Sunday, 20 November 2016

पाकिस्तानचे तीन तुकडे हाच पर्याय.



FADANVISHI  BLOG"s ARTICLE.............   BY MR. AMBARISH FADANVIS...ONLY SHARED BY ME....

इंदिराजींनी असामान्य धैर्य दाखवत पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तरीही पाकिस्तनाची युद्धाची खुमखुमी कमी झाली नाही. आजवर अनेकदा पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडल्या आहेत. कारगिलच्यावेळीस भारताला अधिक आक्रमक होण्याची संधी होती पण ती गमावली गेली. अलीकडेच जानेवारीत दोन सैनिकांची हत्या करून त्यांचा शिरच्छेद करण्याची अमानुष, रानटी आणि सर्व आंतरराष्ट्रीय संकेत झुगारणारी घटना घडली. देशभरातून निषेधांचं वादळ उठलं… विरूनही गेलं. आता पाच सैनिकांची हत्या भारतीय हद्दीत घुसून करण्यात आली. पुन्हा निषेधांचं आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मागण्यांचं वादळ उठलं आहे. या निमित्ताने महत्त्वाचा परंतु दुर्लक्षित राहिलेला प्रश्न म्हणजे भारतीय लष्कर खरोखरच युद्धसज्ज आहे काय?

सीमा ओलांडून पाकिस्तानी सैनिक आत घुसतात आणि ‘बेसावध’ जवानांना ठार मारतात ही घटना भारतीय लष्कराच्या दृष्टीने नक्कीच भूषणास्पद नाही. पाकिस्तानशी भारताने युद्ध घोषित करावं ही मागणी जोर धरत असली तरी तसं होण्याची शक्यता नाही. जागतिकीकरणामुळे बदललेलं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थसत्तांचं राजकीय सत्तांवर वाढत चाललेलं नियंत्रण यामुळे निर्णयशक्तिचं स्वातंत्र्य बाधित झालेलं आहे. पाकिस्तानला अमेरिकेचा आणि चीनचा असलेला छुपा तर कधी उघड पाठिंबाही इथे विचारात घ्यावा लागतो आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जागतिकीकरणाची ‘मधुर’ फळं खायला सोकावलेला नवमध्यमवर्ग युद्धखोरीची भाषा कितीही करत असला तरी युद्धामुळे निर्माण होणार्या संभाव्य आर्थिक पडझडीला सामोरं जाण्याची त्यांची मानसिकता नाही.

सोशल मीडियातून राष्ट्रप्रेमाचं भरतं आल्याचं दाखवण्यात ते धन्यता मानतात. याचा अर्थ असा नव्हे की पाकिस्तानला धडा शिकवू नये. तो शिकवलाच पाहिजे. युद्धाचा उपाय टाळून तो कसा शिकवता येईल यावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. पाकिस्तानचे पूर्वी भारतानेच दोन तुकडे करून दाखवले आहेत. आता त्याचेच तीन तुकडे कसे करता येतील यासाठी कुट नीतिचाच आश्रय घ्यावा लागणार आहे आणि तशी संधी पाकिस्ताननेच निर्माण करून ठेवली आहे.

बलुचिस्तानः

पाकिस्तानचे जे प्रमुख राजकीय विभाग पडतात त्यात बलुचिस्तान हा मोठा भाग आहे. येथील मुस्लीम हे बलुची वंशाचे असून त्यांचं सांस्कृतिक-सामाजिक जीवन हे प्राचीन काळापासून स्वतंत्र राहिलेलं आहे. १९४७ साली पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हापासूनच बलुच्यांनी आपलं स्वतंत्र राष्ट्र असावं यासाठी चळवळ सुरू केली होती. पाकिस्तानमध्ये सामील व्हायला बलुच्यांचा पहिल्यापासूनच विरोध होता. परंतु कलात संस्थानाने १९५५मध्ये पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने १९६० पासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोर पकडू लागली. त्यामुळे संपूर्ण बलुचिस्तानात अराजक माजलं. शेवटी पाकिस्तानला १९७३ साली इराणच्या मदतीने लष्करी कारवाई करून विद्रोह दडपावा लागला होता. यात हजारो विभाजनवादी क्रांतिकारी ठार झाले. हे स्वतंत्रता आंदोलन चिरडण्यात पाकिस्तानला तात्पुरतं यश मिळालं असलं तरी १९९० नंतर ही चळवळ पुन्हा उभी राहिली. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि लष्कर-ए-बलुचिस्तान या संघटनांनी पाकिस्तानमध्ये आजवर अनेक हिंसक कारवाया घडवून आणल्या आहेत. अर्थातच पाकिस्तानने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. बलुचिस्तान हा नैसर्गिक साधनसामग्रीने श्रीमंत प्रदेश असला तरी दारिद्र्याचं प्रमाण याच भागात खूप मोठं आहे. पाकिस्तानने या भागाचा विकास घडवून आणण्यात विशेष पुढाकार घेतल्याचं चित्र नाही. त्यामुळे आणि बलुच्यांच्या रक्तातच असलेल्या स्वतंत्रपणाच्या जाणिवांमुळे स्वतंत्र बलुचिस्तानची चळवळ थांबणं शक्य नाही. दुसरं महत्त्वाचं असं की बलुचिस्तानचा पश्चिम प्रभाग इराणमध्ये सध्या मोडतो. स्वतंत्र बलुचिस्तान होणं इराण्यांनाही अडचणीचं वाटत असल्याने याबाबतीत इराण आणि पाकिस्तान हातात हात घालून आहेत. ही युती तोडता येणं भारताला प्रत्यक्षात कितपत शक्य आहे हा प्रश्न असला तरी भारत पाकिस्तानी बलुचिस्तानला विभक्त करण्यासाठी कसा वेग देऊ शकतो हे पहायला हवं.लष्कर-ए-बलुचिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या दोन्ही गटांत सामंजस्य घडवून आणत भारत त्यांना आर्थिक आणि सामरिक मदत मोठ्या प्रमाणावर पुरवू शकतो. अर्थात तसं करण्यासाठी भारताला अफगाणिस्तानची मदत घ्यावी लागेल. ती कशी शक्य आहे हे आपण पुढे पाहुयात.

