful doll in the minds of saints.
O elegant queen of Venkateshwara (Vishnu)! O Lotus eyed one!  You who wear golden bracelets and are decorated with Kumkum, please come and bless with infinite prosperity..

O Consort of PurandaraviTala! O Queen of Alagiri Ranga! You who shine in the hearts of safes! Come to our Friday worship when streams of ghee and sugar will flow!


https://youtu.be/UeQtfXbs8gc

https://youtu.be/4WhkXpC2iqg

https://youtu.be/YnLRwvb02tU

https://www.youtube.com/watch?v=_tdYY6lUw9g


https://www.youtube.com/watch?v=wSaVGICyYio

Friday, 8 June 2018

“How you can engage community for your cause? “


“How you can engage community for your cause? “


                                



              As we all are human society and we walk through the common stations of human behaviour which includes emotions, expressing yourself, creation, regeneration, and most known and important that is public discourse. We are human society and we have a way to communicate with the other member of this same society which is public or private discourse, simply talking with people or establishing conversation with them. A community is defined as a group of people having excellent mutual communicative understanding and relations or group of people having healthy mutual discourse or conversational relations. So ultimately to engage people for any cause we need to have proper communicative mannerism which will form good relations.


                 For my cause if I have to engage people then I must have a good communicative setup. It can be my writing , way to advertise what I have to convey , endorsement methodology , some true examples of my work which has benefitted people , and such many more qualities anyone will need to convince people or community so that to engage them with our cause.  If my cause is serving the poor class and if I have to engage people in this cause then firstly I have to keep my view and work exactly in front of my community so that they can understand the cause. Then I have to take them to the beneficiaries to ensure that my cause is doing its best for them. I have to show my devotion to the community for engaging them with me. Also the complete system has to show its efficiency and truthfulness for the cause. In this way we can engage community for our cause.


             If I am a leader who has got responsibility to manage a particular constituency for the upcoming elections and for that I need to implant my chain of workers so that my party can exist at a good level. Initially I have to show my love and affection for the local community and also I will start building up my innocent image in the eyes of people or community. Organising youth discussion forums to discuss about problems of constituency will be a starting effective program. After this doing small stage programs on social topics where I will keep my views through very effective speeches and slogans. This will definitely engage community because I have made them sure that it is there problem and need too. Giving the promises of new policies and decisions to ensure the fulfilment of their needs. This is also an effective way to engage people for our cause.  

    For example if I have to run a non-profit organisation and I need to engage society people for it then I have to start forming public relationships which will give me and my work a recognition. Also this will help to make many people aware about the work that is going on. I can use my familiar colony people and youth friends to increase this chain. Also I must make them assure about that the work they are doing is beneficiary for them also. Organising local camps and awareness campaigns is also an effective way to get community people with you. Events setting is also a very good option which can connect people. We should use threads or stories in real life of community to attain their attraction.


Engaging people for a certain cause can be accelerated through modern ways of communication. They all include social media marketing platforms, business cards, pamphlets and leaflets, attractive advertisements and unique ways to endorse the topic for which we want to connect people. The Facebook has become an effective way to promote such activities. Using Whats App and messaging through phone is also a good way to engage community for your cause. Attractive banners and effective writing or content is a best way to connect community with the cause. Nowadays effective content writing is also a proper way of spreading information which can attract people to get engaged with the cause.
  In all the above mentioned ways of communication, marketing, advertising and endorsing and direct contact we can engage community for our cause.

Thank you..!