Sunday, 20 August 2017

सकल विद्या प्रवीण सरफोजी राजे भोसले

महाराष्ट्रापासून कोसो दूर तंजावरमध्ये गेली कित्येक शतके मराठी संस्कृती आकार घेत राहिली, ही नि:संशय विस्मयचकित करणारी बाब. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठय़ांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले.
तंजावर म्हणताच आपणास आठवतात ते व्यंकोजीराजे, सरफोजीराजे दुसरे, सरस्वती महाल ग्रंथालय, मराठी नाटक, भरतनाटय़म् आणि आणखी बरंच काही. शिवाजीराजांचे सावत्रबंधू व्यंकोजीराजे यांनी कावेरीच्या खोऱ्यात तंजावरी मराठी राज्य स्थापन केले. या राज्याचा पुढे फारसा विस्तार झाला नाही, परंतु इ. स. १८५६ पर्यंत- म्हणजे सुमारे १७५ वर्षे तंजावरचे राज्य अस्तित्व राखून होते. तंजावरमध्ये मराठी संस्कृतीचा प्रवाह  वाहता ठेवण्याचे श्रेय तंजावरच्या या राज्यकर्त्यांना जाते.
तंजावरच्या मराठय़ांचा दरबार विद्वान आणि कलावंतांनी गजबजलेला होता. तंजावरचे राज्यकर्ते स्वत: विद्वान व कलासक्त होते. परिणामी तिथे मराठी वाङ्मय, नाटक, नृत्य, कला, संगीत आदींची विस्मयकारक प्रगती झाली. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठय़ांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
तंजावरला पूर्वेचे व्हेनिस किंवा दक्षिणेचे एडन म्हणतात. ही एक यक्षनगरी होती. कावेरीचे सुपीक खोरे, आल्हाददायक हवा आणि उंचच उंच नारळांची झाडे असलेले तंजावर हे संस्थान फारच लहान होते. भारताच्या नकाशात तर ते टिपूसभरच भासे. परंतु या चिमुकल्या संस्थानामुळे महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाला प्रतिभाशाली इतिहासाची जोड लाभली. तंजावर संस्थानाला प्राचीन काळापासून उच्च अभिरुचीचा वारसा लाभला होता. तंजावरच्या मराठय़ांनी पूर्वसुरींपासून चालत आलेल्या या वारशाला मराठी संस्कृती व कलेची जोड दिली.
इ. स. १७९८ मध्ये सरफोजीराजांचे राज्यारोहण झाले. परंतु राज्याची सर्व सूत्रे इंग्रजांकडे होती. सरफोजीराजांची एकूण कारकीर्द ३४ वर्षांची! या राजाने कला, संगीत, नृत्य, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारे, त्यांनीच नावारूपाला आणलेले सरस्वती महाल ग्रंथालय आजही दिमाखात उभे आहे. पर्यटकांचेच नव्हे, तर पौर्वात्य व पाश्चात्य अभ्यासकांचे केंद्र असलेले हे सरस्वती महाल ग्रंथालय व मराठय़ांचा इतिहास सांगणारा बृहदीश्वराच्या मंदिरातील कोरीव लेख हे राजांचे खरेखुरे स्मारक होय.
सरफोजीराजांचा जन्म २४ सप्टेंबर १७७७ रोजी झाला. तंजावरचे राजे तुळजेन्द्रराजे दुसरे यांना अपत्य नसल्याने २३ जानेवारी १७८७ रोजी त्यांनी सरफोजीराजांना दत्तक घेतले. तुळजेन्द्रराजांचे बंधू अमरसिंह यांनी सत्तेच्या राजकारणात सरफोजीराजांना राजगादीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. परंतु डच मिशनरी शॉर्झ यांच्या प्रयत्नांनी त्यांचे चेन्नई येथील मिशनरी शाळेत शिक्षण झाले. तसेच त्यांना संस्कृत व मराठी शिकवण्यासाठी त्या, त्या भाषेच्या पंडितांची नेमणूक करण्यात आली होती. सरफोजीराजांची आई, गुरू शॉर्झ व इंग्रजांच्या मदतीने सरफोजीराजे गादीवर बसले. तथापि राज्याची सर्व व्यवस्था इंग्रजांकडेच होती. राजांची एकंदर कारकीर्द शांततेत गेली. त्यामुळेच त्यांनी आपली कारकीर्द शारदादेवीच्या सेवेत रुजू केली.
उंचपुरे, गोरे, झुबकेदार मिशा असलेल्या सरफोजीराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संपन्न होते. गुरू शॉर्झ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले. सरफोजीराजे ज्ञानी, ज्ञानप्रेमी, उदार, सुसंस्कृत व सर्वगुणसंपन्न होते. विद्याप्रसार, ग्रंथसंग्रह व विद्वानांची संगत यातच त्यांनी आपली सर्व हयात व्यतित केली. चित्रकला, बागकाम, नाणेसंग्रह, ग्रंथसंग्रह, रथांच्या शर्यती, शिकार, बैलांच्या झुंजी या सगळ्याची त्यांना आवड होती. तसेच संगीत, नृत्य, नाटय़ व विज्ञान यात त्यांना विशेष रुची होती. सरफोजीराजे खऱ्या अर्थाने भाषापंडित होते. मातृभाषेव्यतिरिक्त त्यांना संस्कृत, तामिळ, तेलगू, इंग्रजी, जर्मन, इटालियन, फ्रेंच, लॅटिन, अरेबिक इत्यादी भाषाही अवगत होत्या. राजे अतिशय कल्पक बुद्धिमत्तेचे व नावीन्याचे चाहते होते. पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या उदार, व्यासंगी व कलासक्त राजाने विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करून आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा तंजावरच्या इतिहासावर उमटविला. वाङ्मय, नृत्य व संगीत यांची अजोड सेवा राजांनी केली.
तामिळ, मराठी, तेलगु भाषेतून विपुल वाङ्मयीन रचना सरफोजीराजांनी स्वत: केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही करून घेतल्या. गोविंदकवी, विरुपाक्षकवी, गंगाधरकवी, अंबाजी पंडित, अवधूतकवी हे त्यांचे दरबारी होते. सरफोजींच्या आश्रयामुळे व आज्ञेमुळे आपण ग्रंथरचना करू शकलो, अशी कृतज्ञता  गोविंदकवी व विरुपाक्षकवी यांनी आपल्या ग्रंथांतून प्रकट केली आहे. ‘उमा-शंकरसंवाद निरूपण’, ‘श्री हरिलीला निरूपण’ ही आख्यानपर प्रकरणे, स्फुटपदे आणि कितीतरी साहित्य गोविंदकवी यांच्या नावावर पाहावयास मिळते. श्रावणमाहात्म्य, आदिकैलासमाहात्म्य आणि इतर अनेक पौराणिक विषयांवर विरुपाक्षकवीने रचना करून, ‘शरभेंद्रने (सरफोजी) सुरू केलेल्या शाळेत शिकून आपण ही काव्यरचना केली,’ अशी विनम्र कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आढळते.
सरफोजीराजांनी पुराणकथा रचल्या. या रचना पद, श्लोक, ओव्या, आर्या, दिंडी, सवाई, छंद, लावणी, दोहा, गोपीगीत इत्यादी प्रबंधांत केल्या आहेत. या रचना नृत्य, नाटय़ व संगीतमय आहेत. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा मराठय़ांचा इतिहास सांगणारा आशिया खंडातील सर्वात मोठा मराठी भाषेतील कोरीव लेख बृहदीश्वराच्या मंदिरात कोरून मराठय़ांचा इतिहास त्यांनी अजरामर केला. वाङ्मयाबरोबरच नाटय़कलेचीही सेवा सरफोजीराजांनी केली.
‘गंगाविश्वेश्वर परिणय’, ‘मोहिनी-महेश परिणय’, ‘देवेंद्र कोरवन्झी’, ‘सुभद्रा कल्याण’ आदी अनेक नाटके राजांच्या नावावर आहेत. ‘सुभद्रा कल्याण’ हे नाटक ताडपत्रावर तेलगु लिपीत लिहिलेले आहे. ही नाटकं त्याकाळी सादरही केली जात. ती पाहण्यास विद्वान व रसिक येत असत. ही  नाटकं तीन अंकी, चार अंकी वा पाच अंकी आहेत. त्याकाळी नाटय़तंत्रही चांगलेच विकसित झाले होते. या नाटकांतून स्थळ व काळाच्या सूचना दिलेल्या दिसतात. तसेच दोन अंकांतील घटना नाटय़ांतर्गत नाटक दाखवून सादर केलेल्या आहेत. या नाटकांतून नृत्य व गीते आहेतच; परंतु पद्यापेक्षा गद्याचा भाग अधिक असल्याने ही नाटकं वास्तवदर्शी वाटतात. ‘देवेंद्र कोरवन्झी’ हे वैशिष्टय़पूर्ण नाटक जगाचा भूगोल सांगण्यासाठी लिहिले गेले आहे. या नाटकात सूर्यमालेची माहिती, दिवस-रात्र कशी होते, पृथ्वीवरील पाचही खंडांची माहिती, पृथ्वीची गती इत्यादी गोष्टी आहेत. नाटय़ाबरोबरच संगीत व नृत्याची जाणही राजांना उत्तम होती.
सरफोजीराजांचा काळ हा संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्या दरबारात ३६० संगीत-तज्ज्ञ होते. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार  हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. आजही सहा जानेवारीला त्यागराजाच्या स्मरणार्थ तिरुवारुर येथे संगीत मैफल आयोजित केली जाते. त्यांच्या दरबारात पाश्चिमात्य संगीतकारही होते. तंजोर बँडची स्थापना त्यांनी केली. इंग्लिश वाद्यवृंदासाठी हिंदुस्थानी राग व बंदिशी त्यांनी इंग्लिश नोटेशन पद्धतीत बसविली. यावरून त्यांचे कल्पनाचातुर्य दिसते. हेच कल्पनाचातुर्य त्यांच्या नृत्यरचनांमध्येही आढळते. अठरा रचनांचे गुच्छ (निरूपण) करून त्या अठरा रागांमधून एकच कथासूत्र त्यांनी गुंफलेले दिसते.