पख्तुनीस्तानः


पाकिस्तानचा एक दुसरा मोठा प्रदेश म्हणजे पख्तुनीस्तान (पश्तुनीस्तान) होय. हाही प्रदेश सध्या पाकिस्तानची डोकेदुखी बनलेला आहे. याचं कारण म्हणजे बलुच्यांप्रमाणेच पख्तून (पुश्तू) लोकांचीही स्वतंत्र संस्कृती आणि अस्मिता आहे. पख्तून ही पुरातन जमात असून तिचा उल्लेख सनपूर्व आठव्या शतकातील ऋग्वेदातही येतो. दाशराज्ञ युद्धात भाग घेतलेल्या एका टोळीचं नाव पख्त असं आहे. तेच हे पख्तून लोक होत. सरहद्द गांधी म्हणून गौरवले गेलेले खान अब्दुल गफार खान हे पख्तूनच होते. पाकिस्तान स्वतंत्र होण्याआधीपासूनच पख्तून लोकांची स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची अथवा अफगाणिस्तानात सामील होण्याची मागणी होती. याचं कारण म्हणजे अर्धाअधिक पख्तुनीस्तान अफगाणिस्तानात आहे. संस्कृती आणि भाषा हा सर्वांचा समान दुवा असल्याने सर्व पख्तुनांचं एक राष्ट्र असावं अथवा अफगाणिस्तानात विलीन व्हावं ही मागणी तशी न्याय्यही आहे. ब्रिटिशांनी आपल्या फोडा आणि राज्य करा या प्रवृत्तीस अनुसरून १८९३ साली पख्तुनीस्तानची विभागणी केली होती.ज्या रेषेमुळे ही विभाजणी झाली तिला ‘ड्युरांड रेषा’ म्हणतात. ही रेषा पख्तुनांना स्वाभाविकपणेच मान्य नाही. खरं तर १९६५ आणि १९७१च्या भारत-पाक युद्धकाळात पख्तुनीस्तानला स्वतंत्र होण्याची संधी होती. पण केवळ पाकला युद्धकाळात अडचणीत न आणण्याचा निर्णय काही पख्तून राष्ट्रवाद्यांनी घेतला. तो निर्णय चुकीचा होता हे आता पख्तुनांना समजलं असलं तरी राजकीय पटलावर बर्याच हालचाली झाल्या असल्याने पख्तुनांचा विद्रोह आज तरी सीमित आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की आज अफगाणिस्तानातील जवळपास ४५ टक्के लोकसंख्या ही पख्तुनांची आहे. पाकिस्तानातील पख्तुनीस्तान अफगाणिस्तानमध्ये यावा यासाठी अफगाणी सरकारने पूर्वी बरेच प्रयत्न केले असले तरी खुद्द अफगाणिस्तान तालिबान्यांमुळे यादवीत सापडल्याने पुढे पाक-अफगाण राजकीय चर्चेच्या पटलावर हा विषय मागे पडला. बलुच्यांची जशी स्वतंत्र संस्कृती आणि भाषा आहे त्याप्रमाणेच पख्तुनांचीही असल्याने पाकिस्तानचा प्रभाग म्हणून राहण्यात त्यांना विशेष स्वारस्य नाही. त्यात शिया-सुन्नी हा विवाद आहेच. पाकिस्तानातील बव्हंशी दहशतवादी घटनांमागे पख्तून आणि बलुची राष्ट्रवादीच असतात हेही इथे लक्षात घ्यायला हवं. या असंतोषाला भारतच (RAW मार्फत) खतपाणी घालतो हा पाकिस्तानचा जुना आरोप आहे. त्यात मुळीच तथ्य नसेल असं म्हणता येत नाही. किंबहुना ते संयुक्तिकच आहे. परंतु या प्रयत्नांना अधिक व्यापक आणि धाडसी स्वरूप देणं ही काळाची गरज आहे. भारत-अफगाण संबंध हे चांगले राहिले आहेत. याचं कारण म्हणजे तालिबानी राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी अफगाणिस्तानला मदत तर केलीच परंतु त्या राष्ट्राच्या नवउभारणी प्रक्रियेत सर्वात मोठं योगदानही दिलं. २०११ मध्ये भारताने अफगाणिस्तानशी भागीदारी करारही केला. रशियाच्या आक्रमणानंतर झालेला हा अफगाणिस्तानचा पहिला करार होता. ‘



