नमस्कार राजे.......
आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ......
अगदी लहानपणापासून शाळेत आणि घरी महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांबद्द्ल शिकवल्या जात असे... आजही शिकवल्या जातेच..त्यामुळे
कोणाचीही जयंती व पुण्यतिथी असली तर मी स्टेट्स वर अभिवादनाच चित्र टाकतो ..... त्यावर कोणीतरी प्रतिक्रीय देतच असतात
..... आज असेच महात्मा जोतीराव फुल्यांचा फोटो टाकल्यावर आमच्या बंधूंचा ओम शिंदे
या कट्टर उजव्या आणि धारकरी असलेल्या , शिवसेनेच्या कट्टर स्टाईल मध्ये नेहमीच
भावनेत वाहून आक्रमक लिहिणार्या , आमच्या
मित्राचा msg आला .. .... म्हणाले कि
, “अफझल खानाला भोळा म्हणणारे , महमद गजनवी वर पोवाडा लिहिणारे , शिवाजी राजांना
अक्षर शून्य म्हणणारे , गुलामगिरी मध्ये
खोटा इतिहास लिहिणारे फुले तुम्हाला वंदनीय वाटतात का?”
हे असे ऐकून मला फार चीड आली.... बहुसंख्य हिंदू
सगळे काही छातीवर मनावर घेतात हीच आमची सर्वात मोठी चूक आहे..... कदाचित म्हणूनच
आज हिंदू ,बहुजन सर्वच स्तरावर मागे आहेत....आणि डोक्यानी युद्धे लढणारे शेटजी-बनियावादी
किंवा इंग्रज लोक खूप पुढे आहेत ..आणि एवढेच नाही तर कित्येक ठिकाणी आपण त्यांच्या
अधीन आहोत......
असो...., शिंदे साहेब तुम्हाला आणि अश्या प्रकारे क्षणिक आणि फक्त एका
वाक्यापुरता विचार करूनच कोणालाही अगदी सावरकरांसारख्या महान उजव्या नेत्यापासून
ज्योतिबा फुलेन्सारख्या तितक्याच डाव्या नेत्याबद्दल लगेच आपले एकूण अभिमत तयार करणार्यान
साठीच हा टंकन प्रपंच .......
ज्यावेळी जोतीबा जन्मले आणि वाढले त्यावेळी पुण्यात
पेशवाई सत्तेतून गेली असली तरीही ज्या जातीयवादासाठी किंवा पुण्यातल्या ब्राह्मणी सत्तेसाठी
ती बदनाम आहे ..ती परम्पारावादिता काही गेलेली नव्हती..... पेशव्यांनी फुलेंच्या
पूर्वजांना एक जागा दिली होती फुलाच्या शेतीसाठी ..त्यावरूनच यांच्या कुटुंबाचे
नाव फुले असे पडले..याआधी त्यांचे नाव क्षीरसागर असे होते आणीक ते जातीने मराठा
होते ..पण गुणकर्म विभागशः त्यांची जात आणि आडनाव तयार झालेले आहे... आजही त्यांना
सगळे लोक माळी समजतात जे त्यांच्या कर्मावरून पडलेले नाव आहे....
त्यावेळी पुण्यात भयंकर परम्परावाद होता...
महिलांना शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता..... विधवा पुनर्विवाहास मान्यता नव्हती..पण
पुरुषांना मात्र ५० व्या वर्षी सुद्धा विवाह करता येत असे ...स्वतः महादेव गोविंद
तथा न्यायमूर्ती रानडे यांच्या मध्ये आणि रमाबाई यांचे मध्ये दोन दशकाचे अंतर होते... पण त्यांनी जे काम केले ते
फारच महान होते.... म्हातारे माणस कोवळ्या मुलींचा घोट घेत असत..... नवरा मेल्यावर
स्त्रीला केस कापून टाकावे लागत असत आणि विद्रूप जगावे लागत असे..यासाठी फुलेंनी
न्हावी लोकांचा संप घडवून आणला होता....
