कन्नड रक्षण वेदिके .......आणि मराठी भक्षण “भेदि”के.........!
नमस्कार राजे...! कसे आहात?....
गेल्या २ वर्षांपासून नागपूरला मेट्रो च काम सुरु आहे.. म्हणून घराबाहेर पडल
कि “माझी मेट्रो” चे बोर्ड अगदी रोजच दिसत असतात... आता काय झाल काय माहित अचानक..
माझी ऐवजी महा मेट्रो नाव दिल गेलय...अर्थात... अध्या परप्रांतीयांच सरकार आलाय
राज्यात म्हणून माझी हा शब्द कदाचित अस्पृश्य असेल सरकारला...नाहीतर माझी ऐवजी महा
हा शब्द द्यावयाची गरज पडली नसती.....
असो
यावरूनच आठवतंय बंगळूरू मेट्रो चे ते हिंदीतले स्थानकांचे फलक तो राडा आणि
राजकारण...
याबद्दल खूप ऐकल वाचल पण नेमका
मुद्दा काय हे बघण्यासाठी यु ट्यूब वर गेलो २-३ चर्चा पहिल्या त्यात times now या
वृत्त वाहिनीवरची इंग्रजी भाषेतली चर्चा जरा जास्त वेळ होती ती आवडली..विस्तृत उहापोह
झाला त्यात...
एक डिसूजा नावाच्या महिला पत्रकार निवेदक होत्या..तर कर्नाटक कॉंग्रेस चे
एक नेते होते, एक भाजपचे सर्वेश वर्मा नावाचे प्रवक्ते होते,
अग्रवाल नावाचे एक
लेखक होते हिंदीचे, एक मराठी पण विचारांनी हिंदी झालेल्या युवा महिला होत्या तसेच चेन्नई मेट्रो चे व्यवस्थापकीय महांसंचालक
सुद्धा उपस्थित होते..
शिवाय बेंगळूरू चा एक रेडिओ jocky सुद्धा उपस्थित होता...
अर्थात चर्चा नेहमी कोणत्या अंगाने न्यायची ते निवेदक च ठरवत असतात ..
या डिसुझा बाई
बहुधा उत्तर भारतीय असाव्यात म्हणून यांचा कल नेहमीच हिंदी चे फलक बेंगळूरू मेट्रो
मध्ये असावे असाच होता... या दृष्टीनीच चर्चा पुढे नेली जात होती.....
कन्नड समर्थक
फक्त ३ लोकच होते तर विरोधात ५ पण यतो धर्म: ततो जय:! शेवटी या तिघांनी.... बाजी मारली आणि उर्वरित
लोकांना निरुत्तर केले.......
यात रवात जास्त मूर्ख पणाचे प्रदर्शन
जर कोणी केले तर भाजपच्या प्रवक्त्याने ते म्हणाले..कि मेट्रोचे हिंदी मधील
फलक हटवून या देहात आमच्या हिंदी भाषेचा अपमान झालाय...
म्हणे हजारो लोक
ब्रिटीशांच्या विरोधात लढले ...इंग्रजी च्या विरोधात लढले... दक्षिण भारतीयांना
इंग्रजी मान्य आहे जी विदेशी भाषा आहे पण हिंदी मान्य नाही जी देशातलीच भाषा आहे...इथवर
ठीक होते ते म्हणाले कि हिंदी हि देश भक्तीची भाषा आहे आमचे लोक लढले वगरे वगरे ....
यावर सगळे
लोक हसले... म्हणाले कि देशात मराठी कन्नड लोक नही लढले का? या भाषा भारतीय नाहीत
का... कन्नड न येणार्यांना इंग्रजी वाचता येत न मग? कचकच झाली जी नेहमीच होते अश्या चर्चांमध्ये.....
मुद्दा असा आहे कि मेट्रो चा खर्च अर्धा अर्धा दोन्ही सरकारचा आहे पण
राज्यात कुठलेही कार्यालय असो अगदी केंद्र सरकारी असले तरीही मोठ्या अक्षरात
राज्याची भाषा आधी असणे बंधनकारक आहे.... आणि मेट्रो मध्ये तर पुर्नाधिकार
राज्याचा आहे...
म्हणूनच सिद्धरामैय्या सरकारने हिंदी तले फलक काढून टाकले आणि या
सर्व गोष्टी चे श्रेय जाते ते कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिके या कन्नड भाषेच्या रक्षणार्थ
जन्मलेल्या संघटनेला ...
एवढेच काय तर राज्याचा एक ध्वज असावा अशी मागणी सूद्धा
राज्यात वाढलीय आणि चांगलाच धुमाकूळ घातला गेलाय...आणि याला राज्य सरकार समर्थन
देतीय ..
अर्थातच दक्षिणेतल्या राज्यात सरकार कोणतेही असो भाषिक अस्तित्वाशी कोणीही
तडजोड करत नाही... करूच शकत नाही..
.. हिंदी भाषिकांचा भाषिक साम्राज्यवाद त्या
लोकांनी खूप आधीच ओळखला आहे म्हणूनच त्यांचे उरले आणि आपले दिवसेंदिवस सरत चालले
आहे...
आश्चर्य हे कि बिहार मधून ३००० किलोमीटर बेंगळूरू मध्ये साध्या मोल मजुरी
साठी लोकांना यावा लागतंय... केरळ मध्ये बंगाली लोकांना याव लागतंय ... फक्त मोल
मजुरीसाठी...
केरळ मध्ये सुद्धा आता केरळी मानसिकता जन्माला येतीय कारण
दक्षिणेतल्या सर्व राज्यांच शोषण केल जातंय...
पण तरीही धन्य ते कन्नड लोक जे
एवढे जागरूक आहेत..नाहीतर आपले मराठी... स्वभाषा सोडून दुसरीचे गोडवे गातायत ..मी
स्वतः ७ भाषा बोलतो बहुभाषिक आहे पण मराठी कधीच सोडली नाही किंवा तिला substitute
म्हणून अन्य भाषा मला मान्य नाही....
पण आपल्या राज्यात दुकानापासून सरकारी
कार्यालय पर्यंत आणि आता तर भाजपच्या महानगरपालिका यामधून सुद्धा हिंदी हि अधिकृत
भाषा बनवली जातेय... एवढच कशाला बीड च्या नगर पालिकेवर उर्दू मध्ये बोर्ड लावला
गेला चांगलय तो शिवसैनिकांनी काढून टाकला.........
आपल्या राज्याच भक्षण आपलेच
भेदी मुख्यमंत्री आणि राजकारणी करतायत .... आणि कर्नाटकाचे रक्षण त्यांचे
राजकारणी........ आमच्या उतरणीवर कधीपर्यंत
जगणार हे लोक काय माहित...?
असो.... जय कर्नाटक जय महाराष्ट्र.....
No comments:
Post a Comment