Saturday, 28 January 2017

#भाजपचे_विस्मरण


1) १९९८-९९ च्या काळात मायावती, जयललिता आणि ममता बॅनर्जी यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नाकात दम आणला होता. मंत्रिपदावरून हट्ट आणि अडेलतट्टू भूमिकांमुळे वाजपेयीं कोंडीत सापडले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अटलजींना सांगितले होते, ....की शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचे मी राजीनामे घेतो. आमच्या वाट्याची दोन मंत्रिपदे त्यांना द्या. पण तुमचे सरकार राष्ट्रहिताचे आहे. ते वाचले पाहिजे.


(२) गुजरात दंगलीच्या वेळेस भाजप मधले सगळे वरिष्ठ नेते मोदी हटाव च्या बाजूने होते, तेव्हा बाळासाहेबांनी वाजपेयी अणि आडवाणींना निक्षुन सांगितले, "मोदी गया तो समझो गुजरात गया". बाळासाहेब मोदींच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहिले आणि मोदी मुख्यमंत्री म्हणून टिकले,जर मुख्य मंत्री पद गेले असते तर, मोदी राजकारणातून 15 वर्षपूर्वीच बाहेर पडले असते,


                         Image result for balasaheb and modi
(३) उत्तर प्रदेश.., पिलिभीत मधे संजय गांधी यांचे पुत्र भाजप नेते"वरून गांधी"यांनी.., एका भाजपच्या कार्यक्रमात मिडिया समोर बोलले होते की.., "अगर कीसीने हींदु के उपर हात उठाया..,तो वो हात मे काट डालूंगा"त्यांना अटक झाली त्या वेळी भाजप ने त्यांची साथ सोडली होती मग बाळासाहेब त्यांच्या पाठिशी ठाम पणे उभे राहिले.,, वरून गांधी जेल मधून सुखरूप बाहेर आले

(४) मुंडे साहेब जेव्हा भाजप मधे खुप नाराज होते आणि भाजप सोडून कॉंग्रेस मधे जाण्याच्या तयारीत होते.., तेव्हा बाळासाहेबांनी मुंडेंना मातोश्री वर बोलावले आणि गणपतीच्या समोरील भगवा टिळा मुंडेंच्या कपाळावर लावला.., आणी साहेब बोलले की गोपीनाथजी ह्या भगव्याचा रूबाब कमी होऊ देऊ नका..,मुंडेचा निर्णय बदलला मी मरे पर्यंत भाजप मधेच राहणार.., माझं मृत्यू नंतर माझे मृतदेह भाजप कार्यालयातूच उठेल..,


(५) गुजरातचे मुख्यमंत्री असताना शंकर वाघेला त्यावेळी नरेँद्र मोदिँवर नाराज होते...., ते शिवसेनेत येण्यास तयार होते.., पण बाळासाहेबांनी त्यांना रोखले आणि युती धर्म पाळला..., जर ते शिवसेनेत आले असते तर (शंकर वाघेला गुजरात मधे शिवसेनेचे मुख्यमंत्री असते)

शिवसेनेने नेहमीच भाजपाला आणि भाजपा नेत्याना अडीअडचणीत मदत केली.. सोबत खंबीरपणे उभे राहिले.. कदाचीत हेच शिवसेनेच चुकल.. मैत्रीधर्म शिवसेनेने स्वतःच्या सन्मानापेक्षा आणि राजकिय महत्त्वकांक्षे पेक्षा जास्त जपला... त्याचच हे फळीत

मै घायाल घाटी के दिल कि धडकन गाने निकला हुं .....!


Main ghayal ghaati ke dil ke dhadkan gaane nikla hoon
Damroo wale shivshankar ki jo ghati kalyani thi

kashmir jo bhumandal ka swarg bataya jata tha
jiski mitti ko duniya mein argh chadaya jata tha
                            Image result for कश्मीर
kashmir jo bharat mata ki aankhon ka tara tha
kashmir jo lal bahadur ko praano se pyaara tha

kashmir wo doob gaya hai andhi gehri khyaayi mein
phoolo ki ghaati roti hai marghat ki tanhaai mein

Ye rajnigangha mausam ki bela hai
gandho ke ghar bandooko ka mela hai

main bharat ki janta ka sambodhan hoon
aansoo ke vikaaron ka udbodhan hoon

main avdharmi parampara ka charan hoon
aazadi ki peeda ka uchhaaran hoon
                    Image result for कश्मीर      
Isiliye darbaaron ko darpan dikhlane nikla hoon
Main ghayal ghaati ke dil ke dhadkan gaane nikla hoon

Bas naaro mein gaate rahiyega kashmir humara hai
Chookar to dekho us choti ke neeche angaara hai

Dilli apna chehra dekhe dhool hatakar darpan ki 
Narsingho ki tasveere bhi hai besharm samaparn ki
                           Image result for कश्मीर आतंकवाद
Apharano ki roz kahani hoti hai
Main aankhon ke pani ko lalkaar banane nikla hoon
Main ghayal ghaati ke dil ke dhadkan gaane nikla hoon

