Sunday 1 October 2017

मोदी भक्तांसाठी थोडे काही............!

भक्तांसाठी थोडे काही............!


२०१४ च्या निवडणुकीने देशाला नरेंद्र मोदी नावाचे एक खंबीर नेतृत्व दिले... आणि त्यांच्या प्रखर तेजस्वी वाणी ने मोहित होऊन भारतीय जनमानस काही प्रमाणात त्यांच्यावर भाळले..यातूनच त्यांचे काही चाहते किंवा भक्त जन्मला आले...

चाहते असणे चांगलेच आहे पण “ये चाहत जब परवान  चढते जाती है””.... तेव्हा याचे रुपांतर भक्तीमध्ये होते .... माणूस आंधळेपणाने एखाद्या माणसाला चाहु लागतो.... त्याचा अंधभक्त होत जातो ..आणि आज अश्या अनंत आंधळ्या भक्तांची.... पिल्लावळ जन्मली आहेच आपल्या देशात.... 

मी स्वतः भाजपचा एक कार्यकर्ता आणि एक अंशतः स्वयंसेवक म्हणून देश हितासाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाठी भरपूर काम केलय...फक्त हिंदुत्वाच सरकार याव म्हणून... कॉंग्रेसच्या जाचातून देश मुक्त व्हावा म्हणून... पण आत्ता तीन वर्ष झालीत.. काळ बदलत असतो.... सत्तेत आलेले लोक कसे काम करतात याचे मूल्यमापन वेळोवेळी होत असते त्यात काही गोष्टी  आवडतात तर काही नाही आवडत......... 


मुळात माझ्या वाचकांना मी केवळ एवढेच सांगू इच्छितो....
कि... आयुश्यात कोणत्याही संघटनेत जा..पक्षात जा.... काम करा स्वतासाठी समाज आणि देशासाठी.... पण आपली बुद्धी कोणालाही विकू नका... डोके गहाण ठेवू नका... कोणत्याही नेत्याला नायकाला मान द्या.... त्याचे चाहते व्हा पण बुद्धी नि विचार करणे.,,,सोडू  नका .... 


अगदी कुठलीहि परिस्थिती आली न तरीही बुद्धीनेच आधी विचार करा अगदी सारासार विचार झाल्याशिवाय कुठलाही निष्कर्ष लावू नका.... सामान्य माणसांनी कोणत्याही पक्षाला माणसाला नेत्याला आपली बुद्धी वाहून टाकणे याशिवाय मोठी गुलामगिरी कोणतीच नाही....

मोहनदास गांधी... नावाच्या माणसाच्या गोड बोलण्याला 
बळी पडून अश्याच प्रकारे भक्तीचा एक काळ या देशाने पहिला.
.. या भक्तीत हा देश इतका आंधळा झाला....होता कि... गोडसे नि गांधींना मारल्यावर लाखो कॉंग्रेस कार्यकर्ता देशभरातून महाराष्ट्रात आले आणि केवळ नथुराम गोडसे मराठी ब्राह्मण असल्यामुळे महाराष्ट्रातील ५००० ब्राह्मण समाजाच्या हत्या करण्यात आल्या होत्या.... हजारो ब्राह्मण महिलांचे बलातकार करण्यात आले होते 


.... हि बातमी वर येऊ दिली गेली नव्हती..हीचा बागुलबुवा गोध्राच्या दंग्यात जिथे फक्त १००० लोक मारले गेले तिच्याएवढा केला गेला नाही... कारण हे दक्षिण पंथी होते..यात किती तेंडूलकर कर्वे यांच्यारखे भारतरत्न मारले गेले आतील..याचा साधा विचारहि या गांधी भक्तांनी केला नाही.... असो........ गांधी मुळे मिळालंय काय तर मेकॉले च्या व्यवस्थांचा गुलाम भारत .....बस एवढेच....

आजही असेच काहीतरी सुरु आहे असे वाटते..... गेल्या आठवड्यात २ घटना घडल्या...एक म्हणजे मी whatsapp च्या status वर मोदी आणि मनमोहन सिंघ सरकार च्या तुलनेचे काही फोटो टाकले.... आणि अर्ध्या तासात ९ रिप्लाय आले अगदी आक्रमक रित्या भांडण केल्यासारखे..... जणूकाही माझा स्वतःचा काही अधिकारच नाही........  एवढा आंधळेपणा एवढी मग्रुरी.... एवढा माज आलाय या भिकारड्या मोदी भक्तांना ... 