कुमारी कन्यांचे बलात्कार होत असत आणि त्यांना
अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले जात असे.. यात ब्राह्मण महिलांवरच जास्तीत जास्त अत्याचार
झाले आहेत तेही त्यांच्याच जातीतल्या माणसांकडून .... .....स्त्री उपभोगाची वस्तू
याशिवाय काहीही नव्हती....याचसोबत दलितांना अस्पृश्य मानणे तर उत्तर पेशवाईत सुरु
झालेच होते.... तो एक वेगळा प्रश्न तर होताच ......
हा सगळा अन्याय फक्त आणि फक्त आमच्या धर्मात
सांगितलाय म्हणून बहुजन समाज आणि स्त्री वर्गावर होत होता... संपूर्ण समाज हा भीषण
अंधश्रद्धांच्या गर्तेत सापडलेला होता..... आमच्या स्मृती सांगतात, धर्माची पुस्तके
सांगतात म्हणून सर्व काही अत्यंत अन्यायकारक खपवले जात होते... स्त्रीयांवर होणारा
हा भीषण अन्याय बघून जोतिबांचे मन किती दुख्खी झाले असेल याची कल्पनाच न केलेली
बरी..... यातही जोतीबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली ...आधी
स्वतःच्या पत्नीस शिक्षित केले..... मग त्यांच्याकरवी पूर्ण समाज पुढे नेला ....
सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असत तेव्हा त्यांच्यावर शेण, दगड, कचरा फेकला
जात असे ...त्या नउवारी बदलत असत शिकविण्यासाठी आणि मग पुन्हा खराब कपडे घालून घरी
परत येत..... हि पहिली शाळा भिडेंच्या वाड्यात सुरु झाली हे भिडे ब्राह्मण च होते...
एका स्त्रीला असा त्रास देणारा समाज हा खर्च हिंदू असू शकतो का? यत्र नारी अस्तु पूज्यन्ते
मानणारी हि शिकवण आहे का? दुर्गेला भजणारा हा विचार असू शकतो का? यानंतर फुले
कुटुंबाने विधवा महिलांच्या साठी वसतिगृह उघडले , सावित्री बाईंनी तर प्लेग मध्ये
पुणेकरांची इतकी सेवा केली कि त्या स्वतः
तोच रोग होऊन अनंतात विलीन जाहल्या.....ज्योतिबा फुले त्याआधीच निर्वतले होते.....
जोतिबांनी हे आगळे समाजसेवेचे काम सुरु केल्यापासून
काही लोक विशेषतः पुण्यातले भटजी वादी
चिडलेले होते.... या सर्व कामात इंग्रजांचा त्यांना पूर्ण पाठींबा होता..जसा तो पंडिता रमाबाई आणि रेवरंड ना.वा.
टिळकांना होता.... ब्रिटीशांचे काही प्रमाणात भारतीय समाजाला रानटी अवस्थेतून पुढे
आणण्यात योगदान आहेच.... वेगवेगळे कायदे अत्याचाराला प्रवृत्त करण्यासाठी केले जाणे
हे त्यातले एक.... अर्थात एकूणच ब्रीटीशांचे भारतावर प्रेम होते असे मी म्हणत नाहीय.... मेकॉले आणि त्याच्या
व्यवस्था किंवा आजच्या ब्रीटीश व्यवस्था यांवर माझा स्वतःच मत अगदी कट्टर उजवे असेच
आहे.... एवढ्या दीर्घ कालखंडात ब्रिटिशांना काही चांगले काम करावेच लागले..... शेवटी
सत्य हेच कि ब्रिटीश आले तेव्हा हा समाज खूप अंधश्रद्धा आणि अधोगामित्व यांच्या
डोहात सापडलेला होता....
या
देशात समस्या हि आहे कि उजव्यांना फक्त मोगल आणि ब्रिटीश यांचे देशावरील अत्याचार
दिसतात.... तर डाव्यांना मनुवाद, अस्पृश्यता, महिला शिक्षण , याशिवाय काहीही दिसत
नाही.... एकच माणूस फक्त एकच
.....जो या दोहोंचा मेळ साधू शकला ..तो म्हणजे... पुरोगामी हिंदुत्वाचे पितामह महाराष्ट्र शिरोमणी प्रबोधनकार केशव सीताराम
ठाकरे ..... असो ....