Kashmir hai jahan gard mein sooraj chandaa tare hain
Jharno ka pani raktim hai jheelo mein angaare hain

kashmir hai jahan fizaaye ghayal dikhti rahti hai
Garm hawaye jahan ghaati ka raashifal likhti rahti hai
                    Image result for कश्मीर           
Kashmir hai jahan desh ka maan lutaya jata hai
kashmir hai jahan darindo ki manmaani chalti hai

Ghar ghar mein AK56 ki ram kahani chalti hai
kashmir hai jahan humara rashtra gaan sharminda hai

bharat maa ko gali dekar bhi khalnayak zindaa hai
Kashmir hai jahan desh ka sheesh jhukaya jata hai

Masjid mein gaddaron ko khana bhijwaya jata hai
Loola langda pal wo singhaasan hai

loole langde sankalpo ke bhashan hain
phoolon ki ghaati laashon ki mandi hai

Anushashan ka poora daur shikhandi hai
                 Image result for कश्मीर
Main is kodhi kaayarta ki laash uthane nikla hoon
Main ghayal ghaati ke dil ke dhadkan gaane nikla hoon

Humko do aansoo nahi aate hain anhoni ghatna par
Thodi si charcha hoti hai bahut badi durghatna par

Rajmahal ko sharm nahi hai ghayal hoti chaati par
bharat mata ka bhaag likha hai srinagar ki chaati par

Man karta hai phool chada doon loktantra ki arthi par
Bharat ke bete sharanarthi ho gaye apni dharti par

we ghaati se khel rahe hain gairon ke balbooto par
Jinki naak tiki rahti hai gair watan ke jooton par

Kashmir ko batwaare ka dhandha bana rahe hain we
Jugnu ko baishakhi dekar chandaa bana rahe hai we

Fir bhi khoon sane haathon ko nyota hai darbaaron ka
Jaise sooraj ki kirno par karza ho abhiyaaro ka

Kursi bhookhi hai noto ke thailon ki
Kulwanti Daadi ho gayi rakhailon ki

Aaj zaroorat hai sardaar patelon ki

Main ghaati ke aansoo ka santaap mitane nikla hoon
Main ghayal ghaati ke dil ke dhadkan gaane nikla hoon
                        Image result for कश्मीर
Jab chaurahon par hatyaare mahima mandit hote hon
Bharat maa ki maryada ke manjar khandit hote hon

Jab khatnaaras ke naare hon gulmarg ki galiyon mein
Shimla samjhota jalta ho bandooko ki naliyon mein

To kewal aavashyakta hai himmat ki khuddari ki
Dilli kewal do din ki mohlat de de tayyari ki

Sena ko aadesh thama de ghaati gair nahi hogi
jahan TIRANGA nahi milega unki khair nahi hogi

Jinko bharat ki dharti na bhaati ho
Bharat ke jhando se badboo aati ho

Jin logo ne maa ka aanchal faada ho
Dhoodh bhare seene mein chaaku gaada ho

Main unko chauraahon pe phaansi chadwaane nikla hoon
Main ghayal ghaati ke dil ke dhadkan gaane nikla hoon

Amarnath ko gaali di hai bheekh mile hathiyaaron ne
Chaand sitare taak liye hain khoon lipi deewaron ne

Isiliye naakaam rahi hai koshish sabhi Ujaalo ki
kyonki ye sab kathputli hain nafrat karne waalon ki

Antim ek chunauti de seema paar padosi ko
Geedarh kayarta na samjhe singho ki khaamoshi ko

Humko apne khatte meethe bol badalna aata hai
Humko ab bhi duniya ka bhoogol badalna aata hai
                      Image result for कश्मीर
Duniya ke sarpanch humare thaane daar nahi lagte
Bharat ki prabhsatta ke koi thekedaar nahi lagte

Kya darna duniya bhar ki baadhaaon se
Aankh milaao duniya ke dadaaon se

Bharat walo bharat ko balwaan karo
baandh nahi to atom bom nirmaan karo

Main bharat ko duniya ka sarmor banane nikla hu
Mein ghaayal ghati k dil dhadkan gaane nikla hu.

Sunday, 22 January 2017

बघावा विट्ठल । करावा विट्ठल ।।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मुद्राशास्र...



