आज ३ एप्रिल ... काही शहाणे लोक तारखेनुसार छत्रपती शिवाजी राजांची पुण्यतिथी साजरी करत आहेत... काही संघटनांना अश्या दिवशी जातीवादाचे विष ओकायची फार सवय असते.... पुण्यातीठीच्या पोस्ट सोबतच शिवाजीराजांचा खून कसा झाला आणि तो ब्राहमणांनी कसा केला या बद्दलचे भरमसाठ म्यासेजेस watsapp वर येत आहेत.... यातून ब्राहामान कस यांनी किती जातीयवादी आहेत हे दाखवून मराठी समाजात विष पसरवायचा प्रयत्न करण्यात येतोय ...
हि तीच मंडळी आहेत ज्यांनी एक आठवड्यापूर्वी तिथीनुसार मृत्युंजय अमावस्या मनवली. तेव्हाही संभाजी राजांना ब्राह्मणांनी मारले व त्यांचे डोके भाल्याच्या टोकात खोचून मिरवले व तेव्हापासून गुढीपाडवा सुरु झाला वगरे वगरे फुकटचे अज्ञान पाजले गेले होतेच..... प्रश्न असा पडतो कि हेच लोक शिवाजी राजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करायला नकार देतात ... म्हणतात कि तुमचा वाढदिवस पण तिथीप्रमानेच साजरा करा....
मग संभाजी राजांच्या मृत्यू ची तिथी कशीकाय चालते यांना तीसुद्धा तारखेप्रमाणेच साजरी करत जा ना तुम्ही लोक ..तेव्हा कशाला गुढीपाडव्याच्या आधीची तिथी मानता ???? आणि हो मग बुद्ध जयंती पण तारखेनुसारच साजरी करायला हवी...तेव्हा कुठे जाते यांची अक्कल ?? जर ब्राह्मणांनी शिवाजी संभाजी मारले तर मग ह्या जातीवाद्यांचे बाप लोक तेव्हा काय करत होते ? बर तेव्हा अक्कल नव्हती असे मानले तर मग आज का शेतकऱ्यांच्या आणि दलित आदिवासींच्या समस्या तुम्ही सोडवत नाही आहात... नुसत संघटना काढून लेखणीचा गैरवापर करायचा याशिवाय काय येत यांना ???
तिथी ,हिंदू पंचांग पद्धती ,अमावस्या पोर्णिमा या सर्व जर ब्राह्मणांनी बहुजांना लुटायला निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत तर मग तुम्ही का मानता हे सर्व ? एकीकडे म्हणायचं कि पोथ्या पुराने वेद रामायण महाभारत हे सर्व ब्राह्मणांनी बहुजनांना लुटायला जन्माला घातलेले आहे ..आणि मग याच्याच आधारे शाम्बुकाची कथा लिहायची आणि पसरवायची पण शुद्र स्त्रीची उष्टी बोरे खाणारा राम मात्र दाखवायचा नाही... त्याच रामायणातला...शुद्र केवटाला आलिंगन देणारे राम मात्र दाखवायचे नाही... अत्याचारी ब्राह्मण असलेल्या रावणाला मृत्युदंड देणारे क्षत्रीय रूप राम मात्र जाणून दुर्लक्षित करायचे..... ब्रिगेडच्या उत्पत्तीची बीजे ज्योतिबा फुलेंच्या साहित्य्त आहेत असे कुठे ऐकले होते ..ते खरेच निघाले .... एकीकडे एवढे मोठे सामाजिक कार्य आणि गुलामगिरी सारखे खोटे द्वेष पसरवणारे साहित्य लिहून माझ्या मनात तरी आज ज्योतिबा फुलेन्बद्दल थोडा सन्मान कमी झालाय.... संस्कृत भाषा आणि तिच्यातल्या सर्व साहित्याला जातीय अंधश्रद्ध म्हणून एकीकडे नाकारायचे आणि तिच्याच साहित्यातल्या बळी राजाच्या गोष्टी वाचून तिला जातीय रंग द्यायचा.... बळी आणि वामन हे दोघेही कश्यप मुनींचे पुत्र तरीही एकाला ब्राह्मण व एकाला क्षत्रिय ठरवून जातीवाद पसरवायचा.... पर्शुरामावर पोवाडा लिहायचा ..म्हणे परशुरामाने सर्व क्षत्रिय मारले.... तुम्ही बहुजनी लोक गेला होतात का हे सर्व बघायला ... परशुरामच्या नंतरचे हनुमानजींचे आकाशात उडणे हि अंधश्रद्धा पण परशुराम हि श्रद्धा... वाह रे वाह....... आपण मराठी लोक ह्या सगळ्या फुकाच्या हिंदुत्व वादात आणि विरोधात गेली १५० वर्षे गुरफटलो जतोय याची जाणीवच नाहीय आपल्याला ...... याच काळात गुजराथी मारवाडी जैन सिंधी पंजाबी मात्र अटकेपारच नव्हे तर संपूर्ण जगात आपली अर्थसत्ता मिरवत आहेत.... अगदी कॅनडाच्या द्वितीय भाषेपर्यंत पंजाबी भाषेनी मजल मारलीय.....आपल्या मेहनतीच्या एकोप्याच्या कर्तुत्वाच्या गुढ्या या व्यापार्यांनी जगभर रोवल्या आहेत .आणि आपण मराठी अभिजात कि संस्कृतोद्भव याच वादात रमतोय..... इथे शाळा बंद पडतायत इंग्रजीमुळे नुकसान होतेय मराठीचे ते राहिले दूरच... अर्थव्यवस्था हि उत्पादन आणि विक्री या तत्त्वावर चालते आणि महाराष्ट्रात हे क्षेत्र वरील पाच पांडवांनी बर्यापैकी व्यापून घेतलेय... आपल्या राज्याची आर्थिक आणि त्य्द्वारे निर्भर असलेली राजकीय समीकरणे आणि सत्तांतरे आता हि मंडळी जुळवू लागली आहेत... आणि आपण मात्र ब्राह्मण द्वेष आणि पेठेतला ब्राह्मणवाद करण्यात मग्न आहोत....
राहता राहिला प्रश्न हिंदुत्वाचा म्हणजे सेनेच व संघाचा टा आज प्रत्येक राज्याला स्वतःचे लोकसंख्येवर मतदानावर आधारित स्वशासन आहे आज काही अहिल्या आणि राणी लक्ष्मीबाई बनून मराठ्यांना उत्तरेत तलवार गाजवायची संधी नाही आणि आवश्यकताही नाही... मग हवेय कशाला फुकटचे हिंदुत्व.... भाजप नावाचा पक्ष महाराष्ट्रानीच देशाला दिलाय बघून घेतील त्याचं ते आपण कशाला आम्ही हिंदू वगरे वगरे प्रयत्न करायचे... आपल्या मराठी समाजाच काय ते बघा .... उद्या रामनवमी आहे न्याय्कारी राजा रामाच्या जन्मदिवसाच्या तिथीनुसार मनोमय शुभेच्छा.......
No comments:
Post a Comment