Sunday, 26 February 2017

नकारात्मक्तेचे भावविश्व : A PSYCHLOGICAL TRIAL


नमस्कार राजे..... कसे आहात ? ... गेली २०-२५ दिवस प्रकृती बरी नसल्यामुळे वाचन आणि लेखन पूर्णतः बंद होते .... पण चिंतन आणि मनन सुरूच असते सदैव ... त्यावर कोणीही रोक लावू शकत नाही.... गेली १० वर्षे महाराष्ट्रीय आणि भारतीय समाजात जे जे काही घटीत होत गेले ते ते सर्व एका वेगळ्या पद्धतीने मी बघायला शिकलो ...... आजकाल सर्व बाबींकडे मानसशास्त्रीय दृष्टीने बघ्ण्याची नितांत गरज आहे.....  शेवटी या एकविसाव्या शतकात .... PSYCHLOGY HAS BECAME PROVED BIOLOGICAL SCIENCE… म्हणजेच आत्ता मानस शास्त्राला वैद्यक शास्त्रीय  आधार प्राप्त झालाय...आता सायन्स मानस शास्त्राला मानायला लागलाय ..  विविध देशांमध्ये याबाबब्त्चे कित्येक प्रयोग आणि सर्वेक्षणे करण्यात येत असतात .... त्याद्वारे हे आता स्पष्ट झालेले आहे....कि माणसांनी मानव समाजानी आपले मानस सांभाळले तरच संपूर्ण मानव समूहाचे कल्याण होईल....

जे आज अमेरिकेच्या संशोधनातून दिसते ते कित्येक वर्षांआधीच आपल्या धर्म ग्रंथांमध्ये होते... शाबरी कवच सांगते कि
“सर्वव्याधी भय स्थाने मनसास्य तु चिन्तानम”  म्हणजे सर्व व्याधींच्या मुळात मनाचे चिंतन कारणीभूत आहे.... अर्थात आपण जसा विचार करतो तसे आपण बनत जातो.... म्हणून चांगला विचार करा... खूप चांगले वाचन करा आणि आनंदी आयुष्य जागा .....
 Image result for be positive images
पण सर्वत्र चांगले व्हावे हे काही विघ्नसंतोषी लोकांना पचत नाही... आणि यातून मग विविध संघटना जन्माला येतात ... बहुतांश डाव्या पुरोगामी बहुजनी आणि इतर अंशतः उज्व्यासुद्धा....

भारताला शस्त्राणि युक्तिनी आदी आदी कुठल्याही साधनांद्वारे गुलाम करता येत नाही हे ब्रिटिशांना चांगलेच माहित  होते... कारण इतर सर्वच क्षेत्रात भारत जगात पुढे होता फक्त एक क्षेत्र ते म्हणजे मनोबलाच..मानस शास्त्रच यात भारत निश्चितच इंग्रजानएवढा प्रगत नव्हता....म्हणूनच भारताला मानसिक गुलामगिरी च्या जोखडात टाकण्या  साठीचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले...   

जेव्हा इंग्रज आले तेव्हा भारतात अस्पृश्यता जातीवाद महिला अत्याचार शिक्षणाचा अभाव विकासाचा अभाव या सर्व समस्या होत्या ....यावरूनच काय ते ब्रिटिशांनी तुम्ही भारतीय लोक काळे तुम्ही अशिक्षित मागास ,तुमचा धर्म जातीवाद मानायला शिकवणारा आहे ,बहुजन विरोधी आहे, तुमच्याकडे technology नाही अर्थात जे जे काही भारतात तेव्हा नव्हते त्यासाठी इथल्याच लोकान्ना दोषी ठरवायचे आणि भारतीयांच्या मना मध्ये स्वतःच्या देश भाषा समाज धर्म आदींबद्दल नकारात्मकता पेरायची .... आपणच आपल्या देशाचे भाषेचे समाजाचे शत्रू बनायला हि psychlogical strategy ब्रिटिशांनी अमलात आणली ... यामुळेच कित्येक भारतीय लोक ब्रिटिशांना समर्थन देऊ लागले..आणि आपल्याच लोकांना स्वतःकडे खिचून फक्त एक लाख इंग्रजांनी तब्बल ३० कोटींचा भारत गुलाम केला....