भारत आमचं बंधुसमान असलेलं राष्ट्र आहे’ अशी प्रतिक्रिया अफगाणी विदेश मंत्रालयाने दिली होती. हे सारं खरं असलं तरी भारताचं विदेश धोरण अनेकदा धरसोडीचं राहिलेलं आहे. त्यामुळे मित्र राष्ट्रांचा हवा तेवढा फायदा करून घेण्यात भारताला अनेकदा अपयश आलेलं आहे. खरं तर पाकव्याप्त पख्तुनीस्तान अफगाणिस्तानात विलीन करवणं अथवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्याची निर्मिती करणं हे अफगाणिस्तानलाही फायद्याचं आहे. स्वतंत्र राष्ट्र बनल्यास अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये एक बफर राष्ट्र निर्माण होईल. आज अफगाणिस्तानात होणारे अमेरिकन ड्रोन हल्ले पाकिस्तानी भूमीतून केले जात असल्याने अमेरिकेबद्दल आणि अर्थातच पाकिस्तानबद्दल रोष आहे हेही एक वास्तव लक्षात घ्यायला हवं. अशा परिस्थितीत भारताने स्वतंत्र बलुचिस्तान आणि पख्तुनीस्तानला मोठ्या प्रमाणावर मदत करण्याची आवश्यकता आहे. सिंध आणि पंजाब प्रांत हा सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा असल्याने तेवढाच पाकिस्तान राहील. ही मदत अफगाणिस्तानातूनच पुरवता येईल अशा पद्धतीने व्यूहरचना करता येणं शक्य आहे. अफगाणिस्तानला त्यासाठी भारताला अधिकची मदत पुरवता यायला हवी. मैत्रीचे संबंध सर्व स्तरांवर अधिक दृढ कसे होतील यावरही लक्ष केंद्रित करता यायला हवं. यासाठी भारतीय नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्यायला हवा. किमान सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या पातळीवर लोकांना हे करता येणं अशक्य नाही.



नचिकेत सुरेश गुरव - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
पाकिस्तानी-चीनी ही एक अभद्र युती आहे. व्याप्त काश्मिरमधून पाकिस्तानने चीनला जोडणारा लष्करी महामार्ग बनवून दिला आहे. याबाबत भारताने कधीही तीव्र आक्षेप घेतला नाही अथवा तो रस्ता उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला नाही. भारत-पाक युद्ध झालं तर चीनची मदत अत्यंत वेगाने पाकिस्तानला मिळू शकते. अलीकडेच नवाज शरीफांच्या चीन भेटीत या महामार्गाचं माल वाहतुकीसाठी व्यापारी मार्गातही रूपांतर करण्याचं घाटत आहे. शरीफ यांच्या दृष्टीने पाक अर्थव्यवस्थेला या महामार्गाचं बळ मिळणार असलं तरी ती भारताच्या दृष्टीने मोठी कटकट ठरणार आहे. त्यासाठी भारताची रणनीती काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आपले संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी याबाबत बोटचेपं धोरण स्वीकारलं असल्याने ते निःसंशय टीकेस पात्र आहेत. चीनच्या सीमावादातील मुजोरीला भारत झुकला आहे असंच वरकरणी दिसतं. अशा परिस्थितीत चीनलाही शह द्यायचा असेल तर पाकिस्तानचं त्रिभाजन हाच पर्याय भारतासमोर असला पाहिजे. त्यासाठी भारताने प्रत्यक्ष युद्ध करण्याची गरज नाही. पख्तून आणि बलुच्यांमधील स्वतंत्रतेच्या जाज्वल्य भावनांना प्रोत्साहन देत त्यांना छुपी ताकद सर्वशक्तिनिशी पुरवली पाहिजे. अफगाणिस्तानबरोबरील संबंधांचा त्यासाठी उपयोग केला पाहिजे. तरच आपण खर्या अर्थाने पाकिस्तानचा धोका संपवू शकतो आणि चीनवरही अप्रत्यक्ष मात करू शकतो. पण गरज आहे ती इंदिराजींसारख्या दृढ निर्णय घेऊ शकणार्या पंतप्रधानांची आणि खर्याखुर्या राष्ट्रभावनांनी प्रेरित भारतीयांच्या सामूहिक इच्छाशक्तिची… आणि स्वतःच्या सहभागाचीही.



