Friday 18 November 2016

निरीश्वरवाद


 आपल्या भारतात निरीश्वरवादाची किती उज्ज्वल परंपरा आहे. ऋग्वेदापासून... हे सगळे जे तुम्ही टाकले आहे, ते अब्राहमीक संप्रदायाच्या संदर्भात आहे. धर्माच्या नाही. धार्मिक निरीश्वरवाद खूप क्लिष्ट असला तरी आपल्याला (भारतीय मनाला) खूप सहज समजण्यासारखा आहे..

उदाहरणार्थ, ऋग्वेद, मंडळ १०, सुक्त १२९ ज्याला पॉप्युलरली लोक "नासदीय सुक्त" म्हणून ओळखतात.. हे सुक्त भारतीय निरीश्वरवादाचे जनक म्हणता येईल..

नासदासीन नो सदासीत तदानीं नासीद रजो नो वयोमापरो यत |
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद गहनं गभीरम ||

 तेव्हां म्हणजे मुळारंभी असत् नव्हते आणि सत्ही नव्हतें! अंतरिक्ष नव्हतें आणि त्यापलीकडचें जे आकाश तेंही नव्हतें! (अशा स्थितींत) कोणीं (कोणाला) आवरण घातलें (म्हणावें)? कोठे? कोणाच्या सुखासाठीं? अगाध व गहन पाणी (तरी) होतें काय?

न मर्त्युरासीदम्र्तं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः |
आनीदवातं सवधया तदेकं तस्माद्धान्यन न परः किं चनास ||

तेव्हां मृत्यू म्हणजे मृत्युग्रस्त नाशवंत दृश्य सृष्टी नव्हती, व म्हणून (दुसरा) अमृत म्हणजे अविनाशी नित्य पदार्थ (हा भेद) हि नव्हता. (तसेंच) रात्र आणि दिवस यांचा भेद कळण्यास कांहीं साधन (=प्रकेत) नव्हतें. (जें काय होतें) ते एकलें स्वधेनें म्हणजे आपल्या शक्तीनें वायूशिवाय श्वासोच्छ्वास करीत म्हणजे स्फुरत होतें. त्याखेरीज किंवा त्यापलीकडे दुसरें असे कांहींच नव्हतें.

तम आसीत तमसा गूळमग्रे.अप्रकेतं सलिलं सर्वमािदम |
तुछ्येनाभ्वपिहितं यदासीत तपसस्तन्महिनाजायतैकम ||

अंधकार होता, आरंभी हे सर्व अंधकाराने  व्याप्त (आणि) भेदाभेदविरहित पाणी होतें, (किंवा) आभू म्हणजे सर्वव्यापी ब्रह्म (आरंभींच) तुच्छानें म्हणजे फोल मायेने आच्छादिलेले होते - असें (यत्) जें (म्हणतात), तें (तत्) मूळ एक (ब्रह्मच) तपाच्या महिम्यानें (रूपांतरानें पुढें) प्रकट झालेले होतें.

कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः परथमं यदासीत |
सतो बन्धुमसति निरविन्दन हर्दि परतीष्याकवयो मनीषा ||

याच्या) मनाचे जें रेत म्हणजे बीज प्रथमत: निघालें तोच आरंभी काम (म्हणजे सृष्टि निर्माण करण्याची प्रवृत्ति किंवा शक्ती) झाला. (हाच) असतामध्यें म्हणजे मूळ परब्रह्मांत सताचा म्हणजे विनाशी दृश्य सृष्टीचा (पहिला) संबंध होय, असें ज्ञात्यांनी अंत:करणांत विचार करून बुद्धीनें निश्चित केले आहे.

तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः सविदासी.अ.अ.अत |
रेतोधाासन महिमान आसन सवधा अवस्तात परयतिः परस्तात ||

(हा) रश्मी म्हणजे धागा किंवा किरण यांच्या (मध्यें) आडवा पसरला; आणि खालीं होता म्हटलें तर वरहि होता. (यांच्यातलें काही) रेतोधा म्हणजे बीजप्रद झाले, व (वाढून) मोठेही झाले. त्यांचीच स्वशक्ति अलीकडे व प्रयति म्हणजे प्रभाव पलीकडे (व्यापून) राहिला.