या शास्त्रानुसार आपल्या शरीराचे कार्य संतुलितपणे पार पडण्यासाठी पंचप्राण(प्राण,अपान,व्यान,उदान ,समान)
पंचतत्वे(आकाश,वायू,अग्नी,जल,पृथ्वी) आणि त्रिदोष (वात,कफ,पित्त)यांमध्ये संतुलन आवश्यक आहे. संतुलन साधण्याची आपल्या शरीरातच योजना असून आपल्या हाताच्या निरनिराळ्या ठिकाणी दाब देऊन आपल्या शरीराचे कार्य संतुलित करता येते. मुद्राशास्त्र हा योगाचाच एक प्रकार आहे या शास्त्रानुसार आपल्या हाताच्या पाच बोटात पाच तत्वे आहेत व हि पाचही तत्वे आपण आपल्या हाताच्या बोटांची वेगवेगळ्या प्रकारे रचना(मुद्रा) करून तत्व संतुलित करता येते.(या संबंधी पण माझा एक अनुभव आहे.एका स्नेह्यांना छातीमध्ये दुखण्याचा त्रास होत होता,

Image result for विठ्ठल images




त्यासाठी ते डॉक्टरांना भेटून आले, E.C.G. काढला पण normal आला. दोन दिवस वाट पाहूनही दुखण्यात काही फरक पडला नाही डॉक्टरांनी पुन्हा angiography व गरज पडल्यास angeoplasti करण्याचा सल्ला दिला. हृदयाच्या दुखण्यावर अपान-वायू मुद्रा गुणकारी असते हे माहित होते,मी त्यांना अपान-वायू मुद्रा करण्यासाठी सांगितले आणि दहाव्या मिनिटाला त्यांचे छातीत दुखणे कमी
 पुढचे ५-६ दिवस रोज कमीत कमी चाळीस मिनिटे व जास्तीत जास्त २ तास हि मुद्रा केल्याने त्यांचा छातीत दुखण्याचा त्रास एकदम बंद झाला )
भगवान बुद्ध,भगवान महावीर यांच्या ज्या ज्या प्रतिमा सापडल्या आहेत त्या मध्ये सुद्धा ते ज्ञान मुद्रा करताना दर्शविले आहेत








शरीर हे आत्म्याचे परम तत्वाकडे जाण्याचे साधन आहे त्याच्या healing आणि well-functioning
साठी योगाभ्यास,आयुर्वेद आणि मुद्राशास्त्र, शिवस्वरोदयशास्त्र आदि शास्त्रे आहेत असे मानायचे का?
या शास्त्रांचे अस्तित्व दिसत आहे आणि ते मान्य केले तर कर्मविपाक सिद्धांत,पुनर्जन्म वगैरे या गोष्टी ज्यांचे अस्तित्व हि शास्त्रे मान्य करतात त्या सत्य आहेत असे आपण मानायचे का?
नसेल तर या शास्त्रांमध्ये ज्या बारकाई ने मनुष्य शरीराचा विचार,अभ्यास केलेला आहे तो खोटा मानायचा का?
आपले संत हे योगाचा आणि मुद्रा शास्त्राचा अभ्यास करून मनाची सॊहम अवस्था प्राप्त केली का?
कबीर म्हणतो"अडसठ तीरथ घटके भीतर,यूँही मैं मलमल नहाऊ,
गंगा न जाओ जमना न जाओ न कोई तीरथ नहाओ जी "








ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
टीप: अपानवायु मुद्रा दररोज २०मीनीटे करावी.(दिवसातन तीनवेळा केली तर ऊत्तमच)
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
   ​मुळाक्षरे आणि आरोग्य थोडक्यात वर्ड व्हायब्रेशन थेरपी





आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने (व्हयब्रेशनने) तो अवयव नीट काम करू लागतो. आणि आपले आरोग्य सुधारते.
ऊभ्या महाराष्ट्रात "विठ्ठल" पुजला जातो. विट्ठालाचे हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत.पंढरपुरची, विट्ठलवाडीची  विठ्ठलाची मूर्ति नीट बघतली तर हातचे पंजे वरील बाजुस आहेत. नीट वैद्यकीय दृष्टया निरिक्षण केले तर उजवा तळहात लिव्हर वर अणि डावा तळहात स्प्लीनवर आहे. शरीराच्या चुम्बकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात म्हणजे दक्षिण ध्रुव अणि डावा तळहात म्हणजे उत्तर ध्रुव. पोटात गैसेस होवून ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखते व् त्यातून हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अशावेळी विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली  हात ठेवल्यास गैसेस लिव्हरकड़े येतात अणि बाहेर पडतात. छातीत शिरत नाहीत.





 तसेच "ward vibration therapy" चा  विचार करता 'ट' अणि 'ठ' ही अक्षरे अनुस्वार देवून म्हटली की हार्ट चे संरक्षण होते. अणि विट्ठल म्हणताना ठ डबल आहे. म्हणून छातीत दुखु लागले किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे. म्हणजे ५-१० मिनिटात रिलीफ मिळतो. (विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवून उभ रहायच व विठ्ठल विठ्ठल असे बोलत राहायचे) पाच मिनिटात छातीत दुखणे थांबते.




महाराष्ट्रात आषाढ़ महिना हा भरपूर पावसाचा त्यामुळे पाचनशक्ति मंदावाते, गैसेस होतात. म्हणून पंढरीची वारी. म्हणजे विट्ठल नामाचा गजर.
आमचे पूर्वज किती बुद्धिमान होते ते पहा -  राम, कृष्ण, विठ्ठल, व्यंकटेश ही सर्व विष्णुचीच रुपे पण महाराष्ट्रातील हवामानानुसार दैवत विठ्ठल.