नृत्य, नाटय़, संगीत यांचा विकास होत असताना शिक्षण व ग्रंथालयांकडेही त्यांनी विशेष लक्ष पुरवले. देशी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा सरफोजीराजांनी सुरू केल्या. तंजावरपासून वीस किलोमीटर अंतरावर मायावरम् येथे त्यांनी इंग्रजी शाळा सुरू केली. ख्रिश्चन शाळांना छत्रम्चाच भाग समजून आर्थिक साहाय्य दिले जात असे. चर्चच्या शेजारी शिक्षकांच्या राहण्याची सोय होती. त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती शिक्षक म्हणून नियुक्त केल्या जात. स्त्री-शिक्षक नेमून मुलींसाठी शाळा सुरू करून त्यांनी समाजक्रांतीच्या दिशेने फार मोठे पाऊल उचलले. भूगोल व इतिहासाच्या पाठय़पुस्तकांचे मराठी व तामिळ भाषेत भाषांतर केले. विज्ञान, वेदशास्त्र, खगोलशास्त्र, संगीत, शिल्पकला अशा विविध विषयांचे अध्यापन त्यांत केले जात असे. लोकांना हसत-खेळत भूगोलाचे ज्ञान देण्यासाठी ‘देवेंद्र कोरवन्झी’ हे वैशिष्टय़पूर्ण नाटकही त्यांनी लिहिल्याचे आधी सांगितलेच आहे.
शिक्षणासाठी ग्रंथालयांची आवश्यकता ओळखून आणि सरफोजीराजांना ग्रंथवाचन आणि ग्रंथसंग्रह यांच्या असलेल्या आवडीतून तंजावरचे प्रसिद्ध ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ आकाराला आले. मराठी मोडीतील असंख्य हस्तलिखितांचा संग्रह, तेलगु, तमिळ, संस्कृत व इंग्रजी भाषेतील ग्रंथ, ताडपत्रांवरचे संग्रह हे या ग्रंथालयाचे खास वैशिष्टय़ आहे. सरफोजीराजांना यात्रेची खूप आवड होती. त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी देताना त्या, त्या ठिकाणच्या विद्याकेंद्रांनाही भेटी देऊन तेथून ग्रंथ खरेदी करून आणले. इतकेच नव्हे तर त्या ग्रंथांचे प्रतलेखन करण्यासाठी त्या, त्या भाषेतील पंडितांची नियुक्ती केली. एकदा तर त्यांनी दूरच्या प्रदेशातून आलेल्या गृहस्थांकडून हस्तलिखिते विकत घेण्यासाठी आवश्यक निधीच्या अभावामुळे आपल्या गळ्यातील रत्नहारच त्याला देऊन ती हस्तलिखिते ताब्यात घेतली. स्वाभाविकपणेच या ग्रंथालयास ‘राजा सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालय’ हे नाव अत्यंत सार्थ ठरले आहे. इतिहास, संगीत, वैद्यकशास्त्र, वाङ्मय अशा विविध विषयांतील संशोधकांसाठी हे ग्रंथालय तीर्थक्षेत्रच आहे. या ग्रंथालयाच्या रूपाने सरफोजीराजांनी मिळवलेले हे अक्षरसाम्राज्य अक्षय टिकणारे आहे.
या आवडींबरोबरच सरफोजीराजांना वैद्यकशास्त्राचीही आवड होती. सरफोजीराजांनी वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी ‘धन्वंतरी महाल’ची स्थापना केली. मानवी रुग्ण व प्राणी या दोहोंच्या औषधोपचाराची सोय व संशोधन या महालात चालत असे. आधुनिक वैद्यकशास्त्र, युनानी, आयुर्वेद या तिन्ही शाखांचे संशोधन येथे होत असे. विविध औषधे व जडीबुटी यांचे उपयोग सांगणारे अठरा खंड सरस्वती महाल ग्रंथालयात उपलब्ध आहेत. रुग्णांवर केलेल्या उपचारांसंबंधीची कागदपत्रे (केस पेपर) या ग्रंथालयात जतन करून ठेवलेली आहेत. धन्वंतरी महालात रुग्णाला सांगितलेल्या उपचारांसंबंधीची एक कविता उपलब्ध आहे. त्या कवितेला ‘शरभेंद्र वैद्य मुरईगल’ असे म्हणतात. यात विविध आजारांवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती आहे.
सरफोजीराजांना नेत्रचिकित्सेत रस होता. ते स्वत: नेत्रचिकित्सा करून डोळ्यांवर शस्त्रक्रिया करीत. राजांनी केलेल्या नेत्रचिकित्सेसंबंधीची कागदपत्रेही उपलब्ध आहेत. त्यात अनेक आकृत्या आहेत. त्यातील काही नोंदी मोडीत, तर काही इंग्रजीत आहेत. राजे स्वत: मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत पारंगत होते. रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी ते आयुर्वेद, युनानी व इंग्रजी औषधांचा उपयोग करीत असत. गर्भवती स्त्री व तिचे आरोग्य, मुलांचे आरोग्य, बालरोग, नेत्ररोग, वातरोग, कावीळ, हगवण, दमा, सर्दीपडसे, अ‍ॅनिमिया, क्षयरोग, कर्करोग, इत्यादी रोगांची माहिती ‘शरभेंद्र वैद्य मुरईगल’ या काव्यग्रंथात आढळते. धन्वंतरी महालात युरोपीय व भारतीय डॉक्टरांची नियुक्ती केली जात असे. नवीन औषधांचा उपयोग करण्यापूर्वी त्या औषधांची चाचणी केली जात असे. औषधे तयार करण्याची पद्धती, त्या औषधांची यादी, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासावर औषधे ‘स्त्रियांचे दोषास्पद’ या हस्तलिखितात आहेत. ‘अस्थिविद्या’ किंवा ‘अस्थिवर्णन’ हा द्वैभाषिक कोश स्वत: सरफोजीराजांच्या हस्ताक्षरात आहे. हा कोश राजांनी स्वत:च्या माहितीसाठी केला असावा. मुख्य नोंद इंग्रजी भाषेत व तिचा अर्थ मोडी लिपीत दिला आहे.
