Thursday, 2 February 2017

गांधीवध दिना निमित्त ....


•••••••••••••••••••••••••••••••••••••
कुणी वंदा, कुणी निंदा… 
पण एका "महात्म्यानेच" करून ठेवलाय या देशाचा वांदा.
तोच म्हणाला होता की "हिंदू - मुस्लिम" भाऊ भाऊ….

                                     Image result for gandhi anti hindu
असेच जर होते तर त्यांनी मुस्लिमांना का केले पाकिस्तान देऊ???
एका "पंडितलाच" जर करायचे होते पंतप्रधान तर अखंड भारताचाच केला असता…
काश्मीर मधलाही हिंदू पंडित मग भारतात असा निर्वासित झाला नसता. 

खेळली असती कि दोन्ही "भावंडे"(?) खेळीमेळीने - गुण्या गोविंदाने…
गेले नसते घडवले मग बॉम्बस्फोट देशात गुरु अफजल, सालेम अन दाऊद ने.  
ओवैसी बंधुनीही मग श्रीराम धून अन वन्दे मातरम मनापासून गायलं असतं….
                                           Image result for gandhi
घेऊन हातात भगवं निशाण यांनीही गगनी उंच फडकावलं असतं.
"महात्म्या" अरे तू छत्रपति अन महाराणाना जर पथभ्रष्ट म्हटलं नसतं….,
भगतसिंहाच्या फाशीच्या वेळेस इंग्रजांना धारेवर धरलं असतं…,
खिलाफत चळवळीचं स्तोम भारतात माजवलं नसतं…,

अब्दुल रशीद प्रमाणेच श्रद्धानंदनाही तु  "भाऊ" म्हटलं असतं…,
मोपल्यांनी केलेल्या बंडाच्या वेळेस जर हिंदूंसाठी उपोषण केलं असतं… ,
"देश तोडण्याआधी माझे तुकडे करा" हे मागणं रेटून धरलं असतं…,
तर नथुरामनेही तुझ्या अंगावर कधीच पिस्तुल ताणलं नसतं…

अन आम्हीही तुला मनापासूनच "महात्मा" मानलं असतं.
कुणी वंदा, कुणी निंदा… 
पण एका "महात्म्यानेच" करून ठेवलाय या देशाचा वांदा.
🚩🚩🚩


No comments:

Post a Comment