Wednesday, 16 May 2018

Exposing the so called Rightists......!

An Article by my Facebook Friend Makarand Desai

भारतात उजवे आणि डावे यांचा घोळ आहे. तो घोळ नुसत्याच लेबलांचा नसून, आपली बेसिक्स गंडलेली असल्याचे तो प्रतीक आहे.
भारतात डावा वि. उजवा असा संघर्ष आहे असं म्हणायला जागाच नाहीये !
हे हास्यास्पद वाटेल, पण हे
भारतातील अनेक समस्यांचे मूळ आहे.\


जगभरात डावा विरूद्ध उजवा ही लढाई आता सुस्पष्टपणे स्टेटिस्ट समाजसत्तावादी विरूद्ध व्यक्ती स्वातंत्र्य वादी अशी दर्शवली जाऊ लागली आहे. खरंतर हीच या भेदाची सर्वात अचूक मांडणी आहे.
कारण धर्माच्या आधारावर डावा असणे वगैरे कालबाह्य गोष्टी आहेत. There is no conflict, secularism has won the battle long ago !

आर्थिक बाबतीत डावे उजवे ही लढाई सुद्धा कालबाह्यच मानवी लागेल. कारण आर्थिक स्पर्धेत स्टॅलिनचा रशिया टिकलेला नाही. Scandanavia आणि सध्याचा चीन हे देश टिकले आहेत... त्यामुळे शुद्ध आर्थिक बाबतीत डावे विरोध उजवे ही लढाई सुद्धा कालबाह्य झालेली आहे.
याचा अर्थ डावे सगळीकडे हरले असा मुळीच नाही. डावे विरूद्ध उजवे याचा सर्वात अचूक आणि वादाच्या गाभ्यातील अर्थ हा राजकीय - सामाजिक होता, आहे आणि राहील ! धार्मिक आणि आर्थिक बाबतीत जे झालं ते त्या वादाचे Collateral परिणाम होते, मूळ वाद नव्हे !


थोडक्यात - जो व्यक्तीच्या बाजूने उभा राहतो तो उजवा, स्टेटला अपरिहार्य गोष्टींपुरते नियंत्रित ठेवण्याच्या बाजूने असतो तो उजवा, झुंडशाही विरोधात व्यक्तिवादी- स्वातंत्र्यवादी असतो तो उजवा !
या उलट व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाजाच्या हितसंबंधासाठी कायदे करण्याची भाषा करतो तो डावा, झुंडीचे कायदे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालून थोपवतो तो डावा, Directive Principles पायी Fundamental Rights ची कुर्बानी द्यायला तयार असतो तो डावा !!


आता आपण भारतातील राजकीय आखाड्यातील काही उदाहरणे घेऊ.
पहिली म्हणजे काँग्रेस... काँग्रेसमध्ये काही नेते खरंच उजवे आहेत. पण म्हणून काँग्रेस उजवी होत नाही. काँग्रेस कर्जमाफी देते, काँग्रेस आधार कायदा आणते, काँग्रेस लोकांचे पैसे खर्च करून पब्लिक सेक्टर बँकांचा तोटा भरून काढते, काँग्रेस कायदा करून समाज गटाच्या हितसंबंधांना जोपासण्यासाठी कोर्टाचे पुरोगामी, व्यक्तिवादी निर्णय फिरवते (शाहबानो), काँग्रेसने एकेकाळी देशाची कायद्याची चौकट मोडून देश आपल्या कब्जात घेण्याचा हुकुमशाही प्रयत्न केला होता...
आता CPI, CPM, JNU वगैरे डाव्यांची फॅमिली बघू ! डाव्यांची फॅमिली उजवी का असेल म्हणा !! ते डंके की चोट पर डावे आहेतच...
आता प्रादेशिक पक्ष बघू !
शिवसेना, मनसे उजवी असण्याचा प्रश्नच येत नाही. राजकीय सेना कोणतीही असो उजवी नसते. चांगल्या अथवा वाईट कारणांसाठी दुकाने फोडणे हा डावेपणा आहे. तृणमूलचा प्रश्नच नाही.... द्रमुक आणि अण्णा द्रमुक तर झुंडशाही आणि सामाजिक द्वेषाचा इतिहास (पेरियार !) घेऊन बसले आहेत. राष्ट्रवादी ही थोडीशी काँग्रेस आहे ! बाकीच्या प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत उजवे म्हणावे असे नेते बरेच आहेत. पण त्यांची ब्रिगेड आणि तत्सम टोळकी हा झुंडशाहीचा अस्सल नमुना आहे. बाकी ओवेसी आणि इस्लामी पार्टी या इस्लामी असल्यामुळे बाय डिफॉल्ट डाव्या, समाज सत्ता वादी ठरतात !! आपबद्दल बोलण्यात पॉइंट नाहीच... केजरीवाल हा उपटसुंभ मोहल्लावादी हुकुमशहा तिकडे असताना डावा उजवा हा प्रश्नच उरत नाही...
उरला भाजप ! हा पक्ष उजवा आहे अशी सामाजिक अफवा आपण कित्येक वर्षे सत्य मानून चाललो आहोत... मोदी सरकार इतके डावे सरकार इंदिरा गांधींचे असावे ! कोर्टाला आधार केसमध्ये मोदी सरकारने जे काही सांगितलं आहे ते वाचल्यानंतर मोदी आणि भाजपला उजवी म्हणायचं असेल तर मला तुमच्या अकलेवर शंका आहे !! आधारचे राहू द्या... आपण त्यांच्या इतर धोरणांना बघू... कोर्टाचा atrocity चा निर्णय हे सरकार challenge करायला गेलं होतं ! ( तो कसा मास्टर स्ट्रोक होता वगैरे गोष्टी इथे गैरलागू आहेत !!!) हेच लोक नोटबंदी करतात, यांचे सुशिक्षित मुख्यमंत्री झुंडीने केलेले नुकसान सरकार भरून देईल म्हणतात... हे लोक धार्मिक कारणांसाठी झुंडगिरी करणाऱ्या लोकांचे सहानुभूतीदार आहेत. यांच्या विचार सरणीतील लोकांना बाबरी मशिद पाडण्याचा अभिमान वाटतो - अजून काय पाहिजे !!


