प्रेम म्हणजे प्रेम असतं ..........!
प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं ....||धृ||
दुधावरच्या सायीसारख मऊ हळुवार असतं,
वेलीवरच्या जाईच सुगंधात ते अपार असतं ...
लहानश्या छकुली पासून , नऊ वारीतल्या आजीपर्यंत
ते अपरंपार असतं , कारण
प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं
कृष्णाच्या बासरीवर.., आणि
अर्जुनाच्या धनुष्यावर ..
एकच तर नेम असतं....
फुलाच्या राजाच ते रातराणीवर
सेम असतं.... कारण....
प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं.....
चंद्राचं रोहिणीवर ..आणि
कर्णाचं वृषाली वर ते असीम असतं ...
कोरड्या धरतीच
पहिल्या पावसावर ..आणि
मधुरात्रीत परीनीतेच
परीनितावर ते कृत्रिम असतं..
.
कारण .... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं ...
कामासक्त मदनाच रतीवर...आणि..
यौवनाच ललनाच्या लावण्यावर
ते सकाम असतं .....
मेघनादाला घाबरून
प्रियकराच्या बाहुपाशात
प्रेयसीचे शिरणे हेही
प्रेमचं असतं ...
पुरूषाच शौर्यावर
आणि..स्त्रीच सौन्दर्यावर
ते कायम असतंच
कारण ...
प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं ..........
ध्वनीच स्वरांवर ..आणि
गायकीच नृत्यावर ते कायम असतं..
वाऱ्याचं गंधावर आणि
मुंगीच साखरेवर ते असतच असत ..
ब्रेक अप झाला तर
रडायचं नसत,
शहाणे होऊन ,
जुळवून घाय्याच असत
कारण... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं
आमचं सेम असतं ............
चाहत्यांचं नटांवर आणि...
नेत्यांचं सत्तेवर .
.ते उगीचच असतं..
भक्ताच देवावर आणि..
मातेचं लेकरावर
ते निष्काम असतं...
कारण... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं
आमचं सेम असतं.........
विवाहेतेनी परत केलं
तर ते क्रीटीसिझम असत..
पण पुरूषाच मात्र
ते सोशलिझम असतं...
कारण... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं,.....
काँग्रेसनी केलं तर ते
सेक्युलरिझम असतं...
पण आम्ही केलं तर
ते कॉम्युनलीझम असतं ...
कारण ... प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तुमचं आमचं सेम असतं....
स्वप्नातल्या परीच ....
स्वप्नाळूवर ते निस्सीम असतं..
जसं लेखकाच ते शब्दांवर असतं
आणि गायकाच स्वरांवर असत..
शेवटी..काय ? प्रेमचं तर असतं ना....
No comments:
Post a Comment