नचिकेत सुरेश गुरव - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
Bhartiya guptachar yantrana kadun ase prayatna chalu ahet ase aikun ahe. Jar kharach ase zale tar pakistani anvastre konakade jatil vaa jane aaplya hitache ahe ??
Yatil aaplyala faydyacha vaa kami upadravi kon asel ??
DJ Rajesh music lover - 19 de agosto de 2013 - denunciar abuso




भारत  या देशाकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका. कोन्ग्रेस च्या काळात तरी. भारतच्या ताब्यातील  छोटासा काश्मीर विभाग नीटपणे ताब्यात ठेवता आला नाही, तर पाकिस्तानच्या ताब्यातील बालुचीस्तानला कसली मदत करणार ?
आधी काश्मीर मध्ये हिंदुना सुरक्षित वातावरण तयार करा, जिहादी घटकांना नष्ट करा, मग पाकिस्तानचे काय ते बघत येईल.
किवा काश्मीर वरील नियंत्रण हि तुमची घटक चाचणी समजा. वार्षिक परीक्षेला अजून खूप वेळ आणि अभ्यास आहे.



Mangesh J - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
आपन  प्रयत्न करो या न करो ..पाकिस्तान त्याच्या  कर्माने याचे तुकडे होतील .....अणि मग अखंड भारताची सुरुवात ..
yashdeep joshi - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
सोनवणी सरांचा लेख आवडला . हा लेख जास्तीत जास्त ठिकाणी शेयर करा .
सलमान खुर्शीद, अहमद पटेल  इत्यादी लोकांकडून काहीही होणार नाही .
आपण अजून विचारच करत असलो, तरी पाकिस्तान "काश्मीर - केरळ - आसाम" इत्यादी भागांतील मुस्लिमांच्या भावना भडकावून भारताचे तुकडे पडण्यासाठी केव्हाचाच कार्यरत आहे .



१] सर्वांत पहिले म्हणजे - "नवाज शरीफला कारगिल युद्धाची कल्पनाच नव्हती" हा
मीडियाकडून पसरवण्यात आलेला गैरसमज तुम्ही डोक्यातून  काढून टाका.
नवाज शरीफ हा अत्यंत बदमाश- चालू माणूस आहे. स्वतः नामानिराळे राहून भारतविरोधी षड्यंत्र चालू ठेवायची हा त्याचा डावपेच आहे . भारतातील अनेक पत्रकारांना हि वस्तुस्थिती माहित आहे.
दुर्दैवाने सलमान खुर्शीद वगैरे मंडळी जेव्हा पाक-मैत्री इत्यादी गोष्टी करतात, तेव्हा कीव तर येतेच पण किळस वाटते .



२] दुसरा मुद्दा म्हणजे - पाकिस्तानचे राजनैतिक वर्तन पाहिले तर मला तरी त्यांच्यात "राष्ट्रीय अस्मिता" दिसलेली नाही . हिंदूंपासून वेगळे होऊन, प्रांत वेगळा करून , समस्त जगाला इस्लामी भूमी बनविण्याच्या जीहाद करण्यात योगदान देण्यासाठीच पाकिस्तानची निर्मिती झाली आहे.
माझ्या पुढील व्हिडियोमध्ये तुम्हाला त्याचा पुरावा सापडेल .
हे येथे सांगण्याचा उद्देश आगामी भागांत चर्चा करू .






yashdeep joshi - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
http://www.youtube.com/watch?v=gmPKUrLbgjg
yashdeep joshi - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
http://www.youtube.com/watch?v=UtWf4lTUt_I
yashdeep joshi - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
आधी काश्मीर मध्ये हिंदुना सुरक्षित वातावरण तयार करा, जिहादी घटकांना नष्ट करा, मग पाकिस्तानचे काय ते बघत येईल.
किवा काश्मीर वरील नियंत्रण हि तुमची घटक चाचणी समजा. वार्षिक परीक्षेला अजून खूप वेळ आणि अभ्यास आहे.