राजांनी पशुवैद्यकाचा अभ्यास करून पशुवैद्यक विभाग धन्वंतरी महालात सुरू केला. सरफोजीराजे अश्वपरीक्षेतही पारंगत होते. कोणता घोडा जय मिळवून देणार व कोणता नाही, घोडय़ाची शुभ व अशुभ चिन्हे, अश्वाची गती, उंची, तसेच अश्वांच्या आयुष्याविषयीचा राजांचा अभ्यास दांडगा होता. यातूनच त्यांच्या ‘गजशास्त्र प्रबंध’, ‘गजशास्त्र सार’ या ग्रंथांची निर्मिती झाली. राजांनी पक्षीजगताचा अभ्यासही केल्याचे आढळते. पक्षीलक्षण व चिकित्सा यांसंबंधीचे ग्रंथ या ग्रंथालयात आहेत. हे सर्व ग्रंथ त्या, त्या विषयातील तज्ज्ञांकडून माहिती घेऊन लिहून घेतले असावेत. या त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याबरोबरच राजे वैयक्तिक आयुष्यात अत्यंत धार्मिक व जनकल्याणकारी होते.
राजे वैयक्तिक आयुष्यात धार्मिक व धर्मसहिष्णु होते. त्यांनी हिंदू धर्माबरोबरच ख्रिश्चन धर्माचाही आदर केला. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक यज्ञयाग केले. काशी, गया, प्रयाग या त्रिस्थळी यात्रा केल्या. तंजावर-रामेश्वरम् मार्गावर तंजावरपासून चौदा मैलांवर मुक्तंबापूर छत्रम् उभारले. या छत्रम्ला लागून शाळा होती. त्यात तमीळ, तेलगु व इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जात असे. या छत्रम्ला जोडून आरोग्यशाळा होती. एखादा यात्रेकरू तेथे वास्तव्याला असताना आजारी पडल्यास त्याला बरे वाटेपर्यंत त्याच्यावर सरकारी औषध-कोठीतून मोफत औषधोपचाराची व्यवस्था होती. यात्रेकरूंपैकी एखादी स्त्री गर्भवती असल्यास तिच्याकडे विशेष लक्ष दिले जात असे. योगायोगाने ती स्त्री तिथेच प्रसूत झाल्यास तिच्याकडे व बाळाकडे तीन महिने लक्ष पुरविले जात असे.
तंजावरातील पाण्याची अडचण लक्षात घेऊन शिवगंगा तलावातून पिण्याचे पाणी जलसूत्राद्वारे घरोघरी पोहोचविले जात असे. स्वच्छतेच्या दृष्टीने भुयारी गटारांची बांधणी केली गेली होती. त्यांच्या कारकीर्दीत अनेक विहिरी व तलाव बांधले गेले. राजे वारंवार राज्यात दौरे करून रयतेची काळजी घेत असत. त्यांनी मनोरला जहाजांसाठी गोदी व बंदर बांधले. तंजावरपासून ५० कि. मी. अंतरावर हवामान खात्याचे केंद्र त्यांनी उभारले; जे व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त होते. याशिवाय त्यांच्या कार्यकाळात नौकानयन ग्रंथालय तसेच नौकानयन भांडार उभारून नौकानयनाचे तंत्र विकसित केले गेले.
तंजावरच्या कर्तृत्वशाली राजपरंपरेतील अत्यंत लोकप्रिय राजे सरफोजी यांनी आपली कारकीर्द शारदेच्या सेवेत तसेच जनकल्याणार्थ व्यतीत केली. ‘पेरियकोविल’ (मोठे देऊळ)च्या प्रांगणातील भिंतीवर मराठी रियासत कोरून त्यांनी दगडांना बोलके केले! राजांच्या या सर्व कर्तृत्वातून कल्पकता व दूरदृष्टी जाणवते. या बहुआयामी नृपतीची कीर्ती हिंदुस्थानपुरतीच सीमित नव्हती, तर ती इंग्लंडमध्येही पोहोचली होती. इंग्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीने सरफोजीराजांची विद्वत्ता व संशोधनवृत्तीचे अवलोकन करून त्यांना आपल्या संस्थेचे सन्मान्य सभासदत्व बहाल केले. राजांचे विचार अतिशय उदार आणि उदात्त होते. त्यांनी अनेक अज्ञानी व धर्मभोळ्या समजुती बाजूस सारून राज्यात अनेक सामाजिक व शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. काळाची पावले ओळखून आधुनिकतेची कास धरली. अशा या द्रष्टय़ा राजाच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण चिरकाल लोकांच्या मनात कायम न राहते तरच नवल.