यातच जोतीबा फुले विद्रोही साहित्या लिहू लागले.त्यात
परशुराम व शिवाजी राजेंचा पोवाडा ,आणि बळीराजाचा खोटा इतिहास आदी आहे...अर्थातच
एवढ छळल्यावर कोणीही विद्रोही लिहिणारच ..त्यातले आपण काय घ्यायचे ते आपल्यावर
आहे..
जोतिबांच्या या कामामुळे त्यांच्यावर
पुरोहीत्वादी लोकांनी एक दोनवेळा जीवघेणे हल्ले सुद्धा केले .... त्यांना जीवे
मारण्याच्या धमक्या येत असत..... अधर्मी म्हणवून धर्मातून काढण्याची परिस्थिती
होती.... निश्चितच अशा वेळी कोणीही राजसत्तेचा सहारा घेईल... संरक्षण मागेल....
त्यांनी ब्रिटीश सरकारला संरक्षण मागितले..त्यांचेशी संधान बांधले......
हिंदू
धर्म जर इतका जातीय आणि अन्य स्तरावर आतंक व दहशत पसरवणारा झाला असेल तर काय करायचे होते....
ते मध्यंतरी रमाबाई व टिळक यांसारखे क्रिश्चन व्हायच्या फंदात होते..... आपल्या
धर्माचा माणूस जर सुधारणा करतोय तर त्याला साथ देण्याऐवजी जर आपण त्याची हत्या
घडवून आणण्याचा प्रयत्न करू तर तो काय करेल निश्चितच अन्य पर्यायांचा आधार घेईल.....
जोतिबांनी लोकमान्यांना सोडवून आणले....आपले
अवघे आयुष्य समाजाची सेवा केली... आजचे फुलेवादी फक्त तोंडचे आणि चेपुवर फुलेंच्या
नावाने घाण ओकणारे झाले आहेत..जमिनीवर उतरून कोणीही काहीही काम केले नाही ....
तरीही फुलेवादी म्हणवत असतात ...आणि
हे दुसरे मूर्ख उजवे स्वतः समाजाला काय दिलेय
आपण किंवा काय असे मोठे काम केलेय कि ज्याचा आव आणून एखाद्या चुकीसाठी संपूर्ण जोतीबा
आणि सावित्री यांना नाकारतायत.....>????
फुलेंचे जमिनीवर उतरून केलेले काम हे त्यांच्या
व्यक्तीमत्वाच्या ९९ टक्के आहे.... आणि लिखाण फक्त १ टक्का पण या एक टक्क्यावर आज
डावे उजवे सगळे लक्ष देऊन असतात .... बाकी ९९ टक्के नाकारले जातात जोतीबा......
त्यांचे
काम किती महान होते यासाठी त्यावेळची परिस्थिती जाणून घेतली पाहिजे...... पण
व्यर्थ संयम नसणे आणि विचारांची व्यापकता नसणे ....हाच काही लोकांचा स्वभाव ......
कधी कधी असं वाटत कि हे हिंदुत्ववादी उजवे ब्रिगेडी तर नाही...ज्यांना फुलेंचे
एवढेशे साहित्य चूक वाटते ...एखाद्याची छोटी चूक किती महत्त्वाची असावी ..आणि
त्याचे ९९ टक्के काम त्याच काही महत्त्व नाही.... ते आज कोणी आठ्वायलाही तयार
नाही..हि शोकांतिकाच आहे......
