Thursday, 20 July 2017

जिन्हे नाज ही हिंदी पर – त्यांच्यासाठी .........!




नमस्कार राजे....... कसे आहात सगळे.... मजेत ना..........

फावला वेळ असला को काहीतरी गुगलवर टाकत असतो मी ..आता छंदच झालाय माझा ... असेच बघता बघता एक संकेत स्थळ दिसले ...... अमृत मंथन नावाचे... वर्डप्रेस चा ब्लॉग होता तसा म्हटल ..वाचून बघाव.... फारच छान माहिती मिळाली तिथे आपण सर्वांनी नक्कीच वाचण्यासारख खूप काही आहे तिथे शिवाय सभासद सुद्धा होता येईल .... असो...


आज आपण हिंदी राष्ट्रभाषा या विषयावर बोलणार आहोत....

आजवर कित्येकदा आपल्या मराठी आणि इतरही विशेषतः हिंदी भाषिक लोकांकडून हे वारंवार ठासून सांगितले जाते ...कि आमची हिंदी हि राष्ट्रभाषा आहे म्हणून आणि ती तुम्ही सर्वांनी बोललीच पाहिजे .... कित्येकदा हा दुष्प्रचार आहे असे सांगून मी खूप वादही घातले आहेत ...पण व्यर्थ काही मूर्ख लोक विशेषतः नागपूर संघवाले आज सत्ता आल्यामुळे माजात आहेत आणिक काहीही ऐकायला तयार नाही  ..त्यांच्या डोळ्यात पुराव्यानिशी  चरचरीत अंजन घालण्यासाठीच हा लेख प्रपंच ......


जेव्हा भारताचे संविधान तयार होत होते [तयार म्हणजे काय फक्त कॉपी पेस्ट ] तेव्हा संसदेत हा मुद्दा फारच गाजला होता सर्व हिंदी भाषिक खासदारांची मागणी होतीहिंदीला राष्ट्रभाषा करण्याची......

 यावर कधीच एकमत होत नव्हते आणि कधीही होणार नाही... महावीर त्यागी नावाचे एक महाशय जे चांगले खासदार होते पण हिंदीवादी होते त्यांचा हा आग्रह होता कि हिंदीला भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करावे ..पण याला अन्य लोकांचा विरोध होता ...स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यावर काही तोडगा निघाला नाही म्हणून शेवटी याचा निर्णय सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोडला...शेवटी भारत हे UNITED STATES OF INDIA जरी नसलं तरी संवैधानिक रित्या भारत एक संघराज्य म्हणजे  INDIA  A  UNION आहे आणि इथे FEDERAL STRUCTURE OF INDIA या संकल्पनेला फार महत्त्व आहे..... मुळात भारत म्हणजे काय हेच काही मूर्खांना काळात नाही त्यांच्यासाठी भारत म्हणजे काय ? अश्या आशयाचा एक स्वतंत्र लेख लिहितोय तो सुद्धा नक्कीच वाचा....

शेवटी तामिळनाडू ने विरोध कायम ठेवला आणि जोवर सगळी राज्ये एकमत होत नाहीत तोवर कुठलीच भाषा सर्व देशावर थोपवली जाऊ शकत नाही असा निर्णय झाला म्हणूनच केंद्र सरकारच्या सर्व संस्थांना राज्यांची भाषा, हिंदी आणि इंग्रजी या तिनी भाषेत फलक आवेदनपत्रे आणि सर्व काही करणे बंधनकारक आहे...पण महाराष्ट्रसारख्या राज्यात भाषिक साम्राज्यवाद्यांचे हित जपणारे सरकार असल्यामुळे हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत...असो ....
 
बाबासाहेबांनी त्यावेळी मान्यता असलेल्या १४ भाषांना राष्ट्रीय भाषांचा दर्जा दिला.....नेहरू आणि शास्त्री सरकार असतानासुद्धा अश्या प्रकारचे सरकारी माहितीपत्र काढले गेले होते ...
बाबासाहेबांच्या समतेचा टेंभा मिरवणारे लोक भाषिक समता कसे विसरून जातात हेच कळत नाही... नमस्ते सदा वत्सले मात्र्भूमे म्हणणारे प्रकृतीदत्त मातृभूमीच्या एवढ्या बहुविध भाषा संस्कृतींना कसेकाय नाकारू शकतात ? देशप्रेम म्हणजे मराठी बंगाली तामिळी आदी भाषांवर प्रेम नाही का ‘? ते फक्त हिंदीवरच असावे का? बंगाल गुजरात हे राष्ट्राचे भाग नाहीत का?  शिवाय हे धडधडीत सत्य नाकारून तब्बल ७० वर्षांपासून हिंदी राष्ट्रभाषा आहे हे खोटं प्रसारित केल जातंय ...हा भाषिक साम्राज्यवाद खरच भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे का?

  असा म्हणतात कि INDIA IS THE ONLY COUNTRY WHICH HAS NOT INVADED A SINGLE INCH OF OTHER LAND IN LAST KNOWN 10000 YEARS OF HISTORY…

जेव्हापासून जनजीवन आहे तेव्हा पासून भारत हि एकमेव भूमी आहे जिथल्या लोकांनी भौमिक धार्मिक भाषिक क्संस्कृतिक अशा कुठल्याही प्रकारचा साम्राज्यवाद नाही केला .... प्रकृती म्हणजेच भारतीयता...... भारतीय संस्कृतीमध्ये तर निसर्गाला देव मानले आहे......मग निसर्गानी दिलेली तमिळ मराठी त्याज्य ठरवणारे लोक हे खरच भारतीय असू शकतात का ?? आणि तेही या भाषिकांच्या राज्यात येऊन ...