                                             Image result for विठ्ठल


पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!
आमच्या पूर्वजांनी निसर्गातल्या शक्तींचा अभ्यास करून माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज सोपे उपचार दिले. त्यांना आम्ही जुनाट वीचाराचे म्हणतो. अशास्त्रीय (पाश्चात्य लोकांना मान्य नाही असे) म्हणतो.
मराठीतील अक्षरे कोणीही कुठेही म्हटली तरी चालतात. तरी वाचकांना विनंती की विश्वास ठेऊन अथवा न ठेवता मराठीतील मुळाक्षरे म्हणण्याचा प्रयोग करून पाहावा. माझ्या अनुभवा प्रमणे एक अक्षर १०० वेळा म्हणायला एक मिनिट पुरते.






 बरेचशा आजारात मुलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्राची अक्षरे १०० वेळा म्हणणे पुरते. आपल्याला जरूर फायदा होईल.
आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने (व्हयब्रेशनने) तो अवयव नीट कार्य करू लागतो. आणि आपले आरोग्य सुधारते.
मूलाधार चक्राची अक्षरे –



( वं, शं, षं, सं )
मुलाधार चक्रावरची अक्षरे ऊच्चारताना
आहार सात्वीक हवा व पाणीही भरपुर
पियाल पाहिजे.






स्वाधिष्ठान चक्राची अक्षरे –
( बं, भं, मं, यं ,रं, लं )
मणिपूर चक्राची अक्षरे –
( डं, धं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं )




अनाहत चक्राची अक्षरे-
( कं, खं, गं, घं, चं, छं, जं, झं,टं, ठं )




विशुद्ध चक्राची अक्षरे-
( अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋं, ऋृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अंः )




अज्ञा चक्राची अक्षरे-
( हं, क्षं )




(जेवणा नंत्तर ऐकतासानी चक्राची अक्षरे ऊच्चारावी)
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मराठी  मुळाक्षरे



अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ  
स्वर 



अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः
व्यंजन
क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न
प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ
(जीथे शक्य आहे तीथे अनुस्वार देणे




समजा ( उदा. अ = अं )
 ' अं ' चा कमीत कमी वीस वेळा सलग ऊच्चार करायचा असेच
प्रत्येक मुळाक्षराचा अनुस्वार देऊन कमीत कमी वीस वेळा ऊच्चार करावा.)(जेवणा नंत्तर ऐकतासानी)




ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मराठी बाराखडी
क  का  कि  की  कु  कू  के  कै  को  कौ  कं  कः
ख  खा  खि  खी  खु  खू  खे  खै  खो  खौ  खं  खाः 
ग  गा  गि  गी  गु  गू  गे  गै  गो  गौ  गं  गः 
घ  घा  घि  घी  घु  घू  घे  घै  घो  घौ  घं  घः 
ङ  ङा  ङि  ङी  ङु  ङू  ङे  ङै  ङो  ङौ  ङं  ङः



च  चा  चि  ची  चु  चू  चे  चै  चो  चौ  चं  चः
छ  छा  छि  छी  छु  छू  छे  छै  छो  छौ  छं  छः   



ज  जा  जि  जी  जु  जू  जे  जै  जो  जौ  जं  जः
झ  झा  झि  झी  झु  झू  झे  झै  झो  झौ  झं  झः
ञ  ञा  ञि  ञी  ञु  ञू  ञे  ञै  ञो  ञौ  ञं  ञः



ट  टा  टि  टी  टु  टू  टे  टै  टो  टौ  टं  टः
ठ  ठा  ठि  ठी  ठु  ठू  ठे  ठै  ठो  ठौ  ठं  ठः 
ड  डा  डि  डी  डु  डू  डे  डै  डो  डौ  डं  डः



ढ  ढा  ढि  ढी  ढु  ढू  ढे  ढै  ढो  ढौ  ढं  ढः    
ण  णा  णि  णी  णु  णू  णे  णै  णो  णौ  णं  णः 
त  ता  ति  ती  तु  तू  ते  तै  तो  तौ  तं  तः
थ  था  थि  थी  थु  थू  थे  थै  थो  थौ  थं  थः





द  दा  दि  दी  दु  दू  दे  दै  दो  दौ  दं  दः 
ध  धा  धि  धी  धु  धू  धे  धै  धो  धौ  धं  धः  
न  ना  नि  नी  नु  नू  ने  नै  नो  नौ  नं  नः 
प  पा  पि  पी  पु  पू  पे  पै  पो  पौ  पं  पः



फ  फा  फि  फी  फु  फू  फे  फै  फो  फौ  फं  फः
ब  बा  बि  बी  बु  बू  बे  बै  बो  बौ  बं  बः
भ  भा  भि  भी  भु  भू  भे  भै  भो  भौ  भं  भः