जेव्हा माणसावर हे सगळे डाव खेळले जातात .... तेव्हा वारंवार त्याला नकारात्मकता दाखवली जाते.... असे किमान २०-२५ वेळा केले कि त्या गोष्टीचा आजन्म पगडा त्याच्यावर बसत असतो.... गोबेल्स law तर फक्त दहा वेळा खोत बिंबवल तर अकराव्यांदा माणूस खोट्यालाच सत्य माणू लागतो असे सांगतो...हेही त्याच्या जवळचेच आहे.... जेव्हा एखादा समाज या नकारात्मकतेच्या पाशी जाळ्यात अडकून बसतो ..तेव्हा त्याच्या बुद्धीवर कायम कुलूप ठोकले जाते.... भुलभुलैय्या चित्रपटातल्या भैरव कावाचासारखे....
असे लोक स्वतःची बुद्धी वापरूच शकत नाही आणि चार्वाकाचा बुद्धिप्रामाण्यवाद मागे पडतो.... आजही बर्याच प्रमाणात आपण या मानसिक गुलामीत आहोत....

काही उदाहरणे देऊन हा लेख संपवतो.....
माझे काही मित्र आणि फुलेन्सारखे विचारक सुद्धा म्हणतात कि ब्रिटीश आले नसते तर आपण मागास राहिलो असतो ...अविकसित झालो असतो... ब्रिटिशांनी म्हणे भारत विकसित केला... जर हे खर असते तर मग ब्रिटिशांनी तब्बल १० मेट्रिक टन क्षमतेच्या लाखो जहाजांमधून भारातले सोने का त्यांच्या देशात नेले...२५० वर्षे या देशात इंग्रज काय करत होते .... इथला हिरा या सगळ्या गोष्टी का नेल्या.... आणि राहिला प्रश्न विकासाचा तर आज आपण जास्त पुढे आहोत १९४७ च्या तुलनेत...  सर्व काही जर इंग्रजांनी केल असते तर मग आंबेडकर सावरकर सावित्रीबाई ताराबाई  शिंदे  या लोकांच काय? हे की कांचे खेळत होते ???

इंग्रज नव्हते तर काय भारतीय लोक कपडे घालत नव्हते खात पीत नव्हते पक्क्या चिरेबंदी वाड्या व किल्ल्यांमध्ये राहत नव्हते?
एवढा जुना आयुर्वेद जो आजही चालतोय... हा काय यांनी दिला आम्हाला?


Image result for be positive images




यासारखेच काही ब्रिगेडी लोक मानसिक गुलम झाले आहेत त्यांना त्यांचा मालक जेवढी पिन मारतो तेवढेच ते रोबोट सारखे ब्राह्मण विरोधात बोलत असतात... आज सावरकर जयंती... तर सावरकरांचे १० दोष असलेली पोस्ट आली.. अर्धेअधिक त्यात खोटे होते ..बाकीचे खरेही असेल ... पण एवढ्या महान क्रांतिकारकाच्या एवढ्या २८ वर्षच्या बलिदानाला, त्यांच्या कवित्वाला , साहित्याला फक्त ५-१० गोष्टींमुळे गालबोट लावायचं ९९.९९% चांगल्या गोष्टी सोडायच्या आणि ०.०१% नकारात्मकता वारंवार प्रसार माध्यमे, बहुजनी निंदा साहित्याद्वारे समाजापर्यंत पोचवायचे.... दोष सर्वत्र असतात आपल्यातही आहेतच न मग तेच ते वारंवार का पुढे आणायचे ? सकारात्मकता का नाही....  सावरकरांनी दलिताच्या मुंजी केल्या वेद शिकवून पौरोहीत्य दिले,,, हे जाणून लपवायचे...
.
...... ब्राह्मणांना बहुजन समाजाच्या गुलामिसाठी दोषी धरायचे...म्हणे ५०००० वर्षे आम्ही गुलामीत होतो... मग याला दोष कोणाचा तुम्ही विरोध नाही केला त्याचा... आणि आज हे सांगून दलितांचा बहुजनांचा काय फायदा आहे... आज सर्वत्र समानता आलीय समाजात....सर्व ज्ञान संगीत नृत्य भाषा यापासून जे लोक वर्षानुवर्षे दूर होते त्यांनी आपले जीवन आता सर्व ज्ञान मिळविण्यात घालवावे...आपल्या पिढीला ब्राह्मण अथवा हिंदुद्वेषी बनवून त्याचं कोणत भल हणार आहे.....