हजारो वर्षांपासून भारत आहे ... सूर्य चंद्राच्या अस्तित्वापासून असलेली हि भरत भूमी कधीच एका भाषेच्य आधिपत्याखाली नव्हती ... प्रकृतीने भारत देशाला अनेक रंगाने सुशोभीत  केले आहे ..... हा निसर्गाचा शृंगार नष्ट करणे खरच संघ भाजप आणि देशातले सर्वात गरीब , मागास , असभ्य ,शोषित, आणि साम्राज्य वादी लोकांची विचारसरणी आहे....! यांना हा अधिकार आहे का ??


राहीला प्रश्न हिंदीचा तर हिंदी हि भाषा आणि हिंदी शब्दसुद्धा  भारतीय नाही.... हिंदू हिंदी हिंदुस्तान हे शब्द मुस्लीम अरब लोकांनी आणले सिंधूचा हिंदू नाही झालाय.....  हिंदू हि एक शिवी आहे काळ्या लोकांना अरब देशाच्या भाषेत ....  ह चा स सर्वीकडे नाही होत आणि अरबी भाषेत सुलेमान सलीम असे स अक्षर असलेले शब्द आहेत... त्यामुळे स चा ह ची कथा सर्वीकडे लावू नये.. हिंदू म्हणजे अरबी भाषेत काळे तोंड असलेले लोक....

मुस्लीम अथवा मोघल सल्तनत उत्तरेत होती आज ज्या राज्यांची भाषा हिंदी आहे ती सर्व राज्ये एकेकाळी मुघलांच्या सत्तेखाली होती म्हणूनच हिंदी आधीची उत्तर भारताची भाषा हि शौरसेनी प्राकृत होती जी मोघलांनी भाषिक साम्राज्य पसरवून नष्ट केली.... आणि या लोकांनी नष्ट होऊ दिली ... घुंघट धर्मांतर सर्वाधिक मुल्सिम लोकसंख्या सर्वाधिक दंगे आर्थिक मागासलेपणा  प्रचंड जन्मदर आणि लोक संख्या या सर्व गोष्टी धर्म संस्कृती नष्ट झाल्यामुळे येतात असे आर्य चाणक्यांचे कौटिलीय अर्थसूत्र सांगते..त्यात श्लोकच आहे सुखस्य मुलं धर्मः धर्मस्य मुलं अर्थः ......हा २००० वर्ष जुना फोर्मुला आजाही RELEVANT आहे..... 

हिंदी राज्यांच्या एकूण लोकसंख्येच्या अर्धीसुद्धा जीडीपी हि राज्ये देशाच्या तिजोरीत देत नाहीत... एकटा मराठी समूह तब्बल २५ टक्के जीडीपी देशाला देतो जी आमच्या संख्येच्या अडीच पट  आहे. कमलाकांत बुधकर , सुरेश चिपळूणकर यांसारख्या कित्येक मराठी लेखकांनी हिंदीमध्ये अनेक साहित्य लिहून हिंदी भाषा समृद्ध केली आहे.....आणि काही लोक  आज  मराठी भाषेला राज्यातून हटवायची मागणी करतायत...प्रा.वसंतराव ओंक जे संघाचे नेते होते ज्यांना दिल्लीचे राजा दिल्लीश्वर असेही म्हणतात... दिल्लीतून एकदा लोकसभेत जात असत त्या ओंक सरांनी तर हिंदी भाषेचे एकमेव साहित्य संमेलन चालू केले.जे आजही मोठ्या दिमाखात दिल्लीला सरकारी कार्यक्रम म्हणून होत असते.... ४५ कोटी असूनही यांना साहित्य संमेलन करविण्याचे सुचले नाही.. आमच्या महाराष्ट्राचे एवढे अमाप योगदान हिंदीला असूनही आज आमच्या मराठीची गळचेपी होतेय... असो..... ज्यांना प्रकृती कळत नाही त्यांना संस्कृतीसुद्धा कळत नाही हे सत्य ......


खाली  ४-५ लिंक  देतोय लोकसत्ता मध्ये मा.सलील कुलकर्णी सरांचा लेख आणि २००९ साली भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या  अधिकृत भाषा विभागाने सूचनेच्या अधिकारात दिलेली माहितीचे पत्रक आपल्याला बघता येईल.. सदर करतोय जो सबळ पुरावा आहे हिंदी राष्ट्रभाषा नसल्याचा...

माझ्या मुळच्या हिंदी भाषिक वाचकांनो हा लेख द्वेष पसरवायला लिहिलेला नाहीय... आपली भाषा आपल्या राज्यात वाढविणे तिचे साहित्य समृद्ध करणे , तिला प्रवाहाची भाषा बनविणे हे सर्व करून ती समृद्ध होऊ शकते उगाच अन्य भाषिकांवर थोपवून तिचा अपमान करू नये... .. हिंदी भाषेला आणि भाषिकांना त्यांच्या राज्यांना  मराठी लोकांएवढ कोणीही देऊ शकत नाही ..यासाठी इतिहास आणि वर्तमानातले आकडे वाचावे लागतील.....

कोणालाही वाईट वाटल्यास तो त्यांचाच  दोष आहे......






जय मराठी जय महाराष्ट्र

अधिकृत राजपत्र  LINK.....

https://amrutmanthan.files.wordpress.com/2010/01/e0a485e0a4aee0a583e0a4a4e0a4aee0a482e0a4a5e0a4a8-e0a5a7_e0a4b9e0a4bfe0a482e0a4a6e0a580-e0a4b0e0a4bee0a4b7e0a58de0a49fe0a58de0a4b01.pdf























No comments:

Post a Comment