Saturday 29 April 2017

श्रीमान योगी राजा शिवाजी।

'रणजीत देसाई' यांच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीत याचे खूप छान उदाहरण सापडते. ते इथे फक्त संदर्भ म्हणून ते देत आहे कोणाचेही या पुस्तकातील हितसंबंध डावलण्याचा हेयू नाही....
राजांची छावणी तिरुवन्नमलईला पडली होती...
सकाळची वेळ होती. राजे हंबीरराव, जनार्दनपंत यांच्यासह छावणीची पाहणी करत होते......
राजे म्हणाले,
'गाव किती सुरेख आहे !'
'एके काळी हे गाव हिंदूंचे तीर्थक्षेत्र होते.'
जनार्दनपंतांनी सांगितले.
'एके काळी ?'
'हो. येथे श्रीशिव आणि समेत्तिपेरुमल दैवतांची सुरेख मंदिरे होती.'
'मग त्याचं काय झालं ?'
'विजयनगर-साम्राज्याच्या विध्वंसाबरोबर ती मंदिरे मुसलमानी आक्रमणाखाली पाडली गेली.'
'अरेरे ! आता त्या ठिकाणी काहीही नाही ?' राजांनी विचारले.
'त्या पुरातन मंदिरांच्या जागेवर
मुसामानांनी मशिदी बांधल्या आहेत.' .....
राजांची पावले थांबली. एका खड्यात काळभोर नंदी उखळून विरुपावस्थेत पडला होता. त्याच्या पासून थोड्याच अंतरावर सुंदर पाषाणात कोरलेले भ्रष्ट शिवलिंग आजूबाजूच्या हिरवळीतून डोकावत होते. ते उजाड, विषण्ण अवशेष पाहून राजांचे
मन उद्विग्न झाले. ते उद्गारले,
'माणसं जगतात तरी कशी ?'
'सत्ताधार्यांच्या आक्रमणापुढे नेहेमीच मान तुकवली जाते.'
'पंत, वतनाच्या हक्कासाठी पिढ्या-न्-पिढ्य
ा झगडणारी माणसे. ही आमची वतने भंगली, तरी उघड्या डोळ्यांनी आम्ही ते पाहतो. आमची दैवते भग्न होतात, आणि ती आम्ही पाहतो.'
राजे समेत्तिपेरुमलच्या मंदिराचे मशिदीत झालेले रुपांतर पाहत होते. राजे ते पाहून सुन्न झाले. 'धर्माच्या नावावर केवढ अधर्मी कृत्य
हे !'
ज्या मंदिराच्या उभारणीसाठी शेकडो कलावंतांनी,शिल्
पकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असेल, ती माणसाच्या दृष्टीला सुखावणारी, थक्क करणारी, परमेश्वराचा साक्षात्कार घडवणारी ही आमची मंदिरे परक्या धर्मप्रचारासाठी नेस्तनाबूत केली जातात. एवढच नव्हे, तर त्याच पवित्र वास्तूवर मशिदी बांधल्या जातात. पंत ही हिम्मत आली कोठून ?'
'महाराज !' रघुनाथपंतांचा आवाज विषण्ण झाला होता.
'त्याच एकच कारण आहे !
मुसलमानांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. त्या धर्मनिष्ठेपायी सर्वस्वाचे बलिदान करण्याची तयारी आहे. हे फिरंगी आपल्या धर्मासाठी सतसमुद्र ओलांडतात. परमुलखात धर्मप्रचार करतात.
केवढी त्यांची निष्ठा ! तीच
निष्ठा त्यांना विजयी बनविते.
आणि आम्ही हिंदू म्हणवून घेतो, पण उघड्या डोळ्यांनी आपल्या धर्माचा ऱ्हास पाहतो. ज्यांना स्वधर्म निष्ठा नाही, त्यांचा भाग्योदय कसा होणार ?'
'पण महाराज, झाल्या गोष्टीपुढे इलाज काय ? आपण काय करू शकतो ?' राजांची संतप्त नजर हंबीररावांवर खिळली.