त्यामुळे भारतात उजवे कोण याचे उत्तर सुप्रीम कोर्ट असे द्यावे लागेल ! हे एकाच वेळी सुदैव आणि दुर्दैव सुद्धा आहे. सुदैव अशा साठी की सुप्रीम कोर्टामुळे आपला सीरिया किंवा नॉर्थ कोरिया झालेला नाही. दुर्दैव अशासाठी की कोर्ट हा राजकीय पक्ष नाही. आपण एकही उजवा राजकीय पर्याय उभा करू शकत नाही हे दुर्दैव आहे... आपल्या समस्यांचे मूळ आहे ! Legislative या सत्ता स्तंभामध्ये डावेच डावे भरलेले आहेत... आणि एकही सशक्त उजवा पर्याय दृष्टिपथात नाही !


ही स्थिती गंभीर आहे... पण निराश होऊन चालणार नाही... जसजशी नवीन पिढी आपले हक्क आणि स्वातंत्र्य यांना समजून घेईल, आणि व्यक्तिवाद हे मूल्य म्हणून रुजेल; तेव्हा एखादा राजकीय पर्याय सुद्धा अस्तित्वात येईल... निराश न होण्याचे त्याहून महत्त्वाचे कारण असे की.... आपल्या घटनेमध्ये Directive Principles ही काहीशी समाजवादी असली तरी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी Fundamental Rights ची पायमल्ली होता कामा नये असे सुस्पष्ट पणे म्हटलेले आहे. सुप्रीम कोर्टानेही वेळोवेळी ते उचलून धरले आहे (उदा. खरकसिंग, केशवानंद भारती, पुट्टास्वामी) तसेच त्याबाबतीत भूतकाळात झालेल्या चुका दुरुस्त केल्या आहेत (उदा. ADM जबलपूर निर्णय फिरवणे)....


त्यामुळे स्थिती संपूर्ण निराशाजनक नाही... फक्त उजव्यांचा राजकीय उदय होणे आवश्यक आहे ! ते जितक्या लवकर होऊ शकेल तितके हितकारक ठरेल... अन्यथा भगवे डावे, हिरवे डावे, लाल डावे, खादी घातलेले डावे यांच्या झोंबीमध्ये समाज म्हणून आपले नुकसान होत राहणार आहे... नवीन पिढी किती प्रमाणात स्वांतत्र्य आणि व्यक्तिवाद ही मूल्ये शिकते, आत्मसात करते, त्यासाठी आग्रही होते - यावर तो उजवा राजकीय सूर्योदय कधी होईल ते अवलंबून आहे !!
तो सोन्याचा दिन येवो...😇
-🖋मकरंद देसाई

No comments:

Post a Comment