को अद्धा वेद क इह पर वोचत कुत आजाता कुत इयंविस्र्ष्टिः |
अर्वाग देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यताबभूव ||

सताचा) हा विसर्ग म्हणजे पसारा कशापासून किंवा कोठून आला, हें (यापेक्षां) प्र म्हणजे विस्तारानें येथें कोण सांगणार? कोण निश्चयात्मक जाणतो देवही या (सत् सृष्टीच्या) विसर्गानंतरचे. मग ती जेथून निघाली तें कोण जाणणार?

इयं विस्र्ष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न |
यो अस्याध्यक्षः परमे वयोमन सो अङग वेद यदि वा नवेद ||

सताचा) हा विसर्ग म्हणजे पसारा जेथून झाला, किंवा तो निर्मिला गेला अगर न गेला, तें परम आकाशांत असणारा या जगाचा जो अध्यक्ष (हिरण्यगर्भ) तो जाणीत असेल; किंवा नसेलही! (कोणी सांगावें?)



वसंत देव कृत प्रसिद्ध हिंदी भाषांतर
सृष्टी से पहले सत् नहीं था।
असत् भी नहीं।
अन्तरिक्ष् भी नहीं। आकाश भी
नहीं था।
छिपा था क्या? कहाँ? किसने ढका
था?
उस पल तो अगम-अतल जल भी कहाँ
था?।। १।।

नहीं थी मृत्यू थी अमरता भी
नहीं।
नहीं था दिन रात भी नहीं।
हवा भी नहीं साँस थी स्वयमेव
फिर भी।
नही था कोई कुछ भी। परमतत्त्व
से अलग या परे भी।। २।।

अंधेरे में अंधेरा-मुँदा
अँधेरा था।
जल भी केवल निराकार जल था।
परमतत्त्व था सृजन-कामना से
भरा। ओछे जल से घिरा।
वही अपनी तपस्या की महिमा से
उभरा।। ३।।

परम मन में पहला बीज जो उगा वही
काम बनकर जगा।
कवियों-ज्ञानियों ने जाना।
असत् और सत् का निकट सम्बन्ध
पहचाना।। ४।।

फैले सम्बन्ध के किरण-धागे
तिरछे।
परमतत्त्व उस पल ऊपर या नीचे?
वह था बँटा हुआ। पुरुष और
स्त्री बना हुआ।
ऊपर था दाता वही भोक्ता। नीचे
वसुधा स्वधा भोग्या।। ५।।

सृष्टी यह बनी कैसे? किससे? आई
है कहाँ से?
कोई क्या जानता है? बता सकता है?
देवताओं को नहीं ज्ञात, वे आए
सृजन के बाद।
सृष्टी को रचां है जिसने उसको
जाना है किसने?।। ६।।

सृष्टी का कौन है कर्ता? कर्ता
है अथवा अकर्ता?
ऊँचे आकाश में जो रहता। सदा
अध्यक्ष जो बना रहता।
वही सचमुच में जानता या नहीं
जानता।
इसका किसी को नहीं पता नहीं है
पता।। ७।


आस्तिक ते जे वेदप्रामाण्य मानतात.. नास्तिक ते जे वेदप्रामाण्य मानीत नाहीत..

आस्तिक निरीश्वरवादी मते - सांख्य, न्याय, पूर्वमीमांसा, वैशेषिक, काही प्रमाणात योग
आस्तिक सेश्वरवादी मते - वेदांत, काही प्रमाणात योग
नास्तिक निरीश्वरवादी मते - बौद्ध, जैन, चार्वाक
नास्तिक सेश्वरवादी मते - शीख/ गुरुमत


उपरोक्त नासदीयस ुक्त हे आधुनीक शास्त्र जे BIG BANG ची थेरी मांडत त्याच्याशी जवळीक साधत.


ओर्कुत्वरून निश्रेयस साभार प्रस्तुत 

No comments:

Post a Comment