Monday, 4 December 2017

discussion on history

नमस्कार , 
           
तीन दिवस बाहेर होतो म्हणून उत्तर देणे जमले नाही....
आता जे काही लिहितो आहे ते आपल्या मनातले पुर्वाग्रह सोडून वाचायचे.... आणि  केवळ डोक्यानेच विचार करायचा ... मला बामसेफी , ब्रिगेडी , पुरोगामी ,डावा आदी आदी विशेषणे लावायच्या आधी माझे आजवरचे सगळे लेख व माझ पूर्ण व्यक्तित्व जाणून घ्यायचं...उगाच कमरेखालच्या शिव्या हासडून हा बुद्दीवादी लोकांचा समूह घाण करू नका.....




नागपुरात अजब वितरकांचा  एक पुस्तकांचा मेळावा होता .वि. दा. सावरकरांचे कुठलेही पुस्तक १०० रुपयाला... मी तब्बल २० पुस्तके एकदम घेतली... त्यात हिंदू पदपातशाही हे सुद्धा होते... एके दिवशी ते वाचायला घेतले.... सुरुवातीची २० पाने वाचून पुस्तक फेकून द्यावेसे वाटले..... मी बंद केले वाचणे काही काळानी राग उतरल्यावर परत उरलेले पुस्तक वाचले....

रागाचे कारण हे कि सावरकरांच्या लेखी राघोबादादा हे छत्रपती महाराजांपेक्षा महान होते.... त्यांचे कार्य हे इतके मोठे होते जे वरील चित्रामध्ये अधोरेखित केलेलं आहे....
शिव्प्रभूंनी शून्यातून स्वराज्य जन्माला घातले ब्राह्मणापासून महारा पर्यंत कोणालाही दुखवले नाही.... मग त्यांना कमी लेखणे हे योग्य आहे का....?  ज्यावेळी उत्तरेत वायव्य भारतात  मुसलमानी सत्तेची मुळे  कमकुवत होती ..... कोणीही राज्य औरंगाजेबासारख व्यवस्थितपणे चालवत नव्हते तेव्हा हे कामपिपासू राघोबा उत्तरेत भगवा फडकवायला गेले जेव्हा काहीही गरज नव्हती... आणि हो तो भगवा कधीपर्यंत टिकला ?? अवघ्या एक वर्षात पानिपत झाले...शिवाय तो प्रदेश कधीच मराठ्यांच्या ताब्यात नव्हता ..तिथून कर कधीही मराठ्यांन मिळत नसे .... तरीही ते कार्य अधिक पूर्ण वाटण्यामागे काय उद्देश आहे?
अहिल्यादेवी सारख्या महान राणीवर चालून जाणारा हा मूर्ख राघोबा , मराठी सत्तेची मसनद ब्रिटिशांना विकणारा माणूस, सत्तेसाठी घरच्या लहान पोराचा मृत्यू घडवणारे हे लोक ,  यांची तुलना तेही छत्रपती महाराजांशी आणि त्यातही यांना महान ठरवितात सावरकर .......


हिंदुपाद्पातशाही हे पुस्तक २४८ पानांचे आहे . यात फक्त
पण नं. ७ ते २४ एवढेच छत्रपती शिवाजी राजे , छत्रपती संभाजी राजे, राजाराम महाराज, ताराबाई राणीसाहेब व बालाजी विश्वनाथ येईपर्यंतच्या कार्यकालासाठी आहेत.....  १६३० ते १७१७ हि ८७ वर्षे (हि जवळपास वर्षे आहेत... ८०-८७ ) आणि उरलेले सर्व पुस्तकच आपल्या जातीच्या आणि मनात खूप प्रेम असलेल्या पेशवाई साठी सावरकरांनी खर्ची घातलेले आहेत.....

हा अन्याय किंवा चूक नाही? इथे सावरकर मला पटत नाही....


शिवाजी राजांसाठी फक्त ४ पाने आहेत.... तर साम्भाजीराजांसाठी केवळ एक पान ...... त्यातही शिवाजी राजांनी लढलेल्या कुठल्याही युद्धाच, त्यांच्या आरमार स्थापनेच, कशाचाही कौतुक नाही...वर वर लिखाण आहे.... राज्याभिषेक केला त्यावरही सावरकरांना आक्षेप आहे..... कोकण ते तामिळनाडू एवढे राज्य होते आमच्या राजाचे.... पण तरीही म्हणतात कि पूर्ण प्रांत नव्हता ....... आयुष्यभर झटून ज्या राजांनी राज्य उभारिले त्यास अभिषेक नाकारला गेला होता..... यांनी तर लायकीच नाही असे म्हटले अप्रत्यक्षपणे .....