मुद्दा फक्त एवढा आहे....कि... ३ वर्ष  होऊनही महागाई कमी होत  नाहीय.... अर्थकारण किंवा अर्थनीती बदलत नाहीय.... 
सरकारी नोकर्या निघायचं नाव नाहीय.... फक्त ३००० जागांसाठी ६७ लाख अर्ज आलेत.... एवढी बेरोजगारी आहे.... आतंकवाद काश्मीर समस्या अजूनही तशीच आहे.... ज्या  गोष्टी चांगल्या आहेत त्यांचा कौतुक्सुद्धा केलय मी सुषमा बाई याचं काम पर्रीकर राजनाथ सिंघ नितीन गडकरी या मंडळींनी फार छान काम केलाय याची स्तुती सुद्धा करतोच न.....मग....?


जिथे सरकार बरोबर नसेल तिथे....बोलायचं नाही का??
आर्थिक सर्वेक्षणात आकडे मागे मागे चाललेत.... भाजपचेच यशवंत सिंह , सुब्रमनिअम स्वामी सारखे अर्थशास्त्रातले पीएचडी लोक नवीन नीती सुचवत आहेत..ते ऐकायची सुद्धा मानसिकता नाही..यांची.... महगाई कमी झाली नाही अजून,,मेकॉले ची  शिक्षण व्यवस्था बदलत नाही.. ३७० कलम रद्द होत नाही... पाकिस्तानशी आपण संबंध तोडत नाही... मग फक्त बाता करायच्या का?... आणि सामान्य माणसांनी बोलायचेही नाही का?

१ लाख २० हज्जार कोटी खर्चून बुलेट ट्रेन बांधताय कोणासाठी? 
गेली ३ वर्षात महाराष्टात ६००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा देवेंद्र सरकारचाच आकडा आहे... कर्जमाफी का नाही दिली फक्त ३०००० कोटी रुपयांसाठी एवढी माणसे मारू देतोय आपण ... आणि परप्रांतीयांना रिक्षाचे परवाने वाटून आपले शाश्वत मतदार बनवून घेतोय.. लाज नाही वाटत थोडीशी....?.....




एकटा महाराष्ट्र २५% कर देतो देशाला ..
.दिल्ली सरकारची तिजोरी फक्त महारष्ट्र २५ टक्के भरतो.... पण आपण दिलेल्या १०० रुपयांच्या बदल्यात आपल्या फक्त १५ रुपये राज्य चालवायला केंद्र सरकार देतं... हे केंद्रीय अर्थ मंत्रालायचे आकडे आहेत ... कुठेही मिळतील तपासून पहा... राज्याने पैसे मागितले तर दिल्लीकडे ते कधीच नसतात.... मग बाकी गोष्टींसाठी कसेकाय पैसे असतात....?


 येणार सरकार हे गरिबांच असावं  बेरोजगाराच असावं महिलांचं असावं ...अशी अपेक्षा असते पण.... या देशात आजवर कुठल्याही पक्षाच कोणताही सरकार असो पण जनतेच सरकार एकच होत ते म्हणजे शिवाजी राजाच....  आज कुठल्याही नेत्याला जनतेशी घेण देन नाहीय एवढी साधी बाब सुद्धा बोलायला आज मोदी भक्त तुटून पडतायत.... आम्हाला हे स्वातंत्र्य सुद्धा नाहीय..का?   

सरकार विविध क्षेत्रात काम करतय ... विदेश नीती मध्ये सुषमा बाईंनी विदेशातला मिशनरी फंड , एन्जिओ च्या नावावर येणारा पैसा , अनिस सारख्या राष्ट्रद्रोही संघटना ना येणार पैसा कायमचा बंद केला..आम्ही कौतुक करतो खूप छान काम विदेश मंत्री... रस्ते बांधणी मंत्री रक्षा मंत्री यांनी केलाय त्याच कौतुकच आहे...