Tuesday, 1 August 2017

क्षेत्रीय पक्ष आणि समज गैरसमज .......



काल महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या नामी पत्रकार असलेल्या एका महाशयांचा ब्लोग वाचत होतो. त्यात एक लेख होता. तमिळनाडूच्या राजकारणातल्या जयललीतांच्या नंतरचे बदल फार सुखावह आहेत असे काहीतरी त्यांना सुचवायचे होते. 


एकूणच काय तर आज तामिळनाडू मध्ये जयललिता नाहीत त्यामुळे त्यांचा पक्ष विभागला गेला आणि त्याचे अस्तित्व ओसरत चाललेय.. तसेच द्रमुक चे मुख्य करुणानिधी यांनी पंच्यान्नव वर्षे पार केल्यामुळे ते म्हातारे होऊन बसलेत आणि पक्षाची सूत्रे स्टालिन ला दिल्यामुळे दुसरा मुलगा दयानिधी मारन वेगळा गट  करून बसलाय.....


.. म्हणूनच आज तामिळनाडू मधील दोन प्रमुख पक्ष ज्यांनी सर्वदूर तिथले राजकारण ६० च्या दशकापासून स्वाहातात ठेवले आणि आपल्या प्रांतीय अस्मितेचे रक्षण केले ते दोन्ही पक्ष  आज विनाहाच्या भयाण सावटाखाली सापडलेले आहेत...

यामुळेच आजवर ५ दशक पासून  कधीही सत्ता न उपभोगलेल्या  कॉंग्रेस आणि देशावर भगवा फादक्व्ण्याच्या संघ भाजप च्या नेत्यांना तामिल्नादूचे राजकारण खुणावू लागलेय ... त्यासाठी भाजपने रजनीकांत या मराठी पण तामिळी जनतेच्या गळ्यातल्या ताईत  असलेल्या अभिनेत्याला साकडे घातलेय.तर  कॉंग्रेस अन्य मार्ग चाचपडून पाहतीय... 



यावर संघ भाजप वाल्या आणि राज्यांच्या बियोंड भारत आहे असे मानणाऱ्या काही पत्रकारांना असे 
वाटते कि आता तामिळनाडू मुख्य किंवा राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याच्या सुवर्ण वाटेवर आगेकूच करणार आहे... 

बस हेच वाक्य मला खटकते.. आजवर खुपदा हिंदी किंवा राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर खूप चर्चांमध्ये ऐकलय कि क्षेत्रीय दलांमुळे राष्ट्रहितास धोका आहेत क्षेत्रीय पक्ष राष्ट्राला म्हणजे केंद्र सरकारला मोठे निर्णय घेऊ देत नाहीत ..वगरे वगरे....  मला या गोष्टींचाच राग येतो.... 



राष्ट्र हे विविध राज्यांपासून बनले आहे..राज्यांचे हित ते राष्ट्राचे हित...एखादा निर्णय जर राज्यांसाठी घातक असेल तर तोः देशासाठी फायद्याचा कसा ठरेल..?? 

नेहमी उदाहरण दिले जाते राजीव गांधी सरकारचे आणि श्रीलंका संबंधाचे....
अर्थात राजीव गांधींनी तामिळी जनमानस समजून घेतले असते त्यांच्यावरचे वर्षानुवर्षाचे अत्याचार समजून घेतले असते तर कदाचित  त्यांचा मृत्यू नसता झाला....

 तमिळ राष्ट्रवाद नावाची संकल्पना आणि त्याला जनतेतून मिळणारे समर्थन या गोष्टी जन्मालाच आल्या नसत्या जर तामिळींच्या हत्या आणि अत्याचार जे श्रीलंकेत आणि तामिळनाडू झाले ते झाले नसते तर... एखाद्या राज्याला असुरक्षित किंवा आपले अस्तित्व कोणी साम्पाव्तेय असे केव्हा वाटते ?? जेव्हा डोळ्यादेखत अत्याहार होतात्तेव्हा यासठी ४०० वर्षापसून तामिळी जनतेच्या मनात ब्रिटीश आणि बहुजन वाद्यांनी भरलेले विष आणि आधीची भटवादी परंपरांची गुलामी याचा अभ्यास करायला हवा... तेव्हाच समजेल...आजही हजारो तामिळी मासेमार पकडून नेतो श्रीलंका पण एवढ्याशा देशाला आपला एवढा मोठा भारत नमवू शकला नाही.. तामिळी जनतेच्या समस्या समजल्या गेल्या नाही म्हणून प्रांतीयता वाढतीय....




शिवाय भाजप न कॉंग्रेस अनेक राज्यात पसरलेले पक्ष आहे ......

म्हणून ते राष्ट्रीय आहेत आणि इतर सर्व पक्ष राष्ट्रीय नाहीत...

 म्हणजे राष्ट्रवादी नाहीत असा अर्थ कोणीच काढू नये.....


..उलट दक्षिण भारतीयांचे अस्तित्व भाषा विकास आदी गोष्टी

 त्यांच्या प्रांतीय अस्मितेवारच्या प्रेमामुळेच टिकून आहे नाहीतर

 महाराष्ट्राचे आणि देशाचे हिंदु राष्ट्र  होण्याआधी  हिंदी राष्ट्र

 होतेय तेही लाखोंच्या झुंडी घुसल्यामुळे.... 





प्रदेहिक पक्षांमुळे कोणतेही ......

नुकसान राष्ट्रीय राजकारणाला नाही हा फक्त बागुलबुवा आहे...


 तामिळी जनता आजवर काय मुख्य प्रवाहात नव्हती ?

आपल्या लोकांख्येच्या ४ टक्के जास्त जीडीपी ते राज्य देशाला सातत्याने देताय... तुमचा राष्ट्रवादी झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेश किती देतो? अथवा आजवर कॉंग्रेस व भाजप ची सत्ता असलेले राज्य किती देतायत?? याचाही अभ्यास असू द्या?? 




मला तर असे वाटते कि क्षत्रिय पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि समर्थपणे चालवून दाखवावे ... आणि नाही असे झाले तरी .. क्षेत्रीय पक्ष संपून जावे हि मानसिकता फार धोकादायक आहे.... आज महारष्ट्रात शिवसेनेचं व मनसेचं सरकार असत तर आपली लोकसंख्या रोजगार आणि कित्येक गोष्टी शाबूत असत्या ..... भाजप हा भैय्या लोकांची हिते आणि मते जपणार पक्ष झालाय .... राष्ट्रवाद हा राज्याच्या अस्मितेपेक्षा काय वेगळा असतो...??



 राज्ये मिळूनच राष्ट्र बनते... कुठलेही राज्य टोकाची भूमिका तेहाच घेते जेव्हा त्याला त्याचे अस्तित्व म्पाव्ण्याची भीती दिसते.... असो.....   


किमान दक्षिण भारतीय लोकांचे आणि भाषांचे अस्तित्व टिकवून ठेवायला मनसे शिवसेना द्रमुक अण्णाद्रमुक सारखे पख असायलाच हवे.....  कॉंग्रेस राहत्रीय पक्ष असूनही सर्वात जास्त राष्ट्रविरोधी काम याच पक्षाने केले.... बिजद सेना यांचे राष्ट्रद्रोही काम काहीही नाही तरीही आम्ही प्रांतीय क्षत्रप बदनाम  आहोत ,,... एकंदरच काय तर ... छोट्या पक्षांचे  अस्तित्व असावे ....















Monday, 31 July 2017

बिहारमधील निती(ना)श आणि भक्तांचा उतावीळपणा .....




गेल्या आठवड्यात देशाच्या आणि विशेषतः बिहारच्या राजकारणानी फार दूरगामी परिणाम असणारे बदल पाहिले... बिहारचा दहावी नापास उपमुख्यमंत्री म्हणजे लालू यादवचा पोट्टा तेजस्वी यादव याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने तपास सुरु केल्यामुळे बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण बरेच डोके वर काढून होते......