'हंबीरराव, हे तुम्ही बोलता ? आमचे सेनापती हे बोलतात ? मग छत्रपती कशासाठी झालो ? लूट करणे, मुलुख जाळणे, स्वराज्याचा विस्तार करणे याचसाठी का आमचं राज्य ?'
राजांचा चेहेरा करारी बनला. एक वेगळेच तेज त्यांच्या चेहेर्यावर प्रकटले होते.
राजांनी निश्चयपूर्वक आज्ञा दिली.
'पंत, या मशिदी पडून टाका. येथे आमच्या दैवतांची पुन्हा स्थापना करा.
समेत्तिपेरूमलच् या मंदिराच्या पडलेल्या ह्या विटांतून नायक राजांनी बांधलेल्या या हजारखांबी मंडवासमोर सुरेख गोपूर बांधा. या दैवतांची पुन्हा प्रतिष्ठापना झाल्याखेरीज आमच्या मनाला शांती लाभणार नाही.'
या आज्ञेने जनार्दनपंत, हंबीरराव चकित झाले. जनार्दनपंत म्हणाले, 'पण महाराज, या मशिदी पाडल्या तर मुसलमानांची मने दुखावतील.' 'आमची मंदिरे पाडली आणि मशिदी उभ्या केल्या, तेव्हा आमच्या भावना दुखावतील, याचा कुणी विचार केला होता ? किंबहुना, आमचा धर्म नष्ट करण्यासाठीच ही कृत्ये केली ना ?'
'एका धर्मवेड्या पिढीने हे केलं, म्हणून आजच्या पिढीवर हा अन्याय......'
'पंत परधर्मसहिष्णुता म्हणजे स्वधर्माबद्दल अनास्था नव्हे. याच विचारांमुळे परकीय आक्रमण सहन करण्याची सवय आम्हाला लागली आहे. मनं कोडगी बनलीत. देवळी फोडली, तरी आम्ही स्वस्थ !
विजयनगरचं साम्राज्य कोलमडलं, तरी खंत नाही ! आमच्या आयाबहिणींची अब्रू लुटली गेली, तरी आनंद ! माणूस म्हणून जगायचं
तरी कशाला ? कशासाठी ? हीच सवय नडली आम्हाला. नाहीतर आम्हा करोडो हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारं काशीविश्वेश्वराचं मंदिर औरंगजेब पडू धजला नसता. पंत, धर्म हा एका पिढीचा खेळ नाही. तो पिढ्या-न्-पिढ्यांचा वारसा आहे. तो टिकवणे हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला परधर्माचा द्वेष नाही. आमच्या फौजेत मुसलमान आहेत. त्यांच्या मशिदी बांधायला विशाल भूमी मोकळी आहे. त्या आमच्याच पवित्र जागेवर बांधल्या गेल्या पाहिजेत, असं
कोणी म्हणेल, तर ते आमच्या राज्यात होणार नाही.
आमच्या हुकुमाची अंमलबजावणी ताबडतोब
करा.' राजांच्या आज्ञेने मशिदी पाडण्यात आल्या.
मंदिराचे काम सुरू झाले.......
हा कादंबरीतील उल्लेख म्हणजे परिकल्पना नव्हे तर खराखुरा इतिहास आहे
आणि समेत्तिपेरूमलचं मंदिर हे त्याला साक्ष आहे. सेक्युलर म्हणवून घेणार्यांनी या गोष्टीचा आधी विचार करायला हवा की धर्मनिरपेक्षता ही दोन्ही बाजूने
असेल तर ती निरपेक्षता असते नाहीतर समोरच्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्याचे ते शस्त्र ठरते. असे शस्त्र जे आपण स्वतःहून
त्यांना पुरवतो आणि सांगतो काप माझा गळा. इतर धर्मांचा आदर मी सुद्धा करतोे पण त्याही पेक्षा माझा धर्म मला प्रियआहे. दुसर्याच्या आईचा आदर करता येतो पण प्रेम आपल्याच आईवर रहात.

जय भवानी.... जय शिवाजी....

2 comments: