नमस्कार राजे ...!
दिवाळीच्या या सुट्ट्यांमध्ये जरा चेपुवर
चर्चांमध्ये सहभागी झालो.... काही चांगले तर काही वाईट अनुभव...आले...आजवर आयुष्यात
जितकेही वेळा वेगेवगळ्या विषयांवर आपल्या आजूबाजूच्या जगताशी बोललो आहे...तीत्क्याही
वेळा सदैव एक गोष्ट कायम लक्षात आलीय ती म्हणजे... बुद्धीप्रामाण्याचा अभाव... जे
योग्य ते योग्य म्हणावे आणि जे अयोग्य ते अयोग्य मग ते आपल्या जातीच्या, भाषिक
समुदायाच्या अथवा धर्माच्या बाजूने असो अथवा विरोधात असो.....
पण व्यर्थ असा सारासार विचार करणारा समाज आजही
विकसित झालेला नाही....
मी नेहमीच कुठलीही भूमिका घेतली किंवा कुठल्याही
विषयावर बोलायला लागलो किंवा लिहायला लागलो कि वाचकवर्ग नेहमीच.... मी डावा कि
उजवा याच दृष्टीकोनाच्या आडून ते ऐकत बघत वाचत आणि ठरवत असतात ..... या देशात ..डावे आणि उजवे किंवा आपल्या राज्यात पुरोगामी आणि प्रतिगामी असे दोन मतप्रवाह पडलेले
आहेत...विविध संघटना आंदोलने या सर्व बाबींनी जनमानसावर एक विलक्षण प्रभाव पाडला
गेलाय.... आपली जनता देखील या दोन मतमतांतरात विभागली गेलीय ...प्रत्येक गोष्टीकडे
..एकतर डाव्या नाहीतर उजव्या या दोनपैकी एक च चश्म्यानी पहिले जाते ... या दोन
चष्मा शिवायही आणखी मोठे उदात्त खरेखुरे योग्य असे निश्चितच काही असू शकते ना?
दृष्टीकोन बदलायला हवा कि नको...? जे जसा ते तसच का आपण स्वीकारत नाही?
उदाहरणार्थ...परवा नानासाहेब पेशव्यांवर चर्चा
चालू होती एका समूहावर त्यात काही लोक त्यांच्या समर्थनात बोलत होते तर काही
विरोधात ..खूप वेळ हि गंमत मी बघत होतो.. मग मी म्हणालो कि.... महाराष्ट्रात दोन
प्रकारच्या विचारप्रणाली आहेत ....एक जी पेशवाई तल्या चुका मान्य करायला तयार नाही
आणि दुसरी जी पेशवाईच कर्तुत्व मानायला तयार नाही....
एकीकडे लोकांना बालाजी विश्वनाथ ते दुसरा
बाजीराव सरसकट सगळे अत्यंत थोर पराक्रमी आणि महान वाटतात तर दुसरीकडे एक असा वर्ग
आहे ज्या जिथेतिथे जातीवाद्च दिसतो.. घट कंचुकी चे खेळच सर्वत्र दिसतात आणि तलवारीचा
पराक्रम दिसत नाही... कायम रिकामी असलेली तिजोरी दिसत नाही.... पानिपत वरच्या चुका
दिसत नाही...आणि उरलेल्यांना नानासाहेबांचे चांगले काम दिसत नाही..
असेच अन्य खूप ठिकाणी होत असते ..... संस्कृत
भाषावले आणि अभिजात मराठीवले पण असेच ... दक्षिणेतल्या भाषा या संस्कृतोद्भव नाहीत
हे स्पष्ट दिसून येत कितीही खोल गेलात जुळवून जुळवून पहिला तरीही तमिळ मल्याळी कानडी
तेलुगु आणि जुन्या कालातल मराठी हे संस्कृतोद्भव नाहीच.....
पण नाही
हे संस्कृतवाले ऐकतच नाही... म्हणे
जगातल्या सर्व भाषा आमच्याच भाषेतून जन्मल्या..... मग बोलून दाखवा तमिळ ,मल्याळी...
मग सांगाव लागत अरे बाबा मी पण संस्कृत्प्रेमीच
आहे... उत्तरेतल्या मध्य भारतातल्या युरोप्तल्या भाषा संस्कृतोद्भव आहेत ,शिवाय संस्कृत
हि विज्ञान भाषा सुद्धा आहे..ती महानच आहे तिची तुलना अन्य कुठल्याही भाषेशी होऊच
शकत नाही... पण आपण संस्कृत प्रेमी म्हणून अन्य लोकांचे प्रेम नाकारायचे का? खोट बोलायचं का? ...
आणि हे दिड शाहणे दुसरे मूर्ख लोक.... म्हणतात
मराठीवर संस्कृतच आक्रमण झालाय...मराठीला फारसीचा पर्याय द्या उर्दूचा द्या पण
संस्कृत नको.....यांना शिवाजी राजांचा राज्यव्यवहार कोश माहितच नसावं परकीय
भाषेच्या आक्रमणातून मराठी वाचावी म्हणून तिला संस्कृतमय स्वतः शिव छत्रपतींनी केलय
हे या लांड्यांना ठाऊक नसत..... किंवा
यांना आर्य द्रविड आक्रमणाच्या खोटारड्या कथांनी ग्रासलेल असत.... असे दोन्ही विचारक
लोकांची भर पडलीय आपल्या समाजात्त म्हणूनच मराठी मागे जातेय....
. पंजाबी भाषा
कॅनडा ची राजभाषा झालीय कशामुळे फुकटची लेखणी घासून लिहिणार्यांमुळे कि हॉटेल, मोठमोठे उद्योग करून स्वत च्या लोकांना तर
नोकर्या दिल्याच पण कॅनडा च्या अर्थव्यवस्थेत सुद्धा मोलाचा वाट आहे त्यांचा ..आणि आपण मुर्खासारख
लढतोय...मराठी ला अभिजात द्या म्हणून.... त्या दर्जाचा काय फायदा...
आज महाराष्टार्त सर्व शिक्षणाच्या माध्यमांमध्ये राज्य सरकार राजभाषा मराठीला आणि
राज्याच्या इतिहासाला अनिवार्य करू शकते.... तामिळनाडू बंगाल सारख्या खूप राज्यात
हे आहेच... कर्नाटकात तर एक अस वधेयक आणले
जातेय कि खाजगी म्हणजे privet क्षेत्रातल्या सगळ्या २,३,४ श्रेणीच्या नोकर्या कानडी
लिहिता बोलता येणाऱ्या लोकांनाच देण्यात याव्या....
याच राजकीय व्यवस्थे मध्ये
आपल्या भाषिक हिताच संवर्धन रक्षण होऊ शकत...त्यासाठी तसे सरकार हवे...आणि आपल्या
समाजाला उद्योगात अर्थकारणात पुढे नेणारे काही मातब्बर मंडळी सुद्धा.... आपण भाषणच
छान देतो... व्यापारात ढ आहोत....
एकूणच काय तर मध्यम मार्ग असावा जे योग्य ते मानायला
हवे....अयोग्य टाकून द्यावे आणि पुढे जावे.... पण आज समाजात खरे बोलले तरीही
तुम्हाला क्षणात बाम्सेफी ब्रिगेडी किंवा सन्घीय सदाशिवपेठी ठरवल्या जाऊ शकते....
कारण लोक डावी आणि उजवी पट्टी चिटकवून बसलेत डोळ्यावर......
असो.....
No comments:
Post a Comment