संभाजी राजांवर फक्त १ पान ..... बहुधा एवढेच कळले संभाजीराजे सावरकरांना ......  त्यातही कुठेच बुद्धभूषणम , नायिकाभेद यांचा उल्लेख नाही ..... पण मदिरा मदिराक्षी याचा उल्लेख मात्र निश्चित आहे.... आणि तोही पुसटसाच आहे असे काहींना वाटते ...... अहो संभाजी राजेच पुसटशे अवघ्या एकाच पानात संपवले सावरकरांनी..... त्या एवढ्या लढाया ..... इतका पराक्रम , ४० दिवसांचे हाल फक्त ४ ओळीत संपले....


सावरकरच म्हण्याचे कि इतिहासातले विजयी काय ते पुढच्या पिढ्यांना सांगा ..... पराजयाचा इतिहास वाचून समाज मागे जातो..मग त्यांनी स्वतः काय लिहिलेय....ते आंधळ्या सावरकर भक्तांनी बघावे....
जरी ४ च पाने लिहिलीत तरी ती चांगली लिहायची होती ना....

२३० पाने पेशवाई ला वाहिली आहेत..... यातच सावरकरांना सुद्धा पोस्त कर्त्या भूषण रावांनी उद्धृत केलेल्या सुप्त जातीय ओलाव्या ची बाधा होती हे सिद्ध होते....

महाराष्ट्रात पेशवाई च्या चुका आणि पराक्रम दोन्हीही नाकारणारे लोक आहेत.... मी त्यातला नाही... मला राऊ माधवराव पटतात ,राघोबा नाही पटत ...

आजही इतिहासातले योद्धे जातीच्या ओलाव्यात फसले आहेत...
आपल्या मराठी लोकांत पेशवाई बद्दल उगाच एक SOFT CORNER असलेला वर्ग आहे... तो विदांच्या काळी होताच...ते स्वतः तसेच होते...

एकदा एक देशपांडे नावाचे सर मला वर्गात सर्वांसमोर म्हणाले होते.... कि आम्ही तर अटकेपार गेलो तुम्ही सुरतेच्या पलीकडेही जाऊ शकले नाही.... आम्ही आणि तुम्ही जोवर वेगळे आहोत तोवर मराठी कल्याण होणे नाही....

काही लोक कधीच मानणार नाही कि त्यांच्यात  इतिहास बघ्ण्यापासून तर FLAT घेण्यापर्यंत जात महत्तवाची मानली जाते...

असो माझ्या घरात ५ ब्राह्मण महिला आहेत.... माझ्यात जनुकीय दृष्ट्या ब्राह्मणी रक्त आहे .... राउंच्या अनुताई ह्या भगिनी घोरपडे यांच्या घरी दिलेल्या होत्या... इचलकरंजी...चे.घराणे...


उजव्या आणि डाव्या दोन्हीही चश्म्यांना झटकून आत्य पहिले पाहिजे....

ज्योतिबा फुले यांचे तर सगळे साहित्याच विकृत आहे अगदी १०० टक्के ..... पण सावरकर सुद्धा १ टक्का तरी चुकलेच ना?

इथे हा विषय भूषण रावांनी चर्चेस आणला..... मी स्वतः कधीच एखादा माणूस किती चूक यावर बोलायला इच्छुक नसतो ....  जे ज्याच उदात्त ते स्वीकारायला पाहिजे असेच मला वाटते... म्हणून रोज रात्री ने मजसी ने ऐकूनच झोपतो.... मी
एखाद्या ठिकाणी विदा. पटले नाही म्हणून मी काय मणिशंकर अय्यर नाही जाहलो .... अन्द्मांनातून ओव्या हटविणारा भडवा.....

येणाऱ्या पिढीला माझ्या लहान बहिण भावांना कायम मार्सेलीस्ची उडी , अजेय कवित्व , जातीनिर्मुलानाचे काम, अस्पृश्यांचे स्नेहभोजन , हेच सांगत आलोय आणि तेच पुढे नेले पाहिजे....

इथे आपण सूक्ष्म त्यातही इतिहासावर चर्चा करतोय म्हणून बोललो , मी एका वाक्यावरून एक पूर्ण व्यक्ती योग्य कि अयोग्य हे ठरविणारा ब्रिगेडी बामसेफी नाही....



साहित्य सोडून फुलेंच काम बघा व ते पुढे न्या... तसेच वीदांचे महान काम पुढे गेले पाहिजे..... 

No comments:

Post a Comment