 त्यातल्या त्यात यामुळे नितीश सरकारची प्रतिमा मलीन होत होती.... दोन वेळा नितीश कुमारांनी तेज्शिवी ला बोलावून एक्स्प्लेन करायला भरपूर वेळ दिला..पण तो काही आपले निर्दोषत्व सिद्ध करू शकला नाही.. तेज्शिवी अशिव जाहला.. मग नितीश ने त्यांना राजीनामा द्यायला लावला ..... 


पण ८० आमदार असल्याचा माज आलेला लालू यादव व त्याच कार्टा काही बधले नाही..... मग नितीश कुमार यांनी स्वतःच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा  देऊन टाकला व अवघ्या काही तासात भाजप च्या समर्थनावर स्वतः मुख्यमंत्री झाले ... काही तासातच होत्याच नव्हत झाल.....




Image result for bihar backward state


.

मोदींची हि खेळी खूपच बुद्धिमत्तेच आणि यशस्वीतेच काम आहे असे सर्व भक्तांना वाटू लागले... भक्ती आंधळी असते हे अगदी खरे ..याचा प्रत्यय येतोच,... फेसबुकवर  तर एका मित्रांनी लिहिले कि बिहारच्या जनतेचे अभिनंदन..विकासाला निवडून दिल्याबद्दल...अश्या अनेक पोस्त वाचल्या..आणि भक्तांची आणि त्यांच्या बुद्धीची कीव  आली..


... मुळात भाजप म्हणजे विकास हे काही लोक मानायला लागले आहे...यापेक्षा मूर्ख पना अजून काहीही नाही...गेली १२ वर्ष नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत ...यात त्यांनी ६ वेळा म्हणजे दर एक वर्षा आड राजीनामा देऊन शपथ घेण्याचा अनैतिक उद्योग केलाय...राहिला प्रश्न विकासाचा तर फक्त गुंडागर्दी आणि घोटाळे कमी झाले संपले नाही..आणि रोजगाराच काय????? तिथे आजन्म बोंबाबोंब आहे या बिहारची ती याच बोहार्या राजकारण्यांमुळे..... 




Image result for bihar backward state






 गेल्या १५ वर्षात लाखोंच्या झुंडी मुंबई आणि इतर ठिकाणी कायमच्या येत आहेत... कायम आपल राज्य सोडून इथे लुबाडायला लोक येत आहेत.... सर्वात जात स्थलांतर या नितीश्च्या काळात झाल...असा कोणता विकास झाला राज्याचा ???? 

 काही आकडे वर आले..... बस एवढेच... इशरत जहा नावच्या मोदींना मारायला आलेल्या आतंक वादि  फिदायीन ला हे बिहार्की बेटी म्हणायचे.. तसेच इंडिअन मुजाहिदीन च्या संस्थ्प्काला बिहारमध्ये पकडण्यासाठी महाराष्ट्रीय पोलीसदल आणि एटीएस बिहारला गेली तर या नीतिश सरकारने  या जहाल आतंकवाद्यांना फक्त मुस्लीम मतांसाठी त्यांना पकडू दिले नाही...


 मधुबनी आणि आरा मोड्यूल चा आतंकवाद या भडव्या पुरोगामी संजद च्या सरकार मधेच जन्मला... गांधी मैदनावर मोदीनच्या सभेत स्फोट झाला तोसुद्धा नितीश सरकारच्या समर्थन असल्यामुळेच झाला ....... 


राहिला प्रश्न बिहारच्या बेटीचा तर बिहार्यांनी पोसू शकता येईल एवढीच पिल्ले जन्माला घालावी...महाराष्ट्राच्या  भरोशावर पशुन्सारखे काम करू नये......मुंबई वापरून अहमदाबादला जाण्यापेक्षा सरळ बिहार मधूनच जावे .....




 बिहारचे क्षेत्रफळ छत्तीसगड तेलंगण विदर्भ या राज्याएवढे  आहे  आहे या तिनी भागांची लोक संख्या २ ते २.५० कोटींच्या मधात आहे ..पण बिहारची लोकसंख्या आजमितीला यांच्या पाचपट म्हणजे तब्बल १० कोटी एवढी आहे .

.तिथला सरासरी जन्मदर ५ मुले प्रती कुटुंब एवढा आहे... देशात एकच राज्य आहे  आहे जिथे एका मुख्यमंत्र्याला तब्बल १३ अपत्ये आहेत ..हाच तो भडवा लालू आणि तेही एकाच बाई  पासून राबडीदेवी.पासून...... काय क्षमता आहे ठोकण्याची .....कोणी सिक्सर मारत यांनी डायरेक्ट १३  पिल्ले पैदा केली....हसावे कि रडावे???

  त्यांची नावेसुद्धा जलेबी सामोसा लाडू अशी ठेवलीय .....  मागास पणाचा दारिद्र्तेचा कळस म्हणजे मुल्ला मुलायम आणि हा लालू यादव....   आणि मोदी  भक्त वाहात चालले..... 



   बिहारची बेटी गुजरातच्या मुख्य मंत्र्याला मारायला जाते आणि याचे निर्लज्ज समर्थन हे करतात हि अनीती आहे हा माणूस संधिसाधू अनितीश्कुमार आहे...आशा  लोकांशी मोदींनी नाते जोडून कोणती नितीमत्ता दाखवलीय ..??? 

मोदींना मारणार्यांना यांचा शह होता ...या माणसानी  मोदी  पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले म्हणून १७ वर्ष जुनी युती तोडली आणि स्वतः फक्त २ जागा जिंकून बस्ले.... मग लालूही युती काय केली आणि तीन पक्ष मिळून खंडित जनादेशाचे सरकार बनवले तेही धड दोन वर्ष सुद्धा यांना टिकवता आले नाही....


Image result for बिहार

भाजपने लोजपा सोबत मिलुन ३१ जागा जिंकल्या ४० पैकी..त्यात भाजपच्या २५ आहेत ... येत्या निवडणुकीत भाजप खरच २५ लढू तरी शकेल का? आधी पासूनच संजद तिथे मोठा पक्ष आहे आणि नितीशकुमार काही उद्धव ठाकरे नाहीत कि ते भाजपला वर चढू देतील..म्हणजे भाजपच्या २५ जागा तर निश्चित  गेल्या आणि स्वबळावर भगवा फडकवण्याचे स्वप्नही पार धुळीस  मिळाले... २८२ पैकी १५ जागा मोदी आताच गमावून बसले... परत हा पक्ष सेनेसारखा हिंदुत्व वादी नाही त्यामुळे गोहत्या ३७० सारख्या विषयांवर समर्थन मिळणार नाही....
नितीश कुमारांना सोबत घेऊन भाजपने संकट ओढ्व्लेय हे पुढे दिसेलच .......



तूर्तास इति शम\\\\\

Thursday, 20 July 2017

जिन्हे नाज ही हिंदी पर – त्यांच्यासाठी .........!




नमस्कार राजे....... कसे आहात सगळे.... मजेत ना..........