ब्रिगेडी काय करतात सावरकर जयंतीला सावरकरांच्या
काही साहित्यातील ७-८ चुकीचे उतारे काढतात त्याची पोस्ट बनवतात..आणि फिरवतात ..त्याचा
इतका उहापोह करतात कि जणू सावरकर त्याच्या आगे मागे पुढे नाहीतच..त्याशिवाय सावरकर
नाहीच जसे .... मार्सेलिस ची उडी असो, त्यांचे एवढे महान मराठीप्रेम आणि कवित्व
असो , अस्पृश्यता निवारण, पतितपावन मंदिर,जातींचे स्नेहभोजन , हिंदू महासभेचे
त्यांचे काम हे काहीही त्यांना मान्य नसते.... आज अगदी तसेच जोतिबांचे स्त्री
शिक्षणाचे काम, महिलांसाठी वसतिगृह ,मोठे आंदोलने लढे, प्लेगच्या वेळचे काम हे
सगळं महत्कार्य जे ९९ टक्के आहे...ते विसरले,नाकारले आणि अंधारात ठेवले जात आहे....
एखाद्याच्या कामापेक्षा त्याचे लेखन एवढे
महत्त्वाचे झालेय कि त्यावरूनच त्याचे परीक्षण तेही एकूण व्यक्तिमत्त्वाचे केले
जाते जी चूक आहे.....
मला स्वतःला फुलेंचे कुठलेच साहित्य आवडत नाही....
सावरकरांच्या कविता सोडल्या तर त्यांनी नेहमी एकतर्फी विचाराने इतिहास लिहिलाय,आडून आडून स्वजातीच आणि परम्परावादितेच
समर्थनच केलाय,संभाजी राजे व शिवाजी राजे यांचा घोर अपमान केलाय , पण यावर ९६ कुली मराठा म्हणून चिडून भावनाविवश होऊन एकूण सावरकर नाकारू
का? ने मजसी ने ऐकायचं नाही का? वरचे त्यांचे काम नाकारू का? निश्चितच नाही....
स्टेट्स वर तेही असतात खुपदा ..जयंतीला तर निश्चितच .....
अगदी तसेच फुले आहेत.... जमिनीवर उतरून समाजाचे महिलांचे
बहुजनांचे कल्याण यांनी केले ..... हं लेखन नाकारतोयचं मी त्यांचे.... ..जोतीबा
फुले अथवा कोणीही फक्त त्यांच्या कामासाठी लक्षात ठेवावे .....आज समाजाला फुले
सावरकरांपासून खूप शिकून पुढे जाता येईल पण आपण १ टक्का त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाच्या चूका ज्या आज चुका आहेत...त्याकाळी ते तत्कालीन परिस्थितीच्या
भीषण तीव्रेतेचे प्रतिक्रियात्मक उतर होते....
आपण काय घ्यायच आणि काय नाही ते समाजाने ठरवायचे
आहे.... एकूणच काय चांगल घ्या ....चांगल पसरवा ..... बहुजन दलित महिला यांवर झालेले आणि आजही होणारे
अत्याचार ज्यांना दिसत नसतील ते उजवे ब्रिगेडीच आहेत...
माझ्या महाराष्ट्रातले जोतीबा फुले आणि वीर
सावरकर हे दोघेही महान क्रांतिकारक होते....आणि यांनी केलेले सुधारक काम आम्ही
पुढे चालविले पाहिजे....... एवढाच निष्कर्ष .....
आजचा भारतीय निदान महाराष्ट्रीय समाज हा राजहंसाप्रमाणे
दुध व पाणी याला वेगळ करून पराक्रम , शौर्य ,समता ,क्षात्रतेज यांचे क्षीर पान करणारा असावा तरच आपण पुढे जाऊ नाहीतर....मागेच
मागे....कायम लोकांच्या चुका काढणारी ब्रीगेडी मानसिकता जिचे बळी काही उजवे पडलेले
आहे ...जे योग्य ते घ्या बाकीचे सोडा .......एखद्याचे उदात्त ते स्वीकारा .....राजहंसा
सारखे...........
मी असाच आहे.... म्हणूनच “मी राजहंस एक......!”
टीप: एवढ सकारात्मक लिहूनही काहींना समजणार
नाही..... RIGID PEOPLE ….
No comments:
Post a Comment