म  मा  मि  मी  मु  मू  मे  मै  मो  मौ  मं  मः
य  या  यि  यी  यु  यू  ये  यै  यो  यौ  यं  यः 



र  रा  रि  री  रु  रू  रे  रै  रो  रौ  रं  रः 
ल  ला  लि  ली  लु  लू  ले  लै  लो  लौ  लं  लः
व  वा  वि  वी  वु  वू  वे  वै  वो  वौ  वं  वः
श  शा  शि  शी  शु  शू  शे  शै  शो  शौ  शं  शः





ष  षा  षि  षी  षु  षू  षे  षै  षो  षौ  षं  षः 
स  सा  सि  सी  सु  सू  से  सै  सो  सौ  सं  सः



ह  हा  हि  ही  हु  हू  हे  है  हो  हौ  हं  हः
ळ  ळा  ळि  ळी  ळु  ळू  ळे  ळै  ळो  ळौ  ळं  ळः





क्ष  क्षा  क्षि  क्षी  क्षु  क्षू  क्षे  क्षै  क्षो  क्षौ  क्षं  क्षः
ज्ञ  ज्ञा  ज्ञि  ज्ञी  ज्ञु  ज्ञू  ज्ञे  ज्ञै  ज्ञो  ज्ञौ  ज्ञं  ज्ञः


(बाराखडी रोज कमीतकमी पाच वेळा तरी म्हटलीगेली पाहिजे)
( जेवणा नंत्तर ऐकतासानी )


॥श्री गुरुदेव दत्त॥

Saturday, 21 January 2017

*कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?*
एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"



या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
" असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.
सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.
जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. 

या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.
भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
एका विहरीभोवती चार विहीरी होत्या.
चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
हे पाहून भीम चक्रावून गेला.

नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे.
जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली.
पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले.
तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते.
हे पाहून नकूल गोंधळून गेला.

सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.
यावेळी सहदेवही चकीत झाला.

या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
"कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.

कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.

कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."


🙏राम कृष्ण हरी🙏
*"जसे कर्म, तसे फळ."*

Monday, 16 January 2017

*खरच सांगा गुरुजी*

:
=========================
*खरच सांगा गुरुजी.* कोण कुठं चुकलं
*शाळेमध्ये पोरगं* नेमकं काय शिकलं....?

*काॅप्या* पुरवुन *शाळेचं*
काम तुम्ही खास केलं,

*दहावीचं पोर* माझं
झटक्यात *पास* केलं !

पोरासगट माझा
*सत्कार जाहिर* झाला
.
*सत्काराचा* माझ्या *गाजावाजा*
*गावभर* झाला !

*माझ्यासह संस्थेचं, नाव* त्यानं राखलं
*खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं*

*टक्केवारी* वाढवुन
*पगार* तुमची *वाढली,*

*पगाराची नशा*
दारुसारखी *चढली !*

अाता पोरगं अाकरावीत
*भुगोल गणित* पचेना .

*इंग्रजी*तर सोडाच
*मराठीही* वाचेना !

*परिक्षेच्या* भट्टीत, कच्चं *अांम्बं* पिकलं
*खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं*

*अाकरावीतुन बारावीत*
तसच तुम्ही *रेटलं,*

*फॅशनचे कपडे* घालुन
नटावणी नटलं !

*बारावीच्या* नखर्‍याला
खुदकन हसलं,

*चार विषयात* पोरगं
गळ्याइतकं *फसलं !*

*मायेनं पदराखाली,* अाम्ही त्याला झाकलं
*खरच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं*

शाळंसाठी पोराच्या
नवं साल धरलं.

विकु म्हणते *अाई* त्याची
*गळ्यातिल डोरलं !*

शाळा शिकुन पोरगं
लय लय मोठं होईल,

*अाईच्या सपनाला*
*सुखाचं फुल* येईल !

सुखाचं सपान, डोळ्यातच सुकलं
*खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं*

*शाळंला पोरानं*
राम राम ठोकला,

*पुस्तकाचा* डिगारा
किलोवर *विकला !*

अाता *पोरगं हॅाटेलात*
काम करु लागलं,

*खंगलेल्या संसाराला*
धिर देवु लागलं !

अायुष्याच्या प्रवासात कोण काय शिकलं
*खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं*

*शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं*
_______________________
आजच्या *आठवी* पर्यंन्त *पुढच्या वर्गात ढकलणे*
 व नंतर पुढे मुलांची कशी परवड होऊन नुकसान होत
 हे विशद करणारी शिक्षण व्यवस्थेतील उणीव दर्शविनारी *सुंदर कविता.*

मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात!




KAHITARI SAPADLELE.....

वाचता-वाचता येणारी झोप ही सर्वोत्तम असते हे तर खरेच;
पण झोपच उडवणारे पुस्तक म्हणजेच उत्तम पुस्तक हेही तितकेच खरे!