फावला वेळ असला को काहीतरी गुगलवर टाकत असतो मी ..आता छंदच झालाय माझा ... असेच बघता बघता एक संकेत स्थळ दिसले ...... अमृत मंथन नावाचे... वर्डप्रेस चा ब्लॉग होता तसा म्हटल ..वाचून बघाव.... फारच छान माहिती मिळाली तिथे आपण सर्वांनी नक्कीच वाचण्यासारख खूप काही आहे तिथे शिवाय सभासद सुद्धा होता येईल .... असो...


आज आपण हिंदी राष्ट्रभाषा या विषयावर बोलणार आहोत....

आजवर कित्येकदा आपल्या मराठी आणि इतरही विशेषतः हिंदी भाषिक लोकांकडून हे वारंवार ठासून सांगितले जाते ...कि आमची हिंदी हि राष्ट्रभाषा आहे म्हणून आणि ती तुम्ही सर्वांनी बोललीच पाहिजे .... कित्येकदा हा दुष्प्रचार आहे असे सांगून मी खूप वादही घातले आहेत ...पण व्यर्थ काही मूर्ख लोक विशेषतः नागपूर संघवाले आज सत्ता आल्यामुळे माजात आहेत आणिक काहीही ऐकायला तयार नाही  ..त्यांच्या डोळ्यात पुराव्यानिशी  चरचरीत अंजन घालण्यासाठीच हा लेख प्रपंच ......


जेव्हा भारताचे संविधान तयार होत होते [तयार म्हणजे काय फक्त कॉपी पेस्ट ] तेव्हा संसदेत हा मुद्दा फारच गाजला होता सर्व हिंदी भाषिक खासदारांची मागणी होतीहिंदीला राष्ट्रभाषा करण्याची......

 यावर कधीच एकमत होत नव्हते आणि कधीही होणार नाही... महावीर त्यागी नावाचे एक महाशय जे चांगले खासदार होते पण हिंदीवादी होते त्यांचा हा आग्रह होता कि हिंदीला भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करावे ..पण याला अन्य लोकांचा विरोध होता ...स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यावर काही तोडगा निघाला नाही म्हणून शेवटी याचा निर्णय सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोडला...शेवटी भारत हे UNITED STATES OF INDIA जरी नसलं तरी संवैधानिक रित्या भारत एक संघराज्य म्हणजे  INDIA  A  UNION आहे आणि इथे FEDERAL STRUCTURE OF INDIA या संकल्पनेला फार महत्त्व आहे..... मुळात भारत म्हणजे काय हेच काही मूर्खांना काळात नाही त्यांच्यासाठी भारत म्हणजे काय ? अश्या आशयाचा एक स्वतंत्र लेख लिहितोय तो सुद्धा नक्कीच वाचा....

शेवटी तामिळनाडू ने विरोध कायम ठेवला आणि जोवर सगळी राज्ये एकमत होत नाहीत तोवर कुठलीच भाषा सर्व देशावर थोपवली जाऊ शकत नाही असा निर्णय झाला म्हणूनच केंद्र सरकारच्या सर्व संस्थांना राज्यांची भाषा, हिंदी आणि इंग्रजी या तिनी भाषेत फलक आवेदनपत्रे आणि सर्व काही करणे बंधनकारक आहे...पण महाराष्ट्रसारख्या राज्यात भाषिक साम्राज्यवाद्यांचे हित जपणारे सरकार असल्यामुळे हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत...असो ....
 
बाबासाहेबांनी त्यावेळी मान्यता असलेल्या १४ भाषांना राष्ट्रीय भाषांचा दर्जा दिला.....नेहरू आणि शास्त्री सरकार असतानासुद्धा अश्या प्रकारचे सरकारी माहितीपत्र काढले गेले होते ...
बाबासाहेबांच्या समतेचा टेंभा मिरवणारे लोक भाषिक समता कसे विसरून जातात हेच कळत नाही... नमस्ते सदा वत्सले मात्र्भूमे म्हणणारे प्रकृतीदत्त मातृभूमीच्या एवढ्या बहुविध भाषा संस्कृतींना कसेकाय नाकारू शकतात ? देशप्रेम म्हणजे मराठी बंगाली तामिळी आदी भाषांवर प्रेम नाही का ‘? ते फक्त हिंदीवरच असावे का? बंगाल गुजरात हे राष्ट्राचे भाग नाहीत का?  शिवाय हे धडधडीत सत्य नाकारून तब्बल ७० वर्षांपासून हिंदी राष्ट्रभाषा आहे हे खोटं प्रसारित केल जातंय ...हा भाषिक साम्राज्यवाद खरच भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे का?

  असा म्हणतात कि INDIA IS THE ONLY COUNTRY WHICH HAS NOT INVADED A SINGLE INCH OF OTHER LAND IN LAST KNOWN 10000 YEARS OF HISTORY…

जेव्हापासून जनजीवन आहे तेव्हा पासून भारत हि एकमेव भूमी आहे जिथल्या लोकांनी भौमिक धार्मिक भाषिक क्संस्कृतिक अशा कुठल्याही प्रकारचा साम्राज्यवाद नाही केला .... प्रकृती म्हणजेच भारतीयता...... भारतीय संस्कृतीमध्ये तर निसर्गाला देव मानले आहे......मग निसर्गानी दिलेली तमिळ मराठी त्याज्य ठरवणारे लोक हे खरच भारतीय असू शकतात का ?? आणि तेही या भाषिकांच्या राज्यात येऊन ...

हजारो वर्षांपासून भारत आहे ... सूर्य चंद्राच्या अस्तित्वापासून असलेली हि भरत भूमी कधीच एका भाषेच्य आधिपत्याखाली नव्हती ... प्रकृतीने भारत देशाला अनेक रंगाने सुशोभीत  केले आहे ..... हा निसर्गाचा शृंगार नष्ट करणे खरच संघ भाजप आणि देशातले सर्वात गरीब , मागास , असभ्य ,शोषित, आणि साम्राज्य वादी लोकांची विचारसरणी आहे....! यांना हा अधिकार आहे का ??


राहीला प्रश्न हिंदीचा तर हिंदी हि भाषा आणि हिंदी शब्दसुद्धा  भारतीय नाही.... हिंदू हिंदी हिंदुस्तान हे शब्द मुस्लीम अरब लोकांनी आणले सिंधूचा हिंदू नाही झालाय.....  हिंदू हि एक शिवी आहे काळ्या लोकांना अरब देशाच्या भाषेत ....  ह चा स सर्वीकडे नाही होत आणि अरबी भाषेत सुलेमान सलीम असे स अक्षर असलेले शब्द आहेत... त्यामुळे स चा ह ची कथा सर्वीकडे लावू नये.. हिंदू म्हणजे अरबी भाषेत काळे तोंड असलेले लोक....