मराठे शुद्र होते आणि म्हणून आरक्षण अधिकारी आहेत..ब्राह्मणांनी म्हणे आपल जेवढ नुकसान केल ते केल.... आता पुढच बघा... असे मला एका बहुजन आंदोलनकर्त्या माणसांनी म्हटल होत.

तेव्हा मी गप्प बसलो पण नंतर विचार करून चांगलीच उतरवून ठेवली... नुसता जातीवाद पसरवल्या जातोय समाजात... गेली ५५ वर्षे बहुजन विशेषतः मराठ्यांच्या हाती सत्ता होती... मग मराठा समाजाचा विकास का नाही झाला? सर्वात मोठी शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्था शरद पवारांच्या हातात आहे...राज्यातले ७०%  शिक्षण संस्था ,साखर व इतर कारखाने मराठ्यांच्या ताब्यात आहेत, सर्वात जास्त आमदार मराठा, दिल्लीत वर्षानुवषे मराठा पकड आहे मग तरी मराठे मागास का? यात ब्राह्मणांच कसला दोष? आरक्षणासाठी रस्त्यावर याव लागतय ..... एवढी दयनीय अवस्था कोणी केली या समाजची? यांच्यातल्याच १% सत्ताधीशांनी .... बहुजन जर एवढेच चांगले असतील तर मग मराठा शिक्षण संस्था चालाकान्नी management कोट्यात मराठ्यांना आरक्षण द्यावे आणि फी कमी घ्यावी , कारखान्यांमध्ये मराठ लोकान्ना नोकर्या द्या पण हे ऊस पट्टे वाले चोर अत्यंत कमी पैश्यात परप्रांतीयांना राबवून घेतायत हे नाही रे दिसत तुम्हाला.... त्यांना इथे बोलावून इथला माणूस जो आपल्या जातीचा आहे तो उपाशी मारणारे हे हलकट राजकारणी जे तुमच्याच जातीचे आहेत त्याचं काय?

ब.ग. शिर्के एक अत्यंत हुशार मराठा industrialist यांनी स्व कर्तुत्वावर स्वतःची कंपनी स्थापन केली आणि लोकांना नोकरीला लावले,,,,,... या फुकट्या ब्रिगेडी बहुजनी संघटनांनी काय  केल रे समाजासाठी ? नुस्त लेखणी आणि तोंड वापरून एका जातीच्या लोकांना शिव्या मारत बसायच्या .... छोटे उद्योग सुरु करा ..नुस्त नकारात्मक ऐकून वाचून शरीराच्या तीन संस्था निकामी होतात ....हे विज्ञानच सांगतय आज.......

 आरक्षण मिळाल तरी सरकारी नोकर्या फक्त ३% आहेत... शेवटीं अर्थव्यवस्था हि उत्पादन आणि विक्रीवर चालते आणि या क्षेत्रात गुज्जू मारवाडी पंजाबी जैन सिंधी यांनी आधीच शिरकाव केलाय पण अजूनही वेळ गेली नाही....  एक किर्लोस्कर शिर्के पवार पेंढारकर आपण होऊ शकतो ... नाही काही तर ४-५ लोकांना नोकरील लावू शकतो...

बहुजनांनो बुद्धिवादी व्हा ..बुद्धीने विचार करा तुमच खरा विरोधक कोण? हि नकारात्मकता जी तुम्हाला गुलाम बनव्तीय ती कि या अन त्या जातीचे लोक?
मराठ्यांनो विचार करा.... स्व बुद्धीने जगा.... 

Image result for albela sajan aayo re

ब्रिगेडी मानसिकतेत गुरफटन्या पेक्षा कधी अहिर भैरव ऐकून बघा.... कधी पुरिया धनश्री गाऊन बघा.... अगदी आत्म्यातल्या शेवटच्या कप्प्यापर्यंत सर्वत्र सुखच सुख .....आनंदच आनंद.... मधुरताच लाभेल.....



चला जय महारष्ट्र .....
जयस्तु मराठा ......


No comments:

Post a Comment