__________________
माननीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफजल गुरु आणि कसाब यांच्या दयेचा अर्ज झटपट फेटाळून अत्यंत अभिनंदनीय कृती केली . प्रतिभा पाटील यांना ५ वर्षांत हि सद्बुद्धि कशी काय झाली नाही, याचेच आश्चर्य वाटले .
लक्षात घ्या  - अजमल कसाब जगला काय मेला काय, पाकिस्तानला त्याची काहीही पर्वा नव्हती .
प्रणवदा आले, तेव्हा कुठे, देशाला अस्तित्वमान पंतप्रधान नसला, तरी किमान एक राष्ट्रपती तरी आहे, याची अनुभूती आली.
अजमल कसाब हा जगला काय किंवा मेला काय, पाकिस्तानला काहीही पर्वा नव्हती . कारण पाकच्या धर्मांध मुस्लिम लोकांसाठी जिहादी मार्गाने हिंदू निष्पाप लोकांच्या कत्तली करणारासुद्धा "जन्नतला' जात असतो, त्यामुळे कासाबला "जन्नतचे " सद्भाग्य मिळेल हि त्यांची समजूत.


दुसरीकडे पाकिस्तानात मध्यमवर्गच अस्तित्वात नसल्याने  व दारिद्र्यात जगणारी जनता भरपूर असल्याने त्यांना कसाब्चे वर्तमानविषयी काहीही माहिती नव्हती, तसेच त्यांना त्याविषयी जिज्ञासाही नव्हती .
तिसरे म्हणजे आय.एस. आय ने २६ - ११ चा हल्ला हा भारताचाच डाव आहे, असे सांगितल्याने कसाब हा आय.एस. आय वर विश्वास ठेवणा-यांसाठी कसाब केवळ बळीचा बकरा होता .
चौथे म्हणजे जे ०.१ % मानवतावादी लोक पाकिस्तानात असतील , ते स्वतःच मान्य करतात कि पाकिस्तान हा स्वतः निर्माण केलेल्या दहशतवादात गुरफटत चालला आहे,  त्यामुळे कसाब्च्या जीवनाचा अंत काय होणार याची त्यांना कल्पना होतीच .
हे येथे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे - जर  अफजल गुरूला - कसाबला फासावर चढविण्यास आपण नको तेवढी दिरंगाई करत असू , तर आपण स्वतः सैनिकांचे मनोबल खच्ची करत आहोत . कसाब आणि अफझल गुरु यांच्या फाशीचा विषय कोणी मुस्लिम व्होट-ब्यान्कशी जोडत असेल, तो तर देशद्रोही मानायला हवा.
दुर्दैवाने विक्रमी विदेशदौरे करणारे आधीचे राष्ट्रपती, त्याविषयी फार जागरूक दिसले नाहीत .





Kaustubh Gurav - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
Nachiket
100% agreed
Shailendrasingh Patil - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
नेहेमीप्रमाणे भारत बेसावध आहे. कदाचित सरकारने आता सैन्याला तयारीचे आदेश दिले असावेत. ती तयारी ह्या हिवाळ्यापर्यंत तरी संपणार नाही. तोपर्यंत जनमत बनवायचं आणि हिवाळा संपताच पाकिस्तानवर हल्ला करायचा असा प्लान असावा. ते युद्ध जिंकुन निवडणुकीला सामोरे जाणे कॉंग्रेसच्या सोयीचे होईल. भारताला युद्ध जिंकता येतात, नंतरच्या चर्चांमधे मात्र आपण सगळं गमावुन बसतो.
पाकिस्तानची शकले करायची असतील तर पाकिस्तानातील फ़ुटिरतावाद्यांना खुप पैसा पोहोचवता यायला हवा. जागतिक मिडियातुन तसा प्रचार करायला हवा. तो प्रचार शिगेला पोहोचला कि मग लष्करी कारवाई करुन तुकडे पाडता येतील.



Suyash ................. - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
आपल्या सैनिकांवर हल्ला झाल्यावर २ दिवसात क्वेटा  मध्ये स्फोट झालेत, जे अफगाण सीमेवर आहे
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन - 19 de agosto de 2013 - denunciar abuso
भारताचे तुकडे होत आहेत त्याचा विचार म्हत्वाचा.
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन - 20 de agosto de 2013 - denunciar abuso
Shailendrasingh Patil:


नेहेमीप्रमाणे भारत बेसावध आहे. कदाचित सरकारने आता सैन्याला तयारीचे आदेश दिले असावेत. ती तयारी ह्या हिवाळ्यापर्यंत तरी संपणार नाही. तोपर्यंत जनमत बनवायचं आणि हिवाळा संपताच पाकिस्तानवर हल्ला करायचा असा प्लान असावा. ते युद्ध जिंकुन निवडणुकीला सामोरे जाणे कॉंग्रेसच्या सोयीचे होईल. भारताला युद्ध जिंकता येतात, नंतरच्या चर्चांमधे मात्र आपण सगळं गमावुन बसतो.
पाकिस्तानची शकले करायची असतील तर पाकिस्तानातील फ़ुटिरतावाद्यांना खुप पैसा पोहोचवता यायला हवा. जागतिक मिडियातुन तसा प्रचार करायला हवा. तो प्रचार शिगेला पोहोचला कि मग लष्करी कारवाई करुन तुकडे पाडता येतील.
मुद्द्यात दम आहे...मोदी ला डिफ्युज करणा साठीचा उत्तम मार्ग..अर्थात लोक किति फसतिल व आर्थिक द्रुष्ट्या परवडणार का?