गेल्या आठवड्यात मी हे पुस्तक पूर्ण केल्याच्या रात्री शांत झोपू
शकलो नाही. आणि तेव्हाच निश्चित केले की आपल्या वाचकांपर्यंत
विचार करणाऱ्या लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवायचे.

लेखकाचा आणि माझा पूर्वपरिचय नाही. मी पुस्तकातील पात्रांना भेटलेलो नाही. पण महानाट्य काय असू शकते आणि ते किती भयानक असू शकते याची केवळ कल्पना पुस्तक वाचल्यावर येते. लेखक विक्रम विनय भावे. एक संसारी मराठी हिंदू तरुण. एका चित्रपटगृहाबाहेरच्या झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल आरोपी. सध्या जामिनावर बाहेर.

कारागृहात असताना लेखकाचा अगदी जवळून सबंध येतो मालेगाव स्फोटासंदर्भात आरोपी असलेल्या हिंदू आणि मुस्लिम बंद्यांशी. लेखक हा त्यावेळी लेखक नसतो. सहबंदी असतो. त्याला लेखनाचा पूर्वानुभव असावा असे शैलीवरून वाटते पण तसा उल्लेख कोठे नाही. सहज गप्पा म्हणून विषय निघतात आणि लेखकासमोर एक प्रचंड मोठे महानाट्य उलगडत जाते. हिंदू आरोपी मेजर श्री. रमेश उपाध्याय, लेफ्टनंट कर्नल श्री. प्रसाद पुरोहित, श्री. समीर कुलकर्णी, श्री. राकेश धावडे, श्री. अजय राहिरकर, श्री. शाम साहू, श्री. शिवनारायण कलसंग्रा, श्री. जगदीश म्हात्रे आणि शंकराचार्य स्वामी यांच्याबरोबर एकाच अंडासेल मध्ये व्यतीत केलेला काळ अन् कालांतराने तिथे आलेले मुस्लिम आरोपी उदा. डॉ. फारूक इकबाल अहमद मगदूमी या सर्वांमुळे या नाट्याचे धागे जुळत जातात. एक अदृश्य चित्र स्पष्टपणे समोर येऊ लागते. कारागृहातून जामिनावर बाहेर पडल्यानंतर प्रस्तुत लेखकाला माहिती अधिकाराच्या अर्जांवर काही माहिती मिळते, आरोपींच्या वकिलांची भेट होते, जुने रेकॉर्ड्स चाळता येतात, अन्य व्यक्तिंना भेटता येते आणि मग परिश्रमपूर्वक या सर्व सामग्रीवर पुस्तकाची निर्मिती होते.

हे पुस्तक हे केवळ पुस्तक नाही, ती एक व्यथा आहे. अनाकलनीय वाटणारे सोपे करून सांगण्याची केलेली शर्थ आहे. पहिल्याच प्रकरणात लेखक लिखाणामागची भूमिका तर स्पष्ट करतोच पण हेही सांगतो की त्याने सत्याशी प्रतारणा न करता, ऐकीव माहितीपेक्षा कागदपत्रांवर अधिक भर देऊन निर्भीडपणे ते वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसऱ्या प्रकरणात मालेगाव प्रकरणातील आरोपींची भेट कशी झाली याचा उल्लेख करून एक आरोपी श्री. समीर कुलकर्णी यांनी कारागृह प्रशासनाकडे ‘रक्तदानाच्या परवानगीची मागणी’, ती धुडकावून लावल्यावर त्यांनी पत्राद्वारे उच्च न्यायालयात केलेली याचिका, मेजर रमेश उपाध्याय यांचे कारागृह प्रश्न सुधारण्यासाठीचे प्रयत्न यांची नोंद आहे.
तिसऱ्या प्रकरणापासून पुस्तक मनाची पकड घ्यायला लागते. यात पात्रपरिचय आला आहे. अगदी इथूनच आपण पुस्तकाशी समरस व्हायला सुरुवात होते. जणू पहिल्या रांगेत बसून पाहतोय असे. संस्कृतमधे एम.ए. केलेले सुधाकर चतुर्वेदी कारागृहातच या बंद्यांना कालिदासाचे मेघदूत रंगवून सांगत होते. लेखकाला हे समीकरण कळेना. हळव्या मनाचा, विद्वान, सुसंस्कृत माणूस अन् मानवतेला काळिमा फासणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या आरोपावरून तुरुंगात? म्हणून विक्रमजी सुधाकर चतुर्वेदींना विचारते झाले आणि पाचव्या प्रकरणात ए.टी.एस. ने कशाप्रकारे फसवून त्यांना ताब्यात घेतले याचा उहापोह आला आहे. कुणी बागडे नावाच्या अधिकाऱ्याने आणि त्यांच्या ४-५ धटिंगण सहकाऱ्यांनी पकडून सुधाकरजींना शिव्या देत, कानाखाली मारून जीपमध्ये कोंबले. पुन्हा शिव्या हासडत म्हणाले बॉम्बस्फोट करता काय? आता तुझ्या गांडीत बॉम्ब लावतो, सगळी आय-माय आठवेल तुला भडव्या.” हात-पाय बांधून लाथाबुक्क्यांनी तुडवत पोलीस स्टेशनात नेले. पुढची २ पाने हा अत्याचार वाचवत नाही अशाप्रकारचा आहे. हवे ते जबाब काढून घेण्यासाठी मारहाण, त्याचे प्रकार आणि मारणारे अधिकारी यांचा नावासकट उल्लेख आला आहे. कोरे कागद पुढ्यात ठेऊन बळजबरीने साक्ष द्यायला लावली, खोटे पंचनामे तयार केले, अंगावरचे सर्व कपडे फाडून टाकले या गोष्टी कपोलकल्पित वाटत नाहीत.