 यापुढेसुद्धा देशात मोदी च पंतप्रधान म्हणून यावेत म्हणून
त्यांनाच मत देणार आहे... पण याचा अर्थ असा नसतो कि सरकारच्या काही चुकीच्या धोरणावर टीका करण्याचाही अधिकार आम्हाला नाही.... मीच कशाला प्रत्येक सामान्य माणसांनी जागृत व्हावे शेवटी या देशातली ब्रिटीश दत्त राज व्यवस्था हि लुटायलाच आपल्यावर लादली गेलीय ... म्हणूनच तर हि सगळी राजकीय जमात लुटेरीच आहे...... म्हणूनच कमी लूट करणार्याला निवडा.. पण डोक नेहमी बुद्धीवादाकडे ठेवा .... आधी कच्चे रस्ते पूल रेल्वे स्थानक सुधारा मग बुलेट ट्रेन च काय ते बघा.... मुळात या देशांत जनतेच माणूस सत्तेत कधी आलाच नाही.... वरच्या पदावर गेले कि सगळे गरिबाला विसरतात असेच दिसते... मोदी भक्तांनो....एवढी अंध्भ्क्ती बरी नाही..... देशात दोन-तीन प्रवाह आहेत एक डावा एक उजवा आणि एक floating voters ....हा तिसरा सर्वात मोठ्ठ समुह असतो.... त्याकडे दुर्लक्ष करू नका.... आज एका जरी सरकारी निर्णयाच्या विरुद्ध बोलल तर हे भक्त लगेच.... तुम्हाला डावे पुरोगामी बामसेफी ठरवू शकतात.... भक्तीच्च्या आंधळेपणाने यांची मती गुडघ्यात गेलीय.... floating voters हि बहुंख्य सामान्य जनता असते हे यांना कधीच लक्षात नाही येणार....
मुळात सत्ता डोक्यात गेलीय यांच्या .... पिसाट होऊन सुटलेत सगळे...

आता काही प्रश्न मोदी भक्तांसाठी.....

१.बारामतीमध्ये येऊन शरद पवारांना आणि पक्षाला भ्रष्ट वादी  कॉंग्रेस म्हणणारे तुमचे देवता स्वरूप मोदी .... नंतर येऊन म्हणतात कि शरदराव माझे गुरु आहेत आजही आठवड्याला ४ वेळा फोन करून आम्ही बोलतो....  हिंदूंना आतंकवादी म्हणणारा पवार हा मोदिचा गुरु म्हणून तुम्हाला चालतो का?



२.प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रालयात घोटाळा झाला आहे त्याचा तपास देखील सुरू झाला नाहीय...का? पटेलांनी गुजरातमध्ये राज्यसभेत दोन आमदाराचा पाठींबा दिला त्या बदल्यात हा घोटाळा माफ केलाय का तुम्ही?

३.छगन भुजबळ जेलमध्ये आणि घोटाळा फक्त ५०० कोटी आणि ७०००० कोटी चा सिंचन घोटाळ्याचे अजित पवार आणि शरद पवार याचं काय? कुठे आहे भ्रष्टाचार विरोधी युद्ध ? यावर तीलीत तोमैय्या का नाही बोलत ?
    
४.नारायण राणे सारखे डाव्या विचारांचे लोक के चालतात तुम्हाला...? गडकरी पुतळ्याच काय?

५.अफझल गुरु आणि कसाब ला शहीद म्हण नारी मेहबूबा मुफ्ती चालतेच कशी तुम्हाला?

६.मोदी गेलेत तर सोनिया madam येतील आणि आधीसारख ५० टक्के कमिशन खातील अश्या पोस्ट फिराव्नार्यांनो....  आधीच्या घोटाळ्यात सोनिया आणि तिच्या कार्ट्याला सहज आत टाकू शकता ...!  ३ वर्षात का नाही टाकल?

७.संघ म्हणतो त्याप्रमाणे भारतीय अर्थसूत्रांवर भारताची अर्थ व्यवस्था कधी चालेल? 
८.इंग्रजांची अन्यायप्रणाली कधी जाईल? भारतीय शिक्षण न्याय व्यवस्थाकधी येईल??

९.किसान संघ आणि मजदूर संघ ज्या संघाच्या संघटना आहेत त्या सुद्धा आंदोलन करत आहेत....?? तुमचेच लोक जे पटत नाही नाही त्या साठी आंदोलन करत आहेत.... मग माझा एवढाही अधिकार नाही का कि मी एखादा फोटो ठेवावा ??


१०.या देशात प्रत्येकाला आपला ओपिनियन असण्याची स्वतंत्र्यता आहे कि नाही......?का तुम्ही भक्तच आम्ही श्वास केव्हा घ्यायचा हे ठरवणार?


आणखी खूप आहेत....... फक्त एवढच अभिप्रेत आहे कि माणसांनी आंधळ होऊ नये....

आता देवेंद्रच्या भक्तांनो....तुमच्या साठी  सुद्धा  लवकरच घेऊन येतोय फडणविशी.......



तूर्त इत्य शम!...

No comments:

Post a Comment