Ambareesh Phadnavis - 20 de agosto de 2013 - denunciar abuso

आगामी काळ कठीण आहे. २०२४ पर्यंत तरी कठीण आहे. २०१४-२०२४ हा बिकट काळ आहे. पाकिस्तानचे तीन तुकडे करणे वगैरे ठीक आहे, प्रॉब्लेम कसे करायचे हा आहे.
शैलेंद्रजी योग्य म्हणाले पण त्यात आणखीन एक पदर आहे जो त्यांनी सोडला आहे. पाकिस्तान च्या अस्तित्वाची सर्वात मोठी ग्यारंटी खुद्द दिल्ली स्थित भारतीय सत्तेने घेतली आहे. दिल्ली ची लॉबी (निव्वळ कॉंग्रेस नाही, तर भाजप चे देखील युपी आणि दिल्लीमधले काही नेते) पाकी लोकांशी पप्पी-झप्पी करत असते. जोवर हि लॉबी सत्तेत आहे, तोवर पाकिस्तान ला समूळ धक्का लावण्यात येणार नाही.
पाकिस्तान शी युद्ध म्हणजे चीन-अमेरिका-ब्रिटन या तीन देशांशी एकत्रित युद्ध आहे. भारताची ती तयारी नाही.
दिल्ली च्या या लॉबीला सत्तेत ठेवायला पाकिस्तान देखील एक लहान विजय भारताला देऊ शकतो. तुंडा चे हस्तांतरण देखील यातलाच एक भाग आहे.
निर्णायक लढाई किंवा संघर्ष दहा वर्षांनी होईल.. तोवर काश्मीर आणि (किंवा) पूर्वोत्तर भारत हातचा गेलेला असेल आणि भारतात मोठ्या प्रमाणात रक्तपात, दंगली आणि गृहयुद्ध सदृश परिस्थिती उद्भवलेली असेल. जर भारतीयांनी (बहुतांश हिंदूंनी) तेव्हा जागे होऊन प्रत्याक्रमण सुरु केले (प्रत्येक पातळीवर, समजेल त्याच शब्दात आणि कृतीत) तर भारत परत गेलेला भाग परत मिळवू शकतो. प्रत्याक्रमण सामाजिक पातळीवर, गुंडांच्या पातळीवर, सामरिक पातळीवर, वैचारिक पातळीवर सर्वात मुख्य म्हणजे धार्मिक आणि सांप्रदायिक पातळीवर होणे आवश्यक आहे. आणि ते होईल.



पण हे सगळे भीषण रक्तपातानंतर सुचलेली अक्कल असेल. पाकिस्तान चा बंदोबस्त करणे म्हणजे इस्लाम चे भारतीयीकरण आणि हिंदुकरण करणे.  हे महाराष्ट्रात सर्वांना आता पटणार नाही. पण किश्तवाड, कोक्राझार, बंगाल, केरळ, मेरठ, उत्तर-बिहार वगैरे ठिकाणी हिंदू लोकांना हे आता पटू लागले आहे.




Ambareesh Phadnavis - 20 de agosto de 2013 - denunciar abuso

आगामी काळ कठीण आहे. २०२४ पर्यंत तरी कठीण आहे. २०१४-२०२४ हा बिकट काळ आहे. पाकिस्तानचे तीन तुकडे करणे वगैरे ठीक आहे, प्रॉब्लेम कसे करायचे हा आहे.
शैलेंद्रजी योग्य म्हणाले पण त्यात आणखीन एक पदर आहे जो त्यांनी सोडला आहे. पाकिस्तान च्या अस्तित्वाची सर्वात मोठी ग्यारंटी खुद्द दिल्ली स्थित भारतीय सत्तेने घेतली आहे. दिल्ली ची लॉबी (निव्वळ कॉंग्रेस नाही, तर भाजप चे देखील युपी आणि दिल्लीमधले काही नेते) पाकी लोकांशी पप्पी-झप्पी करत असते. जोवर हि लॉबी सत्तेत आहे, तोवर पाकिस्तान ला समूळ धक्का लावण्यात येणार नाही.
पाकिस्तान शी युद्ध म्हणजे चीन-अमेरिका-ब्रिटन या तीन देशांशी एकत्रित युद्ध आहे. भारताची ती तयारी नाही.
दिल्ली च्या या लॉबीला सत्तेत ठेवायला पाकिस्तान देखील एक लहान विजय भारताला देऊ शकतो. तुंडा चे हस्तांतरण देखील यातलाच एक भाग आहे.