पुढे तर मुंबई ते भोपाळ हा विमानप्रवास कसा खोट्या नावाने म्हणजे सुधाकर चतुर्वेदीला ‘संग्रामसिंग’ दाखवून केला गेला. ते विमान ‘इंडिया बुल्स’ या खाजगी कंपनीचे सात आसनी विमान होते. भोपाळ ला सुधाकरजींना समीर कुलकर्णीला फोन करायला लावला. त्याला फसवून ताब्यात घेतले आणि परतीच्या प्रवासातसुद्धा ‘संग्रामसिंग’ ही खोटी नोंद करून तशी बनावट कागदपत्रे ए.टी.एस. च्या अधिकाऱ्यांनी सादर करून मुंबई गाठली. परतीला सुद्धा ‘इंडिया बुल्स’ कंपनीचे तेच सात आसनी विमान होते. ही सर्व माहिती ए.टी.एस. च्या त्या अधिकाऱ्यांच्या नावांसकट माहिती अधिकारात उघड झाली आहे. वास्तविक ह्यात खाजगी कंपनी कशी आली? कोणाच्या इशाऱ्यावर हे सर्व चालू होते? ‘इंडिया बुल्स’ आणि त्याच्या मालकांची/अधिकाऱ्यांची या सर्व प्रकारात चौकशी व्हायला नको का? ए.टी.एस. चे अधिकारी मिंधे झाले होते काय? त्यांना कुणाची भीती वाटत होती? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता? न्यायालयाने ‘इंडिया बुल्स’ आणि असे कर्तव्यच्युत अधिकारी यांजकडे खुलासा मागून सखोल चौकशीचे आदेश द्यायला हवेत की नको? ही सर्व प्रश्नांची जंत्री वाचकाच्या डोक्यात फिरत राहते..


चतुर्वेदींना अटक झालीये २०.११.२००८ रोजी..पण त्यांची ब्रेन मॅपिंग ची चाचणी मात्र ११.११.२००८ रोजी करण्यात आली. काय ही तत्परता! कोणाच्या इशाऱ्यावर?
चतुर्वेदींनी तर सरळच कोर्टाकडे केलेल्या याचिकेत म्हटले आहे की आपले अपहरण करून आपल्याकडून घराच्या किल्ल्या काढून घेण्यात आल्या आणि ए.टी.एस. चे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बागडे यांनी आर.डी.एक्स. मिश्रित माती तेथे टाकली आणि याच मातीचा पुढे पंचनामा करून बॉम्ब तिथेच बनवल्याचा सपशेल खोटा पुअरावा तयार करण्यात आला. बागडे यांची चौकशी कसून व्हायला नको का? इंडिया बुल्स चे विमान अटकेआधीच कसे वापरायला मिळते याचा खुलासा व्हायला नको का?


