Monday, 7 May 2018

अपौरुषेय

BY Ambareesh Fadanvis   on facebook 


अपौरुषेय या शब्दा विषयी थोडेसे : बऱ्याच लोकांची या शब्दाच्या चुकीच्या माहितीमुळे निष्कर्षात चुका होतात. तस्मात हा लेखन प्रपंच.
चेतन ज्ञानापासून जड विश्वाची उत्पत्ती झाली - हा धर्माचा मुख्य सिद्धांत आहे. ज्ञानाला कुणीही उत्पन्न करू शकत नाही. म्हणजेच ज्ञान/वेद हे ईश्वर देखील निर्माण करू शकत नाही. कारण जर ईश्वराने ज्ञानास उत्पन्न केले असे म्हंटले तर आधी ईश्वर अज्ञानी होता का? आणि जर होता, तर हे अज्ञानी तत्व ज्ञानासारखी गोष्ट कशी काय निर्माण करू शकेल?
वेद म्हणजेच ज्ञान अपौरुषेय आहे - ते या अर्थाने. ज्ञान कुणीही निर्माण/उत्पन्न करू शकत नाही. पण ज्ञानापासून सर्व सृष्टी (देवी देवता लोक जगत इत्यादी) उत्पन्न होते.
वेद या ग्रंथांची भौतिक रचना माणसांनीच केलेली आहे. ज्या ऋषींना जे जे मंत्र समाधी अवस्थेत स्फुरले त्या ऋषींना त्या मंत्रांचे द्रष्टेपण दिलेले आहे. उदा. गायत्री मंत्राचा द्रष्टा ऋषी विश्वामित्र. हे पुरूषच होते (काही स्त्रिया देखील होत्या).
पण अपौरुषेय या शब्दात असलेला पुरुष हा "पुरे शेते स पुरुषः" (जो या पुरात वास्तव्य करून आहे तो) या अर्थाने अभिप्रेत आहे, व्यक्ती या अर्थाने नाही. सांख्ययोगात आणि सनातन धर्मात इतरत्र देखील "पुरुष" या शब्दाचा हा अर्थ अभिप्रेत आहे. परंपरेने विष्णू या देवतेला पुरुष म्हणतात (यद् विशितो भवन्ति तद् विष्णुः भवन्ति - जो विश्वाच्या आत शिरून सर्वत्र ओतप्रोत भरलेलआहे तो विष्णू - तुकारामांचे विष्णुमय जगत ते हेच). सेश्वरवादी लोक पुरुष या शब्दाचे प्रयोजन सहसा ईश्वर या अर्थाने करतात.
निरीश्वरवादी लोक (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक इत्यादी) पुरुष शब्दाचा उपयोग प्रकृती च्या सापेक्ष सहसा करतात. प्रकृतीने बनवलेल्या या तीन गुणांच्या आणि पाच महाभूतांच्या शरीरात जे तत्व वास्तव्य करून आहे, ते तत्व म्हणजे पुरुष.
सेश्वरवादी असोत कि निरीश्वरवादी, ज्ञानाचे अपौरुषेयत्व (वरील अर्थाने) हे आस्तिक दर्शनांच्या (प्रचलित हिंदू धर्माच्या) गाभ्याशी आहे.
Like
Comment
Comments
Chinmaye Bhavé कळलं, मग आता वेदात अमुक लिहीलं आहे ते शब्दशः पाळणं सक्तीचं आहे की मानवी बुद्धिने आणि विवेकाने निर्णय घेतलेले चालणार आहे?
Manage
Reply11h
Ambareesh Phadnavis काय लिहिलंय? त्यावर अवलंबून आहे. वेदांमध्ये वेगवेगळ्या यज्ञांचे विधी आहेत. ते काटेकोर पणे पाळणे अभिप्रेतच आहे. नसतील पाळायचे तर करू नये, बंधन नाही.
Manage
Reply11h
Rohan Vijay Upalekar छान मांडणी. 
श्रीसंत गुलाबराव महाराजांनी सांख्य निरीश्वरवादी नसून सेश्वर आहे, याचा सुंदर ऊहापोह केलाय, वाचला असेलच तुम्ही. योगशास्त्र तर सेश्वरच आहे.
Manage
Love
Reply10h
Ambareesh Phadnavis योगाचे सेश्वरत्व सापेक्ष आहे. चित्तवृत्तीनिरोध साधायच्या अनेक मार्गांपैकी एक म्हणजे ईश्वर प्रणिधान. इथे ईश्वर हे एक साधन आहे, साध्य नाही की कैवल्य “देणारा” मुकूंद नाही. 

वेदांतातला ईश्वर आणि सांख्ययोगातला ईश्वर या दोहोंचे प्रायोजन खूप सूक्ष्म पातळीवर भिन्न आहे.
Manage
Love
Reply4h
Rohan Vijay Upalekar ईश्वर ही टर्म प्रत्येक शास्त्रसापेक्ष भिन्न आहेच की. म्हणून तुमचे शेवटचे वाक्य मान्य आहेच मला. गुलाबराव महाराजांची मांडणी जरूर पाहा पाहिली नसेल तर. फार छान समन्वय करतात ते.
2

No comments:

Post a Comment