मुस्लीम अथवा मोघल सल्तनत उत्तरेत होती आज ज्या राज्यांची भाषा हिंदी आहे ती सर्व राज्ये एकेकाळी मुघलांच्या सत्तेखाली होती म्हणूनच हिंदी आधीची उत्तर भारताची भाषा हि शौरसेनी प्राकृत होती जी मोघलांनी भाषिक साम्राज्य पसरवून नष्ट केली.... आणि या लोकांनी नष्ट होऊ दिली ... घुंघट धर्मांतर सर्वाधिक मुल्सिम लोकसंख्या सर्वाधिक दंगे आर्थिक मागासलेपणा  प्रचंड जन्मदर आणि लोक संख्या या सर्व गोष्टी धर्म संस्कृती नष्ट झाल्यामुळे येतात असे आर्य चाणक्यांचे कौटिलीय अर्थसूत्र सांगते..त्यात श्लोकच आहे सुखस्य मुलं धर्मः धर्मस्य मुलं अर्थः ......हा २००० वर्ष जुना फोर्मुला आजाही RELEVANT आहे..... 

हिंदी राज्यांच्या एकूण लोकसंख्येच्या अर्धीसुद्धा जीडीपी हि राज्ये देशाच्या तिजोरीत देत नाहीत... एकटा मराठी समूह तब्बल २५ टक्के जीडीपी देशाला देतो जी आमच्या संख्येच्या अडीच पट  आहे. कमलाकांत बुधकर , सुरेश चिपळूणकर यांसारख्या कित्येक मराठी लेखकांनी हिंदीमध्ये अनेक साहित्य लिहून हिंदी भाषा समृद्ध केली आहे.....आणि काही लोक  आज  मराठी भाषेला राज्यातून हटवायची मागणी करतायत...प्रा.वसंतराव ओंक जे संघाचे नेते होते ज्यांना दिल्लीचे राजा दिल्लीश्वर असेही म्हणतात... दिल्लीतून एकदा लोकसभेत जात असत त्या ओंक सरांनी तर हिंदी भाषेचे एकमेव साहित्य संमेलन चालू केले.जे आजही मोठ्या दिमाखात दिल्लीला सरकारी कार्यक्रम म्हणून होत असते.... ४५ कोटी असूनही यांना साहित्य संमेलन करविण्याचे सुचले नाही.. आमच्या महाराष्ट्राचे एवढे अमाप योगदान हिंदीला असूनही आज आमच्या मराठीची गळचेपी होतेय... असो..... ज्यांना प्रकृती कळत नाही त्यांना संस्कृतीसुद्धा कळत नाही हे सत्य ......


खाली  ४-५ लिंक  देतोय लोकसत्ता मध्ये मा.सलील कुलकर्णी सरांचा लेख आणि २००९ साली भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या  अधिकृत भाषा विभागाने सूचनेच्या अधिकारात दिलेली माहितीचे पत्रक आपल्याला बघता येईल.. सदर करतोय जो सबळ पुरावा आहे हिंदी राष्ट्रभाषा नसल्याचा...

माझ्या मुळच्या हिंदी भाषिक वाचकांनो हा लेख द्वेष पसरवायला लिहिलेला नाहीय... आपली भाषा आपल्या राज्यात वाढविणे तिचे साहित्य समृद्ध करणे , तिला प्रवाहाची भाषा बनविणे हे सर्व करून ती समृद्ध होऊ शकते उगाच अन्य भाषिकांवर थोपवून तिचा अपमान करू नये... .. हिंदी भाषेला आणि भाषिकांना त्यांच्या राज्यांना  मराठी लोकांएवढ कोणीही देऊ शकत नाही ..यासाठी इतिहास आणि वर्तमानातले आकडे वाचावे लागतील.....

कोणालाही वाईट वाटल्यास तो त्यांचाच  दोष आहे......






जय मराठी जय महाराष्ट्र

अधिकृत राजपत्र  LINK.....

https://amrutmanthan.files.wordpress.com/2010/01/e0a485e0a4aee0a583e0a4a4e0a4aee0a482e0a4a5e0a4a8-e0a5a7_e0a4b9e0a4bfe0a482e0a4a6e0a580-e0a4b0e0a4bee0a4b7e0a58de0a49fe0a58de0a4b01.pdf























Friday, 14 July 2017

Globalisation a destroying agenda

अहो ऐकलत का ? त्या पाटील काकूंच्या मुलांनी जर्मनी मध्ये एका जर्मन मुलीशी लग्न केलय... काकू आणि काका फारच संतापले आहेत..त्यांनी तर मुलाशी नातेच तोडले......... आई बाबांना सांगत होती.......... आणि मी माझ्या खोलीतून ऐकत होतो...... त्यावर बाबा ...जरा प्रक्टीकॅल बोलले....... त्यात काय एवढ बागुलबुवा करण्यासारखे आहे...? माझी शाळेतल्या जोशी madam च्या मुलांनी नाही का ब्रिटीश मुलीश लग्न केले..पण त्यांनी तर सुनेला स्वीकारले ..हम....  globalisaton आहे ग ...आता आपल्या भारतीय लोकांनी हे सगळ स्वीकारायची मानसिकता तयार केली पाहिजे ......


जागतिकीकरण हा शब्द ऐकला आणि माझ्या मनात विचारांचे काहूर सुरु झाले.... गेली दोन दशके म्हणजे ९१ ते ९५ च्या काळात अर्थ मंत्री असलेल्या मौनी बाबांनी जे उदारीकरण आणि इतर असे खाउजा धोरण आणले तेव्हा पासून देशाची सामाजिक आणि अर्थातच आर्थिक व्यावस्था हि फार बदलली असे म्हणतात कोणी याचे फार कौतुक करतात तर कोणी निंदा.... या सर्व बाबींमुळे देशात काय बदल घडले जगात काय घडले यावर माझे म्हणणे मांडण्यासाठी  हा खटाटोप.....

मुळात उदारीकरण हि संकल्पना जगात अमेरिका आणि युरोप च्या काही बड्या कंपन्या आणि त्यातून सरकारे चालवणारे काही  राजकारणी लोक यांच्या मनात आली म्हणजे  जगातल्या कुठल्याही कंपनीला भारतात आणि तसेच इतरही देशांमध्ये मुक्त व्यापार करण्याची मुभा मिळाली...म्हणूनच याला मुक्त अर्थ व्यवस्था धोरण असेही म्हणतात....  खरेतर हि छोट्या आणि भारतासारख्या स्वत्व न उमगलेल्या देशांसाठी पूर्णतः आर्थिक आणि सामाजिक गुलामीची साखळीच म्हणावी लागेल.... भारत देशांनी जोवर हे धोरण स्वीकारायचे होते तोवर जगातले ७४ देश सुद्धा उदारीकरणाच्या विरोधात होते ...... भारतासारख्या  आत्मनिर्भर देशानी जर हे स्वीकारले तरच आम्ही स्वीकारू एवढा विश्वास भारतवर या देशाचा होता पण भारताने उदारीकरण स्वीकारले आणि या ७४ देशांनी सुद्धा  .......... यामुळे देशात आज ५००० विदेशी कॅम्प्न्या काम करत आहेत आणि दिवसाला अमर्याद नफा आपापल्या देशात पाठवत आहेत..... या उदारीकरणामुळे..... उत्तर कोरिया नावाच्या देशाने हे स्वीकारल्यापासून पूर्ण अर्थव्यवस्था बुडाली आणि तब्बल ५ वेळा जागतिक बँकेचे कर्ज हा देश चुकवू शकला नाही आणि आजसुद्धा पराधीन अवस्थेत आहे..........  thailand सारख्या देशाला तर इतके भयंकर नुकसान झाले कि त्यांना आल्या देशातल्या महिलांना वेश्या व्यवसायास लावावे लागले आणि आज त्या देशाची अर्थव्यवस्था वेश्याव्यवसायावर चालते  कुठे बुद्धाचे वैराग्य आणि आजचे हे बौद्ध देश..... पण भारतातील हिंदुविरोधी बौद्ध  बांधवांना मात्र खूप अभिमान आहे या देशाचा........... असो.....