निर्णायक लढाई किंवा संघर्ष कदाचित दहा वर्षांनी होईल.. तोवर काश्मीर आणि (किंवा) पूर्वोत्तर भारत हातचा गेलेला असेल आणि भारतात मोठ्या प्रमाणात रक्तपात, दंगली आणि गृहयुद्ध सदृश परिस्थिती उद्भवलेली असेल. जर भारतीयांनी (बहुतांश हिंदूंनी) तेव्हा जागे होऊन प्रत्याक्रमण सुरु केले (प्रत्येक पातळीवर, समजेल त्याच शब्दात आणि कृतीत) तर भारत परत गेलेला भाग परत मिळवू शकतो. प्रत्याक्रमण सामाजिक पातळीवर, गुंडांच्या पातळीवर, सामरिक पातळीवर, वैचारिक पातळीवर सर्वात मुख्य म्हणजे धार्मिक आणि सांप्रदायिक पातळीवर होणे आवश्यक आहे. आणि ते होईल. नाहीतर पाकिस्तान एकदा तोडून भारताला फारसे काहीही मिळाले नाही, फक्त दोन पाकिस्तान मिळाले. बांगलादेश हा दिल्लीच्या लॉबी साठी चांगला असेल, आसाम आणि बंगाली आणि मणिपुरी आणि त्रिपुरी लोकांसाठी, इथल्या हिंदूंसाठी आणि खुद्द बांगलादेशातल्या हिंदूंसाठी बिलकुल फरक नाही. त्यामुळे अजून तीन तुकडे केले कि बांगलादेश सारखे दिल्ली च्या सरकार शी मैत्री ठेवणारे तीन वेगळे देश तयार होती. दक्षिण आशिया खंडातल्या हिंदूंच्या नशिबातली साडेसाती काही संपणार नाही.
पण हे सगळे भीषण रक्तपातानंतर सुचलेली अक्कल असेल. पाकिस्तान चा बंदोबस्त करणे म्हणजे इस्लाम चे भारतीयीकरण आणि हिंदुकरण करणे.  हे महाराष्ट्रात सर्वांना आता पटणार नाही. पण किश्तवाड, कोक्राझार, बंगाल, केरळ, मेरठ, उत्तर-बिहार वगैरे ठिकाणी हिंदू लोकांना हे आता पटू लागले आहे.


पाकिस्तानी सेनेचा संपूर्ण विनाश (मी शारीरिक विनाश म्हणतोय) आणि तो मुलुख भारताच्या सेनेच्या संरक्षणाखाली ७०/८० वर्षे ठेऊन आणि तिथे विहिंप वगैरे संस्थांना संपूर्ण प्रोटेक्शन देऊन धर्मप्रसार केला कि २-३ पिढ्यांनंतर "कदाचित" धार्मिक लोकांची पैदावार तिथे सुरु होईल. तोवर भारताने आणि हिंदूंनी खमके राहणे आवश्यक आहे. त्या आधी गंगेच्या खोऱ्यात कार्यरत असलेले जिहादी नेटवर्क नेस्तोनाबूत करावे लागेल, मगच वरील पाउल उचलता येईल. आणि वरील पाउल उचलायला दिल्ली बाहेरचे नेते सत्तेत किमान दहा वर्षे तरी असायला हवेत जेणेकरून निवडणूक प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा करून मतपेटी चे राजकारण कमी करता येईल.




Este comentário foi removido.
Ambareesh Phadnavis - 20 de agosto de 2013 - denunciar abuso

सिद्धेश, नाही.. एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे या विचार प्रणाली मध्ये..
चीन भारताशी दीर्घकाळ मैत्री का करेल? चीन ला भारताकडून असे काय मिळेल जे आता मिळत नाही? जर दीर्घकाळ मैत्रीची कमिटमेंट न करता व्यापाराचे सगळे फायदे मिळत असतील तर मैत्रीची कमिटमेंट कुणी का करावी? वही सफेदी वही झाग कम दाम मे मिले तो कोई ये क्यू ले, वो न ले?
भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तानच्या मदतीला अमेरिका सहज येऊ शकतो कारण सौदी, बहरैन आणि हिंदू-महासागरात दिएगो गार्सिया नावाच्या बेटावर अमेरिकेचे आणि इंग्लंड चे खूप मोठे लष्करी तळ आहे. अमेरिकेचे पाचवे आणि सातवे आरमार सिंधूसागरात तैनात आहे. जवळपास एक लक्ष सैनिक आहेत. त्यामुळे एक वेळ चीन नाही येऊ शकणार, अमेरिका सहज येईल..
अधिक अमेरिकेला प्रत्यक्ष काहीही करायची गरज नाही. मदत म्हणून जी रक्कम ते पाकिस्तान ला देतात ती रक्कम वापरून पाकिस्तान अमेरिकी शस्त्रास्त्रे, सामग्री, विमाने वगैरे विकत घेतो. या सगळ्यांना वरून अमेरिकी उपग्रहांचा सपोर्ट असतो. माझ्या काही सेनेतल्या ओळखीच्या लोकांनी मला सांगितले कि ऑपरेशन पराक्रम च्या वेळेस पाकिस्तानला अमेरिका भारतीय वायुसेनेबद्दल माहिती पुरवीत होता. माहिती म्हणजे खरी खुरी रियलटाईम इंटेलिजन्स.. कुठल्या भारतीय बेस वरून कुठल्या क्षणी कुठले विमान उडत आहे हे सगळे वरून उपग्रहांद्वारे बघून ती माहिती पाकिस्तान ला पुरवली तर आक्रमण करून फायदा काय?



