Wednesday, 4 January 2017

शिवाजी राजांची अस्सल चित्रे ....!


*छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे !*

शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख  मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत.
आजवर उपलब्ध असलेल्या शिवरायांच्या सर्व अस्सल चित्रांचा हा घेतलेला मागोवा -
(डावीकडून उजवीकडे चित्र पहावीत )




















*1.मनुची चित्र संग्रह -* 1672 च्या आसपासचे, मनुचीने भारतातील 56 राजे-बादशाह यांची चित्रे मीर महम्मद कडून तयार केली होती.त्यातील हे चित्र आहे. सध्या हे चित्र पॅरिस मध्ये आहे.


*2.किशनगड चित्रशाळा -*हे चित्र किशनगड मध्ये तयार केले असून ते 1750 नंतरचे असावे कारण अशी चित्रे तेथील प्रसिद्ध चित्रकार निहाल चंद ने काढली आहेत. हे चित्र सध्या बॉनहॅम्स कलेक्शन लंडन येथे आहे.



*3.राजपूत शैली -* राजपुती शैलीतील हे चित्र राजस्थान मध्ये काढले गेले असून, 1750 नंतरचे असावे.जगजितसिंह गायकवाड यांचेकडून हे प्राप्त झाले.


*4.रॉबर्ट ऑर्म कलेक्शन -* हिस्टोरीकल फ्रॅगमेंट्स या ऑर्म च्या पुस्तकात हे चित्र आले आहे, 1782 साली हे पुस्तक आले होते ,हे पेंटिंग 1782 च्या आधीचे आहे.


*5.अश्वारूढ शिवराय -* 1785, 1821,1831 च्या युनिव्हर्स पिक्चरस्क आणि इंडे या डिडॉट च्या ग्रंथात हि चित्र आले आहे.हे चित्र अँटोन झेनेटी ने काढले आहे. चित्राचा काळ 1705-1741 असावा. झेनेटी ने हे चित्र मनुची साठी काढले असण्याची शक्यता आहे. मूळ चित्र कॉपर एनग्रेव्हड असून त्यावर रंगकाम केले आहे.



*6.मुंबईतील चित्र-* हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शन मधील असून 1675 नंतर गोवळकोंडा येथे काढले असावे. छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय,मुंबई येथे चित्र सध्या आहे.



*7.फ्रांस राष्ट्रीय ग्रंथालय -* वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवराय हे चित्र 1685 सालचे गोवळकोंडा येथील आहे. सध्या फ्रांस मध्ये आहे.





*8.स्मिथ लेसोफ कलेक्शन -* छत्रपती शिवरायांचे  हे उभे असलेले , एका हातात तलवार , दुसर्या हातात पट्टा असलेले चित्र फ्रांस च्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे. हे चित्र १७व्या शतकाच्या शेवटचे असावे.






*9.रिक्स म्युसियम -* डाव्या हातात पट्टा, उजव्या हातात तलवार असलेले हे चित्र हॉलंड मधील असून चित्र 1680 च्या आसपासचे असल्याची तिथे नोंद आहे. चित्रावर 'Siesvage' लिहिलेले आहे.



*10.विटसेन संग्रह -* हे चित्र हॉलंड मधील रिक्स म्युसियम येथे आहे, 1675-1685 हा चित्राचा काळ सांगितला जातो.  Siwagii Prince in Decam असे चित्रावर लिहिले आहे.


*11.बर्लिन,जर्मनी -* बर्लिन स्टेट लायब्ररी येथे असणारे हे चित्र आहे, या चित्रावर 'Siuwagie gewerzere maratise vorst' असे लिहिले आहे. ज्याचा अर्थ मराठ्यांचा राजा असा होतो. चित्र 1700 च्या पूर्वीचे असून, तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी येथे नेले आहे.



*12.गीमे म्युसियम -* पॅरिस फ्रांस येथील मुघल शैलीतील हे शिवरायांचे चित्र आहे. चित्राचे वैशिठ्य म्हणजे या चित्रात त्यांचा पूर्ण चेहरा दिसत आहे.



*13.ब्रिटिश म्युसियम -* लंडन येथे सध्या असणारे शिवाजी महाराजांचे चित्र पोर्टरेट्स ऑफ इंडियन प्रिन्सेस या अल्बम मधील आहे. चित्र गोवळकोंडा येथे बनवले असून काळ 1680 ते 1687 नोंदवला आहे.



*14.फ्रांस्वा वॅलेंटिन संग्रह -* भिंतीवर हात ठेवलेले हे शिवाजी राजांचे वैशिष्ठयपूर्ण चित्र हे फ्रांस्वा वॅलेंटिन ह्या डच अधिकाराच्या संग्रहातील आहे. चित्र 1782 मध्ये प्रसिद्ध झाले असून ते 1712 च्या आधीचे असावे. चित्रावर 'dwn hee Seva Gi' लिहिले आहे.



*15.लेनिनग्राड -* इंडियन मिनिएचर्स या चीत्रसंग्रहात प्रसिध्द झालेले हे चित्र बर्लिन मधील चित्राशी मिळतेजुळते आहे, हे चित्र हॉलंड मधून प्राप्त झाले असून सध्या रशियन लायब्ररीत आहे.

(सर्व चित्रे शिवकालीन व शिवोत्तरकालीन आहेत, इ.स.१८०० नंतरची चित्र विचारात घेतली नाहीत)



*- मालोजीराव जगदाळे*

No comments:

Post a Comment