मला तरी असे वाटते कि जागतिकीकरण हे भारता फक्त हिंदूंसाठी किंवा हिंदू समाजान आपली भाषा धर्म कपडे भोजन आदी सगळे काही सोडावे यासाठीच आणले गेले आहे......  गेल्या २० वर्षात कुठल्याच मुस्लीम महिलेला बुरखा त्याज्य वाटला नाही उलट मुस्लिमांची कट्टरता  वाढतच गेली... महारार्ष्ट्रातले अर्धे मुसलमान लोकांनी २०११ च्या जनगणनेत आपली मातृभाषा मराठी नसून उर्दू आहे असे सांगितले .भाषा भोजन कपडे या सर्व गोष्टीत मुस्लीम लोक आणखी अरबी वहाबी होत चाललेत... आधी मुस्लिमांची मुले मराठी शाळेत शिकत असत..आता मात्र अपवादात्मक दिसतात..इतर सगळे...मदर्स्यात जातात ....... 

Image result for all types of sarees in map of india
 साडी आणि नऊ वारी हळूहळू गायब होत चाललेत ..... साल globalisation  हे काय फक्त हिंदूंसाठी आहे.......  हिंदूंच्या मुली बायकांचे कपडे झपाट्याने बदलत आहेत बाकीच्यांचे काय???? 

सौंदर्याची परिभाषा हि विविध प्रकारचे नक्षी काम असलेल्या इतक्या वैविध्येतेच्या एतद देशीय पोशाखान्म्ध्ये होती एवढे रंग इतक्या प्रकारचे कापड आणि कित्येक प्रकारचे दगिने घालून मिरवणाऱ्या राणी पद्मिनी सारख्या अस्सल भारतीय महिला...ज्या जीवाची राखरांगोळी करायला सुद्धा मागे पुढे बघत नसत......... 
 आता काश्मीर ते कन्याकुमारी एकच काळ्या किंवा निळ्या रंगाचा जीन्स आणि top घालण्यात येतोय ज्यात न रंग आहे न नक्षी ... भारताची विविधता संपवली जातेय...असे नाही का दिसत ??  अमर्याद वर्क असणार्या भरजरी साड्या आणि ती श्रीमंती व सौंदर्य ज्याला साक्षात देवीचे रूप मानून आजवर आम्ही पुजत आलो  त्याची जागा आता lingeri आणि बिकनी घेतेय ..... 


कामसुख आणि संभोग आधी सुद्धा होताच न? पण आता २४ तास टीव्ही वर चित्रपटात  मोबाईल  मध्ये  घराच्याबाहेर सर्वत्र हेच दिसते .... एकदम फिट्ट बसणारे जीन्स आणि टोप ज्यातून नितंब आणि स्तन पूर्ण दिसावे आणि रोज अशा कित्येक पोरींच्या मागच्या पुढच्या भागाकडे बघून मुलांचे लक्ष जाते आणि मग देख उसक कितने  बडे ही...माल है यार...... बास झाल इथेच संपल स्त्रीच सौंदर्य.....    ब्युटी किंवा सौंदर्य नाम म शेष होतंय ....त्याची जागा आता कपड्यांमध्ये sex अपील किती आहे किती खिडक्या किती उघडी मुलगी दिसते यावर सर्वकाही अवलंबून झालाय..........

सौंदर्याला देवी मानून पुज्णारा भारत आणि हा भारतीय विचार नाहीसा केला जातोय......... 
Image result for indian languages map




आपल्या भाषा इतक्या व्यापक असूनही देशात कुठेही देशी भाषांमध्ये आधुनिक शिक्षण उपलब्ध नाहीये ... जगात सर्वत्र ते आहे ...

आजही ब्रिटन चा गुलाम असलेला स्कॉटलंड मध्ये शिक्षण व सरकारी इतर सगळे काम स्कॉटिश भाषेतच होते चीन रशिया जपान सगळीकडे स्वतःच्या देशी भाषेत शिक्षण काय संगणक सुद्धा आहे... 

फक्त कॉमन  वेल्थ देश म्हणजे ज्यांना ब्रिटिशांनी एक सोबत  लुटले त्यांवर इंग्रजीची गुलामी लादली गेलीय ...नाही समजत तरी रट्टा मारून इंग्रजी बोला ...आणि तेही त्या बुड धुण्याची अक्कल आणि पाणी दोन्ही नसणाऱ्या गोर्या लोकांचा अयाक्सेंट accent मध्ये  ....
पूर्ण गळा उघडतो भारताच्या वातावरणात तरीही वरवर उच्चार  करा अशी भाषा बोला इतका अट्टाहास......

एक भाषा तीही फक्त २६ अक्षरांची बोलून खरच देशाची अर्थ व्यवस्था सुधारेल का? न्याय शिक्षण आदी समस्या सुटतील का? एका भाषेची एवढी गुलामी करावी इतके मूर्ख झालोय आपण....?  आणि आता तर भाजप नावच्या महान पक्षाचे सरकार येउन सुद्धा सर्व सारखच दिसत आहे.....





Image result for indian foodImage result for indian food mapImage result for indian food map


 तसेच जेवणाचे...noodles आणि मंचुरियन तर आजकाल प्रत्येक लग्नात हमखास असतेच... आपले देशी पदार्थ कायमचे नाहीसे केले यांमुळे...

.काय ती अमेरिकन चोप्सी...
.christini ..., 
कॅपचिनो आणि इतर घाणेरडे पदार्थ.

..कित्ती वेड लावलाय आपल्याला याच,.... फक्त मार्केटिंग  फंडा आहे यात........   झुणका भाकरीच मार्केटिंग देश विदेशात केले न तर यापेक्षा जास्त चालेल.... पण आपण कुठे एवढे शहाणे ,,.....

 खर पाहिल्यास या चायनीज पदार्थांना काहीही चव नसते पण तोः पूर्ण ताकदीनिशी उपलब्ध केला जातो आणि गळया खाली  उतरवल्या जातो....

  जसे अभिनय येत नसतानाही काही बड्या कलाकारांचे पोट्टे १५-२० चित्रपटांसाठी हिरो 
 म्हणून घेतलेच जातात जस अभिषेक बच्चन .... भरपूर काही मिळाला बापामुळे ... आता बसला घरी.... 


आधुनिकता हे हिंदूंनी किंवा भारतीयांनी  भारतीय कपडे भाषा भोजन इत्यादी  सगळे त्याज्य मानून सोडून टाकावे याचाच प्रयत्न तर नाही ??



असो...........  




आणखी काही माहिती असल्यास अथवा ब्लॉग असल्यास मला  प्रतिक्रिया द्याव्यात हि विनंती .....