सगळी लष्करी डावपेच कोलमडून पडतात जर तुमची प्रत्येक हालचाल शत्रू बघत असेल आणि तुम्ही ती बघू शकत नसाल तर.
भारत १/२ महिने चालणाऱ्या युद्धात कोलमडून पडेल. कारण आपले उत्पादन क्षेत्र फार कमकुवत आहे. पहिल्या झटक्यात काही शे विमाने, रणगाडे वगैरे निकामी झाली कि इंडस्ट्री ने तितक्या गतीने नवीन विमाने, रणगाडे वगैरे निर्मिती करून सेनेला तत्परतेने पुरवले पाहिजे. जर्मनी ५ वर्षे दोन आघाड्यांवर असा शुरतेने लढू शकला कारण त्यांचे उत्पादन क्षेत्र सॉलिड तगडे आहे.



सेवा क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था युद्धतत्पर कधीही नसते. आपल्या कडे सध्या mechanical engineers, electrical engineers, गणितज्ञ, भौतिकशास्त्री, रसायनशास्त्री, भाषाशास्त्री वगैरे पोरांची खूप कमी आहे. सगळे पोरे सरसकट कम्प्युटर करतात आणि मग एम्बीए करतात. करियर म्हणून ठीक आहे, पण असे देश कधीही एक मोठी शक्ती म्हणून उभारू शकत नाहीत, सोरी..



रशिया कम्युनिस्ट नाही आहे. आणि त्यांची युद्ध करायची ऐपत नाहीये.
Ambareesh Phadnavis - 20 de agosto de 2013 - denunciar abuso
इंग्लंड आणि अमेरिकेचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे.
जगात कुठल्याच सत्तेने एका समूहाला असे सहजतेने नाही नाचवले जितक्या सहजतेने अमेरिका-इंग्लंड सुन्नी-मुस्लीम लोकांना नाचवते..
जेव्हा या १९२४ नंतर च्या कालखंडाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो इतिहासकार अमेरिकेचे आणि इंग्लंडचे (मुख्यत्वे इंग्लंड) तोंडभरून कौतुक केल्याशिवाय नाही राहणार आणि सुन्नी लोकांची चेष्टा केल्याविना नाही राहणार.. कुणी डोक्याने इतके पैदल कसे काय असू शकते, हा प्रश्न मला वारंवार पडतो.. हे लोक अमेरिकेला शिव्या तर घालतात पण त्यांच्याच मैला वाहतात आणि त्यासाठी वाट्टेल ते करतात..
Kaustubh Gurav - 20 de agosto de 2013 - denunciar abuso
जगात कुठल्याच सत्तेने एका समूहाला असे सहजतेने नाही नाचवले जितक्या सहजतेने अमेरिका-इंग्लंड सुन्नी-मुस्लीम लोकांना नाचवते..
+1
नचिकेत सुरेश गुरव - 21 de agosto de 2013 - denunciar abuso
@ ambareesh, shailendra
+1




SANDESH, HOW GREEN WAS MY VALLEY - 21 de agosto de 2013 - denunciar abuso


चीन आणि पाकिस्तानच्या चीथावण्या नैराश्यातून निर्माण झालेल्या आहेत सध्याच्या परिस्थितीत युरोपियन समूहातील देश
चीन च्या ऐवजी भारतामधून माल आयात करण्यास इच्छित आहेत. एकतर त्यांची मागणी थोडी कमी झालेली आहे आणि जेव्हढी त्यांची गरज आहे तितका माल एकटा  भारत त्याना पुरवू शकतो. बांगलादेशातून पण तिथे मोठ्या प्रमाणात निर्यात त होते शिवाय त्यांचा माल   थोडा स्वस्त पण आहे . पण तिथे राजकीय स्थैर्य नाही. तुलनेने भारतात ते आहे.  भारताला मिळणारा फायदा पाहून  चीन पाकिस्तान बांगलादेश या सगळ्यांच्या पोटात दुखणे स्वभाविक आहे. त्यामुळे भारतात अस्थिरता निर्माण करायचा प्रयत्न ही शेजारी राष्ट्रे करत आहेत. यांना पुरून उरायचं असेल तर आपसातील मतभेद विसरून एकजुटीने सामंजस्याने    लढा द्यायला हवा .

No comments:

Post a Comment