असे वेचक, अचूक आणि वाचकाच्या मनात रुतणारे १४ मुद्दे देऊन लेखक पुढे सरकतो. ७ व्या प्रकरणात मुस्लिम आरोपींच्या कथा-व्यथा आल्या आहेत. लेखक प्रकरणाची सुरुवात आपल्याशी निगडित खटल्यातील साक्षीदाराचे उदाहरण देऊन करतो. शरद बळीद या इसमाला पोलिसांनी साक्षीदार म्हणून उभा केले. त्याने हिंदू असल्याचे सांगितले. पण उलटतपासणीत त्याने बरेच आढेवेढे घेऊन मग ख्रिश्चन असल्याचे मान्य केले. शिवाय चर्चच्या आवारात आपण राहतो याचीही कबुली त्याने दिली. ख्रिस्ती धर्मांतरणाला विरोध करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्याच्या भूमिकेतून त्यांना गोवणे हा शरद बळीद चा हेतू असावा हा लेखकाने दिलेला तर्क नाकारता येत नाही. मा. न्यायालयाने या शरद ची साक्ष रद्दबातल ठरवली. पुढे लेखक कोल्हापूरला गेल्यावर त्याच्या लक्षात आले की शरद बळीद हा पोलिसांचा आवडता साक्षीदार आहे. कित्येक प्रकरणांत त्याने साक्षीदाराची आणि पंचाची निर्णायक भूमिका निभावली आहे आणि ते गरीब बिचारे आरोपी अशा पुराव्यांच्या आधारे आज तुरुंगवास भोगत आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम आरोपींना सुद्धा फसवून गोवल्याचे लेखक विविध तर्कांच्या आणि माहितीच्या आधारे निर्भेळपणे स्पष्ट करतो. मुस्लिम आरोपींची कारागृहातील वागणूक, त्यांची धर्मनिष्ठ आणि प्रेमळ वागणूक, डॉ. फारूक इकबाल चे कैद्यांना वाटणारे आधाराचे स्थान, आणि स्वतः मिळवलेली कागदपत्रे, कायद्याची माहिती, सहाय्यभूत न्यायनिवाडे उदार मनाने आणि मोकळेपणाने हिंदू सहबंद्यांना देणे याचाही उल्लेख आला आहे. मालेगाव प्रकरणात गोवले गेलेले हे मुस्लिम आरोपी आपले सहबंदी हिंदू आरोपी न्यायालयातून पुन्हा आल्यावर उत्कंठेने विचारत असत की आज काय काय झाले.. माझ्यामते हे मुस्लिम आरोपी आज जामिनावर बाहेर आहेत.


पुढे कर्नल श्री. पुरोहित, बेपत्ता दिलीप पाटीदार चे गूढ, मेजर श्री. रमेश उपाध्याय यांच्यावरील आरोप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील आरोप, साध्वी प्रज्ञासिंग अशा अनेक पैलूंचा धांडोळा लेखकाने घेतला आहे.
साध्वीवरील पोलिसी अत्याचारांची परिसीमा तर रक्त खवळून टाकते. तिला आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा न पुरविण्याबरोबरच तिला संभोगाच्या अश्लील चित्रफिती दाखवण्यात आल्या आणि नृशंस मारझोड करण्यात आली या बातम्या केवळ ऐकीव नसाव्यात. साध्वी प्रज्ञासिंगला अजूनही जामीन मिळू नये आणि कारागृहात पिचत राहण्याची सत्वपरीक्षा तिला द्यावी लागावी यापरतें अधिक दुर्दैव ते कोणते! साध्वीवर कारागृहातीलाच एका मुस्लिम महिलेने केलेल्या हल्ल्याची दखल घेतली जात नाही. पण सिमीच्या काही सदस्यांनी भारतविरोधी घोषणा देऊन एका तुरुंग कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याबाबत तुरुंगाधिकारी स्वाती साठे यांनी कडक पावले उचलताच काही निवडक अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाने बोलावून घेऊन सज्जड दम भरला आणि ‘स्वाती साठे यांना अडकवा’ असे सांगितल्याची कुजबूज लेखकाच्या कानावर येत असे. याच स्वाती साठेंवर बिलाल नाझकी या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ठपका ठेऊन खटला चालवायला दिला आणि साठेंविरुद्ध निकाल दिला. हे निकालपत्र सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढले. स्वाती साठे यांच्यावर दोषारोप करणाऱ्या पाकिस्तानवादी कैद्यांची बाजू श्री. नाझकी यांनी का घेतली असावी? नाझकी यांनी काश्मिरात लढणाऱ्या भारतीय जवानांविरुद्ध गरळ ओकण्याचे कारण काय? श्री. नाझकी यांचे धोरण कोणाला धार्जिणे आहे? असे प्रश्न लेखक उपस्थित करतो. याची सखोल चौकशी व्हायला हवी.
लेखक साहित्यिक ताकदीने विषयाला भिडतो – “चतुर्वेदी यांनी केलेली याचिका व सैन्यात असलेली अस्वस्थता, यांमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेला कोंबडे झाकून सूर्याचे उगवणे थांबविण्याच्या आपल्या सत्यद्रोही खटाटोपातील व्यर्थता एक दिवस निश्चितपणे जाणवेल.”


या पुस्तकात असे अनेक पैलू आले आहेत ज्या सर्वाचीच नोंद मी इथे करणार नाही. पण हे पुस्तक सर्व विचार करणाऱ्या, चिंता करणाऱ्या सुजाण नागरिकांनी वाचायला हवे. शरद पवारांनी पुण्यातील भाषणात दहशतवादाचे उघडपणे केलेले समर्थन, इफ्तार पार्ट्या झोडणारे आपले नेते, हज अनुदान बंद करा असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही नवीन हज हाऊसेस बांधणारे सरकार, मदरशांवर कोट्यवधींची खैरात उधळणारे दळभद्री राज्यकारभारी, भाषणांनी हिंदू आणि मुस्लिम जनतेला चिथावणी देणारे हिंदू आणि मुस्लिम ‘स्वयंघोषित’ नेते हे असे सर्वजण अजूनही अदृश्य राहू शकतील? अस्वस्थ करणारे प्रश्न...