निवडणूक
वाजलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा बिगुल
कार्यकर्ते होतील प्रचारात मशगुल
नेत्यांची सुरु तिकीटाची लगीनघाई
एकमेकांसमोर उभे ठाकतील जे कालपर्यंत होते भाई भाई
एका पक्षाने नाकारले तर दुसऱया पक्षाची धरतिल वाट
राञी एका पार्टित तर दुसऱया पार्टित पहाट
पक्षांतर्गत चालेल फोडा फोडीचा विधी
त्यासाठी वापरात येणार आडमार्गाचा निधी
कार्यकर्त्यांचीही सुरु होणार आता चंगळ
ज्याने दिले नाही त्याला बाधला समजा मंगळ
उनको भी मालूम है यही वक्त है बटोरने का माया
चुनाव के बाद दिखेगा नहि पांच साल तक नेताओंका साया
काही उघडणार आघाडी, काही अवलंबतिल युती चे तंञ
जागा वाटपाच्या कारणावरुन पुन्हा लढतील स्वतंञ
निवडणूकी पूरते चालेल असेच सञ
सत्तास्थापने साठी पुन्हा एकञ
आरोप- प्रत्यारोप करतांना मर्यादेचे भान राखा जरा
महाराष्ट्रीय राजकारणाला लाभली आहे सभ्य आणि सुसंस्कृत परंपरा
मतदार राजाही झाला आहे जागरुक
उमेदवारांना सुधारावीच लागेल आपली वागणूक ,,🚩
🕉जय श्रीराम🕉 🚩
No comments:
Post a Comment