Monday, 6 August 2018

मित्र दिन

Tukaram Chinchanikar is feeling यदि वेदा: प्रमाणं स्यु: जीवेय
मित्र दिन साजराच करायचा असेल तर अशा चिंतनाने करा.
वेदवाणी !
Image result for mahabharat krishna with arjun

*ॐ दृते॒ दृᳯह॑ मा मि॒त्रस्य॑ मा॒ चक्षु॑षा॒ सर्वा॑णि भू॒तानि॒ समी॑क्षन्ताम् ।*
*मि॒त्रस्या॒हञ्चक्षु॑षा॒ सर्वा॑णि भू॒तानि॒ समी॑क्षे । मि॒त्रस्य॒ चक्षु॑षा॒ समी॑क्षामहे॥*
यजुर्वेद ३६.१८
देवता ईश्वरो देवता
छंद - भुरिग् जगती
स्वर - निषादः
ऋषि - दध्यङ्ङाथर्वण ऋषिः
अर्थ - *हे अविद्यारूपी अंध:काराचा निवारक जगदीश्वर! ज्याने सर्वजण मित्राच्या दृष्टीने मला सम्यक् पाहतील, मी मित्राच्या दृष्टीने सर्वांस सम्यक् पाहु शकेन, अशा प्रकारे सर्व आम्ही लोक परस्परांस मित्रदृष्टीने पाहु असे आम्हांस दृढसंकल्प करा.*
पुन्हा ऋग्वेद - १०.१९१ शेवटच्या सूक्तात म्हणतो. आदरणीय मोदींनी पंतप्रधानपदाच्या प्रथम अभिभाषणांत लाल किल्ल्यावरून हा उच्चारलेला मंत्र.
हे संघटन सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे.
*ॐ संस॒मिद्यु॑वसे वृष॒न्नग्ने॒ विश्वा॑न्य॒र्य आ ।*
*इ॒ळस्प॒दे समि॑ध्यसे॒ स नो॒ वसू॒न्या भ॑र ॥*
*ॐ सं ग॑च्छध्वं॒ सं व॑दध्वं॒ सं वो॒ मनां॑सि जानतां ।*
*दे॒वा भा॒गं यथा॒ पूर्वे॑ संजाना॒ना उ॒पास॑ते ॥*
*ॐ स॒मा॒नो मंत्रः॒ समि॑तिः समा॒नी स॑मा॒नं मनः॑ स॒ह चि॒त्तमे॑षां ।*
*स॒मा॒नं मंत्र॑म॒भि मं॑त्रये वः समा॒नेन॑ वो ह॒विषा॑ जुहोमि ॥*
*ॐ स॒मा॒नी व॒ आकू॑तिः समा॒ना हृद॑यानि वः ।*
*स॒मा॒नम॑स्तु वो॒ मनो॒ यथा॑ वः॒ सुस॒हास॑ति ॥*
अग्निः - देवता
छंद - विराडनुष्टुप्
स्वर - गान्धारः
संवनन संवाद
अर्थ - *हे सुखवर्षक अग्निदेव! आपण संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात. समस्त तत्वांमध्ये आपणच विद्यमान आहात. यज्ञवेदी अथवा पृथ्वी आपणच प्रकाशित होतात. आपण आम्हांस विभिन्न प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करा.*
*हे मनुष्यानो! तुम्ही सर्व एकत्र चला, एकत्र बोला, तुमचं मन समान ज्ञानसंपन्न हो, जसे पूर्वीचे देव लोक एक समान ज्ञानसंपन्न होऊन आपल्या ध्येयांस प्राप्त करते झाले, तसेच तुम्ही एकत्र कार्य करा.*
*हे स्तुती करणार्यांनो ! आपणा सर्वांची प्रार्थना एकसमान होवो, परस्परसंबंध एकच होवो. आपले विचारतंत्र समानरुप होवो.*
*हे स्तोताओं, मी आपल्या जीवनांसच एकाच मंत्राने अभिमंत्रित करतो. एक समान आहुती प्रदान करून यज्ञमय करतो.*
*हे स्तोताओ ! तुमचं हृदय एक समान होवो, तुमचे मन एक होवो, संकल्प एक होवो, तुम्ही संगठित होऊन आपले सर्व कार्य संघटित करु शकाल.*
शुभाशिष !

No comments:

Post a Comment